SunderKanda Part 13
दोहा—कपिपति बेगि बोलाए आए
जूथप जूथ ।
नाना बरन अतुल बल बानर भालु
बरुथ ॥ ३४ ॥
वानरराज सुग्रीवाने
लगेच वानरांना बोलावले. सेनापतींचे समूह आले. वानर व अस्वलांच्या झुंडी अनेक
रंगांच्या होत्या आणि त्यांच्यामध्ये अतुलनीय बळ होते. ॥ ३४ ॥
प्रभुपद पंकज नावहिं सीसा ।
गर्जहिं भालु महाबल कीसा ॥
देखी राम सकल कपि सेना ।
चितइ कृपा करि राजिव नैना ॥
सर्वजण प्रभूंच्या
चरणकमली नतमस्तक झाले. महाबलवान अस्वले व वानर गर्जना करीत होते. श्रीरामांनी सर्व
सेना पाहून आपल्या कमलनेत्रांतून तिच्यावर कृपावर्षाव केला. ॥ १ ॥
राम कृपा बल पाइ कपिंदा ।
भए पच्छजुत मनहुँ गिरिंदा ॥
हरषि राम तब कीन्ह पयाना ।
सगुन भए सुंदर सुभ नाना ॥
रामकृपेचे बळ
मिळाल्यामुळे श्रेष्ठ वानर जणूं पंख असलेले मोठे पर्वत झाले. मग श्रीरामांनी
आनंदाने प्रस्थान केले. त्यावेळी अनेक सुंदर व शुभ शकुन झाले. ॥ २ ॥
जासु सकल मंगलमय कीती ।
तासु पयान सगुन यह नीती ॥
प्रभु पयान जाना बैदेहीं ।
फरकि बाम अँग जनु कहि देहीं ॥
ज्यांची कीर्ती ही सर्व
मांगल्यांनी परिपूर्ण आहे, त्यांच्या प्रस्थानाच्या वेळी शकुन होणे, ही लीला आहे.
प्रभूंचे प्रस्थान जानकीलाही जाणवले. तिची डावी अंगे स्फुरुन सांगत होती की,
श्रीराम येत आहेत. ॥ ३ ॥
जोइ जोइ सगुन जानकिहि होई ।
असगुन भयउ रावनहि सोई ॥
चला कटकु को बरनैं पारा ।
गर्जहिं बानर भालु अपारा ॥
जानकीला जेव्हा शकुन
होत होते, तेव्हा रावणाला अपशकुन झाले. श्रीरामांची सेना निघली, तिचे वर्णन कोण
करील ? असंख्य वानर व अस्वले गर्जना करीत होती. ॥ ४ ॥
नख आयुध गिरि पादपधारी ।
चले गगन महि इच्छाचारी ॥
केहरिनाद भालु कपि करहीं ।
डगमगहिं दिग्गज चिक्करहीं ॥
नखें हीच त्यांची
शस्त्रे होती, ती स्वच्छेनुसार चालणारी अस्वले व वानर पर्वत व वृक्ष उचलून
आकाशातून निघाले आणि काही जमिनीवरुन चालत होते. ते सिंहाप्रमाणे गर्जना करीत होते.
त्यांच्या चालण्याने व गर्जनेने दिग्गज घाबरुन चीत्कार करीत होते. ॥ ५ ॥
छं०—चिक्करहिं दिग्गज डोल
महि गिरि लोल सागर खरभरे ।
मन हरष सभ गंधर्ब सुर मुनि
नाग किंनर दुख टरे ॥
कटकटहिं मर्कट बिकट भट बहु
कोटि कोटिन्ह धावहीं ।
जय राम प्रबल प्रताप
कोसलनाथ गुन गन गावहीं ॥ १ ॥
दिशांचे हत्ती चीत्कार
करु लागले, पृथ्वी डगमगू लागली, पर्वत कापू लागले आणि समुद्र खवळले. गंधर्व, देव,
मुनी नाग, किन्नर हे सर्वच्या सर्व मनातून आनंदित झाले की, आता आमची दुःखे टळली.
अनेक कोटी भयानक वानर योद्धे दात चावत होते आणि कोट्यावधी धावत होते. ‘ प्रबल
प्रतापी कोसलनाथ श्रीरामचंद्रांचा विजय असो, ‘ अशा घोषणा देत ते श्रीरामांचे
गुणगान करीत होते. ॥ १ ॥
सहि सक न भार उदार अहिपति
बार बारहिं मोहई ।
गह दसन पुनि पुनि कमठ पृष्ट
कठोर सो किमि सोहई ॥
रघुबीर रुचिर प्रयान
प्रस्थिति जानि परम सुहावनी ।
जनु कमठ खर्पर सर्पराज सो
लिखत अबिचल पावनी ॥
परमश्रेष्ठ व महान
सर्पराज शेषसुद्धा सेनेचे ओझे सहन करु शकेना. तो वातंवार घाबरुन जात होता आणि पुनः
पुन्हा कासवाच्या कठोर पाठीला दातांनी धरीत होता. वारंवार दांत घुसवून तो
कासवाच्या पाठीवर तो रेघा ओढीत होता. तो असा शोभत होता की, जणू श्रीरामचंद्रांची
सुंदर प्रस्थानयात्रा ही फार चांगली समजून तिची पवित्र व अढळ कथा सर्पराज शेष
कासवाच्या पाठीवर लिहीत होता. ॥ २ ॥
एहि बिधि जाइ कृपानिधि उतरे
सागर तीर ।
जहँ तहँ लागे खान फल भालु
बिपुल कपि बीर ॥ ३५ ॥
अशा प्रकारे कृपानिधान
श्रीराम समुद्रतटावर जाऊन पोहोचले. अनेक अस्वले व वानर जिंकडे तिकडे फळे खाऊ लागले.
॥ ३५ ॥
उहॉं निसाचर रहहिं ससंका ।
जब तें जारि गयउ कपि लंका ॥
निज निज गृहँ सब करहिं
बिचारा । नहिं निसिचर कुल के उबारा ॥
तिकडे लंकेत हनुमान
लंका जाळून गेला, तेव्हापासून राक्षस भयभीत झाले होते. अपापल्या घरात सर्वजण विचार
करीत होते की, आता राक्षसकुळाच्या बचावाचा कोणताही उपाय नाही. ॥ १ ॥
जासु दूत बल बरनि न जाई ।
तेहि आएँ पुर कवन भलाई ॥
दूतिन्ह सन सुनि पुरजन बानी
। मंदोदरी अधिक अकुलानी ॥
ज्यांच्या दूताच्या
बळाचे वर्णन करणे शक्य नाही, ते श्रीराम स्वतः नगरात आल्यावर आमची काय अवस्था
होणार ! दूतींच्याकडून नगरवासींचे बोलणे ऐकून मंदोदरी फार व्याकूळ झाली. ॥ २ ॥
रहसि जोरि कर पति पग लागी ।
बोली बचन नीति रस पागी ॥
कंत करष हरि सन परिहरहू ।
मोर कहा अति हित हियँ धरहू ॥
ती एकांतात हात जोडून
रावणाच्या पाया पडली आणि नीतिरसाने परिपूर्ण वाणीने म्हणाली, ‘ हे प्रियतम,
श्रीहरींशी विरोध करणे सोडून द्या. माझे म्हणणे अत्यंत हितकारक समजून हृदयात धरा.
॥ ३ ॥
समुझत जासु दूत कइ करनी ।
स्रवहिं गर्भ रजनीचर घरनी ॥
तासु नारि निज सचिव बोलाई ।
पठवहु कंत जो चहहु भलाई ॥
ज्यांच्या दूताच्या
कृत्याचा विचार करताच राक्षसांच्या स्त्रिया गर्भगळित होतात, हे प्रिय स्वामी, जर
कल्याण व्हावेसे वाटत असेल, तर, आपल्या मंत्र्यांना बोलावून त्यांच्याबरोबर
श्रीरामांच्या पत्नीला पाठवून द्या. ॥ ४ ॥
तव कुल कमल बिपिन दुखदाई ।
सीता सीता निसा सम आई ॥
सुनहु नाथ सीता बिनु
दीन्हें । हित न तुम्हार संभु अज कीन्हें ॥
सीता ही आपल्या कुलरुपी
कमलवनाला दुःख देणार्या थंडीच्या रात्रीप्रमाणे झाली आहे. हे नाथ, ऐकून घ्या.
सीतेला परत पाठविल्याशिवाय शंभू किंवा ब्रह्मदेवही तुमचे भले करणार नाहीत. ॥ ५ ॥
दोहा—राम बान अहि गन सरिस
निकर निसाचर भेक ।
जब लगि ग्रसत न तब लगि जतनु
करहु तजि टेक ॥ ३६ ॥
श्रीरामांचे बाण हे
सर्पांच्या समूहासारखे आहेत आणि राक्षस-समूह त्यांच्यापुढे बेडकाप्रमाणे आहेत. ते
जोपर्यंत यांना खाऊन टाकत नाहीत, तोपर्यंत आपला हट्ट सोडून काही उपाय करा. ‘ ॥ ३६
॥
श्रवन सुनी सठ ता करि बानी
। बिहसा जगत बिदित अभिमानी ॥
सभय सुभाउ नारि कर साचा ।
मंगल महुँ भय मन अति काचा ॥
मूर्ख आणि जगप्रसिद्ध
घमेंडखोर रावण आपल्या कानांनी मंदोदरीचे बोलणे ऐकून मोठ्याने हसून म्हणाला, ‘
स्त्रियांचा स्वभाव खरोखरच भित्रट असतो. तूं मंगल प्रसंगीसुद्धा भीत आहेस. तुझे मन
फारच हळवे आहे. ॥ १ ॥
जौं आवइ मर्कट कटकाई ।
जिअहिं बिचारे निसिचर खाई ॥
कंपहिं लोकप जाकीं त्रासा ।
तासु नारि सभीत बड़ि हासा ॥
जर वानरांची सेना आली,
तर बिचारे राक्षस त्यांना खाऊन आपली पोटे भरतील. लोकपालही माझ्या भयाने कापू
लागतात, त्याची बायको असून तू घाबरतेस, ही मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. ‘ ॥ २ ॥
अस कहि बिहसि ताहि उर लाई । चलेउ सभॉं ममता
अधिकाई ॥
मंदोदरी हृदयँ कर चिंता । भयउ कंत पर बिधि
बिपरीता ॥
रावणाने असे म्हणत हसून तिला हृदयाशी धरले आणि मोठे प्रेम दाखवून तो सभेला गेला. मंदोदरी मनात काळजी करु लागली की,
विधाता आपल्या पतीला प्रतिकूल झालेला आहे. ॥ ३ ॥
बैठेउ सभॉं खबरि असि पाई । सिंधु पार सेना सब आई
॥
बूझेसि सचिव उचित मत कहहू । ते सब हँसे मष्ट करि
रहहू ॥
रावण सभेमध्ये जाऊन बसताच त्याला समजले की,
शत्रूची सर्व सेना समुद्रापलीकडे आली आहे. त्याने मंत्र्यांना म्हटले की, योग्य
सल्ला द्या. तेव्हा सर्वजण हसले व म्हणाले की, ‘ गप्प राहावे, यात सल्ला काय
द्यायचा ? ॥ ४ ॥
जितेहु सुरासुर तब श्रम नाहीं । नर बानर केहि
लेखे माहीं ॥
तुम्ही देव व राक्षसांना जिंकून घेतले, तेव्हासुद्धा काही
कष्ट पडले नाहीत. मग मनुष्य व वानर यांचे काय घेऊन
बसलात ? ‘ ॥
५ ॥
No comments:
Post a Comment