दोहा—कंद मूल फल सुरस अति
दिए राम कहुँ आनि ।
प्रेम सहित प्रभु खाए
बारंबार बखानि ॥ ३४ ॥
तिने अत्यंत रसाळ व
स्वादिष्ट कंद-मुळे आणि फळे आणून श्रीरामांना दिली. श्रीप्रभूंनी वारंवार प्रशंसा
करीत ती प्रेमाने खाल्ली. ॥ ३४ ॥
पानि जोरि आगें भइ ठाढ़ी ।
प्रभुहि बिलोकि प्रीति अति बाढ़ी ॥
केहि बिधि अस्तुति करौं
तुम्हारी । अधम जाति मैं जड़मति भारी ॥
मग ती हात जोडून समोर
उभी राहिली. प्रभूंना पाहून तिचे प्रेम उचंबळून आले. ती म्हणाली, ‘ मी कशा प्रकारे
तुमची स्तुती करु ? मी नीच जातीची आणि अत्यंत मंदबुद्धीची आहे. ॥ १ ॥
अधम ते अधम अधम अति नारी ।
तिन्ह महँ मैं मतिमंद अघारी ॥
कह रघुपति सुनु भामिनि बाता
। मानउँ एक भगति कर नाता ॥
जे अधमांचे अधम आहेत,
त्यांच्यामध्येही स्त्रिया या अत्यंत अधम आहेत. हे पापनाशना, त्यातही पुन्हा मी
मंदबुद्धीची आहे. ‘ श्रीराम म्हणाले, ‘ हे भामिनी, माझे ऐक. मी फक्त भक्तीला महत्व
देतो. ॥ २ ॥
जाति पॉंति कुल धर्म बड़ाई ।
धन बल परिजन गुन चतुराई ॥
भगति हीन नर सोहइ कैसा ।
बिनु जल बारिद देखिअ जैसा ॥
जात-पात कुल, मोठेपणा, धन,
बल, कुटुंब, गुण आणि चातुर्य हे सर्व असूनही भक्तीने रहित मनुष्य जलहीन मेघासारखा
मला वाटतो. ॥ ३ ॥
नवधा भगति कहउँ तोहि पाहीं
। सावधान सुनु धरु मन माहीं ॥
प्रथम भगति संतन्ह कर संगा
। दूसरि रति मम कथा प्रसंगा ॥
मी तुला आता माझी
नवविधा भक्ती सांगतो. तूं लक्ष देऊन ऐक आणि मनात ठेव. पहिली भक्ती म्हणजे संतांचा
संग. दुसरी भक्ती आहे माझ्या कथा-प्रसंगांबद्दल प्रेम. ॥ ४ ॥
दोहा—गुर पद पंकज सेवा
तीसरि भगति अमान ।
चौथि भगति मम गुन गन करइ
कपट तजि गान ॥ ३५ ॥
अभिमानरहित होऊन
गुरुंच्या चरणांची सेवा ही तिसरी भक्ती आणि निष्कपट भावनेने माझे गुणगान करणे ही
चौथी भक्ती. ॥ ३५ ॥
मंत्र जाप मम दृढ़ बिस्वासा
। पंचम भजन सो बेद प्रकासा ॥
छठ दम सील बिरति बहु करमा ।
निरत निरंतर सज्जन धरमा ॥
माझ्या राममंत्राचा जप
आणि माझ्यावर दृढ विश्वास ही पाचवी भक्ती. वेदांमध्ये ही प्रसिद्ध आहे. सहावी
भक्ती म्हणजे इंद्रियनिग्रह, शील, अनेक लौकिक कार्यांबद्दल वैराग्य आणि संत
पुरुषांप्रमाणे आचरण करणे, हे होय. ॥ १ ॥
सातवँ सम मोहि मय जग देखा ।
मोतें संत अधिक करि लेखा ॥
आठवँ जथालाभ संतोषा ।
सपनेहुँ नहिं देखइ परदोषा ॥त
सातवी भक्ती म्हणजे
संपूर्ण जगाला समभावाने माझ्यामध्ये ओतप्रोत असलेले पाहणे आणि संतांना
माझ्यापेक्षाही अधिक मानणे. आठवी भक्ती म्हणजे जे काही मिळेल, त्यांत संतोष मानणे
आणि स्वप्नातही कधी दुसर्याचे दोष न पाहणे. ॥ २ ॥
नवम सरल सब सन छलहीना । मम
भरोस हियँ हरष न दीना ॥
नव महुँ एकउ जिन्ह कें होई
। नारि पुरुष सचराचर कोई ॥
नववी भक्ती म्हणजे
सरळपणा व सर्वांबरोबर कपटरहित वागणे, मनातून माझ्यावर श्रद्धा ठेवणे आणि कोणत्याही
अवस्थेमध्ये हर्ष व दैन्य नसणे. या नऊंपैकी ज्याला एकही भक्ती प्राप्त असते, तो
स्त्री-पुरुष, जड-चेतन कुणीही असो, ॥ ३ ॥
सोइ अतिसय प्रिय भामिनि
मोरें । सकल प्रकार भगति दृढ़ तोरें ॥
जोगि बृंद दुरलभ गति जोई ।
तो कहुँ आजु सुलभ भइ सोई ॥
हे भामिनि, तोच मला
प्रिय आहे आणि तुझ्यात तर सर्व भक्ती दृढ आहेत. म्हणून योग्यांनाही जी गती दुर्लभ
आहे, तीच आज तुला सुलभ झाली आहे. ॥ ४ ॥
मम दरसन फल परम अनूपा । जीव
पाव निज सहज सरुपा ॥
जनकसुता कइ सुधि भामिनि ।
जानहि कहु करिबरगामिनी ॥
जीव आपले सहज स्वरुप
प्राप्त करतो, हेच माझ्या दर्शनाचे परम अनुपम फल आहे. बाई गं ! जर तुला सुंदरी
सीतेची काही बातमी असेल, तर ती आता सांग ‘ ॥ ५ ॥
पंपा सरहि जाहु रघुराई ।
तहँ होइहि सुग्रीव मिताई ॥
सो सब कहिहि देव रघुबीरा ।
जानतहूँ पूछहु मतिधीरा ॥
शबरी म्हणाली, ‘ हे
रघुनाथ, तुम्ही पंपासरोवराला जा. तेथे तुमची सुग्रीवाशी मैत्री होईल. हे देवा, हे
रघुवीरा, तो सर्व परिस्थिती सांगेल. हे धीरबुद्धी श्रीराम, सर्व जाणत असतानाही
तुम्ही मला विचारता आहात.’ ॥ ६ ॥
बार बार प्रभु पद सिरु नाई
। प्रेम सहित सब कथा सुनाई ॥
वारं वार प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन तिने प्रेमाने
आपली सर्व कथा सांगितली. ॥ ७ ॥
No comments:
Post a Comment