ShriRamCharitManas
छं०—निज परम प्रीतम देखि
लोचन सुफल करि सुख पाइहौं ।
श्री सहित अनुज समेत
कृपानिकेत पद मन लाइहौं ॥
निर्बान दायक क्रोध जा कर
भगति अबसहि बसकरी ।
निज पानि सर संधानि सो मोहि
बधिहि सुखसागर हरी ॥
तो मनात विचार करु
लागला की, आपल्या परमप्रिय श्रीरामांना पाहून नेत्रांचे पारणे फेडीन. जानकीसह व
लक्ष्मणासह कृपानिधान श्रीरामांच्या चरणी मन लावीन. ज्यांचा क्रोध सुद्धा मोक्ष
देणारा आहे आणि ज्यांची भक्ती स्वतंत्र अशा भगवंताना वश करणारी आहे, अहाहा ! तेच आनंदाचे
सागर असलेले श्रीहरी आपल्या हातांनी बाण मारुन माझा वध करणार !
दोहा---मम पाछें धर धावत
धरें सरासन बान ।
फिरि फिरि प्रभुहि
बिलोकिहउँ धन्य न मो सम आन ॥ २६ ॥
धनुष्य-बाण धारण
केलेल्या प्रभूंना मी माझ्या मागे मागे मला पकडण्यासाठी पृथ्वीवर धावताना वारंवार
पाहीन. माझ्यासारखा धन्य दुसरा कोणीही नाही. ॥ २६ ॥
तेहि बन निकट दसानन गयऊ । तब मारीच कपटमृग भयऊ ॥
अति बिचित्र कछु बरनि न जाई । कनक देह मनि रचित
बनाई ॥
श्रीराम ज्या वनात राहात होते, त्या वनाजवळ
जेव्हा रावण पोहोचला, तेव्हा मारीच वेषधारी मृग झाला. तो इतका अद्भुत होता की,
त्याचे वर्णन करता येत नाही. त्याचे सोन्याचे शरीर रत्नजडित होते. ॥ १ ॥
सीता परम रुचिर मृग देखा । अंग अंग सुमनोहर बेषा
॥
सुनहु देव रघुबीर कृपाला । एहि मृग कर अति सुंदर
छाला ॥
सीतेने ते अत्यंत सुंदर हरण बघितले. त्याच्या
अंगांची शोभा फार मनोहर होती. ती म्हणू लागली, ‘ हे देवा, हे कृपाळू रघुवीर, ऐका.
या मृगाचे कातडे फारच सुंदर आहे. ‘ ॥ २ ॥
सत्यसंध प्रभु बधि करि एही । आनहु चर्म कहति
बैदेही ।
तब रघुपति जानत सब कारन । उठे हरषि सुर काजु
सँवारन ॥
जानकी म्हणाली, ‘ हे सत्यप्रतिज्ञ प्रभो,
याला मारुन याचे कातडे आणून द्या. ‘ तेव्हा रघुनाथ मारीच हा खोटा मृग असल्याचे
जाणूनही देवांचे कार्य सिद्ध करण्यासाठी आनंदाने उठले. ॥ ३ ॥
मृग बिलोकि कटि परिकर बॉंधा । करतल चाप रुचिर सर
सॉंधा ॥
प्रभु लछिमनहि कहा समुझाई । फिरत बिपिन निसिचर
बहु भाई ॥
हरणाला पाहून श्रीरामांनी कंबर कसली आणि
हातात धनुष्य घेऊन त्याच्यावर दिव्य बाण चढविला. मग प्रभूंनी लक्ष्मणाला समजावून
सांगितले की, ‘ हे बंधू, वनात पुष्कळ राक्षस फिरत आहेत. ॥ ४ ॥
सीता केरि करेहु रखवारी । बुधि बिबेक बल समय
बिचारी ॥
प्रभुहि बिलोकि चला मृग भाजी । धाए रामु सरासन
साजी ॥
तू बुद्धीने आणि विवेकाने शक्ती व वेळ-प्रसंग
पाहून सीतेचे रक्षण कर. ‘ प्रभूंना पाहून मृग पळू लागला. श्रीरामचंद्रसुद्धा
धनुष्य सज्ज करुन त्याच्यामागे धावले. ॥ ५ ॥
निगम नेति सिव ध्यान न पावा । मायामृग पाछें सो
धावा ॥
कबहुँ निकट पुनि दूरि पराई । कबहुँक प्रगटइ कबहुँ
छपाई ॥
वेद ज्यांच्याविषयी ‘ नेति नेति ‘ असे
म्हणतात आणि शिवांनाही ध्यानामध्ये ज्यांचे दर्शन घडत नाही, जे मन व वाणी यांच्या
पलीकडचे आहेत, तेच श्रीराम मायेने बनलेल्या मृगामागे धावत होते. तो कधी जवळ येई,
तर कधी दूर पळे. कधी प्रकट दिसे, तर कधी लपून राही. ॥ ६ ॥
प्रगटत दुरत करत छल भूरी । एहि बिधि प्रभुहि गयउ
लै दूरी ॥
तब तकि राम कठिन सर मारा । धरनि परेउ करि घोर
पुकारा ॥
अशाप्रकारे कधी दिसत तर कधी लपत अनेक प्रकारे
कपट करीत तो प्रभूंना दूर घेऊन गेला. तेव्हा श्रीरामांनी नेम धरुन तीक्ष्ण बाण
मारला. तो लागताच तो किंचाळून खाली पडला. ॥ ७ ॥
लछिमन कर प्रथमहिं लै नामा । पाछें सुमिरेसि मन
महुँ रामा ॥
प्रान तजत प्रगटेसि निज देहा । सुमिरेसि रामु
समेत सनेहा ॥
प्रथम लक्ष्मणाचे नाव घेऊन त्याने
श्रीरामांचे स्मरण केले. प्राण-त्याग करताना त्याने आपले राक्षसी रुप प्रकट केले
आणि प्रेमाने श्रीरामांचे स्मरण केले. ॥ ८ ॥
अंतर प्रेम तासु पहिचाना । मुनि दुर्लभ गति
दीन्हि सुजाना ॥
सर्वज्ञ श्रीरामांनी त्याच्या मनातील प्रेम
पाहून त्याला मुनींनाही दुर्लभ असलेली आपल्या परमपदाची गती दिली. ॥ ९ ॥
दोहा---बिपुल सुमन सुर
बरषहिं गावहिं प्रभु गुन गाथ ।
निज पद दीन्ह असुर कहुँ
दीनबंधु रघुनाथ ॥ २७ ॥
देव फुले उधळत होते आणि
प्रभूंची स्तुती करीत होते की, श्रीरघुनाथ असे दीनबंधू आहेत की, त्यांनी असुरालाही
आपले परमपद दिले. ॥ २७ ॥
खल बधि तुरत फिरे रघुबीरा ।
सोह चाप कर कटि तूनीरा ॥
आरत गिरा सुनी जब सीता । कह
लछिमन सन परम सभीता ॥
दुष्ट मारीचाला मारुन
श्रीरघुवीर लगेच परतले. त्यांच्या हातात धनुष्य व कमरेला भाता शोभून दिसत होता.
इकडे मरताना मारीचाने ‘ हा लक्ष्मणा ‘ असा आवाज काढला होता. जेव्हा सीतेने ती
दुःखपूर्ण वाणी ऐकली, तेव्हा ती फार घाबरली आणि लक्ष्मणाला म्हणू लागली, ॥ १ ॥
जाहु बेगि संकट अति भ्राता
। लछिमन बिहसि कहा सुनु माता ॥
भृकटि बिलास सृष्टि लय होई
। सपनेहुँ संकट परइ कि सोई ॥
‘ तू ताबडतोप जा. तुझे
भाऊ संकटात आहेत. ‘ लक्ष्मण हसून म्हणला, ‘ हे माते, ज्यांच्या भृकुटीच्या नुसत्या
इशार्यावर संपूर्ण सृष्टीचा नाश होतो, ते श्रीराम कधी स्वप्नातही संकटात पडू
शकतील काय ‘ ? ॥ २ ॥
मरम बचन जब सीता बोला । हरि प्रेरित लछिमन मन डोला
॥
बन दिसि देव सौंपि सब काहू । चले जहॉं रावन ससि
राहू ॥
त्यावर सीता मनाला बोचणारे बोलू लागली.
तेव्हा भगवंतांच्या प्रेरणेने लक्ष्मणाचे मनही अस्थिर झाले. तो सीतेला वन-देवता व
दिशा-देवतांच्या भरवशावर सोडून निघाला. रावणरुपी चंद्राला ग्रासणारे राहुरुप
श्रीराम होते, तिकडे तो गेला. ॥ ३ ॥
सून बीच दसकंधर देखा । आवा निकट जती कें बेषा ॥
जाकें डर सुर असुर डेराहीं । निसि न नीद दिन अन्न
न खाहीं ॥
जवळ कुणी नाही, अशी संधी बघून रावण संन्यासी
वेषात सीतेजवळ आला. ज्याच्या भीतीमुळे देव आणि दैत्य इतके घाबरत की, त्यांना
रात्री झोप येत नसे आणि दिवसा पोटभर जेवणही जात नसे. ॥ ४ ॥
सो दससीस स्वान की नाईं । इत उत चितइ चला भड़िहाईं
॥
इमि कुपंथ पग देत खगेसा । रह न तेज तन बुधि बल
लेसा ॥
तोच रावण कुत्र्याप्रमाणे इकडे-तिकडे पाहात
चोरी करण्यास निघाला. काकभुशुंडी म्हणतात, ‘ हे गरुडा, अशाप्रकारे कुमार्गावर पाऊल
ठेवताच शरीरामध्ये तेज, बुद्धी व बळ यांचा लेशही उरत नाही.’ ॥ ५ ॥
नाना बिधि करि कथा सुहाई । राजनीति भय प्रीति
देखाई ॥
कह सीता सुनु जती गोसाईं । बोलेहु बचन दुष्ट की
नाईं ॥
रावणाने अनेक प्रकारच्या छान गोष्टी रचून
सीतेला राजनीती, भय आणि प्रेम दाखविले. सीता म्हणाली, ‘ हे संन्याश्या ! तूं तर
दुष्टासारखे बोललास. ‘ ॥ ६ ॥
तब रावन निज रुप देखावा ।
भई सभय जब नाम सुनावा ॥
कह सीता धरि धीरजु गाढ़ा । आइ गयउ प्रभु रहु खल
ठाढ़ा ॥
तेव्हा रावणाने आपले खरे रुप दाखविले आणि
जेव्हा आपले नाव सांगितले, तेव्हा सीता भयभीत झाली. तिने मोठ्या धीराने म्हटले, ‘
अरे दुष्टा, थांब तर खरा ! प्रभू आले. ‘ ॥ ७ ॥
जिमि हरिबधुहि छुद्र सस चाहा । भएसि कालबस निसिचर
नाहा ॥
सुनत बचन दससीस रिसाना । मन महुँ चरन बंदि सुख
माना ॥
ज्याप्रमाणे सिंहिणीची अभिलाषा तुच्छ सशाला वाटते,
त्याचप्रमाणे अरे राक्षसराज, तू माझी इच्छा धरल्याने
काळाला वश झाला आहेस. ‘ हे ऐकून रावणाला राग
आला, परंतु मनात त्याने सीतेच्या चरणांना वंदन करुन
आनंद
मानला. ॥ ८ ॥
No comments:
Post a Comment