Saturday, October 5, 2013

Shri Devyaha PratahaSmaranam श्रीदेव्याः प्रातःस्मरणम्

Shri Devyaha PratahaSmaranam 
Shri Devyaha PratahaSmaranam is in Sanskrit. It is a praise of Goddess. It is to be recited earlier in the morning. 
श्रीदेव्याः प्रातःस्मरणम् 
प्रातः स्मरामि शरदिन्दुकरोज्ज्वलाभां 
सद्रत्नवन्मकरकुण्डलहारभूषाम् । 
दिव्यायुधोर्जितसुनीलशस्रहस्तां 
रक्तोत्पलाभचरणां भवतीं परेशाम् ॥ १ ॥ 
प्रातर्नमामि महिषासुरचण्डमुण्ड 
शुम्भासुरप्रमुखदैत्यविनाशदक्षाम् । 
ब्रह्मेन्द्ररुद्रमुनिमोहनशीललीलां 
चण्डीं समस्तसुरमूर्तिमनेकरुपाम् ॥ २ ॥ 
प्रातर्भजामि भजतामभिलाषदात्रीं 
धात्रीं समस्तजगतां दुरितापहन्त्रीम् । 
संसारबन्धनविमोचनहेतुभूतां मायां 
परां समधिगम्य परस्य विष्णोः ॥ ३ ॥ 
॥ इति श्रीदेव्याः प्रातःस्मरणं सम्पूर्णम् ॥ 
श्रीदेव्याः प्रातःस्मरणंचा मराठी अर्थ: 
१ जिची अंगकांति शरदांतील चंद्राच्या किरणांप्रमाणे उज्वल आहे. जी उत्तम रत्नांनी जडविलेल्या मकराकृती कुंडलांनी आणि हारानी शोभून दिसत आहे. जीचे घन नीळ हजारो हात दिव्य आयुधांनी संपन्न आहेत. जिचे चरण लाल कमलाच्या कान्तिप्रमाणे लाल आहेत. अशा परमेश्र्वरीचे मी प्रातःकाळी स्मरण करतो. 
२ जी महिषासुर, चणड, मुण्ड, शुम्भासुर इत्यादि प्रमुख दैंत्यांचा विनाश करण्यांत निपुण आहे. लीलापूर्वक ब्रह्मा, इन्द्र, रुद्र आणि मुनींना मोहित करणारी, सनस्त देवतांची मूर्तिस्वरुप, अनेक रुपे धारण करणारी अशा चण्डीला मी प्रातःकाळी नमस्कार करतो. 
३ जी भजन करणार्‍या भक्तांची अभिलाषा पूर्ण करते, जी समस्त जगाचे पालन-पोषण करते, जी पापांचा नाश करते, जी संसार बंधनांतून मुक्त करणारी भगवान विष्णुंची परा माया आहे. अशा त्या देवीला मी प्रातःकाळी भजतो. 
अशा रीतीने हे देविचे प्रातःस्मरण येथे पुरे झाले.
Shri Devyaha PratahaSmaranam
श्रीदेव्याः प्रातःस्मरणम्


Custom Search

No comments: