Tuesday, May 31, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 13 Doha 28 to 29 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग १३ दोहा २८ ते २९

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 13 
Doha 28 to 29 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग १३ 
दोहा २८ ते २९

दोहा---क्रोधवंत तब रावन लीन्हिसि रथ बैठाइ ।

चला गगनपथ आतुर भयँ रथ हॉंकि न जाइ ॥ २८ ॥

नंतर रागारागाने रावणाने सीतेला रथात बसविले आणि तो मोठ्या लगबगीने आकाशमार्गाने निघाला. परंतु भीतीमुळे त्याला रथ हाकता येत नव्हता. ॥ २८ ॥

हा जग एक बीर रघुराया । केहिं अपराध बिसारेहु दाया ॥

आरति हरन सरन सुखदायक । हा रघुकुल सरोज दिननायक ॥

सीता विलाप करु लागली की, ‘ हे जगातील अद्वितीय वीर रघुनाथ, कोणत्या अपराधासाठी तुम्ही माझ्यावरील दया विसरलात. हे दुःखांचे हरण करणारे, हे शरणागताला सुख देणारे,हे रघुकुलरुपी कमळाचे सूर्य, ॥ १ ॥

हा लछिमन तुम्हार नहिं दोसा । सो फलु पायउँ कीन्हेउँ रोसा ॥

बिबिध बिलाप करति बैदेही । भूरि कृपा प्रभु दूरि सनेही ॥

हे लक्ष्मणा, तुझा दोष नाही. मी तुझ्यावर रागावले, त्याचे फळ मला मिळाले.’ जानकी अनेक प्रकारे विलाप करीत होती की, ‘ अरेरे, प्रभूंची कृपा फार मोठी आहे, परंतु ते प्रेमळ प्रभू फार दूर राहिले. ॥ २ ॥

बिपति मोरि को प्रभुहि सुनावा । पुरोडास चह रासभ खावा ॥

सीता कै बिलाप सुनि भारी । भए चराचर जीव दुखारी ॥

प्रभूंना माझी ही विपत्ती कोण सांगणार ? यज्ञातील पुरोडाश गाढव खाऊ पाहात आहे.’ सीतेचा विलाप ऐकून चराचर जीव दुःखी झाले. ॥ ३ ॥

गीधराज सुनि आरत बानी । रघुकुलतिलक नारि पहिचानी ॥

अधम निसाचर लीन्हें जाई । जिमि मलेछ बस कपिला गाई ॥

गृध्रराज जटायूने सीतेचे दुःखी बोलणे ऐकून ओळखले की, ही रघुकुलतिलक श्रीरघुनाथांची पत्नी आहे. त्याला दिसले की, कपिला गाय एखाद्या म्लेंच्छाच्या तावडीत सापडावी, तसा नीच राक्षस जबरदस्तीने तिला नेत आहे. ॥ ४ ॥

सिते पुत्रि करसि जनि त्रासा । करिहउँ जातुधान कर नासा ॥

धावा क्रोधवंत खग कैसें । छूटइ पबि परबत कहुँ जैसें ॥त

तो म्हणाला, ‘ हे सीते, भिऊ नकोस. मी या राक्षसाचा नाश करतो.’ असे म्हणून तो पक्षी रागारागाने धावून गेला. पर्वतावर वज्र कोसळावे तसा. ॥ ५ ॥

रे रे दुष्ट ठाढ़ किन होही । निर्भय चलेसि न जानेहि मोही ॥

आवत देखि कृतांत समाना । फिरि दसकंधर कर अनुमाना ॥

तो आह्वान देऊन म्हणाला, ‘ अरे दुष्टा, थांबत का नाहीस ? निर्भयपणे निघाला आहेस. तू मला ओलखले नाहीस ? यमाप्रमाणे तो येत असल्याचे पाहून रावण वलला आणि मनात विचार करु लागला की, ॥ ६ ॥

की मैनाक कि खगपति होई । मम बल जान सहित पति सोई ॥

जाना जरठ जटायु एहा । मम कर तीरथ छॉंड़िहि देहा ॥

हा एक तर मैनाक पर्वत आहे किंवा पक्ष्यांचा राजा गरुड. परंतु तो गरुड तर आपला स्वामी विष्णूप्रमाणे माझे बळ जाणतो. जवळ आल्यावर रावणाने ओळखले की, ‘ हा तर म्हातारा जटायू आहे. माझ्या हातरुपी तीर्थांत हा आपले शरीर सोडील. ‘ ॥ ७ ॥

सुनत गीध क्रोधातुर धावा । कह सुनु रावन मोर सिखावा ॥

तजि जानकिहि कुसल गृह जाहू । नाहिं त अस होइहि बहुबाहू ॥

हे ऐकताच जटायू रागाने मोठ्या वेगाने धावून गेला आणि म्हणाला, ‘ रावणा, माझे म्हणणे ऐक. जानकीला सोडून सुखरुप आपल्या घरी जा. नाहीतर अनेक भुजा असणार्‍या, रावणा ! असे होईल की, ॥ ८ ॥

राम रोष पावक अति घोरा । होइहि सकल सलभ कुल तोरा ॥

उतरु न देत दसानन जोधा । तबहिं गीध धावा करि क्रोधा ॥

श्रीरामांच्या अत्यंत भयानक क्रोधाग्नीमध्ये तुझा संपूर्ण वंश पतंगाप्रमाणे भस्म होईल. ‘ वीर रावणाने काही उत्तर दिले नाही, तेव्हा तो क्रोधाने धावला. ॥ ९ ॥

धरि कच बिरथ कीन्ह महि गिरा । सीतहि राखि गीध पुनि फिरा ॥

चोचन्ह मारि बिदारेसि देही । दंड एक भइ मुरुछा तेही ॥

त्याने रावणाचे केस पकडून त्याला रथातून खाली खेचले. रावण पृथ्वीवर पडला. जटायूने सीतेला एका बाजूला बसविले आणि चोची मार-मारुन रावणाचे शरीर विदीर्ण केले. त्याला थोडा वेळ मूर्छा आली. ॥ १० ॥

तब सक्रोध निसिचर खिसिआना । काढ़ेसि परम कराल कृपाना ॥

काटेसि पंख परा खग धरनी । सुमिरि राम करि अदभुत करनी ॥

जेव्हा चिडलेल्या रावणाने क्रोधाने अत्यंत भयानक कट्यार घेतली आणि जटायूचे पंख कापून टाकले, तेव्हा अशाप्रकारे अद्भुत पराक्रम गाजवून जटायू श्रीरामांच्या लीलांचे स्मरण करीत पृथ्वीवर पडला. ॥ ११ ॥

सीतहि जान चढ़ाइ बहोरि । चला उताइल त्रास न थोरी ॥

करति बिलाप जाति नभ सीता । ब्याध बिबस जनु मृगी सभीता ॥

सीतेला पुन्हा रथात घालून रावण लगबगीने निघाला. त्याला खूप भीती वाटत होती. सीता आकाशातून विलाप करीत जात होती. जणू व्याधाच्या जाळ्यात सापडलेली एखादी भयभीत हरिणी. ॥ १२ ॥

गिरि पर बैठे कपिन्ह निहारी । कहि हरि नाम दीन्ह पट डारी ॥

एहि बिधि सीतहि सो लै गयऊ । बन असोक महँ राखत भयऊ ॥

पर्वतावर बसलेल्या वानरांनी पाहून सीतेने हरिनाम घेऊन आपली ओढणी खाली टाकली. अशाप्रकारे रावण सीतेला घेऊन गेला आणि तिला त्याने अशोकवनात नेऊन ठेवले. ॥ १३ ॥

दोहा---हारि परा खल बहु बिधि भय अरु प्रीति देखाइ ।

तब असोक पादप तर राखिसि जतन कराइ ॥ २९ ( क ) ॥

सीतेला अनेक प्रकारे भीती व प्रेम दाखवून तो दुष्ट थकला, तेव्हा त्याने तिच्या रक्षणाची व्यवस्था करुन तिला अशोक वृक्षाखाली ठेवले. ॥ २९ ( क ) ॥

नवाह्न पारायण, सहावा विश्राम

जेहि बिधि कपट कुरंग सँग धाइ चले श्रीराम ।

सो छबि सीता राखि उर रटति रहति हरिनाम ॥ २९ ( ख ) ॥

श्रीराम ज्या रुपात कपट-मृगामागे धावत गेले, ते रुप हृदयात धरुन सीता रामनाम जपत होती. ॥ २९ ( ख ) ॥

रघुपति अनुजहि आवत देखी । बाहिज चिंता कीन्हि बिसेषी ॥

जनकसुता परिहरिहु अकेली । आयहु तात बचन मम पेली ॥

इकडे श्रीरघुनाथ लक्ष्मणाला येत असलेला पाहून बाह्यतः आपल्याला मोठी काळजी वाटत असल्याचे दाखवून म्हणाले, ‘ हे बंधू, तू जानकीला एकटीला सोडलेस, आणि माझ्या आज्ञेचे उल्लंघन करुन येथे आलास ! ॥ १ ॥

निसिचर निकर फिरहिं बन माहीं । मम मन सीता आश्रम नाहीं ॥

गहि पद कमल अनुज कर जोरी । कहेउ नाथ कछु मोहि न खोरी ॥

वनात राक्षसांच्या झुंडी फिरत असतात. सीता आश्रमात नसावी, असे मला वाटत आहे. ‘ लक्ष्मणाने श्रीरामांचे चरण-कमल धरुन व हात जोडून म्हटले, ‘ हे नाथ, यात माझा काही दोष नाही. ‘ ॥ २ ॥

अनुज समेत गए प्रभु तहवॉं । गोदावरि तट आश्रम जहवॉं ॥

आश्रम देखि जानकी हीना । भए बिकल जस प्राकृत दीना ॥

मग प्रभू श्रीराम लक्ष्मणासह गोदावरीच्या तटावरील आपल्या आश्रमाच्या ठिकाणी गेले. आश्रमात जानकी नसल्याचे पाहून श्रीराम सामान्य मनुष्याप्रमाणे व्याकूळ व दुःखी झाले. ॥ ३ ॥

हा गुन खानि जानकी सीता । रुप सील ब्रत नेम पुनीता ॥

लछिमन समुझाए बहु भॉंती । पूछत चले लता तरु पॉंती ॥

ते विलाप करु लागले, ‘ हे गुणनिधान जानकी, रुप, शील, व्रत आणि नियमांनी पवित्र असलेल्या सीते ! ‘ लक्ष्मणाने श्रीरामांना पुष्कळ समजावले, परंतु श्रीराम लता-वृक्षांच्या रांगांना विचारत निघाले. ॥ ४ ॥

हे खग मृग हे मधुकर श्रेनी । तुम्ह देखी सीता मृगनैनी ॥

खंजन सुक कपोत मृग मीना । मधुप निकर कोकिला प्रबीना ॥

‘ हे पक्ष्यांनो, हे पशूंनो, हे भ्रमरांच्या झुंडींनो, तुम्ही माझ्या मृगनयनी सीतेला पाहिले काय ? खंजन, पोपट, कबूतर, हरीण, मासे, भ्रमर-समूह, गायनप्रवीण कोकिळ, ॥ ५ ॥

कुंद कली दाड़िम दामिनी । कमल सरद ससि अहिभामिनी ॥

बरु पास मनोज धनु हंसा । गज केहरि निज सुनत प्रसंसा ॥

कुंदकळ्या , डाळिंब, वीज, कमळ, शरदातील चंद्रमा, नागीण, वरुणाचा पाश, कामदेवांचे धनुष्य, हंस, हत्ती आणि सिंह, हे सर्वजण आज आपली प्रशंसा ऐकत होते. ॥ ६ ॥

श्रीफल कनक कदलि हरषाहीं । नेकु न संक सकुच मन माहीं ॥

सुनु जानकी तोहि बिनु आजू । हरषे सकल पाइ जनु राजू ॥

श्रीफळ, सुवर्ण आणि केळी आज आनंदित होत होत्या. त्यांच्या मनात जरासुद्धा शंका व संकोच नव्हता. हे जानकी, ऐक. तुझ्याविना हे सर्व आज असे आनंदात आहेत की, जणू त्यांना राज्य मिळाले आहे. ( तुझ्या अंगांपुढे सर्वजण तुच्छ, अपमानित व लज्जित होते. तू नसल्यामुळे हे आपल्या शोभेच्या अभिमानाने प्रफुल्लित आहेत. ) ॥ ७ ॥

किमि सहि जात अनख तोहि पाहीं । प्रिया बेगि प्रगटसि कस नाहीं ॥

एहि बिधि खोजत बिलपत स्वामी । मनहु महा बिरही अति कामी ॥

तुला ही त्यांची घमेंड कशी सहन होते ? हे प्रिये, तू लवकर प्रकट का होत नाहीस ? ‘ अशा प्रकारे अनंत ब्रह्मांडांचे व स्वरुपशक्ती सीतेचे स्वामी श्रीराम सीतेला शोधत असा विलाप करीत होते की, जसा एखादा महाविरही आणि अत्यंत कामी पुरुष करतो. ॥ ८ ॥

पूरनकाम राम सुख रासी । मनुजचरित कर अज अबिनासी ॥

आगें परा गीधपति देखा । सुमिरत राम चरन जिन्ह रेखा ॥

पूर्णकाम, आनंदाची खाण, अजन्मा व अविनाशी श्रीराम

 मनुष्यासारखी लीला करीत होते. पुढे गेल्यावर त्यांना

 गृध्रपती जतायू पडलेला दिसला. तो श्रीरामांच्या ध्वज,

 कुलिश इत्यादी चिह्नांनी अंकित चरणांचे स्मरण करीत

 होता. ॥ ९ ॥



Custom Search

No comments: