SunderKanda Part 11
दोहा—जाइ पुकारे ते सब बन
उजार जुबराज ।
सुनि सुग्रीव हरष कपि करि
आए प्रभु काज ॥ २८ ॥
सर्वांनी जाऊन ओरडून
सांगितले की, अंगद मधुवन उध्वस्त करीत आहे. हे ऐकून सुग्रीवाला आनंद झाला की, वानर
प्रभुंचे कार्य करुन आले आहेत. ॥ २८ ॥
जौं न होति सीता सुधि पाई ।
मधुबन के फल सकहिं कि खाई ॥
एहि बिधि मन बिचार कर राजा
। आइ गए कपि सहित समाजा ॥
जर सीतेची वार्ता
मिळाली नसती, तर त्यांनी मधुवनातील फळे कशी खाल्ली असती ? अशा प्रकारे राजा
सुग्रीव मनात विचार करीत होता. एवढ्यात वानर-समूह आला. ॥ १ ॥
आइ सबन्हि नावा पद सीसा ।
मिलेउ सबन्हि अति प्रेम कपीसा ॥
पूँछी कुसल कुसल पद देखी ।
राम कृपॉं भा काजु बिसेषी ॥
सर्वांनी सुग्रीवाच्या
चरणी मस्तक नमविले. कपिराज सुग्रीव मोठ्या प्रेमाने सर्वांना भेटला. त्याने खुशाली
विचारली, तेव्हा वानरांनी सांगितले की, ‘तुमच्या दर्शनाने सर्व कुशल आहे.
श्रीरामांच्या कृपेमुळे कार्य यशस्वी झाले. ॥ २ ॥
नाथ काजु कीन्हेउ हनुमाना ।
राखे सकल कपिन्ह के प्राना ॥
सुनि सुग्रीव बहुरि तेहि
मिलेऊ । कपिन्ह सहित रघुपति पहिं चलेऊ ॥
हे नाथ, हनुमानानेच
सर्व काम पार पाडले आणि वानरांचे प्राण वाचविले. ‘ हे ऐकून सुग्रीव हनुमानाला
पुन्हा भेटला आणि सर्व वानरांसह ते श्रीरघुनाथांच्याजवळ गेले. ॥ ३ ॥
राम कपिन्ह जब आवत देखा ।
किएँ काजु मन हरष बिसेषा ॥
फटिक सिला बैठे द्वौ भाई ।
परे सकल कपि चरनन्हि जाई ॥
श्रीरामांनी पाहिले की,
वानर काम पुरे करुन येत आहेत, तेव्हा त्यांच्या मनाला खूप आनंद झाला. दोघे बंधू
स्फटिकशिळेवर बसले होते. सर्व वानर त्यांच्या पाया पडले. ॥ ४ ॥
दोहा---प्रिति सहित सब भेटे
रघुपति करुना पुंज ।
पूँछी कुसल नाथ अब कुसल
देखि पद कंज ॥ २९ ॥
दयेचे राशी असलेले
श्रीरघुनाथ मोठ्या प्रेमाने सर्वांना मिठी मारुन भेटले आणि त्यांनी क्षेम-कुशल
विचारले. वानर म्हणाले, ‘ हे नाथ, तुमच्या चरण-कमलांच्या दर्शन घडल्याने आता सर्व
क्षेम आहे. ‘ ॥ २९ ॥
जामवंत कह सुनु रघुराया ।
जा पर नाथ करहु तुम्ह दाया ॥
ताहि सदा सुभ कुसल निरंतर ।
सुर नर मुनि प्रसन्न ता ऊपर ॥
जांबवानाने म्हटले, ‘
हे रघुनाथ, ऐका. हे नाथ, ज्याच्यावर तुम्ही दया करता, त्याचे कल्याण व क्षेम नित्य
असते. देव, मनुष्य आणि मुनी सर्वजण त्याच्यावर प्रसन्न असतात. ॥ १ ॥
सोइ बिजई बिनई गुन सागर ।
तासु सुजसु त्रैलोक उजागर ॥
प्रभु कीं कृपा भयउ सबु
काजू । जन्म हमार सुफल भा आजू ॥
तोच विजयी, तोच विनयी
आणि तोच गुणांचा समुद्र बनतो. त्याचीच उत्तम कीर्ती त्रैलोक्यात पसरते. प्रभूंच्या
कृपेने सर्व कार्य झाले. आज आमचा जन्म सफळ झाला. ॥ २ ॥
नाथ पवनसुत कीन्हि जो करनी
। सहसहुँ मुख न जाइ सो बरनी ॥
पवनतनय के चरित सुहाए ।
जामवंत रघुपतिहि सुनाए ॥
हे नाथ, पवनपुत्र
हनुमानाची जी कामगिरी आहे, तिचे वर्णन हजार मुखांनीही करता येणार नाही.’ मग
जांबुवानाने हनुमानाची उत्कृष्ट कामगिरी श्रीरघुनाथांना सांगितली. ॥ ३ ॥
सुनत कृपानिधि मन अति भाए ।
पुनि हनुमान हरषि हियँ लाए ॥
कहहु तात केहि भॉंति जानकी
। रहति करति रच्छा स्वप्रान की ॥
हनामानाची कामगिरी ऐकून
कृपानिधी श्रीरामचंद्रांच्या मनाला खूप समाधान वाटले. त्यांनी आनंदाने हनुमानाला
पुन्हा आलिंगन दिले आणि म्हटले, ‘ वत्सा, सांग. सीता कशी आहे, आणि ती आपल्या
प्राणांचे रक्षण कसे करते ? ॥ ४ ॥
दोहा—नाम पाहरु दिवस निसि
ध्यान तुम्हार कपाट ।
लोचन निज पद जंत्रित जाहिं
प्रान केहिं बाट ॥ ३० ॥
हनुमान म्हणाला, ‘
तुमचे नाम रात्रंदिवस तिच्यावर पहारा देते आणि तुमचे ध्यान तिच्यासाठी दरवाजा आहे.
ती आपले नेत्र नेहमी आपल्या चरणी लावते, ते कुलूप आहे. मग प्राण जाणार कुठल्या
मार्गाने ? ॥ ३० ॥
चलत मोहि चूड़ामनि दीन्ही ।
रघुपति हृदयँ लाइ सोइ लीन्ही ॥
नाथ जुगल लोचन भरि बारी ।
बचन कहे कछु जनककुमारी ॥
येताना मला तिने
चूडामणी काढून दिला. ‘ तो श्रीरामांनी आपल्या हृदयी धरला. मग हनुमान म्हणाला, ‘ हे
नाथ, दोन्ही डोळ्यांत पाणी आणून जानकीने मला सांगितले की, ॥ १ ॥
अनुज समेत गहेहु प्रभु चरना
। दीन बंधु प्रनतारति हरना ॥
मन क्रम बचन चरन अनुरागी ।
केहिं अपराध नाथ हौं त्यागी ॥
‘ लक्ष्मणासह प्रभूंचे
चरण धरुन सांग की, तुम्ही दीनबंधू आहात. शरणागतांचे दुःख हरण करणारे आहात आणि मी
कायावाचामनाने तुमच्याच चरणांवर प्रेम करते. मग हे स्वामी, तुम्ही कोणत्या
कारणामुळे माझा त्याग केलात ? ॥ २ ॥
अवगुन एक मोर मैं माना ।
बिछुरत प्रान न कीन्ह पयाना ॥
नाथ सो नयनन्हि को अपराधा ।
निसरत प्रान करहिं हठि बाधा ॥
मी आपला एक दोष नक्की
मानते की, वियोग होताच माझे प्राण गेले नाहीत. परंतु हे नाथ, हा माझ्या नेत्रांचा
अपराध आहे. प्राण जाण्यांत ते जबरदस्तीने बाधा आणतात. ॥ ३ ॥
बिरह अगिनि तनु तूल समीरा ।
स्वास जरइ छन माहिं सरीरा ॥
नयन स्रवहिं जलु निज हित
लागी । जरैं न पाव देह बिरहागी ॥
विरह हा अग्नि आहे,
शरीर हा कापूस आहे आणि श्वास हा वारा आहे. म्हणून हे शरीर क्षणात जळू शकते. परंतु
नेत्र प्रभूंच्या स्वरुपाचे दर्शन घेण्याच्या स्वार्थासाठी अश्रुजलाचा वर्षाव
करतात. त्यामुळे विरहाच्या आगीने देह जळू शकत नाही. ॥ ४ ॥
सीता कै अति बिपति बिसाला ।
बिनहिं कहें भलि दीनदयाला ॥
सीतेची विपत्ती फार मोठी आहे. हे दीनदयाळा ! ती न
सांगणेच चांगले. ( सांगितली तर आपल्यालाच क्लेश
होतील. ) ॥ ५ ॥
No comments:
Post a Comment