ShriRamCharitManas
दोहा—तात तीनि अति प्रबल खल काम क्रोध अरु लोभ ।
मुनि बिग्यान धाम मन करहिं निमिष महुँ छोभ ॥ ३८ (
क) ॥
हे बंधो ! काम, क्रोध आणि लोभ हे तिन्ही
अत्यंत प्रबल व दुष्ट आहेत. ते ज्ञानसंपन्न मुनींचेही मन क्षणात क्षुब्ध करुन
टाकतात. ॥ ३८ ( क ) ॥
लोभ कें इच्छा दंभ बल काम कें केवल नारि ।
क्रोध कें परुष बचन बल मुनिबर कहहिं बिचारि ॥ ३८
( ख ) ॥
लोभाला इच्छा व दंभाचे बळ असते, कामाला केवळ
स्त्रीचे बळ असते आणि क्रोधाला कठोर वचनांचे. श्रेष्ठ मुनी विचारपूर्वक असेच
सांगतात. ‘ ॥ ३८ ( ख ) ॥
गुनातीत सचराचर स्वामी । राम उमा सब अंतरजामी ॥
कामिन्ह कै दीनता देखाई । धीरन्ह कें मन बिरति
दृढ़ाई ॥
शिव म्हणतात, ‘ हे पार्वती, श्रीरामचंद्र हे
त्रिगुणातीत, चराचर जगाचे स्वामी आणि सर्वांच्या मनातील जाणणारे आहेत. ‘ त्यांनी
वरील वर्णनातून कामी लोकांची लाचारी दाखवून दिली आणि विवेकी पुरुषांच्या मनातील
वैराग्य दृढ केले. ॥ १ ॥
क्रोध मनोज लोभ मद माया । छूटहिं सकल राम कीं
दाया ॥
सो नर इंद्रजाल नहिं भूला । जा पर होइ सो नट
अनुकूला ॥
काम, क्रोध, लोभ, मद आणि माया हे सर्व
श्रीरामांच्या दयेमुळे सुटतात. ते नटराज भगवंत ज्याच्यावर प्रसन्न होतात, तो
मनुष्य मायेमुळे भटकत नाही. ॥ २ ॥
उमा कहउँ मैं अनुभव अपना । सत हरि भजनु जगत सब
सपना ॥
पुनि प्रभु गए सरोबर तीरा । पंपा नाम सुभग गंभीरा
॥
हे उमे, मी तुला आपला अनुभव सांगतो. हरीचे
भजन सत्य आहे आणि हे संपूर्ण जग स्वप्नाप्रमाणे खोटे आहे. नंतर प्रभू श्रीराम पंपा
नामक सुंदर आणि अथांग सरोवराकाठी आले. ॥ ३ ॥
संत हृदय जस निर्मल बारी । बॉंधे घाट मनोहर चारी
॥
जहँ तहँ पिअहिं बिबिध मृग नीरा । जनु उदार गृह
जाचक भीरा ॥
त्या सरोवराचे पाणी संतांच्या हृदयाप्रमाणे
निर्मळ होते. त्याला बांधलेले मनोहर सुंदर चार घाट होते. तर्हेतर्हेचे पशू इकडे
तिकडे पाणी पीत होते. जणू उदार दानी पुरुषांच्या घरी याचकांची गर्दी झालेली असावी.
॥ ४ ॥
दोहा—पुरइनि सघन ओट जल बेगि
न पाइअ मर्म ।
मायाछन्न न देखिऐ जैसें
निर्गुन ब्रह्म ॥ ३९ ( क ) ॥
दाट कमल-पत्रांनी
झाकलेल्या पाण्याचा लवकर पत्ता लागत नाही, ज्याप्रमाणे मायेने झाकल्यामुळे निर्गुण
ब्रह्म दिसत नाही. ॥ ३९ ( क ) ॥
सुखी मीन सब एकरस अति अगाध
जल माहिं ।
जथा धर्मसीलन्ह के दिन सुख
संजुत जाहिं ॥ ३९ ( ख ) ॥
त्या सरोवराच्या अत्यंत
अथांग जलामध्ये सर्व मासे सतत एकसमान सुखी राहात होते. ज्याप्रमाणे धर्मशील
पुरुषांचे सर्व दिवस सुखात जातात. ॥ ३९ ( ख ) ॥
बिकसे सरसिज नाना रंगा ।
मधुर मुखर गुंजत बहु भृंगा ॥
बोलत जलकुक्कुट कलहंसा ।
प्रभु बिलोकि जनु करत प्रशंसा ॥
त्यात रंगी-बेरंगी कमळे
उमललेली होती. पुष्कळ भ्रमर मधुर स्वरांनी गुंजारव करीत होते. पाणकोंबडे व राजहंस
बोलत होते, जणु प्रभूंना पाहून ते त्यांची प्रशंसा करीत असावेत. ॥ १ ॥
चक्रबाक बक खग समुदाई ।
देखत बनइ बरनि नहिं जाई ॥
सुंदर खग गन गिरा सुहाई ।
जात पथिक जनु लेत बोलाई ॥
चक्रवाक, बगळे इत्यादी
पक्ष्यांचे समुदाय पाहातच राहावे, असे वर्णनीय वाटत होते. सुंदर पक्ष्यांची किलबिल
फार गोड वाटत होती; जणू रस्त्याने जाणार्या वाटसरुंना ते बोलावीत होते. ॥ २ ॥
ताल समीप मुनिन्ह गृह छाए ।
चहु दिसि कानन बिटप सुहाए ॥
चंपक बकुल कदंब तमाला ।
पाटल पनस परास रसाला ॥
त्या सरोवराच्याजवळ
मुनींनी आश्रम बनविले होते. त्याच्या चारी बाजूंना वनातील सुंदर वृक्ष होते. चाफा,
बकुळ, कदंब, तमाल, पाटस, फणस, पळस, आम्रवृक्ष इत्यादी ॥ ३ ॥
नव पल्लव कुसुमित तरु नाना
। चंचरीक पटली कर गाना ॥
सीतल मंद सुगंध सुभाऊ ।
संतत बहइ मनोहर बाऊ ॥
अनेक प्रकारचे वृक्ष
नवनवीन पाने आणि सुगंधित फुलांनी भरलेले होते, त्यांवर भ्रमरांचे समूह गुंजारव
करीत होते. तसेच शीतल, मंद, सुगंधित हवा नित्य वाहात होती. ॥ ४ ॥
कुहू कुहू कोकिळ धुनि करहीं
। सुनि रव सरस ध्यान मुनि टरहीं ॥
कोकिळ ‘ कुहू-कुहू ‘ बोलत
होते. त्यांचे मधुर बोल ऐकून मुनींचे ध्यानही भंग पावत होते. ॥ ५ ॥
No comments:
Post a Comment