ShriRamCharitManas Part 11 श्रीरामचरितमानस भाग ११
श्रीरामचरितमानस---प्रथम
सोपान---बालकाण्ड
दोहा—
सबदरसी सुनिअ प्रभु करउ सो बेगि उपाइ ।
होइ मरनु जेहिं बिनहिं श्रम दुसह
बिपत्ति बिहाइ ॥ ५९ ॥
तर हे सर्वदर्शी
प्रभो ! ऐका आणि माझे मरण लवकर यावे, असा काही उपाय करा. मग विनासायास हे (
पति-परित्यागरुपी ) असह्य दुःख नाहीसे होइल. ॥ ५९ ॥
एहि बिधि दुखित
प्रजेसकुमारी । अकथनीय दारुन दुखु भारी ॥
बीतें संबत सहस
सतासी । तजी समाधि संभु अबिनासी ॥
अशाप्रकारे
दक्षकन्या सती ही फार दुःखी होती. तिला इतके भतंकर दुःख होते की, त्याचे वर्णन
करता येत नाही. सत्त्याऐंशी हजार वर्षांनंतर अविनाशी शिवांनी समाधी उतरविली. ॥ १ ॥
राम नाम सिव सुमिरन
लागे । जानेउ सतीं जगतपति जागे ॥
जाइ संभु पद बंदनु
कीन्हा । सनमुख संकर आसन दीन्हा ॥
श्रीशंकर रामनामाचे स्मरण
करु लागले, तेव्हा जगाचे स्वामी ( शंकर ) जागे झाले आहेत हे सतीला कळले. तिने जाऊन
त्यांच्या चरणी प्रणाम केला. शिवांनी तिला बसण्यासाठी समोर आसन दिले. ॥ २ ॥
लगे कहन हरिकथा
रसाला । दच्छ प्रजेस भए तेहि काला ॥
देखा बिधि बिचारि सब
लायक । दच्छहि कीन्ह प्रजापति नायक ॥
श्रीशंकर तिला
श्रीहरींच्या रसाळ कथा सांगू लागले. त्याचवेळी दक्ष हा प्रजापती झाला.
ब्रह्मदेवाने सर्वप्रकारे योग्य समजून प्रजापतींचा नायक म्हणून त्याला निवडले. ॥ ३
॥
बड अधिकार दच्छ जब पावा । अति अभिमानु हृदयॅ तब आवा
॥
नहिं कोउ अस जनमा जग
माहीं । प्रभुता पाइ जाहि मद नाहीं ॥
दक्षाला जेव्हा मोठा
अधिकार प्राप्त झाला, तेव्हा त्याच्या मनात अभिमान जागा झाला. सत्ता मिळाल्यावर मद
चढत नाही, असा जगात कोणी झालेला नाही. ॥ ४ ॥
दोहा—दच्छ लिए मुनि
बोलि सब करन लगे बड जाग ।
नेवते सादर सकल सुर
जे पावत मख भाग ॥ ६० ॥
दक्षाने सर्व
मुनींना बोलावले आणि तो मोठा यज्ञ करु लागला. हविर्भागाचा ज्यांना अधिकार होता,
त्या सर्व देवांना दक्षाने आदराने निमंत्रित केले. ॥६०॥
किंनर नाग सिद्ध
गंधर्बा । बधुन्ह समेत चले सुर सर्बा ॥
बिष्णु बिरंचि महेसु
बिहाई । चले सकल सुर जान बनाई ॥
( दक्षाचे निमंत्रण
मिळाल्यावर ) किन्नर, नाग, सिद्ध, गंधर्व आणि सर्व देव हे आपापल्या स्रियांसह
निघाले. विष्णू, ब्रह्मदेव आणि महादेव हे सोडून सर्व देव आपापली विमाने सजवून
निघाले. ॥ १ ॥
सतीं बिलोके ब्योम बिमाना
। जात चले सुंदर बिधि नाना ॥
सुर सुंदरी करहिं कल
गाना । सुनत श्रवन छूटहिं मुनि ध्याना ॥
अनेक प्रकारची सुंदर
विमाने आकाशमार्गाने जात असल्याचे सतीने पाहिले, अप्सरा मधुर गीत गात होत्या. ते
ऐकून मुनींचे ध्यानही विचलित होत होते. ॥ २ ॥
पूछेउ तब सिवँ कहेउ
बखानी । पिता जग्य सुनि कछु हरषानी ॥
जौं महेसु मोहि आयसु
देहीं । कछु दिन जाइ रहौं मिस एहीं ॥
विमानांतून देव कां
जात आहेत, म्हणून सतीने विचारले, तेव्हा श्रीशिवांनी सर्व हकीगत सांगितली. वडील
यज्ञ करीत आहेत, हे ऐकून सती काहीशी प्रसन्न झाली आणि विचार करु लागली की
श्रीशंकरांनी जर मला आज्ञा दिली, तर या निमित्ताने काही दिवस माहेरी जाऊन राहता
येईल. ॥ ३ ॥
पति परित्याग हृदयँ
दुखु भारी । कहइ न निज अपराध बिचारी ॥
बोली सती मनोहर बानी
। भय संकोच प्रेम रस सानी ॥
कारण पतीने त्याग
केल्याचे मोठे शल्य तिच्या मनात होते. परंतु आपल्याकडूनच अपराध झाला, म्हणून ती
काही बोलत नव्हती. शेवटी ती भय, संकोच आणि प्रेमाने भरलेल्या अशा मनोहर वाणीने
म्हणाली, ॥ ४ ॥
दोहा—पिता भवन उत्सव
परम जौं प्रभु आयसु होइ ।
तौं मैं जाउँ
कृपायतन सादर देखन सोइ ॥ ६१ ॥
‘ हे प्रभो, माझ्या
पित्याच्या घरी फार मोठा उत्सव आहे. तो पाहाण्याची मला उत्सुकता आहे. हे कृपानिधान
! जर तुमची आज्ञा असेल तर मी तो पाहाण्यास जाऊ काय ?’ ॥ ६१ ॥
कहेहु नीक मोरेहुँ
मन भावा । यह अनुचित नहिं नेवत पठावा ॥
दच्छ सकल निज सुता
बोलाईं । हमरें बयर तुम्हउ बिसराईं ॥
श्रीशिव म्हणाले, ‘
तू म्हणतेस ते ठीक आहे. मलाही ते पटते, पण त्यांनी निमंत्रण पाठविले नाही, हे
योग्य नव्हे. दक्षाने सर्व मुलींना बोलाविले आहे, परंतु आमच्याशी वैर असल्याने ते
तुलाही विसरले. ॥ १ ॥
ब्रह्मसभॉ हम सन
दुखु माना । तेहि तें अजहुँ करहिं अपमाना ॥
जौं बिनु बोलें जाहु
भवानी । रहइ न सीलु सनेहु न कानी ॥
एकदा ब्रह्मदेवाच्या
सभेमध्ये ते आमच्यावर नाराज झाले होते. त्यामुळे अजूनही ते आमचा अपमान करतात. हे
भवानी, निमंत्रण नसतांना तू गेलीस, तर त्यात शील, प्रेम किंवा मान-मर्यादा असणार
नाही. ॥ २ ॥
जदपि मित्र प्रभु
पितु गुर गेहा । जाइअ बिनु बोलेहुँ न सँदेहा ॥
तदपि बिरोध मान जहँ
कोई । तहॉ गएँ कल्यानु न होई ॥
मित्र, स्वामी, पिता
आणि गुरु यांच्या घरी न बोलावताही जावे, यात काही शंका नाही. तरीही जिथे कोणी वैर
करत असेल, तिथे जाण्याने कल्याण होणार नाही. ॥ ३ ॥
भॉंति
अनेक संभु समुझावा । भावी बस न ग्यानु उर आवा ॥
कह प्रभु जाहु जो
बिनहिं बोलाएँ । नहिं भलि बात हमारे भाएँ ॥
शिवांनी अनेक
प्रकारे समजावून सांगितले, परंतु पुढें होणार्या अटळ गोष्टीमुळे सतीला ते पटले
नाही. तेव्हा शिव म्हणाले की, ‘ जर न बोलाविता तू गेलीस, तर आमच्या मते ती चांगली
गोष्ट होणार नाही. ॥ ४ ॥
दोहा—कहि
देखा हर जतन बहु रहइ न दच्छकुमारि ।
दिए मुख्य गन संग तब
बिदा कीन्ह त्रिपुरारि ॥ ६२ ॥
शिवांनी पुष्कळ
सांगून पाहिले, परंतु सती काही ऐकेना, तेव्हा महादेवांनी आपले मुख्य गण सोबत देऊन
तिला पाठवून दिले. ॥ ६२ ॥
पिता भवन जब गईं
भवानी । दच्छ त्रास काहुँ न सनमानी ॥
सादर भलेहिं मिली एक
माता । भगिनीं मिलीं बहुत मुसुकाता ॥
भवानी जेव्हा आपल्या
वडिलांच्या घरी गेली, तेव्हा दक्षाच्या भीतीमुळे कुणीही तिचे स्वागत केले नाही,
फक्त आई तेवढी आदराने तिला भेटली. बहिणी भेटल्या पण त्यांनी सतीला पाहून नाके
मुरडली. ॥ १ ॥
दच्छ न कछु पूछी कुसलाता
। सतिहि बिलोकि जरे सब गाता ॥
सतीं जाइ देखेउ तब
जागा । कतहुँ न दीख संभु कर भागा ॥
स्वतः दक्षाने
विचारपूस केली नाही. सतीला पाहून दक्षाच्या अंगाची लाही लाही झाली. जेव्हा सतीने
जाऊन यज्ञ पाहिला, तेव्हा तिथे कुठे शिवांचा भाग ठेवलेला दिसला नाही. ॥ २ ॥
तब चित चढेउ जो संकर
कहेऊ । प्रभु अपमानु समुझि उर दहेऊ ॥
पाछिल दुखु न हृदयँ अस
ब्यापा । जस यह भयउ महा परितापा ॥
शंकरांनी जे
सांगितले होते, ते सतीला आठवले. आपल्या पतीच्या अपमानामुळे सतीचे मन दुःखी झाले.
पूर्वी त्यागामुळे तिचे मन इतके कष्टी झाले नव्हते, परंतु यावेळी मात्र ( पतीच्या
अपमानामुळे ) तिचे काळीज पेटून उठले. ॥ ३ ॥
जद्यपि जग दारुन दुख
नाना । सब तें कठिन जाति अवमाना ॥
समुझि सो सतिहि भयउ
अति क्रोधा । बहु बिधि जननीं कीन्ह प्रबोधा ॥ ४ ॥
जरी जगामध्ये अनेक
प्रकारचीघोर दुःखे असली, तरी स्वजनांकडून होणारा अपमान हा फार भयंकर असतो. तो
पाहून सतीच्या अंगाचा तिळपापड झाला. आईने तिला पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला. ॥
४ ॥
दोहा—सिव अपमानु न
जाइ सहि हृदयँ न होइ प्रबोध ।
सकल सभहि हठि हटकि
तब बोलीं बचन सक्रोध ॥ ६३ ॥
सतीला शिवांचा अपमान
सहन झाला नाही. तिला दुसरा विचारच सुचेना. तेव्हा भरसभेत आवेशाने फटकारुन ती
रागारागाने बोलू लागली. ॥ ६३ ॥
सुनहु सभासद मुनिंदा
। कही सुनी जिन्ह संकर निंदा ॥
सो फलु तुरत लहब सब
काहूँ । भली भॉंति पछिताब पिताहूँ ॥
“ सभासदानों व सर्व
मुनीश्र्वरांनो, ऐका ज्या लोकांनी शिवांची निंदा केली आहे किंवा ऐकली आहे, त्या
सर्वांना त्याचे फळ ताबडतोब मिळणार आहे. आणि माझे वडिल दक्ष यांनाही चांगलाच पश्र्चाताप करावा
लागेल. ॥ १ ॥
संत संभु श्रीपति
अपबादा । सुनिअ जहॉं तहँ असि मरजादा ॥
काटिअ तासु जीभ बसाई
। श्रवन मूदि न त चलिअ पराई ॥
जेथे संतांची,
शिवांची किंवा भगवान विष्णूंची निंदा कानीं पडते, तेथे असा नियम आहे की, शक्य असेल
तर निंदा करणार्याची जीभ छाटावी आणि नसेल तर कान बंद करुन तेथून निघून जावे. ॥ २
॥
जगदातमा महेसु
पुरारी । जगत जनक सब के हितकारी ॥
पिता मंदमति निंदत
तेही । दच्छ सुक्र संभव यह देही ॥
त्रिपुरासुराला
मारणारे भगवान महेश्र्वर हे संपूर्ण जगाचे आत्मा आहेत. ते जगत्पिता आहेत आणि
सर्वांचे कल्याण करणारे आहेत. माझा मूर्ख पिता त्यांची निंदा करीत आहे आणि माझा हा
देह दक्षाच्याच वीर्यापासून बनला आहे. ॥ ३ ॥
तजिहउँ तुरत देह
तेहि हेतु । उर धरि चंद्रमौलि बृषकेतू ॥
अस कहि जोग अगिनि
तनु जारा । भयउ सकल मख हाहाकारा ॥
म्हणून मी आपल्या
भाळी चंद्रमा धारण करणार्या वृषध्वज शिवांचे स्मरण करुन हे माझे शरीर विसर्जित
करते, “ असे म्हणत सतीने योगाग्नीने आपले शरीर भस्म करुन टाकले. संपूर्ण यज्ञशाळेत
हाहाकार माजला. ॥ ४ ॥
दोहा—सती मरनु सुनि
संभु गन लगे करन मख खीस ।
जग्य बिधंस बिलोकि
भृगु रच्छा कीन्हि मुनीस ॥ ६४ ॥
सतीचा देहत्याग ऐकून
शिवांचे गण यज्ञाचा विध्वंस करु लागले, तेव्हा भृगु ऋषींनी यज्ञाचे रक्षण केले. ॥
६४ ॥
समाचार सब संकर पाए
। बीरभद्रु करि कोप पठाए ॥
जग्य बिधंस जाइ
तिन्ह कीन्हा । सकल सुरन्ह बिधिवत फलु दीन्हा ॥
ही वार्ता शिवांना
कळली, तेव्हा त्यांनी रागारागाने वीरभद्राला पाठविले. त्याने जाऊन यज्ञाचा विध्वंस
केला आणि सर्व देवांना यथोचित प्रायश्र्चित्त दिले. ॥ १ ॥
भै जगबिदित दच्छ गति
सोई । जसि कछु संभु बिमुख कै होई ॥
यह इतिहास सकल जग
जानी । ताते मैं संछेप बखानी ॥
शिव-द्रोह्याची जी
गती होते, ती दक्षाच्या वाट्याला आली. हा इतिहास सर्व जगाला ठाऊक आहे, म्हणून मी
तो येथे थोडक्यात सांगितला आहे. ॥ २ ॥
सतीं मरत हरि सन बरु
मागा । जनम जनम सिव पद अनुरागा ।
तेहि कारन हिमगिरि
गृह जाई । जनमीं पारबती तनु पाई ॥
सतीने मरतेवेळी भगवान श्रीहरींजवळ वर मागितला की, ‘
जन्मोजन्मी माझे शिवांच्या चरणी प्रेम राहो.’ म्हणून ती हिमालयाच्या घरी
पार्वतीच्या रुपाने जन्मास आली. ॥ ३ ॥
जब तें उमा सैल गृह
जाईं । सकल सिद्धि संपति तहँ छाई ॥
जहँ तहँ मुनिन्ह
सुआश्रम कीन्हे । उचित बास हिम भूधर दीन्हे ॥
सती जेव्हा
हिमालयाच्या घरी उमेच्या रुपाने जन्माला आली, तेव्हा तो प्रदेश सर्व सिद्धींनी व संपत्तीने
भरुन गेला. मुनींनी जिकडे तिकडे आश्रम बनविले आणि हिमालयाने त्यांना योग्य अशी
स्थानें दिली. ॥ ४ ॥
दोहा—सदा सुमन फल
सहित सब द्रुम नव नाना जाति ।
प्रगटीं सुंदर सैल
पर मनि आकर बहु भॉंति ॥ ६५ ॥
त्या सुंदर पर्वतावर
अनेक प्रकारचे नवनवीन वृक्ष नित्य फुलू-फळू लागले आणि तेथे अनेक तर्हेच्या
रत्नांच्या खाणी प्रगट झाल्या. ॥ ६५ ॥
सरिता सब पुनीत जलु
बहहीं । खग मृग मधुप सुखी सब रहहीं ॥
सहज बयरु सब जीवन्ह
त्यागा । गिरी पर सकल करहिं अनुरागा ॥
सर्व नद्यांमधून
पवित्र जल वाहू लागले आणि पक्षी, पशू, भ्रमर सर्व सुखाने राहू लागले. सर्व जीवांनी
आपले स्वाभाविक वैर सोडून दिले आणि हिमालयात सर्वजण परस्परांवर प्रेम करु लागले. ॥
१ ॥
सोह सैल गिरिजा गृह
आएँ । जिमि जनु रामभगति के पाएँ ॥
नित नूतन मंगल गृह
तासू । ब्रह्मादिक गावहिं जसु जासू ॥
पार्वती घरी
आल्यामुळे हिमालय असा शोभिवंत झाला की, रामभक्ती लाभताच जसा भक्त सुशोभित होतो.
त्या पर्वतराजाच्या घरी नित्य नवनवीन मंगलोत्सव साजरे होऊ लागले. ब्रह्मादिक
देवसुद्धा त्यांची कीर्ती गाऊ लागले. ॥ २
॥
नारद समाचार सब पाए
। कौतुकहीं गिरि गेह सिधाए ॥
सैलराज बड आदर
कीन्हा । पद पखारि बर आसनु दीन्हा ॥
जेव्हा नारदांना हे
वर्तमान समजले, तेव्हा कौतुकाने ते हिमालयाच्या घरी आले. पर्वतराजाने त्यांचा मोठा
आदर-सत्कार केला. त्यांचे पाद-प्रक्षालन करुन त्यांना बसायला उत्तम आसन दिले. ॥ ३
॥
नारि सहित मुनि पद सिरु
नावा । चरन सलिल सबु भवनु सिंचावा ॥
निज सौभाग्य बहुत
गिरि बरना । सुता बोलि मेली मुनि चरना ॥
नंतर आपल्या पत्नीसह
त्यानें मुनींच्या चरणीं मस्तक ठेवले आणि त्यांचे चरणोदक घरभर शिंपडले. आपल्या
भाग्याची त्याने वाखाणणी केली आणि मुलीला बोलावून मुनींच्या चरणीं घातले. ॥ ४ ॥
दोहा—त्रिकालग्य
सर्बग्य तुम्ह गति सर्बत्र तुम्हारि ।
कहहु सुता के दोष
गुन मुनिबर हृदयँ बिचारि ॥ ६६ ॥
( तो म्हणाला ) ‘ हे
मुनीश्र्वर, तुम्ही त्रिकालज्ञ आणि सर्वज्ञ आहात. आपला सर्वत्र संचार असतो. म्हणून
आपण विचार करुन मुलीचे गुण-दोष सांगा.’ ॥ ६६ ॥
कह मुनि बिहसि गूढ
मृदु बानी । सुता तुम्हारि सकल गुन खानी ॥
सुंदर सहज सुसील
सयानी । नाम उमा अंबिका भवानी ॥
नारदमुनींनी हसून
रहस्यपूर्ण कोमल वाणीने म्हटले की, तुमची कन्या सर्व गुणांची खाण आहे. ही स्वभावाने
सुंदर, सुशील आणि समजुतदार आहे. उमा, अंबिका आणि भवानी अशी हिची नावे आहेत. ॥ १ ॥
सब लच्छन संपन्न
कुमारी । होइहि संतत पियहि पिआरी ॥
सदा अचल एहि कर
अहिवाता । एहि तें जसु पैहहिं पितु माता ॥
ही कन्या सर्व
सुलक्षणांनी संपन्न आहे. ही आपल्या पतीला सदा प्रिय असेल. हिचे सौभाग्य सदा अढळ
राहील आणि हिच्यामुळे हिच्या माता-पित्यांना कीर्ती लाभेल. ॥ २ ॥
होइहि पूज्य सकल जग
माहीं । एहि सेवत कछु दुर्लभ नाहीं ॥
एहि कर नामु सुमिरि
संसारा । त्रिय चढिहहिं पतिब्रत असिधारा ॥
ही संपूर्ण जगामध्ये
पूज्य होईल आणि हिची सेवा केल्याने दुर्लभ असे काहीही असणार नाही.जगातील स्रिया
हिचे नाम-स्मरण करीत पातिव्रत्याचे असिधाराव्रत सहजपणे पार पाडू शकतील. ॥ ३ ॥
सैल सुलच्छन सुता
तुम्हारी । सुनहु जे अब अवगुन दुइ चारी ॥
अगुन अमान मातु पितु
हीना । उदासीन सब संसय छीना ॥
पर्वतराज, तुमची
कन्या सुलक्षणी आहे. आता हिचे दोन-चार अवगुण आहेत, तेही ऐकून ठेवा. गुणहीन,
मानहीन, माता-पिताविहीन, उदासीन, ॥ ४ ॥
Custom Search
No comments:
Post a Comment