ShriRamCharitManas
दोहा---कर सरोज सिर परसेउ
कृपासिंधु रघुबीर ।
निरखि राम छबि धाम मुख बिगत
भई सब पीर ॥ ३० ॥
कृपासागर
श्रीरघुवीरांनी आपल्या करकमलांनी त्याच्या मस्तकाला स्पर्श केला. शोभाधाम
श्रीरामचंद्रांचे परमसुंदर मुख पाहून जटायूची सर्व पीडा नाहीशी झाली. ॥ ३० ॥
तब कह गीध बचन धरि धीरा ।
सुनहु राम भंजन भव भीरा ॥
नाथ दसानन यह गति कीन्ही ।
तेहिं खल जनकसुता हरि लीन्ही ॥
मग धीर धरुन त्या जटायु
गिधाडाने म्हटले, ‘ हे जन्म-मृत्युरुप भवाच्या भयाचे नाश करणारे श्रीराम, ऐका. हे
नाथ, रावणाने माझी अशी दशा केली. त्या दुष्टाने जानकीचे हरण केले आहे. ॥ १ ॥
लै दच्छिन दिसि गयउ गोसाईं
। बिलपति अति कुररी की नाईं ॥
दरस लागि प्रभु राखेउँ
प्राना । चलन चहत अब कृपानिधाना ॥
हे स्वामी, तो तिला
घेऊऩ दक्षिण दिशेला गेला आहे. सीता ही टिटवीप्रमाणे खूप आक्रोश करीत होती. हे
प्रभो, मी तुमच्या दर्शनासाठी प्राण राखले होते. हे कृपानिधान, आता हे प्राण जाऊ
इच्छितात.’ ॥ २ ॥
राम कहा तनु राखहु ताता ।
मुख मुसुकाइ कही तेहिं बाता ॥
जा कर नाम मरत मुख आवा ।
अधमउ मुकुत होइ श्रुति गावा ॥
श्रीरामचंद्र म्हणाले,
‘ हे तात, शरीर सोडू नका.’ तेव्हा त्याने हसत मुखाने म्हटले, ‘ मरताना ज्यांचे नाव
मुखात आल्यास महान पापीसुद्धा मुक्त होतो, असे वेदांनी सांगितले आहे, ॥ ३ ॥
सो मम लोचन गोचर आगें ।
राखौं देह नाथ केहि खॉंगें ॥
जल भरि नयन कहहिं रघुराई ।
तात कर्म निज तें गति पाई ॥
तेच तुम्ही माझ्या डोळ्यांसमोर
उभे आहात. हे नाथ, आता मी कोणती उणीव आहे, म्हणून देह राखून ठेवू ?’
श्रीरघुनाथ डोळ्यांत पाणी आणून म्हणाले, हे तात, तुम्ही स्वतःच्या श्रेष्ठ
कर्मांनी दुर्लभ गती प्राप्त केली आहे. ॥ ४ ॥
परहित बस जिन्ह के मन माहीं
। तिन्ह कहुँ जग दुर्लभ कछु नाहीं ॥
तनु तजि तात जाहु मम धामा ।
देउँ काह तुम्ह पूरनकामा ॥
ज्यांच्या मनांत दुसर्याचे
हित असते, त्यांच्यासाठी या जगात काहीही दुर्लभ नाही. हे तात, आज देह सोडून तुम्ही
माझ्या परमधामास जा. मी तुम्हांला काय देऊ ? तुम्ही तर पूर्णकाम आहात. ॥ ५ ॥
दोहा---सीता हरन तात जनि
कहहु पिता सन जाइ ।
जौं मैं राम त कुल सहित
कहिहि दसानन आइ ॥ ३१ ॥
हे तात, सीतेच्या
हरणाची वार्ता तुम्ही जाऊन ( स्वर्गात ) माझ्या वडिलांना सांगू नका. जर मी राम
असेन, तर सहकुटुंब रावणच तेथे जाऊन सांगेल.’ ॥ ३१ ॥
गीध देह तजि धरि हरि रुपा ।
भूषन बहु पट पीत अनूपा ॥
स्याम गात बिसाल भुज चारी ।
अस्तुति करत नयन भरि बारी ॥
जटायूने गिधाडाचा देह
सोडून हरीचे रुप धारण केले आणि अनेक अनुपम, दिव्य अलंकार व दिव्य पीतांबर धारण
केले. श्याम शरीर, चार विशाल भुजा आणि प्रेम व आनंदाचे अश्रू डोळ्यांत आणून तो
स्तुती करु लागला. ॥ १ ॥
छं०—जय राम रुप अनूप
निर्गुन सगुन गुन प्रेरक सही ।
दससीस बाहु प्रचंड खंडन चंड
सर मंडन मही ॥
पाथोद गात सरोज मुख राजीव
आयत लोचनं ।
नित नौमि रामु कृपाल बाहु
बिसाल भव भय मोचनं ॥
‘ हे राम, तुमचा विजय
असो. तुमचे रुप अनुपम आहे. तुम्ही निर्गुण आहात, तसेच सगुण आहात आणि खरोखरच मायेचे
प्रेरक आहात. दहा शिरांच्या रावणांच्या प्रचंड भुजांचे तुकडे तुकडे करण्यासाठी
प्रचंड बाण धारण करणारे, पृथ्वीला सुशोभित करणारे, सजल मेघांसमान श्यामल शरीराचे,
कमळासमान मुख असलेले आणि लाल कमळासमान विशाल नेत्रांचे, विशाल भुजांचे आणि भव भयापासून
मुक्त करणारे हे कृपाळू श्रीराम ! मी तुम्हांला नित्य नमस्कार करतो. ॥ १ ॥
बलमप्रमेयमनादिमजमब्यक्तमेकमगोचरं
।
गोबिंद गोपर द्वंदहर
बिग्यानघन धरनीधरं ॥
जे राम मंत्र जपंत संत अनंत
जन मन रंजनं ।
नित नौमि राम अकाम प्रिय
कामादि खल दल गंजनं ॥
तुम्ही अपरिमित बळाचे,
अनादी, अजन्मा अव्यक्त, एक, अगोचर, वेदवाक्ये जाणणारे गोविंद, इंद्रियातीत,
जन्म-मरण, सुख-दुःख, हर्ष-शोकादी द्वंदांचे हरण करणारे, विज्ञानस्वरुप आणि
पृथ्वीचे आधार आहात. जे संत राम-मंत्राचा जप करतात, त्या अनंत भक्तांच्या मनाला
आनंद देणारे आहात. त्या निष्कामजनांना प्रिय असणारे आणि काम आदी दुष्ट वृत्तींच्या
समूहाचे निर्दालन करणारे, हे श्रीराम, मी तुम्हांला नित्य नमस्कार करतो. ॥ २ ॥
जेहि श्रुति निरंजन ब्रह्म
ब्यापक बिरज अज कहि गावहीं ।
करि ध्यान ग्यान बिराग जोग
अनेक मुनि जेहि पावहीं ॥
सो प्रगट करुना कंद सोभा
बृंद अग जग मोहई ।
मम हृदय पंकज भृंग अंग अनंग
बहु छबि सोहई ॥
निरंजन, ब्रह्म,
व्यापक, निर्विकार आणि जन्मरहित म्हणून ज्यांचे श्रुती गायन करतात. मुनी ज्यांना
ध्यान, ज्ञान, वैराग्य आणि योग इत्यादी अनेक साधने करुन प्राप्त करतात, तेच
करुणाकंद, शोभेचे समूह असलेले प्रत्यक्ष श्रीभगवान प्रकट होऊन चराचराला आज मोहित
करीत आहेत. माझ्या हृदयकमलाचे भ्रमर असलेल्या त्यांच्या अंगांमध्ये अनेक कामदेवांच्या
रुपाची शोभा दिसत आहे. ॥ ३ ॥
जो अगम सुगम सुभाव निर्मल
असम सम सीतल सदा ।
पस्यंति जं जोगी जतन करि
करत मन गो बस सदा ॥
सो राम रमा निवास संतत दास
बस त्रिभुवन धनी ।
मम उर बसउ सो समन संसृति
जासु कीरति पावनी ॥
जे अगम आणि सुगम आहेत, निर्मल स्वभावाचे आहेत,
विषम व सम आहेत आणि सदा शीतल आहेत, मन
आणि इंद्रिये यांचा नित्य संयम करुन योगीजन खूप
साधन केल्यावर ज्यांचे दर्शन प्राप्त करतात, ते तिन्ही
लोकींचे स्वामी, रमानिवास श्रीराम निरंतर आपल्या
दासांच्या अधीन असतात. ज्यांची पवित्र कीर्ती
संसारचक्राचा नाश करणारी आहे. तेच प्रभू माझ्या
हृदयात निवास करोत.
‘ ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment