SunderKanda Part 5
दोहा—भवन गयउ दसकंध इहॉं पिसाचिनि बृंद ।
सीतहि त्रास देखावहिं धरहिं रुप बहु मंद ॥ १० ॥
असे म्हणून रावण घरी गेला. इलडे राक्षसींच्या
झुंडी अनेक भयानक रुपे धारण करुन सीतेला भय दाखवू लागल्या. ॥ १० ॥
त्रिजटा नाम राच्छसी एका । राम चरन रति निपुन
बिबेका ॥
सबन्हौ बोलि सुनाएसि सपना । सीतहि सेइ करहु हित अपना
॥
त्यांच्यामध्ये त्रिजटा नावाची एक राक्षसी
होती. तिला श्रीरामचंद्रांच्या चरणी प्रेम होते व ती विवेकशील होती. तिने सर्वांना
बोलावून आपल्याला पडलेले स्वप्न सांगून म्हटले, ‘ सीतेची सेवा करुन स्वतःचे कल्याण
करुन घ्या. ॥ १ ॥
सपनें बानर लंका जारी । जातुधान सेना सब मारी ॥
खर आरुढ़ नगन दससीसा । मुंडित सिर खंडित भुज बीसा
॥
स्वप्नात मला दिसले की, एका वानराने लंका
जाळून टाकली. राक्षसांची सर्व सेना मारुन टाकली. रावण नागडा होता आणि तो गाढवावर
बसला होता. त्याच्या डोक्याचे मुंडन केलेले होते आणि त्याच्या वीसही भुजा
कापलेल्या होत्या. ॥ २ ॥
एहि बिधि सो दछ्छिन दिसि जाई । लंका मनहुँ बिभीषन
पाई ॥
नगर फिरी रघुबीर दोहाई । तब प्रभु सीता बोलि पठाई
॥
अशाप्रकारे तो दक्षिणेस यमपुरीला जात आहे आणि
लंका बिभीषणाला मिळाली आहे. नगरामध्ये श्रीरामांचा डांगोरा पिटला आहे. मग प्रभूंनी
सीतेला बोलावणें पाठविले. ॥ ३ ॥
यह सपना मैं कहउँ पुकारी । होइहि सत्य गएँ दिन
चारी ॥
तासु बचन सुनि ते सब डरीं । जनकसुता के चरनन्हि
परीं ॥
मी खात्रीने सांगते की, हे स्वप्न चार
दिवसांत खरे होईल.’ तिचे बोलणे ऐकून सर्व राक्षसी घाबरल्या आणि सीतेच्या चरणावर
त्यांनी लोटांगण घातले. ॥ ४ ॥
दोहा—जहँ तहँ गईं सकल तब
सीता कर मन सोच ।
मास दिवस बीतें मोहि मारिहि
निसिचर पोच ॥ ११ ॥
नंतर त्या सर्व जिकडे
तिकडे निघून गेल्या. सीता मनात काळजी करु लागली की, एक महिना झाल्यावर नीच राक्षस
मला मारणार. ॥ ११ ॥
त्रिजटा सन बोलीं कर जोरी ।
मातु बिपति संगिनि तै मोरी ॥
तजौं देह करु बेगि उपाई ।
दुसह बिरहु अब नहिं सहि जाई ॥
सीता हात जोडून
त्रिजटेला म्हणाली की, ‘ हे माते, तू संकटामध्ये माझी सोबतीण आहेस. मी शरीर-त्याग
करु शकेन असा उपाय लवकर कर. विरह असह्य झाला आहे. ॥ १ ॥
आनि काठ रचु चिता बनाई ।
मातु अनल पुनि देहि लगाई ॥
सत्य करहि मम प्रीति सयानी
। सुनै को श्रवन सूल सम बानी ॥
लाकडे आणून चिता रच. हे
माते, मग तिला आग लाव. तू सुज्ञ आहेस, तेव्हा माझ्यावरील प्रेम खरे करुन दाखव.
रावणाचे शूलाप्रमाणे दुःख देणारे बोलणे कानांनी कोण ऐकणार ? ॥ २ ॥
सुनत बचन पद गहि समुझाएसि ।
प्रभु प्रताप बल सुजसु सुनाएसि ॥
निसि न अनल मिल सुनु
सुकुमारी । अस कहि सो निज भवन सिधारी ॥
सीतेचे बोलणे ऐकून
त्रिजटेने तिचे पाय धरुन तिची समजूत घातली आणि श्रीरामांच्या प्रताप, बल आणि
सुकीर्ती यांचे वर्णन केले. ती म्हणाली, ‘ हे सुकुमारी, ऐक. रात्रीच्या वेळी आग
मिळू शकणार नाही.’ असे म्हणून ती घरी गेली. ॥ ३ ॥
कह सीता बिधि भा प्रतिकूला
। मिलिहि न पावक मिटिहि न सूला ॥
देखिअत प्रगट गगन अंगारा ।
अवनि न आचत एकउ तारा ॥
सीता मनात म्हणू लागली,
‘ काय करु ? विधाता प्रतिकूल झाला आहे. आग मिळणार नाही आणि दुःखही संपणार नाही.
आकाशामध्ये निखारे दिसत आहेत, परंतु पृथ्वीवर एकही तारा येत नाही. ॥ ४ ॥
पावकमय ससि स्त्रवत न आगी ।
मानहुँ मोहि जानि हतभागी ॥
सुनहि बिनय मम बिटप
असोका । सत्य नाम करु हरु मम सोका ॥
चंद्र अग्निमय आहे,
परंतु तोसुद्धा मला हतभागिनी समजून आगीचा वर्षाव करीत नाही. हे अशोक वृक्षा, माझी
विनंती मान्य कर. माझा शोक हरण कर आणि आपले अशोक हे नाव सार्थ कर. ॥ ५ ॥
नूतन किसलय अनल समाना ।
देहि अगिनि जनि करहि निदाना ॥
देखि परम बिरहाकुल सीता ।
सो छन कपिहि कलप सम बीता ॥
तुझी नवीन कोवळी पाने
अग्नीसारखी आहेत. म्हणून विचार न करता मला अग्नी दे. विरह रोग वाढवून त्याची
परिसीमा करु नकोस,’ सीता ही विरहाने अत्यंत व्याकूळ झालेली पाहून तो क्षण
हनुमानाला कल्पाप्रमाणे वाटला. ॥ ६ ॥
सो०—कपि करि हृँदय बिचार
दीन्हि मुद्रिका डारि तब ।
जनु असोक अंगार दीन्ह हरषि
उठि कर गहेउ ॥ १२ ॥
मग हनुमानाने मनात
विचार करुन सीतेसमोर श्रीरामांची अंगठी टाकली. जणु काही अशोक वृक्षाने निखारा
दिला, असे समजून सीतेने आनंदाने उठून ती हातात घेतली. ॥ १२ ॥
तब देखी मुद्रिका मनोहर ।
राम नाम अंकित अति सुंदर ॥
चकित चितव मुदरी पहिचानी ।
हरष बिषाद हृदयँ अकुलानी ॥
तेव्हा तिला रामनामाने अंकित असलेली अत्यंत
सुंदर व मनोहर अंगठी दिसली. अंगठी ओळखून सीता चकित होऊन तुच्याकडे पाहू लागली आणि
हर्ष व विषाद यांमुळे तिचे हृदय व्याकुळ झाले. ॥ १ ॥
जीति को सकइ अजय रघुराई ।
माया तें असि रचि नहिं जाई ॥
सीता मन बिचार कर नाना । मधुर
बचन बोलेउ हनुमाना ॥
ती विचार करु लागली की,
‘ श्रीरामचंद्र हे तर अजेय आहेत, त्यांना कोण जिंकू शकणार ? आणि मायेने असली दिव्य
व चिन्मय अंगठी बनविता येत नाही.’ सीता मनात अनेक प्रकारे विचार करीत होती.
त्याचवेळी हनुमान मधुर वाणीने, ॥ २ ॥
रामचंद्र गुन बरनै लागा ।
सुनतहिं सीता कर दुख भागा ॥
लागीं सुनैं श्रवन मन लाई ।
आदिहु तें सब कथा सुनाई ॥
श्रीरामचंद्रांच्या
गुणांचे वर्णन करु लागला. ते ऐकताच सीतेचे दुःख पळून गेले. ती कान व मन लावून ते
ऐकू लागली. हनुमानाने सुरवातीपासून सर्व कथा ऐकविली. ॥ ३ ॥
श्रवनामृत जेहिं कथा सुहाई
। कही सो प्रगट होति किन भाई ॥
तब हनुमंत निकट चलि गयऊ ।
फिरि बैठी मन बिसमय भयऊ ॥
सीता म्हणाली, ‘ ज्याने
माझ्या कानांसाठी अमृतरुप ही सुंदर कथा सांगितली, त्या हे बंधो, तू प्रकट का होत
नाहीस ? ‘ तेव्हा हनुमान तिच्याजवळ गेला. त्याला पाहून सीता तोंड फिरवून बसली.
तिच्या मनात आश्चर्य भरले होते. ॥ ४ ॥
राम दूत मैं मातु जानकी ।
सत्य सपथ करुनानिधान की ॥
यह मुद्रिका मातु मैं आनी ।
दीन्हि राम तुम्ह कहँ सहिदानी ॥
हनुमान म्हणाला, ‘ हे
जानकीमाते, मी श्रीरामचंद्रांचा दूत आहे. करुणानिधान श्रीरामांच्या शपथेवर सत्य
सांगतो. हे माते, ही अंगठी मीच आणली आहे. श्रीरामांनी ही तुझ्यासाठी ओळखीची खूण
म्हणून दिलेली आहे. ॥ ५ ॥
नर बानरहि संग कहु कैसें ।
कही कथा भइ संगति जैसें ॥
सीतेने विचारले, ‘ नर व वानराची मैत्री कशी झाली, ते
सांग.’ तेव्हा हनुमानाने संपूर्ण हकिगत सांगितली. ॥ ६
॥
No comments:
Post a Comment