ShriRamCharitManas
दोहा—फल भारन नमि बिटप सब रहे भूमि निअराइ ।
पर उपकारी पुरुष जिमि नवहिं सुसंपति पाइ ॥ ४० ॥
फळांच्या ओझ्यामुळे वृक्ष वाकून जमिनीजवळ
येऊन टेकत, ज्याप्रमणे परोपकारी पुरुष खूप संपत्ती मिळाल्यावरही विनयाने नम्र
होतात. ॥ ४० ॥
देखि राम अति रुचिर तलावा । मज्जनु कीन्ह परम सुख
पावा ॥
देखी सुंदर तरुबर छाया । बैठे अनुज सहित रघुराया
॥
श्रीरामांनी ते सुंदर सरोवर पाहून स्नान
केले. त्यामुळे त्यांना फार समाधान वाटले. एका सुंदर व उत्तम वृक्षाची सावली पाहून
श्रीराम लक्ष्मणासह तेथे बसले. ॥ १ ॥
तहँ पुनि सकल देव मुनि आए । अस्तुति करि निज धाम
सिधाए ॥
बैठे परम प्रसन्न कृपाला । कहत अनुज सन कथा रसाला
॥
मग तेथे सर्व देव व मुनी आले आणि श्रीरामांची
स्तुती करुन घरी परत गेले. कृपाळू श्रीराम अत्यंत प्रसन्न होऊन लक्ष्मणाला रसाळ
कथा सांगत होते. ॥ २ ॥
बिरहवंत भगवंतहि देखी । नारद मन भा सोच बिसेषी ॥
मोर साप करि अंगीकारा । सहत राम नाना दुख भारा ॥
भगवंतांना विरही अवस्थेत पाहून नारदांना
मनातून विशेष दुःख झाले. त्यांनी विचार केला की, माझाच शाप स्वीकारुन श्रीराम हे
नाना प्रकारची दुःखे सहन करीत आहेत. ॥ ३ ॥
ऐसे प्रभुही बिलोकउँ जाई । पुनि न बनिहि अस अवसरु
आई ॥
यह बिचारि नारद कर बीना । गए जहॉं प्रभु सुख
आसीना ॥
अशा भक्तवत्सल प्रभूंना जाऊन पाहावे तरी
पुन्हा अशी संधि येणार नाही. असा विचार
करुन नारद हातात वीणा घेऊन प्रभू जेथे सुखाने बसले होते तेथे गेले. ॥ ४ ॥
गावत राम चरित मृदु बानी । प्रेम सहित बहु भॉंति
बखानी ॥
करत दंडवत लिए उठाई । राखे बहुत बार उर लाई ॥
ते कोमल वाणीने व मोठ्या प्रेमाने
राम-चरित्राचे वर्णन गात जात होते. ते दंडवत करीत आहेत, असे पाहून श्रीरामांनी
त्यांना उठवले व हृदयाशी धरले. ॥ ५ ॥
स्वागत पूँछि निकट बैठारे । लछिमन सादर चरन पखारे
॥
नंतर त्यांचे स्वागत करुन व खुशाली विचारुन
त्यांना आपल्याजवळ बसवून घेतले. लक्ष्मणाने आदराने त्यांचे चरण धुतले. ॥ ६ ॥
दोहा—नाना बिधि बिनती करि
प्रभु प्रसन्न जियँ जानि ।
नारद बोले बचन तब जोरि
सरोरुह पानि ॥ ४१ ॥
अनेक प्रकारे प्रभूंची
विनवणी करुन व ते प्रसन्न आहेत, असे पाहून नारद आपले कर-कमल जोडून म्हणाले, ॥ ४१ ॥
सुनहु उदार सहज रघुनायक ।
सुंदर अगम सुगम बर दायक ॥
देहु एक बर मागउँ स्वामी ।
जद्यपि जानत अंतरजामी ॥
‘ हे स्वभावाने उदार
असलेल्या श्रीरघुनाथा, तुम्ही सुंदर, दुर्लभ व सुखदायक वर देणारे आहात. हे स्वामी,
मी एक वर मागतो, तो मला द्या. अंतर्यामी असल्यामुळे तुम्ही सर्व जाणताच. ‘ ॥ १ ॥
जानहु मुनि तुम्ह मोर सुभाऊ
। जन सन कबहुँ कि करउँ दुराऊ ॥
कवन बस्तु असि प्रिय मोहि
लागी । जो मुनिबर न सकहु तुम्ह मागी ॥
श्रीराम म्हणाले, ‘ हे
मुनी, तुम्ही माझा स्वभाव जाणताच. मी आपल्या भक्तांपासून काही लपवून ठेवतो काय ?
मला अशी कोणती गोष्ट प्रिय वाटते की, ती हे मुनिश्रेष्ठ, तुम्ही मागू शकणार नाही ?
॥ २ ॥
जन कहुँ कछु अदेय नहिं मोरें । अस बिस्वास तजहु जनि
भोरें ॥
तब नारद बोले हरषाई । अस बर मागउँ करउँ ढिठाई ॥
भक्ताला न देण्यासारखे माझ्याकडे काही नाही,
हा विश्वास चुकूनही विसरु नका. ‘ तेव्हा हर्षित होऊन नारद म्हणाले की, ‘ मी असा वर
मागण्याचे धाडस करीत आहे. ॥ ३ ॥
जद्यपि प्रभु के नाम अनेका । श्रुति कह अधिक एक
तें एका ॥
राम सकल नामन्ह तें अधिका । होउ नाथ अघ खग गन
बधिका ॥
जरी प्रभुंची अनेक नावे आहेत आणि ती सर्व एकापेक्षा
एक श्रेष्ठ आहेत, असे वेद सांगतात, तरीही हे नाथ,
रामनाम हे सर्व नामांहून श्रेष्ठ असावे आणि ते पापरुपी
पक्ष्यांच्या समूहासाठी पारध्याप्रमाणे
असावे. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment