SunderKanda Part 14
दोहा—सचिव बैद गुर तीनि जौं
प्रिय बोलहिं भय आस ।
राज धर्म तन तीनि कर होइ
बेगिहीं नास ॥ ३७ ॥
मंत्री, वैद्य व गुरु
हे तिघे जर कुणी नाताज होईल या भीतीने किंवा लाभाच्या आशेने हिताची गोष्ट न सांगता
प्रिय बोलले, तर ते राज्य, शरीर व धर्म या तिन्हींचा लवकरच नाश होतो. ॥ ३७ ॥
सोइ रावन कहुँ बनी सहाई ।
अस्तुति करहिं सुनाइ सुनाई ॥
अवसर जानि बिभीषन आवा ।
भ्राता चरन सीसु तेहिं नावा ॥
रावणावरही असाच प्रसंग
आला. मंत्री त्याच्यासमोर स्तुती करीत होते. याचवेळी योग्य प्रसंग पाहून बिभीषण
तेथे आला. त्याने मोठा भाऊ रावण याच्या चरणी मस्तक नम्र केले. ॥ १ ॥
पुनि सिरु नाइ बैठ निज आसन
। बोला बचन पाइ अनुसासन ॥
जौ कृपाल पूँछिहु मोहि बाता
। मति अनुरुप कहउँ हित ताता ॥
मग पुन्हा एकदा नतमस्तक
होऊन तो आपल्या आसनावर बसला आणि आज्ञा घेऊन म्हणाला, ‘ हे कृपाळू, तू मला विचारलेच
आहेस, म्हणून हे दादा ! मी आपल्या बुद्धीनुसार तुझ्या हिताची गोष्ट सांगतो, ॥ २ ॥
जो आपन चाहै कल्याना ।
सुजसु सुमति सुभ गति सुख नाना ॥
सो परनारि लिलार गोसाईं ।
तजउ चउथि के चंद कि नाईं ॥
ज्या मनुष्याला आपले
कल्याण, सुंदर कीर्ती, सुंदर बुद्धी, शुभगती आणि नाना प्रकारची सुखे हवी असतात, हे
स्वामी, त्याने परस्त्रीच्या मुखाकडे चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे अशुभ मानून पाहू
नये. ॥ ३ ॥
चौदह भुवन एक पति होई ।
भूतद्रोह तिष्टइ नहिं सोई ॥
गुन सागर नागर नर जोऊ । अलप
लोभ भल कहइ न कोऊ ॥
चौदा भुवनांचा एकच
स्वामी असला तरी तोसुद्धा जिवांशी वैर केल्याने टिकू शकत नाही. जो मनुष्य गुणांचा
समुद्र आणि चतुर आहे, परंतु त्याला थोडासा जरी लोभ असला तरी त्याला कोणी चांगले
म्हणत नाहीत. ॥ ४ ॥
दोहा—काम क्रोध मद लोभ सब
नाथ नरक के पंथ ।
सब परिहरि रघुबीरहि भजहिं
जेहि संत ॥ ३८ ॥
हे राजा, काम, क्रोध,
मद, लोभे हे सर्व नरकाचे मार्ग आहेत. यांना सोडून देऊन श्रीरामचंद्रांना भज. संत
त्यांना भजतात. ॥ ३८ ॥
तात राम नहिं नर भूपाला ।
भुवनेस्वर कालहु कर काला ॥
ब्रह्म अनामय अज भगवंता ।
ब्यापक अजित अनादि अनंता ॥
हे बंधो ! श्रीराम
मनुष्यांचे राजा नव्हेत. ते सर्व लोकांचे स्वामी आणि कालाचेही काल आहेत. ते षडैश्वर्यसंपन्न
भगवान आहेत. ते विकाररहित, अजन्मा, व्यापक, अजेय, अनादी आणि अनंत ब्रह्म आहेत. ॥ १
॥
गो द्विज धेनु देव हितकारी
। कृपासिंधु मानुष तनुधारी ॥
जन रंजन भंजन खल ब्राता ।
बेद धर्म रच्छक सुनु भ्राता ॥
त्या कृपेचे समुद्र
असलेल्या भगवानाने पृथ्वी, ब्राह्मण, गाई आणि देवांच्या कल्याणासाठीच मनुष्यशरीर
धारण केलेले आहे. हे बंधू, ऐकून घे. ते सेवकांना आनंद देणारे, दुष्टांच्या समूहाचा
नाश करणारे आणि वेद व धर्म यांचे रक्षण करणारे आहेत. ॥ २ ॥
ताहि बयरु तजि नाइअ माथा ।
प्रनतारति भंजन रघुनाथा ॥
देहु नाथ प्रभु कहुँ बैदेही
। भजहु राम बिनु हेतु सनेही ॥
त्यांच्याशी वैर सोडून
त्यांच्यापुढे मस्तक नम्र कर. ते रघुनाथ शरणागतांचे दुःख नष्ट करणारे आहेत. हे
नाथ, त्या सर्वेश्वर प्रभूंना जानकी देऊन टाक आणि अकारण प्रेम करणार्या
श्रीरामांना भज. ॥ ३ ॥
सरन गएँ प्रभु ताहु न
त्यागा । बिस्व द्रोह कृत अघ जेहि लागा ॥
जासु नाम त्रय ताप नसावन ।
सोइ प्रभु प्रगट समुझु जियँ रावन ॥
ज्याला संपूर्ण जगाशी
द्रोह करण्याचे पाप लागले आहे, तो प्रभूंना शरण गेल्यास ते त्याचाही त्याग करीत
नाहीत. ज्यांचे नाम तिन्ही तापांचा नाश करणारे आहे, तेच प्रभू मनुष्यरुपाने प्रगट
झाले आहेत. हे रावणा, मनापासून हे समजून घे. ॥ ४ ॥
दोहा—बार बार पद लागउँ बिनय
करउँ दससीस ।
परिहरि मान मोह मद भजहु
कोसलाधीस ॥ ३९ ( क ) ॥
हे दशानना ! मी वारंवार
तुझ्या पाया पडतो आणि विनंती करतो की, मान, मोह व मद यांचा त्याग करुन श्रीरामांचे
भजन कर. ॥ ३९ ( क ) ॥
मुनि पुलस्ति निज सिष्य सन
कहि पठई यह बात ।
तुरत सो मैं प्रभु सन कही
पाइ सुअवसरु तात ॥ ३९ ( ख ) ॥
पुलस्त्य मुनींनी
आपल्या शिष्याबरोबर हाच निरोप पाठविला आहे. बंधो ! योग्य वेळ बघून मी ती गोष्ट
तुला सांगत आहे. ‘ ॥ ३९ ( ख ) ॥
माल्यवंत अति सचिव सयाना ।
तासु बचन सुनि अति सुख माना ॥
तात अनुज तव नीति बिभूषन ।
सो उर धरहु जो कहत बिभीषन ॥
माल्यवान नावाचा एक मोठा
बुद्धिमान मंत्री होता. त्याला बिभीषणाचे बोलणे ऐकून आनंद झाला, तो म्हणाला, ‘ हे
महाराज ! तुमचे बंधू नीति-विभूषण आहेत. बिभीषण जे सांगत आहेत, ते लक्षात ठेवा.’ ॥
१ ॥
रिपु उतकरष कहत सठ दोऊ ।
दूरि न करहु इहॉं हइ कोऊ ॥
माल्यवंत गृह गयउ बहोरी ।
कहइ बिभीषन पुनि कर जोरी ॥
रावण म्हणाला, ‘ हे
दोघे मूर्ख शत्रूचा महिमा सांगत आहेत. इथे कोणी आहे काय ? या दोघांना येथून हाकला.
‘ तेव्हा माल्यवान घरी गेला आणि बिभीषण हात जोडून पुन्हा बोलू लागला. ॥ २ ॥
सुमति कुमति सब कें उर
रहहीं । नाथ पुरान निगम अस कहहीं ॥
जहॉं सुमति तहँ संपति नाना
। जहॉं कुमति तहँ बिपति निदाना ॥
‘ हे बंधो, पुराणे व
वेद असे सांगतात की, सुबुद्धी आणि कुबुद्धी सर्वांच्या मनात असते. जेथे सुबुद्धी
असते, तेथे नाना प्रकारच्या संपदा असतात आणि जेथे कुबुद्धी असते, तेथे परिणामी
विपत्ती असतात. ॥ ३ ॥
तव उर कुमति बसी बिपरीता ।
हित अनहित मानहु रिपु प्रीता ॥
कालराति निसिचर कुल केरी ।
तेहि सीता पर प्रीति घनेरी ॥
तुझ्या मनात उलटी
बुद्धी आलेली आहे. म्हणून तू हिताला अहित व शत्रूला मित्र मानत आहात. जी
राक्षसकुलासाठी काळरात्र आहे, त्या सीतेवर तुझे फार प्रेम आहे. ॥ ४ ॥
दोहा—तात चरन गहि मागउँ
राखहु मोर दुलार ।
सीता देहु राम कहुँ अहित न
होइ तुम्हार ॥ ४० ॥
हे राजन ! मी तुझे पाय
धरुन तुझ्याकडे भीक मागतो की, तू मज भावाचा आग्रह प्रेमाने स्वीकार. श्रीरामांना
सीता देऊन टाक. त्यामुळे तुझे अहित होणार नाही. ‘ ॥ ४० ॥
बुध पुरान श्रुति संमत बानी
। कही बिभीषन नीति बखानी ॥
सुनत दसानन उठा रिसाई । खल
तोहि निकट मृत्यु अब आई ॥
बिभीषणाने पंडित, पुराण
आणि वेद यांना संमत असलेली नीती वर्णन करुन सांगितली, परंतु ते ऐकताच रावण खवळून
म्हणाला, ‘ अरे दुष्टा, आता तुझा मृत्यु जवळ आला आहे. ॥ १ ॥
जिअसि सदा सठ मोर जिआवा ।
रिपु कर पच्छ मूढ़ तोहि भावा ॥
कहसि न खल अस को जग माहीं ।
भुज बल जाहि जिता मैं नाहीं ॥
अरे मूर्खा, तू जिवंत
आहेस, तो मी पोसल्यामुळे. हे मूर्खा, तुला शत्रूचा पक्ष चांगला वाटतो. अरे दुष्टा,
जगात मी माझ्या स्वतःच्या भुजबलाने जिंकला नाही, असा कोण आहे ते सांग ? ॥ २ ॥
मम पुर बसि तपसिन्ह पर
प्रीती । सठ मिलु जाइ तिन्हहि कहु नीती ॥
अस कहि कीन्हेसि चरन
प्रहारा । अनुज गहे पद बारहिं बारा ॥
माझ्या नगरात राहून तू
तपस्वांवर प्रेम करतोस ! मूर्खा, मग त्यांनाच जाऊन भेट आणि त्यांना नीती सांग. ‘
असे म्हणून रावणाने बिभीषणाला लाथ मारली. परंतु बिभीषणाने तरीही वारंवार त्याचे
पाय धरले. ॥ ३ ॥
उमा संत कइ इहइ बड़ाई । मंद
करत जो करइ भलाई ॥
तुम्ह पितु सरिस भलेहिं
मोहि मारा । रामु भजें हित नाथ तुम्हारा ॥
शिव म्हणतात, ‘ हे उमे,
संतांचे हेच मोठेपण असते की, ते वाईट करणार्याचेही भलेच करीत असतात. ‘ बिभीषण
म्हणाला, ‘ तू मला पित्यासमान आहेस. मला तू मारलेस, त्याचे मला वाईट वाटत नाही.
परंतु हे राजा ! तुझे कल्याण श्रीरामांना भजण्यात आहे. ‘ ॥ ४ ॥
सचिव संग लै नभ पथ गयऊ ।
सबहि सुनाइ कहत अस भयऊ ॥
असे म्हणून बिभीषण
आपल्या मंत्र्यांसह आकाश-मार्गाने गेला आणि सर्वांना उद्देशून म्हणाला, ॥ ५ ॥
No comments:
Post a Comment