SunderKanda Part 6
दोहा—कपि के बचन सप्रेम
सुनि उपजा मन बिस्वास ।
जाना मन क्रम बचन यह
कृपासिंधु कर दास ॥ १३ ॥
हनुमानाचे प्रेमळ बोलणे
ऐकून सीतेच्या मनात विश्वास वाटू लागला. हा कायावाचामनाने कृपासागर रघुनाथांचा दास
आहे, हे तिने जाणले. ॥ १३ ॥
हरिजन जानि प्रीति अति गाढ़ी
। सजल नयन पुलकावलि बाढ़ी ॥
बूड़त बिरह जलधि हनुमाना ।
भयहु तात मो कहुँ जलजाना ॥
भगवंतांचा सेवक आहे,
असे समजल्यावर सीतेला त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटू लागले. नेत्रांमध्ये अश्रू
दाटून आले आणि शरीर अत्यंत पुलकित झाले. सीता म्हणाली, ‘ हे वत्स, हनुमाना,
विरहसागरात बुडत असलेल्या मला वाचवण्यासाठी तू जहाज बनून आलास. ॥ १ ॥
अब कहु कुसल जाउँ बलिहारी ।
अनुज सहित सुख भवन खरारी ॥
कोमलचित कृपाल रघुराई । कपि
केहि हेतु धरी निठुराई ॥
मी तुझ्यावरुन जीव
ओवाळून टाकते. आता लहान बंधू लक्ष्मणासह खर राक्षसाचे शत्रू, सुखधाम असलेल्या
प्रभूंचे क्षेम-कुशल सांग. श्रीरघुनाथ हे तर कोमल हृदयाचे व कृपाळू आहेत. मग हे
हनुमाना, माझ्यावरच ते काय म्हणून निष्ठुर झाले ? ॥ २ ॥
सहज बानि सेवक सुखदायक ।
कबहुँक सुरति करत रघुनायक ॥
कबहुँ नयन मम सीतल ताता ।
होइहहिं निरखि स्याम मृदु गाता ॥
सेवकाला सुख देणे हे
त्यांचे ब्रीद आहे. ते श्रीरघुनाथ कधी माझी आठवण काढतात काय ? हे तात, त्यांचे
कोमल सावळे रुप पाहून माझे नेत्र कधी तृप्र होतील काय ? ॥ ३ ॥
बचनु न आव नयन भरे बारी ।
अहह नाथ हौं निपट विसारी ॥
देखि परम बिरहाकुल सीता ।
बोला कपि मृदु बचन बिनीता ॥
सीतेच्या मुखातून शब्द
फुटत नव्हता. नेत्रांमध्ये विरहाचे अश्रू भरुन आले. ती दुःखाने म्हणाली, ‘ हे नाथ,
तुम्ही मला अगदीच विसरुन गेलात.’ सीतेला विरहाने अतिशय व्याकूळ झाल्याचे पाहून
हनुमान कोमल व नम्र वाणीने म्हणाला, ॥ ४ ॥
मातु कुसल प्रभु अनुज समेता
। तव दुख दुखी सुकृपा निकेता ॥
जनि जननी मानहु जियँ ऊना ।
तुम्ह ते प्रेमु राम कें दूना ॥
‘ हे माते, सुंदर
कृपेचे धाम असलेले प्रभू बंधू लक्ष्मणासह सुखरुप आहेत, परंतु ते तुझ्या दुःखामुळे
दुःखी आहेत. हे माते, मनात दुःख करु नकोस. श्रीरामांच्या मनात तुझ्याहून दुप्पट
प्रेम आहे. ॥ ५ ॥
दोहा—रघुपति कर संदेस अब
सुनु जननी धरि धीर ।
अस कहि कपि गदगद भयउ भरे
बिलोचन नीर ॥ १४ ॥
हे माते, आता धीर धरुन
श्रीरामांचा निरोप ऐक. ‘ असे म्हणून हनुमान प्रेमाने सद्गदित झाला. त्याच्या
डोळ्यात प्रेमाश्रू दाटले. ॥ १४ ॥
कहेउ राम बियोग तव सीता ।
मो कहुँ सकल भए बिपरीता ॥
नव तरु किसलय मनहुँ कृसानू
। कालनिसा सम निसि ससि भानू ॥
हनुमान म्हणाला, ‘
श्रीरामचंद्रांनी सांगितले आहे की, हे सीते, तुझ्या वियोगामुळे माझ्यासाठी सर्व
पदार्थ प्रतिकूल झालेले आहेत. वृक्षांची नवीन कोमल पालवी जणू अग्नीसारखी, रात्र ही
कालरात्रीसारखी, चंद्र सूर्यासारखा, ॥ १ ॥
कुबलय बिपिन कुंतबन सरिसा ।
बारिद तपत तेल जनु बरिसा ॥
जे हित रहे करत तेइ पीरा ।
उरग स्वास सम त्रिबिध समीरा ॥
आणि कमळांची वने ही
भाल्यांच्या वनासारखी झालेली आहेत. मेघ जणू उकळते तेल ओतत आहेत. जे हितकारक होते
ते आता सतावू लागले आहेत. त्रिविध हवा सापाच्या फुत्कारासारखी विषारी व गरम झाली
आहे. ॥ २ ॥
कहेहू तें कछु दुख घटि होई
। काहि कहौं यह जान न कोई ॥
तत्व प्रेम कर मम अरु तोरा
। जानत प्रिया एकु मनु मोरा ॥
मनातले दुःख सांगून
टाकल्याने काहीसे कमी होते, पण सांगू कुणाला ? माझे हे दुःख कुणी जाणत नाही. हे
प्रिये, माझ्या व तुझ्या प्रेमाचे रहस्य एक माझे मनच जाणते. ॥ ३ ॥
सो मनु सदा रहत तोहि पाहीं
। जानु प्रीति रसु एतनेहि माहीं ॥
प्रभु संदेसु सुनत बैदेही ।
मगन प्रेम तन सुधि नहिं तेही ॥
आणि ते तर नेहमी
तुझ्याजवळ असते. बस्स, माझ्या प्रेमाचे सार एवढ्यातच काय ते समज.’ प्रभूंचा निरोप
ऐकताच जानकी प्रेम-मग्न झाली. ती देहभान विसरली. ॥ ४ ॥
कह कपि हृदयँ धीर धरु माता
। सुमिरु राम सेवक सुखदाता ॥
उर आनहु रघुपति प्रभुताई ।
सुनि मम बचन तजहु कदराई ॥
हनुमान म्हणाला, ‘ हे
माते, मनात धीर धर आणि सेवकांना सुख देणार्या श्रीरामांचे स्मरण कर.
श्रीरघुनाथांची प्रभुता आठव आणि माझे बोलणे ऐकून भय सोडून दे. ॥ ५ ॥
दोहा---- निसिचर निकर पतंग
सम रघुपति बान कृसानु ।
जननी हृदयँ धीर धरु जरे निसाचर
जानु ॥ १५ ॥
राक्षसांचे समूह हे
पतंग-कीटकांप्रमाणे आहेत आणि रघुनाथांचे बाण हे अग्नीसारखे आहेत. हे माते, धीर धर
आणि राक्षस जळून खाक झाले, असे समज. ॥ १५ ॥
जौं रघुबीर होति सुधि पाई ।
करते नहिं बिलंबु रघुराई ॥
राम बान रबि उएँ जानकी । तम
बरुथ कहँ जातुधान की ॥
श्रीरामांना जर तुझी
वार्ता कळली असती, तर त्यांनी उशीर लावला नसता. हे जानकी, रामबाणरुपी सूर्य उदित
झाल्यावर राक्षस-सेनारुपी अंधकार कसा राहील ? ॥ १ ॥
अबहिं मातु मैं जाउँ लवाई ।
प्रभु आयसु नहिं राम दोहाई ॥
कछुक दिवस जननी धरु धीरा ।
कपिन्ह सहित अइहहिं रघुबीरा ॥
हे माते, मी तुला आत्ता
येथून घेऊन जाईन, परंतु श्रीरामांची शपथ सांगतो, मला प्रभूंची तशी आज्ञा नाही.
म्हणून हे माते, आणखी काही दिवस धीर धर. श्रीरामचंद्र वानरांसह येथे येतील, ॥ २ ॥
निसिचर मारि तोहि लै जैहहिं
। तिहुँ पुर नारदादि जसु गैहहिं ॥
हैं सुत कपि सब तुम्हहि
समाना । जातुधान अति भट बलवाना ॥
आणि राक्षसांना मारुन
तुला घेऊन जातील. नारदादी ऋषि-मुनी तिन्ही लोकांमध्ये त्यांची कीर्ती गातील. ‘
सीता म्हणाली, हे वत्सा, सर्व वानर तुझ्यासारखेच लहान-लहान असणार. राक्षस हे तर
बलवान योद्धे आहेत. ॥ ३ ॥
मोरें हृदय परम संदेहा ।
सुनि कपि प्रगट कीन्हि निज देहा ॥
कनक भूधराकार सरीरा । समर
भयंकर अतिबल बीरा ॥
म्हणून माझ्या मनात
मोठी शंका येते की, तुझ्यासारखे वानर राक्षसंना कसे जिंकतील ? ‘ हे ऐकून हनुमानाने
आपले रुप प्रकट केले. सुवर्ण पर्वत सुमेरुच्या आकाराचे ते अत्यंत विशाल शरीर होते.
ते युद्धामध्ये शत्रूंच्या हृदयात धडकी भरणारे अत्यंत बलवान व वीर होते. ॥ ४ ॥
सीता मन भरोस तब भयऊ । पुनि
लघु रुप पवनसुत लयऊ ॥
ते पाहून सीतेला खात्री पटली. हनुमानाने पुन्हा आपले
छोटे रुप धारण केले. ॥ ५ ॥
No comments:
Post a Comment