SunderKanda Part 15
दोहा—रामु सत्यसंकल्प प्रभु सभा कालबस तोरि ।
मैं रघुबीर सरन अब जाउँ देहु जनि खोरि ॥ ४१ ॥
‘ श्रीराम सत्यसंकल्प व सर्वसमर्थ प्रभू व हे
रावणा, तुझी सभा काळाच्या दाढेत आहे. म्हणून मी श्रीरामांना शरण जातो. नंतर मला
दोष देऊ नकोस.’ ॥ ४१ ॥
अस कहि चला बिभीषनु जबहीं । आयूहीन भए सब तबहीं ॥
साधु अवग्या तुरत भवानी । कर कल्यान अखिल कै हानी
॥
असे म्हणून बिभीषण जाताच सर्व राक्षसांचा
मृत्यु निश्र्चित झाला. शिव म्हणतात, ‘ हे भवानी, साधूचा अपमान संपूर्ण कल्याणाचा
तत्काळ नाश करतो. ॥ १ ॥
रावन जबहिं बिभीषन त्यागा । भयउ बिभव बिनु तबहिं
अभागा ॥
चलेउ हरषि रघुनायक पाहीं । करत मनोरथ बहु मन
माहीं ॥
रावणाने ज्या क्षणी बिभीषणाचा त्याग केला,
त्याच क्षणी तो अभागी ऐश्र्वर्यहीन झाला. बिभीषण आनंदामध्ये अनेक मनोरथ करीत
श्रीरघुनाथांच्याकडे गेला. ॥ २ ॥
देखिहउँ जाइ चरन जलजाता । अरुन मृदुल सेवक सुखदाता
॥
जे पद परसि तरी रिषिनारी । दंडक कानन पावनकारी ॥
तो विचार करीत होता की, ‘ मी जाऊन भगवंताच्या
कोमल व तांबूस चरण-कमलांचे दर्शन घेईन. ते सेवकांना सुख देणारे आहेत. त्या
चरणांच्या स्पर्शाने ऋषिपत्नी अहल्येचा उद्धार झाला आणि ते चरण दंडकवनास पवित्र
करणारे आहेत. ॥ ३ ॥
जे पद जनकसुतॉं उर लाए । कपट कुरंग संग धर धाए ।
हर उर सर सरोज पद जेई । अहोभाग्य मैं देखिहउँ तेई
॥
जे चरण जानकीने आपल्या हृदयी धारण केले आहेत,
जे चरण कपटमृगाच्या मागे पृथ्वीवर धावत होते आणि जी चरण-कमले साक्षात शिवांच्या
हृदयरुपी सरोवरात विराजमान आहेत, तीच मी आज पाहीन. हे केवढे माझे भाग्य ! ॥ ४ ॥
दोहा—जिन्ह पायन्ह के
पादुकन्हि रतु रहे मन लाइ ।
ते पद आजु बिलोकिहउँ इन्ह
नयनन्हि अब जाइ ॥ ४२ ॥
ज्या चरणांच्या
पादुकांमध्ये भरताने आपले मन मग्न केले आहे, अहाहा, आज जाऊन त्याच चरणांचे दर्शन
मी आपल्या नेत्रांनी घेणार ! ॥ ४२ ॥
एहि बिधि करत सप्रेम बिचारा
। आयउ सपदि सिंधु एहिं पारा ॥
कपिन्ह बिभीषनु आवत देखा ।
जाना कोउ रिपु दूत बिसेषा ॥
अशा प्रकारे
प्रेमपूर्वक विचार करीत बिभीषण लगेच समुद्राच्या पलीकडील तीरावर पोहोचला. बिभीषण
येताना पाहून वानरांना वाटले की, हा शत्रूचा कोणी खास दूत असावा. ॥ १ ॥
ताहि राखि कपीस पहिं आए ।
समाचार सब ताहि सुनाए ॥
कह सुग्रीव सुनहु रघुराई ।
आवा मिलन दसानन भाई ॥
त्याला पहार्यावर
थांबवून ते सुग्रीवाजवळ आले आणि त्यांनी बातमी सांगितली. सुग्रीवाने
श्रीरामांच्याजवळ सांगितले की, ‘ हे रघुनाथा, रावणाचा भाऊ तुम्हांला भेटायला आला
आहे. ‘ ॥ २ ॥
कह प्रभु सखा बूझिऐ काहा ।
कहइ कपीस सुनहु नरनाहा ॥
जानि न जाइ निसाचर माया ।
कामरुप केहि कारन आया ॥
प्रभू राम म्हणाले, ‘
हे मित्रा, तुझा काय विचार आहे ?’ वानरराज सुग्रीव म्हणाला, ‘ हे महाराज,
राक्षसांची माया समजत नाही. आपल्या इच्छेप्रमाणे रुप बदलणारा हा कशासाठी आला आहे,
कुणास ठाऊक ! ॥ ३ ॥
भेद हमार लेन सठ आवा ।
राखिअ बॉंधि मोहि अस भावा ॥
सखा नीति तुम्ह नीकि बिचारी
। मम पन सरनागत भयहारी ॥
मला असे वाटते की, हा
मूर्ख आपले रहस्य जाणून घेण्यासाठी आला आहे, म्हणून याला बांधून घालावे, ‘ श्रीराम
म्हणाले, ‘ हे मित्रा, तू चांगली नीती सांगितलीस. परंतु शरणागताचे भय दूर करणे, हे
माझे ब्रीद आहे. ॥ ४ ॥
सुनि प्रभु बचन हरष हनुमाना
। सरनागत बच्छल भगवाना ॥
प्रभूंचे वचन ऐकून
हनुमानाला आनंद झाला. तो मनात म्हणू लागला की, ‘ भगवान किती शरणागतवत्सल आहेत ! ‘
॥ ५ ॥
दोहा—सरनागत कहुँ जे तजहिं
निज अनहित अनुमानि ।
ते नर पावँर पापमय तिन्हहि
बिलोकत हानि ॥ ४३ ॥
मग श्रीराम म्हणू
लागले, ‘ जे लोक आपले अहित होईल, असे अनुमान करुन शरण आलेल्याला दूर लोटतात, ते
क्षुद्र होत, पापी होत. त्यांना पाहणे हेसुद्धा पाप आहे.’ ॥ ४३ ॥
कोटि बिप्र बध लागहिं जाहू
। आएँ सरन तजउँ नहिं ताहू ॥
सनमुख होइ जीव मोहि जबहीं ।
जन्म कोटि अघ नासहिं तबहीं ॥
ज्याने कोट्यावधी
ब्राह्मणांची हत्या केली असेल, तोही शरण आल्यास मी त्याचा त्याग करीत नाही.
ज्याक्षणीं जीव माझ्यासमोर येतो, त्याच क्षणी त्याचे कोट्यावधी जन्मांचे पाप नष्ट
होते. ॥ १ ॥
पापवंत कर सहज सुभाऊ । भजनु
मोर तेहि भाव न काऊ ॥
जौं पै दुष्ट हृदय सोइ होई
। मोरें सनमुख आव कि सोई ॥
माझे भजन कधीही न
आवडणे, हा पापी मनुष्याचा मुळचा स्वभाव असतो. जर तो रावणाचा भाऊ खराच दुष्ट मनाचा
असता, तर तो माझ्यासमोर आला असता का ? ॥ २ ॥
निर्मल मन जन सो मोहि पावा
। मोहि कपट छल छिद्र न भावा ॥
भेद लेन पठवा दससीसा ।
तबहुँ न कछु भय हानि कपीसा ॥
जो मनुष्य निर्मल मनाचा
असतो, तोच मला भेटतो. मला कपट, लबाडी हे आवडत नाहीत. जरी रावणाने आपले रहस्य
जाणण्यासाठी त्याला पाठविले असले, तरी हे सुग्रीवा, आपल्याला कोणतेही भय किंवा नुकसान
नाही. ॥ ३ ॥
जग महुँ सखा निसाचर जेते ।
लछिमनु हनइ निमिष महुँ तेते ॥
जौं सभीत आवा सरनाईं ।
रखिहउँ ताहि प्रान की नाईं ॥
कारण हे मित्रा, जगात जितके म्हणून राक्षस आहेत,
त्यांना एका क्षणांत लक्ष्मण मारु शकतो आणि तो
भयभीत होऊन मला शरण आला असेल, तर मी त्याला
प्राणाप्रमाणे जपेन. ‘ ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment