SunderKanda Part 12
दोहा---निमिष निमिष
करुणानिधि जाहिं कलप सम बीति ।
बेगि चलिअ प्रभु आनिअ भुज
बल खल दल जीति ॥ ३१ ॥
हे करुणानिधान, तिचा एक
एक क्षण कल्पासारखा जात आहे. म्हणून हे प्रभू, लगेच चला आणि आपल्या भुजबलाने
दुष्टांचे सैन्य जिंकून सीतेला घेऊन या.’ ॥ ३१ ॥
सुनि सीता दुख प्रभु सुख
अयना । भरि आए जल राजिव नयना ॥
बचन कायँ मन मम गति जाही ।
सपनेहुँ बूझिअ बिपति की ताही ॥
सीतेचे दुःख ऐकून
सुखाने धाम असलेल्या प्रभूंचे कमलनेत्र पाण्याने डबडबले. ते म्हणाले, ‘
कायावाचामनाने जिला माझाच आश्रय आहे, तिला स्वप्नातही विपत्ती येऊ शकेल काय ?’ ॥ १
॥
कह हनुमंत बिपति प्रभु सोई
। जब तव सुमिरन भजन न होई ॥
केतिक बात प्रभु जातुधान की
। रिपुहि जीति आनिबी जानकी ॥
हनुमान म्हणाला, ‘ हे
प्रभो, विपत्ती तेव्हाच येते, जेव्हा तुमचे भजन-स्मरण नसेल. हे प्रभो, राक्षसांचे
ते काय ? तुम्ही शत्रूला जिंकून जानकीला घेऊन याल. ‘ ॥ २ ॥
सुनु कपि तोहि समान उपकारी
। नहिं कोउ सुर नर मुनि तनुधारी ॥
प्रति उपकार करौं का तोरा ।
सनमुख होइ न सकत मन मोरा ॥
भगवान म्हणाले, ‘ हे
हनुमाना, ऐक. तुझ्यासारखा माझ्यावर उपकार करणारा देव, मनुष्य किंवा मुनी असा
कोणीही देहधारी नाही. मी तुला या उपकाराबद्दल काय देणार ? माझे मनही तुझ्यासमोर
यायला धजावत नाही. ॥ ३ ॥
सुनु सुत तोहि उरिन मैं
नाहीं । देखेउँ करि बिचार मन माहीं ॥
पुनि पुनि कपिहि चितव
सुरत्राता । लोचन नीर पुलक अति गाता ॥
हे वत्सा, मी मनात खूप
विचार करुन पाहिला परंतु मी तुझ्या ॠणातून मुक्त होऊ शकत नाही. ‘ देवांचे रक्षक
प्रभू वारंवार हनुमानाकडे पाहात होते. त्यांच्या नेत्रांत प्रेमाश्रू भरुन आले
होते आणि त्यांचे शरीर पुलकित झाले होते. ॥ ४ ॥
दोहा—सुनि प्रभु बचन बिलोकि
मुख गात हरषि हनुमंत ।
चरन परेउ प्रेमाकुल त्राहि
त्राहि भगवंत ॥ ३२ ॥
प्रभूंचे बोलणे ऐकून व
त्यांचे प्रसन्न मुख आणि पुलकित अंग पाहून हनुमानाला आनंद झाला आणि प्रेमाने व्याकूळ
होऊन तो म्हणाला, ‘ हे भगवन, माझे करा, रक्षण करा, रक्षण करा. ‘ असे म्हणत त्याने
प्रभूंच्या चरणांवर लोटांगण घातले. ॥ ३२ ॥
बार बार प्रभु चहइ उठावा ।
प्रेम मगन तेहि उठब न भावा ॥
प्रभु कर पंकज कपि कें सीसा
। सुमिरि सो दसा मगन गौरीसा ॥
प्रभू त्याला वारंवार
उठवू पाहात होते, परंतु प्रेमामध्ये बुडालेल्या हनुमानाला चरण सोडून उठावेसे वाटत
नव्हते. प्रभूंचे कर-कमल हनुमानाच्या शिरावर होते. त्या स्थितीच्या आठवणीनेच शिव
प्रेममग्न होऊन समाधिस्थ झाले. ॥ १ ॥
सावधान मन करि पुनि संकर ।
लागे कहन कथा अति सुंदर ॥
कपि उठाइ प्रभु हृदयँ लगावा
। कर गहि परम निकट बैठावा ॥
मग मन सावध करुन
शिवशंकर अत्यंत सुंदर गोष्ट सांगू लागले. हनुमानाला उठवून प्रभूंनी हृदयाशी धरले
आणि हात धरुन आपल्याजवळ बसविले. ॥ २ ॥
कहु कपि रावन पालित लंका ।
केहि बिधि दहेउ दुर्ग अति बंका ॥
प्रभु प्रसन्न जाना हनुमाना
। बोला बचन बिगत अभिमाना ॥
प्रभू म्हणाले, ‘
हनुमाना, सांग तर खरे, रावणाकडून सुरक्षित असलेली लंका आणि त्याचा दुर्गम दुर्ग
कसा काय जाळलास ? ‘ प्रभू प्रसन्न आहेत, हे पाहून हनुमानाने कोणताही अभिमान न
बाळगता सांगितले. ॥ ३ ॥
साखामृग कै बड़ि मनुसाई ।
साखा तें साखा पर जाई ॥
नाघि सिंधु हाटकपुर जारा ।
निसिचर गन बधि बिपिन उजारा ॥
‘ वानराने एका
फांदीवरुन दुसर्या फांदीवर उडी मारणे, हाच मोठा पुरुषार्थ आहे. मी समुद्र ओलांडून
सोन्याचे नगर जाळले आणि राक्षसांना मारुन अशोकवन उध्वस्त केले, ॥ ४ ॥
सो सब तव प्रताप रघुराई ।
नाथ न कछू मोरि प्रभुताई ॥
हे रघुनाथ, हा सर्व
तुमचा प्रताप आहे, हे नाथ, यात माझे काही मोठपण नाही. ॥ ५ ॥
दोहा---ता कहुँ प्रभु कछु अगम नहिं जा पर तुम्ह
अनुकूल ।
तव प्रभावँ बड़वानलहि जारि सकइ खलु तूल ॥ ३३ ॥
हे प्रभू, ज्याच्यावर तुम्ही प्रसन्न होता,
त्याला काहीही कठीण नाही. तुमच्या प्रभावाने कापूससुद्धा वडवानलाला नक्कीच जाळू
शकतो. ॥ ३३ ॥
नाथ भगति अति सुखदायनी । देहु कृपा करि अनपायनी ॥
सुनि प्रभु परम सरल कपि बानी । एवमस्तु तब कहेउ
भवानी ॥
हे नाथ, अत्यंत सुख देणारी आपली निश्चल भक्ती
कृपा करुन मला द्या. ‘ हनुमानाचे ते सरळ बोलणे ऐकून, हे भवानी, प्रभू म्हणाले, '
तथास्तु ‘. ॥ १ ॥
उमा राम सुभाउ जेहिं जाना । ताहि भजनु तजि भाव न
आना ॥
यह संबाद जासु उर आवा । रघुपति चरन भगति सोइ पावा
॥
हे उमे, ज्याने श्रीरामांचा स्वभाव जाणला
आहे, त्याला भजन सोडून दुसरी कोणतीही गोष्ट आवडत नाही. हा स्वामी-सेवकाचा संवाद
ज्याच्या मनात ठसला, त्यालाच श्रीरामांच्या चरणांची भक्ती मिळाली.’
सुनि प्रभु बचन कहहिं कपिबृंदा । जय जय जय कृपाल
सुखकंदा ॥
तब रघुपति कपिपतिहि बोलावा । कहा चलैं कर करहु बनावा
॥
प्रभूंचे बोलणे ऐकून वानरगण म्हणू लागले, ‘
कृपाळू आनंदकंद श्रीरामांचा विजय असो, विजय असो. ‘ मग श्रीरघुनाथांनी वानरराज
सुग्रीवाला बोलावून सांगितले की, ‘ निघायची तयारी करा. ‘ ॥ ३ ॥
अब बिलंबु केहि कारन कीजे । तुरत कपिन्ह कहुँ
आयसु दीजे ॥
कौतुक देखि सुमन बहु बरषी । नभ तें भवन चले सुर
हरषी ॥
आता उशीर कशाला करायचा ? वानरांना लगेच आज्ञा
दे.’ भगवंतांची ही रावण-वधाच्या तयारीची लीला पाहून
देव खूप फुले उधळून आणि आनंदित होऊन
आकाशातून आपापल्या लोकी निघून गेले. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment