SunderKanda Part 7
दोहा—सुनु माता साखमृग नहिं
बल बुद्धि बिसाल ।
प्रभु प्रताप तें गरुड़हि
खाइ परम लघु ब्याल ॥ १६ ॥
हे माते वानरांमध्ये
बल-बुद्धी नसते, परंतु प्रभूंच्या प्रतापामुळे छोटा सर्पसुद्धा गरुडाला खाऊ शकतो.’
॥ १६ ॥
मन संतोष सुनत कपि बानी ।
भगति प्रताप तेज बल सानी ॥
आसिष दीन्हि रामप्रिय जाना
। होहु तात बल सील निधाना ॥
भक्ती, प्रताप, तेज व
बलाने परिपूर्ण असलेले ते हनुमानाचे बोलणे ऐकून सीतेच्या मनाला संतोष वाटला. तिने
श्रीरामांचा आवडता असल्याचे मानून हनुमानाला आशीर्वाद दिला की, हे वत्सा, तू बल व
शीलाचे निधान होशील. ॥ १ ॥
अजर अमर गुननिधि सुत होहु ।
करहुँ बहुत रघुनायक छोहू ॥
करहुँ कृपा प्रभु अस सुनि
काना । निर्भर प्रेम मगन हनुमाना ॥
हे वत्सा, तू अजर, अमर
आणि गुणांचे भांडार होशील. श्रीरघुनाथ तुझ्यावर खूप कृपा करोत. ‘ ‘ प्रभू कृपा
करोत ‘ , असे कानांनी ऐकताच हनुमान प्रगाढ प्रेमामध्ये मग्न झाला. ॥ २ ॥
बार बार नाएसि पद सीसा ।
बोला बचन जोरि कर कीसा ॥
अब कृतकृत्य भयउँ मैं माता
। आसिष तव अमोघ बिख्याता ॥
हनुमानाने वारंवार आपले
मस्तक सीतेच्या चरणी नम्र केले आणि हात जोडून तो म्हणाला, ‘ हे माते, आज मी कृतार्थ
झालो. तुझा आशीर्वाद सफळ होतो, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. ॥ ३ ॥
सुनहु मातु मोहि अतिसय भूखा
। लागि देखि सुंदर फल रुखा ॥
सुनु सुत करहिं बिपिन
रखवारी । परम सुभट रजनीचर भारी ॥
हे माते, येथील फळांचे
वृक्ष पाहून मला फारच भूक लागली आहे. ‘ सीता म्हणाली, ‘ वत्सा, फार मोठे राक्षस या
वनाची रखवाली करतात. ‘ ॥ ४ ॥
तिन्ह कर भय माता मोहि
नाहीं । जौं तुम्ह सुख मानहु मन माहीं ॥
हनुमान म्हणाला, ‘
माते, तुला आनंद वाटत असेल, तर मला आज्ञा दे . मला त्यांचे मुळीच भय वाटत नाही.’ ॥
५ ॥
दोहा—देखि बुद्धि बल निपुन
कपि कहेउ जानकीं जाहु ।
रघुपति चरन हृदयँ धरि तात
मधुर फल खाहु ॥ १७ ॥
हनुमानाचे बुद्धी व बल
यांमधील नैपुण्य पाहून जानकी म्हणाली, ‘ जा, बाळा !, श्रीरघुनाथांचे चरण हृदयी
धरुन गोड फळे खा.’ ॥ १७ ॥
चलेउ नाइ सिरु पैठेउ बागा ।
फल खाएसि तरु तोरैं लागा ॥
रहे तहॉं बहु भट रखवारे ।
कछु मारेसि कछु जाइ पुकारे ॥
सीतेपुढे नतमस्तक होऊन
तो निघाला आणि बागेत घुसला.फळे खाल्ली आणि तो वृक्ष मोडू लागला. तेथे बरेच योद्धे
रखवालदार होते. त्यांपैकी काहींना त्याने मारुन टाकले आणि काहींनी जाऊन रावणाला
सांगितले की, ॥ १ ॥
नाथ एक आवा कपि भारी ।
तेहिं असोक बाटिका उजारी ॥
खाएसि फल अरु बिटप उपारे ।
रच्छक मर्दि मर्दि महि डारे ॥
‘ महाराज ! , एक मोठा
वानर आलेला आहे. त्याने अशोक वाटिका उध्वस्त
केली. फळे खाल्ली, वृक्ष उपटले आणि रखवालदारांचे मर्दन करुन त्यांना खाली
पाडले. ‘ ॥ २ ॥
सुनि रावण पठए भट नाना ।
तिन्हहि देखि गर्जेउ हनुमाना ॥
सब रजनीचर कपि संघारे । गए
पुकारत कछु अधमारे ॥
हे ऐकल्यावर रावणाने
पुष्कळसे योध्ये पाठविले. त्यांना पाहून हनुमानाने गर्जना केली. त्याने सर्व
राक्षसांना मारुन टाकले. जे अर्धमेले झाले होते, ते ओरडून निघून गेले. ॥ ३ ॥
पुनि पठयउ तेहिं अच्छकुमारा
। चला संग लै सुभट अपारा ॥
आवत देखि बिटप गहि तर्जा ।
ताहि निपाति महाधुनि गर्जा ॥
मग रावणाने
अक्षुकुमाराला पाठविले. तो असंख्य बलाढ्य योद्धे घेऊन निघाला. त्याला येताना पाहून
हनुमानाने हातात एक वृक्ष घेऊन त्याला आह्वान दिले आणि त्याला मारुन मोठ्या जोराने
गर्जना केली. ॥ ४ ॥
दोहा—कछु मारेसि कछु
मर्देसि कछु मिलएसि धरि धूरि ।
कछु पुनि जाइ पुकारे प्रभु
मर्कट बल भूरि ॥ १८ ॥
त्याने सेनेतील काहींना
मारले, काहींना चिरडले आणि काहींना पकडून धुळीला मिळविले. काहींनी पुन्हा
रावणापाशी जाऊन धावा केला की, ‘ हे प्रभू, वानर फार बलवान आहे.’ ॥ १८ ॥
सुनि सुत बध लंकेस रिसाना ।
पठएसि मेघनाद बलवाना ॥
मारसि जनि सुत बॉंधेसु ताही
। देखिअ कपिहि कहॉं कर आही ॥
पुत्राचा वध झाल्याचे ऐकून रावण
क्रुद्ध झाला आणि त्याने आपला ज्येष्ठ पुत्र मेघनाद याला पाठवून दिले. तो त्याला
म्हणाला, ‘ हे पुत्रा, त्याला न मारता बांधून घेईन ये. त्या वानराला पाहूया तरी,
तो कुठला आहे ते. ‘॥ १ ॥
चला इंद्रजित अतुलित जोधा ।
बंधु निधन सुनि उपजा क्रोधा ॥
कपि देखा दारुन भट आवा ।
कटकटाइ गर्जा अरु धावा ॥
इंद्राला जिंकणारा
अतुलनीय योद्धा मेघनाद निघाला. आपला भाऊ मारला गेल्याचे ऐकून त्याला खूप क्रोध आला
होता. हनुमानाने पाहिले की, आता भयानक योद्धा येत आहे. तेव्हा दात ओठ खाऊन त्याने
गर्जना केली व तो धावून गेला. ॥ २ ॥
अति बिसाल तरु एक उपारा ।
बिरथ कीन्ह लंकेस कुमारा ॥
रहे महाभट ताके संगा । गहि
गहि कपि मर्दइ निज अंगा ॥
त्याने एक फार मोठा
वृक्ष उपटून घेतला आणि त्याच्या प्रहाराने लंकेश्र्वर रावणाचा मुलगा मेघनाद याचा
रथ मोडून त्याला खाली पाडले. त्याच्याबरोबर जे मोठमोठे योद्धे होते, त्यांना पकडून
हनुमान आपल्या हातांनी बदडू लागला. ॥ ३ ॥
तिन्हहि निपाति ताहि सन
बाजा । भिरे जुगल मानहुँ गजराजा ॥
मुठिका मारि चढ़ा तरु जाई ।
ताहि एक छन मुरुछा आई ॥
त्या सर्वांना मारुन मग
तो मेघनादाशी लढू लागला. लढताना असे वाटत होते की, जणू दोन हत्ती भिडले आहेत.
हनुमान त्याला एक ठोसा मारुन वृक्षावर जाऊन बसला. मेघनादाला क्षणभर मूर्छा आली. ॥
४ ॥
उठि बहोरि कीन्हिसि बहु
माया । जीति न जाइ प्रभंजन जाया ॥
पुन्हा उठून त्याने
माया सोडली, परंतु पवन-पुत्राला त्याला जिंकता आले नाही. ॥ ५ ॥
No comments:
Post a Comment