Tuesday, May 31, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 20 Doha 42 to 43 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग २० दोहा ४२ ते ४३

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 20 
Doha 42 to 43 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग २० 
दोहा ४२ ते ४३

दोहा—राका रजनी भगति तव राम नाम सोइ सोम ।

अपर नाम उडगन बिमल बसहुँ भगत उर ब्योम ॥ ४२ ( क ) ॥

तुमची भक्ती ही पौर्णिमेची रात्र आहे. आणि तिच्यात ‘ राम ‘ नाम हे पूर्ण चंद्रासारखे बनून इतर सर्व नामे तारागण बनून भक्तांच्या हृदयरुपी निर्मळ आकाशात निवास करोत. ‘ ॥ ४२ ( क ) ॥

एवमस्तु मुनि सन कहेउ कृपासिंधु रघुनाथ ।

तब नारद मन हरष अति प्रभु पद नायउ माथ ॥ ४२ (ख ) ॥

कृपासागर श्रीरघुनाथांनी मुनींना ‘ तथास्तु ‘ म्हटले. तेव्हा नारद मनापासून आनंदित होऊन प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले. ॥ ४२ ( ख ) ॥

अति प्रसन्न रघुनाथहि जानी । पुनि नारद बोले मृदु बानी ॥

राम जबहिं प्रेरेउ निज माया । मोहेहु मोहि सुनहु रघुराया ॥

श्रीरघुनाथ अत्यंत प्रसन्न असलेले पाहून नारद पुन्हा मृदू वाणीने म्हणाले –‘ हे श्रीराम, हे रघुनाथ, जेव्हा तुम्ही आपल्या मायेने मला प्रेरित करुन मोहित केले होते, ॥ १ ॥

तब बिबाह मैं चाहउँ कीन्हा । प्रभु केहि कारन करै न दीन्हा ॥

सुनु मुनि तोहि कहउँ सहरोसा । भजहिं जे मोहि तजि सकल भरोसा ॥

तेव्हा मी विवाह करु इच्छित होतो. हे प्रभू, तुम्ही त्या वेळी मला कोणत्या कारणाने विवाह करु दिला नाहीत ? ‘ प्रभू म्हणाले, ‘ हे मुनि, मी तुम्हांला अत्यंत हर्षाने सांगतो की, जे सर्व आशा व विषयविश्वास सोडून फक्त मलाच भजतात. ॥ २ ॥

करउँ सदा तिन्ह कै रखवारी । जिमि बालक राखइ महतारी ॥

गह सिसु बच्छ अनल अहि धाई । तहँ राखइ जननी अरगाई ॥

त्यांचे रक्षण मी, माता जशी बालकाची काळजी घेते, तशी करतो. लहान मूल जेव्हा धावत आग किंवा साप पकडण्यास जाते, तेव्हा आई त्याला हाताने मागे ओढून वाचविते. ॥ ३ ॥

प्रौढ़ भएँ तेहि सुत पर माता । प्रीति करइ नहिं पाछिलि बाता ॥

मोरें प्रौढ़ तनय सम ग्यानी । बालक सुत सम दास अमानी ॥

मूल शहाणे झाल्यावर माता त्याच्यावर प्रेम तर करते, पण ती पूर्वीची गोष्ट उरत नाही. माता त्याला वाचविण्याची काळजी करीत नाही. तो आपले रक्षण आपण करु शकतो. ज्ञानीजन हे माझे प्रौढ शहाण्या पुत्रासारखे आहेत. तुमच्यासारखा आपल्या बळाची घमेंड न बाळगणारा सेवक हा माझ्या लहान मुलासारखा आहे. ॥ ४ ॥

जगहि मोर बल निज बल ताही । दुहु कहँ काम क्रोध रिपु आही ॥

यह बिचारि पंडित मोहि भजहीं । पाएहुँ ग्यान भगति नहिं तजहीं ॥

माझ्या सेवकाला फक्त माझ्याच बळाचा आधार असतो. आणि तो ज्ञानी मनुष्य स्वतःच्या बळावर विसंबून असतो. परंतु काम-क्रोधरुपी शत्रू हे तर दोघांनाही आहेत. भक्ताच्या शत्रूला मारण्याची जबाबदारी माझी आहे, कारण तो मला शरण असल्यामुळे माझेच बळ मानतो, परंतु स्वतःचे बळ मानणार्‍या ज्ञानी मनुष्याचीजबाबदारी माझ्यावर नाही. असा विचार करुन बुद्धिमान लोक मलाच भजतात. ज्ञान प्राप्त झाल्यावरही ते भक्ती सोडत नाहीत. ॥ ५ ॥

दोहा—काम क्रोध लोभादि मद प्रबल मोह कै धारि ।

तिन्ह महँ अति दारुन दुखद मायारुपी नारि ॥ ४३ ॥

काम, क्रोध, लोभ, मद इत्यादि प्रबळ सेना आहे. यामध्ये मायारुपिणी स्त्री ही अत्यंत दारुण दुःख देणारी आहे. ॥ ४३ ॥

सुनु मुनि कह पुरान श्रुति संता । मोह बिपिन कहुँ नारि बसंता ॥

जप तप नेम जलाश्रय झारी । होइ ग्रीषम सोषइ सब नारी ॥

हे मुनि, ऐका. पुराण, वेद व संत असे म्हणतात की, मोहरुपी वनाला फुलविणारा हा वसंत ऋतू आहे. जप, तप, नियमरुपी संपूर्ण जल-स्थानांना स्त्री ही ग्रीष्म ऋतू बनून शोषून घेते. ॥ १ ॥

काम क्रोध मद मत्सर भेका । इन्हहि हरषप्रद बरषा एका ॥

दुर्बासना कुमुद समुदाई । तिन्ह कहँ सरद सदा सुखदाई ॥

काम, क्रोध, मद व मत्सर हे बेडूक आहेत. यांना वर्षा-ऋतू बनून हर्ष देणारी स्त्री हीच एकमात्र आहे. वाईट वासना या कुमूदांचे समूह आहेत. त्यांना सदैव सुख देणारी स्त्री ही शरदऋतू आहे. ॥ २ ॥

धर्म सकल सरसीरुह बृंदा । होइ हिम तिन्हहि दहइ सुख मंदा ॥

पुनि ममता जवास बहुताई । पलुहइ नारि सिसिर रितु पाई ॥

संपूर्ण धर्म हे कमलांचे ताटवे आहेत. ही विषयजन्य सुख देणारी स्त्री हिम-ऋतू होऊन त्यांना नष्ट करते. मग ममतारुपी तांबड्या धमाशाचे वन स्त्रीरुपी शिशिर-ऋतू येताच हिरवेगार बनते. ॥ ३ ॥

पाप उलूक निकर सुखकारी । नारि निबिड़ रजनी अँधाआरी ॥

बुधि बल सील सत्य सब मीना । बनसी सम त्रिय कहहिं  प्रबीना ॥

पापरुपी घुबडांच्या समूहांना सुख देणारी स्त्री ही घोर

 अंधकारमय रात्र आहे. बुद्धी, बल, शील व सत्य हे सर्व

 मासे आहेत आणि त्यांना फसवून त्यांचा नाश

 करण्यासाठी स्त्री ही गळासारखी आहे, असे चतुर पुरुष

 म्हणतात. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: