Tuesday, May 31, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 9 Doha 19 and 20 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग ९ दोहा १९ व २०

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 9 
Doha 19 and 20 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग ९ 
दोहा १९ व २०

छं०—उर  दहेउ कहेउ कि धरहु धाए बिकट भट रजनीचरा ।

सर चाप तोमर सक्ति सूल कृपान परिघ परसु धरा ॥

प्रभु कीन्हि धनुष टकोर प्रथम कठोर घोर भयावहा ।

भए बधिर ब्याकुल जातुधान न ग्यान तेहि अवसर रहा ॥

खर-दूषण भडकले. ते म्हणाले, ‘ पकडा ‘ ते ऐकून भयानक राक्षस योद्धे बाण, धनुष्य, तोमर, शक्ती, बरछी, कृपाण, परिघ आणि परशु घेऊन धावले.प्रभू श्रीरामांनी प्रथमतः धनुष्याचा कठोर, घोर व भयानक टणत्कार केला. तो ऐकताच राक्षस बहिरे व व्याकुळ झाले. त्यावेळी त्यांना शुद्ध राहिली नाही.

दोहा—सावधान होइ धाए जानि सबल आराति ।

लागे बरषन राम पर अस्त्र सस्त्र बहुभॉंति ॥ १९ ( क)  

मग ते शत्रू बलवान आहेत, असे पाहून सावध होऊन धावले आणि श्रीरामचंद्रांच्यावर अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे सोडू लागले. ॥ १९ ( क ) ॥

तिन्ह के आयुध तिल सम करि काटे रघुबीर ।

तानि सरासन श्रवन लगि पुनि छॉंड़े निज तीर ॥ १९ ( ख ) ॥   

श्रीरघुवीरांनी त्यांची शस्त्रे तिळाप्रमाणे तुकडे तुकडे करुन टाकली. नंतर धनुष्य कानापर्यंत खेचून आपले बाण सोडले. ॥ १९ ( ख ) ॥

छं०—तब चले बान कराल । फुंकरत जनु बहु ब्याल ।

कोपेउ समर श्रीराम । चले बिसिख निसित निकाम ॥ १ ॥

ते भयानक बाण असे सुटले की, जणू पुष्कळ साप फूत्कार करीत जात होते. श्रीराम अत्यंत क्रुद्ध होऊन तीक्ष्ण बाण सोडू लागले. ॥ १ ॥

अवलोकि खरतर तीर । मुरि चले निसिचर बीर ।

भए क्रुद्ध तीनिउ भाइ । जो भागि रन ते जाइ ॥

ते अत्यंत तीक्ष्ण बाण पाहून राक्षसवीर पाठ दाखवून पळू लागले. तेव्हा खर, दूषण, त्रिशिरा हे तिन्ही भाऊ खवळून म्हणाले, ‘ जो युद्धातून पळेल, ॥ २ ॥

तेहि बधब हम निज पानि । फिरे मरन मन महुँ ठानि ॥

आयुध अनेक प्रकार । सनमुख ते करहिं प्रहार ॥

त्याला आम्ही मारुन टाकू.’ तेव्हा पळून जाणारे राक्षस मनात मरण्याचा निश्चय करुन परत फिरले आणि समोर येऊन अनेक प्रकारच्या शस्त्रांचा श्रीरामांच्यावर प्रहार करु लागले. ॥ ३ ॥

रिपु परम कोपे जानि । प्रभु धनुष सर संधानि ।

छॉंड़े बिपुल नाराच । लगे कटन बिकट पिसाच ॥ ४ ॥

शत्रू फार क्रुद्ध झाल्याचे पाहून प्रभूंनी धनुष्याला बाण लावून पुष्कळ बाण सोडले. त्यामुळे भयानक राक्षस कापले जाऊ लागले. ॥ ४ ॥

उर सीस भुज कर चरन । जहँ तहँ लगे महि परन ।

चिक्करत लागत बान । धर परत कुधर समान ॥ ५ ॥

त्यांची छाती, शिर, हात आणि पाय पृथ्वीवर इकडे-तिकडे पडू लागले. बाण लागताच हत्तीप्रमाणे चीत्कार करु लागले. त्यांची डोंगरासारखी धडे कापली जाऊन पडू लागली. ॥ ५ ॥       

भट कटत तन सत खंड । पुनि उठत करि पाषंड ॥

नभ उड़त बहु भुज मुंड । बिनु मौलि धावत रुंड ॥ ६ ॥

योध्यांचे देह कापले जाऊन शेकडो तुकडे होत होते. मग ते मायेने उठून पुन्हा उभे राहात. आकाशात पुष्कळ भुजा व शिरे उडत होती आणि शिरांविना धडे पळत होती. ॥ ६ ॥

खग कंक काक सृगाल । कटकटहिं कठिन कराल ॥ ७ ॥

घारी, कावळे इत्यादी पक्षी आणि कोल्हे भयंकर ‘ कटकट ‘ असा आवाज करीत होते. ॥ ७ ॥

 

छं०—कटकटहिं जंबुक भूत प्रेत पिसाच खर्पर संचहीं ।

बेताल बीर कपाल ताल बजाइ जोगिनि नंचहीं ॥

रघुबीर बान प्रचंड खंडहिं भटन्ह के उर भुज सिरा ।

जहँ तहँ परहिं उठि लरहिं धर धरु करहिं भयकर गिरा ॥ १ ॥

कोल्हे कटकट करीत होते. भुते, प्रेते, पिशाचे मुंडकी गोळा करीत होती. वीर-वेताळ मुंडक्यांवर ताल देत होते आणि योगिनी नाचत होत्या. श्रीरघुवीरांचे प्रचंड बाण राक्षस योध्यांची वक्षःस्थळे, भुजा व शिरांचे तुकडे-तुकडे करुन टाकीत होते, त्यांची धडे जिकडे-तिकडे पडत होती. ते पुन्हा उठून लढत होते आणि ‘ पकडा पकडा ‘ असा भयंकर ओरडा करीत होते. ॥ १ ॥

अंतावरीं गहि उड़त गीध पिसाच कर गहि धावहीं ।

संग्राम पुर बासी मनहुँ बहु बाल गुड़ी उड़ावहीं ॥

मारे पछारे उर बिदारे बिपुल भट कहँरत परे ।

अवलोकि निज दल बिकल भट तिसिरादि खर दूषन फिरे ॥ २ ॥

आंतड्यांचे टोक पकडून गिधाडे उडत होती तर त्यांचेच दुसरे टोक हाताने पकडून पिशाचे धावत होती. असे वाटत होते की, जणू युद्धरुपी नगरातील अनेक बालक पतंग उडवीत आहेत. अनेक योद्धे मारले गेले आणि खाली पडले. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले होते, असे बरेचसे राक्षस खाली पडून विव्हळत होते. आपली सेना व्याकूळ झाल्याचे पाहून त्रिशिरा, खर, दूषण इत्यादी योद्धे श्रीरामांच्याकडे वळले. ॥ २ ॥

सर सक्ति तोमर परसु सूल कृपान एकहि बारहीं ।

करि कोप श्रीरघुबीर पर अगनित निसाचर डारहीं ॥

प्रभु निमिष महुँ रिपु सर निवारि पचारि डारे सायका ।

दस दस बिसिख उर माझ मारे सकल निसिचर नायका ॥ ३ ॥

असंख्य राक्षस एकाच वेळी क्रोधाने बाण, शक्ती, तोमर, परशु, शूल आणि तलवार यांचा मारा श्रीरामांच्यावर करु लागले. प्रभूनीं एका क्षणांत शत्रूंचे बाण तोडून टाकून, ललकार करीत त्यांच्यावर आपले बाण सोडले. सर्व राक्षस-सेनापतींच्या छातीवर दहा-दहा बाण मारले. ॥ ३ ॥

महि परत उठि भट भिरत मरत न करत माया अति घनी ।

सुर डरत चौदह सहस प्रेत बिलोकि एक अवध धनी ॥

सुर मुनि सभय प्रभु देखि मायानाथ अति कौतुक कर्यो ।

देखहिं परसपर राम करि संग्राम रिपुदल लरि मर्यो ॥ ४ ॥

योद्धे पृथ्वीवर पडत होते, पुन्हा उठून भिडत होते. मरत नव्हते. पुष्कळ प्रकारची मोठी माया करीत होते. राक्षस चौदा हजार आहेत आणि श्रीराम एकटे आहेत, ते पाहून देव व मुनी भयभीत होऊन पाहात होते. त्यावेळी मायेचे स्वामी असलेल्या प्रभूंनी एक मोठे कौतुक केले. त्यामुळे शत्रूंच्या सेनेला एकमेक श्रीरामांच्या रुपांत दिसू लागला आणि ते एकमेकांशीच युद्ध करीत मरुन गेले. ॥ ४ ॥  

दोहा—राम राम कहि तनु तजहिं पावहिं पद निर्बान ।

करि उपाय रिपु मारे छन महुँ कृपानिधान ॥ २० ( क ) ॥

सर्वजण ‘ हाच राम आहे, याला मारा ‘ अशा प्रकारे राम-राम म्हणत देह सोडत होते आणि त्यांना मोक्ष मिळत होता. कृपानिधान श्रीरामांनी असा उपाय करुन क्षणभरात शत्रूंना मारुन टाकले. ॥ २० ( क ) ॥

हरषित बरषहिं सुमन सुर बाजहिं गगन निसान ।

अस्तुति करि करि सब चले सोभित बिबिध बिमान ॥ २० ( ख ) ॥

देव आनंदाने फुले उधळू लागले. आकाशात नगारे वाजू लागले. मग ते सर्व स्तुती करीत अनेक विमानात बसून निघून गेले. ॥ २० ( ख ) ॥

जब रघुनाथ समर रिपु जीते । सुर नर मुनि सब के भय बीते ॥

तब लछिमन सीतहि लै आए । प्रभु पद परत हरषि उर लाए ॥

जेव्हा श्रीरामांनी शत्रूला युद्धात जिंकले आणि देव, मनुष्य आणि मुनी या सर्वांचे भय नष्ट झाले, तेव्हा लक्ष्मण सीतेला घेऊन आला. तो श्रीरामांच्या चरणी लोटांगण घालू लागला.तेवढ्यात प्रभूंनी त्याला मोठ्या आनंदाने उठवून हृदयाशी धरले. ॥ १ ॥

सीता चितव स्याम मृदु गाता । परम प्रेम लोचन न अघाता ॥

पंचबटीं बसि श्रीरघुनायक । करत चरित सुर मुनि सुखदायक ॥

सीता श्रीरामांच्या श्यामल व कोमल देहाकडे अत्यंत प्रेमाने पाहू लागली. तिचे नेत्र तृप्त होत नव्हते. अशाप्रकारे पंचवटीत राहून श्रीरघुनाथ देवांना व मुनींना सुख देणार्‍या लीला करु लागले. ॥ २ ॥    

धुआँ देखि खरदूषन केरा । जाइ सुपनखॉं रावन पेरा ॥

बोली बचन क्रोध करि भारी । देस कोस कै सुरति बिसारी ॥

खर-दूषन यांचा नाश झाल्याचे पाहून शूर्पणखेने जाऊन रावणाला भडकविले. ती मोठ्या क्रोधाने म्हणाली, ‘ तुला देशाची व खजिन्याची शुद्ध राहिली नाही. ॥ ३ ॥

करसि पान सोवसि दिनु राती । सुधि नहिं तव सिर पर आराती ॥

राज नीति बिनु धन बिनु धर्मा । हरिहि समर्पे बिनु सतकर्मा ॥

बिद्या बिनु बिबेक उपजाएँ । श्रम फल पढ़ें किएँ अरु पाएँ ॥

संग तें जती कुमंत्र ते राजा । मान ते ग्यान पान तें लाजा ॥

तू दारु पितोस आणि रात्रंदिवस पडून राहतोस. शत्रू तुझ्या डोक्यावर उभा आहे, याची तुला गंधवार्ता नाही. नीतीविना राज्य, धर्माविना धन प्राप्त केल्यामुळे आणि भगवंताना अर्पण केल्याविना उत्तम कर्म केल्याने, तसेच विवेकाविना विद्या शिकल्याने परिणामी हाती फक्त श्रमच लागतात. विषयांच्या संगामुळे संन्यासी, वाईट सल्ल्यामुळे राजा, दुरभिमानामुळे ज्ञान, मदिरापानामुळे लाज, ॥ ४-५ ॥

प्रीति प्रनय बिनु मद ते गुनी । नासहिं बेगि नीति अस सुनी ॥

नम्रतेविना प्रेम आणि अहंकारामुळे गुणवान पुरुष

 लवकरच नष्ट होतात, अशी नीती आहे, असे मी ऐकले

 आहे. ॥ ६ ॥



Custom Search

No comments: