BhaktiYoga Part 5
म्हणोनि गा पांडवा ।
मूर्तीचा मेळावा ।
करुनि त्यांचिया गांवा ।
धांवतु आलों ॥ ८९ ॥
८९) म्हणून अर्जुना,
सगुणरुप धारण करुन, भक्तांच्या गांवाला मी धांवत आलों.
नामाचिया सहस्रवरी । नावा
इया अचधारीं ।
सजूनिया संसारीं । तारु
जाहलों ॥ ९० ॥
९०) माझीं हजारों
नांवें ह्याच कोणी नावा, त्या तयार करुन संसारसागरांतून भक्तांना तारणारा मी
नावाडी झालों असें समज.
सडे जे देखिले । ते
ध्यानकासे लाविले ।
परिग्रही घातले । तरियावरी
॥ ९१ ॥
९१) जे भक्त सडे (
अंतर्बाह्य परिग्रहरहित ) असे मी पाहिले, त्यांस ( माझ्या ) ध्यानरुपी कांसेला
लाविलें व परिग्रही होते त्यांना नामरुपी नावेवर बसविलें.
प्रेमाची पेटी । बांधली
एकाचां पोटीं ।
मग आणिले तटीं ।
सायुज्याचां ॥ ९२ ॥
९२) एकाच्या पोटीं
प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यास मोक्षाच्या कांठावर आणलें.
परि भक्तांचेनि नांवें ।
चतुष्पादादि आघवे ।
वैकुंठींचिये राणिवे ।
योग्य केले ॥ ९३ ॥
९३) परंतु, जे माझे
भक्त असे ( माझ्या दृष्टीनें ठरलेले आहेत ) मग ते ( गजेंद्रासारखे ) चार पायांचीं
जनावरें वगैरे कां असेनात, पण त्या सर्वांस वैकुंठाच्या राज्यास योग्य केलें.
म्हणोनि गा भक्तां । नाहीं
एकही चिंता ।
तयातें समुद्धर्ता । आथि मी
सदा ॥ ९४ ॥
९४) म्हणून माझ्या
भक्तांना एकहि चिंता नाही. कारण त्यांचा उद्धार करणारा मी नेहमीं तयार आहे.
आणि जेव्हांचि का भक्तीं ।
दिधली चित्तवृत्ती ।
तेव्हांचि मज सूती ।
तयांचिये नाटीं ॥ ९५ ॥
९५) आणि जेव्हां
भक्तांनी ( आपली ) चित्तवृत्ति मला दिली, त्या वेळीं त्यांनी मला ( आपल्या )
छंदांत घातलें.
याकारणें गा भक्तराया । हा
मंत्र तुवां धनंजया ।
कीजे जे यया । मार्गा भजिजे
॥ ९६ ॥
९६) याकरितां हे
भक्तश्रेष्ठा अर्जुना, भक्तिमार्गाचें आचरण करावें. हा विचार पक्का लक्षांत ठेव.
मूळ श्लोक
मय्येव मन आधत्स्व मयि
बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत
ऊर्ध्वं न संशयः ॥ ८ ॥
८) माझ्या ठिकाणीं मन
वृत्तिवंत करुन घाल. माझ्या ठिकाणीं बुद्धि स्थिर कर. ( म्हणजे ) त्यानंतर तूं माझ्या ठिकाणीं निवास
करशील ( मद्रूप होशील ) यांत संशय नाहीं.
अगा मानस हें एक । माझां
स्वरुपीं सवृत्तिक ।
करुनि घालीं निष्टंक ।
बुद्धिनिश्र्चयेंसीं ॥ ९७ ॥
९७) अरे अर्जुना,
बुद्धीच्या निश्चयासह, तूं आपले मन फक्त माझ्या स्वरुपीं अखंड वतनदार करुन ठेव.
इये दोनी सरिसीं । मजमाजीं
प्रेमेंसीं ।
रिगालीं तरी पावसी । मातें
तूं गा ॥ ९८ ॥
९८) बा अर्जुना, या
दोघांनीं ( बुद्धी व मन यांनी ) जर माझ्यामध्यें प्रेमानें बरोबर प्रवेश केला, तर
तूं मला पावशील.
जे मन बुद्धि इहीं । घर
केलें माझां ठायीं ।
तरी सांगे मग काई । मी तूं
ऐसे उरे ॥ ९९ ॥
९९) कारण कीं, मन ब
बुद्धि हीं माझ्या ठिकाणीं कायमची राहिलीं तर मग, मी व तूं असें द्वैत उरेल काय ?
सांग.
म्हणोनि दिवा पालवे ।
सवेंचि तेज मालवे ।
कां रविबिंबासवें । प्रकाशु
जाय ॥ १०० ॥
१००) म्हणून पदराच्या
वार्यानें दिवा मालवला असतां त्या दिव्याचें तेज ( जसें ) लागलीच नाहींसें
होंतें; अथवा सूर्यास्ताच्या वेळीं त्या सूर्याच्या बिंबाबरोबर ( जसा ) प्रकाश
जातो;
उचललेया प्राणासरिसीं ।
इंद्रियेंही निगती जैसीं ।
तैसा मनोबुद्धिपाशीं ।
अहंकारु ये ॥ १०१ ॥
१०१) शरीरांतून प्राण
निघाल्याबरोबर इंद्रियें जशीं त्याच्या बरोबर निघतात, त्याप्रमाणें जिकडे मन व
बुद्धि जातील तिकडे त्यांच्याबरोबर अहंकार येतो.
म्हणोनि माझां स्वरुपीं ।
मनबुद्धि इयें निक्षेपीं ।
येतुलेनि सर्वव्यापी । मीचि
होसी ॥ १०२ ॥
१०२) म्हणून माझ्या
स्वरुपीं मन व बुद्धि ही दोन्ही ठेव. एवढ्यानें सर्वव्यापी जो मी, तोच तूं होशील.
यया बोला कांहीं । अनारिसें
नाहीं ।
आपली आण पाहीं । वाहतु असें
गा ॥ १०३ ॥
१०३) अर्जुना, हें जे
मी बोललों, यांत कांहीं अन्यया नाहीं, असें मी आपली शपथ वाहून तुला सांगतों.
मूळ श्लोक
अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनजंय ॥ ९ ॥
९) अथवा माझ्या ठिकाणीं चित्त स्थिर करण्याला
समर्थ नसलास तर, हे धनंजया, ( चित्तैकाग्रतेचा ) अभ्यास करुन माझी प्राप्ति करुन
घेण्याची इच्छा कर.
अथवा हें चित्त । मनबुद्धीसहित ।
माझां हातीं अचुबिंत । न शकसी देवों ॥ १०४ ॥
१०४) अथवा जर मनबुद्धिसहित हें चित्त माझ्या
हातीं ( सकलवासनारहित असें ) संपूर्ण तू देऊं शकणार नाहीस,
तरि गा ऐसें करीं । यां आठां पाहारांमाझारीं ।
मोटकें निमिषभरी । देतु जाय ॥ १०५ ॥
१०५) तर अर्जुना, असें कर कीं, या आठ
प्रहरांमध्यें नेमकें निमिषभर चित्त ( मला ) देत जा.
मम जें जें कां निमिख । देखेल माझें सुख ।
तेतुलें अरोचक । विषयीं घेईल ॥ १०६ ॥
१०६) मग जितकें जितकें निमिष तुझें चित्त
माझें सुख पाहील, तितकें तुझे चित्त विषयांच्या ठिकाणीं अरुची घेईल.
जैसा शरत्कालु रिगे । आणि सरिता वोहटूं लागे ।
तैसें चित्त काढेल वेगें । प्रपंचौनि ॥ १०७ ॥
१०७) ज्याप्रमाणें शरद् ऋतूचा प्रवेश झाला
असता नद्यांचे पाणी कमी होऊं लागतें, त्याप्रमाणें तुझ्या चित्ताचा माझ्या
स्वरुपांत जसजसा प्रवेश होईल, तसतसें तुझें चित्त प्रपंचांतून वेगानें निघेल.,
मग पुनवेहूनि जैसें । शशिबिंब दिसें दिसें ।
हारपत अंवसे । नाहींचि होय ॥ १०८ ॥
१०८) मग ज्याप्रमाणें पौर्णिमेपासून
दिवसेंदिवस चंद्राचें बिंब कमी होत होत अमावास्येलाअगदीं नाहींसे होतें;
तैसें भोगाआंतूनि निगतां । चित्त मजमाजीं रिगतां
।
हळूहळू पांडुसुता । मीचि होईल ॥ १०९ ॥
१०९) त्याप्रमाणें भोगांतून तुझें चित्त निघून माझ्यामध्यें
प्रवेश करतां करतां, अर्जुना, तें तुझें चित्त हळूहळू मद्रूप
होईल.
अगा अभ्यासयोगु म्हणिजे । तो हा एकु जाणिजे ।
येणें कांहीं न निपजे । ऐसें नाहीं ॥ ११० ॥
११०) अरे, अभ्यासयोग जो म्हणतात, तो हाच एक
आहे, असें समज. याच्या योगानें कोणतीहि गोष्ट प्राप्त होणार नाहीं, असें
नाहीं.
पैं अभ्यासाचेनि बळें । एकां गति अंतराळे ।
व्याघ्र सर्प प्रांजळे । केले एकी ॥ १११ ॥
१११) अभ्यासाच्या सामर्थ्यानें कित्येक
आकाशाच्या पोकळींत चालूं शकतात व कित्येकांनी वाघ व साप यासारखे दुष्ट प्राणी करुन
घेतले.
विष कीं आहारीं पडे । समुद्रीं पायवाट जोडे ।
एकीं वाग्ब्रह्म थोकडें । अभ्यासें केलें ॥ ११२ ॥
११२) विष खाण्याचा अभ्यास केला असतां तें
विषदेखील पचनीं पडलें. अभ्यासाच्या योगानें समुद्रावरुन पायानें जातां येतें;
कित्येकांनीं वेदांचा अभ्यास करुन ते वेद आटोक्यांत आणले,
म्हणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं
।
यालागीं माझां ठायीं । अभ्यासें मिळ ॥ ११३ ॥
११३) म्हणून अभ्यासाला कोणतीहि गोष्ट मुळींच कठीण
नाहीं, याकरितां माझ्या स्वरुपीं तूं अभ्यासाने एकरुप हो.
No comments:
Post a Comment