Lanka Kanda Part 1
श्लोक
रामं कामारिसेव्यं भवभयहरणं कालमत्तेभसिंहं ।
योगीन्द्रं
ज्ञानगम्यं गुणनिधिमजितं निर्गुणं निर्विकारम् ॥
मायातीतं
सुरेशं खलवधनिरतं ब्रह्मवृन्दैकदेवं ।॥
वन्दे
कन्दावदातं सरसिजनयनं देवमुर्वीशरुपम् ॥ १ ॥
१)
कामदेवाचे शत्रू असणार्या शिवांचे आराध्य दैवत, जन्म-मृत्युरुपी भवाचे भय हरण करणारे,
कालरुपी हत्तीसाठी सिंहासमान, योगीश्र्वर, ज्ञानाने जाणता येणारे, गुणांचे निधी,
अजेय, निर्गुण, निर्विकार, मायातीत, देवांचे स्वामी, दुष्टांचा वध करण्यात तत्पर,
ब्राह्मणवृदांचे एकमात्र देव, सजल मेघासमान सुंदर श्याम, कमलसदृश नेत्रांचे,
राजाच्या रुपातील परमदेव श्रीराम यांना मी वंदन करतो.
शङ्खेन्द्वाभमतीवसुन्दरतनुं
शार्दूलचर्माम्बरं ।
कालव्यालकरालभूषणधरं
गङ्गाशशाङ्कप्रियम् ॥
काशीशं
कलिकल्मषौघशमनं कल्याणकल्पद्रुमं ॥।
नौमीड्यं गिरिजापतिं
गुणनिधिं कन्दर्पहं शङ्करम् ॥ २ ॥
२) शंख
आणि चंद्र यांच्यासारखी कांती असणारे, अत्यंत सुंदर शरीराचे, व्याघ्रांबर धारण
करणारे, कालसमान भयानक सर्पांचे भूषण धारण करणारे, गंगा व चंद्र यांचे प्रेमी
काशीपती, कलियुगातील पाप-समूहाचा नाश करणारे, कल्याणाचा कल्पवृक्ष, गुणांचे निधान
आणि कामदेवाला भस्म करणारे, पार्वतीपती, पूज्य श्रीशंकर यांना मी नमस्कार करतो. ॥
२ ॥
यो ददाति
सतां शम्भुः कैवल्यमपि दुर्लभम् ।
खलानां
दण्डकृद्योऽसौ शङ्करः शं तनोतु मे ॥ ३ ॥
३) जे सत्पुरुषांना
अत्यंत दुर्लभ अशी कैवल्यमुक्तीसुद्धा देऊन टाकतात आणि जे दुष्टांना दंड देणारे
आहेत, ते कल्याणकारी श्रीशंभू माझ्या कल्याणाचा विस्तार करोत. ॥ ३ ॥
दोहा—लव निमेष परमानु जुग बरष कलप सर चंड ।
भजसि न मन तेहि राम को कालु जासु कोदंड ॥
लव, निमेष, परमाणू, वर्ष, युग आणि कल्प हे ज्यांचे प्रचंड
बाण आहेत आणि काळ हेज्यांचे धनुष्य आहे, हे मना ! तू त्या श्रीरामांचे भजन कां
करीत नाहीस ?
सोपान—सिंधु बचन सुनि राम सचिव बोलि प्रभु अस कहेउ ।
अब बिलंबु केहि काम करहु सेतु उतरै कटकु ॥
समुद्राचे बोलणे ऐकून प्रभू श्रीरामांनी मंत्र्यांना
बोलावून घेतले आणि म्हटले, ‘ आता उशीर कशासाठी ? सेतू तयार करा. त्यामुळे सेना
पलीकडे जाऊ शकेल ‘ .
सुनहु भानुकुल केतु जामवंत कर जोरि कह ।
नाथ नाम तव सेतु नर चढ़ि भव सागर तरहिं ॥
जांबवान हात जोडून म्हणाला, ‘ हे सूर्यकुलाचे ध्वजस्वरुप
श्रीराम, ऐकून घ्या. हे नाथ सर्वांत मोठा सेतु तर तुमचे नावच आहे. त्याचा आधार
घेऊन मनुष संसाररुपी समुद्र पार करतो.
यह लघु जलधि तरत कति बारा । अस सुनि पुनि कह पवनकुमारा ॥
प्रभु प्रताप बड़बानल भारी । सोषेउ प्रथम
पयोनिधि बारी ॥
मग हा लहानसा समुद्र पार करण्यास कितीसा वेळ लागेल ?’ हे
ऐकून पवनकुमार श्रीहनुमान म्हळाला, ‘ प्रभूंचा प्रताप हा प्रचंड वडवानलासारखा आहे.
त्याने पूर्वीच समुद्राचे पाणी शोषून घेतले आहे. ॥ १ ॥
तव रिपु नारि रुदन जल धारा । भरेउ बहोरि
भयउ तेहिं खारा ॥
सुनि अति उकुति पवनसुत केरी । हरषे कपि रघुपति तन हेरी ॥
परंतु तुमच्या शत्रूंच्या स्त्रियांच्या
अश्रूंच्या धारांनी हा पुन्हा भरला आहे आणि त्यामुळे खारा आहे.’ हनुमानाचे
अलंकारपूर्ण बोलणे ऐकून श्रीरघुनाथांच्याकडे पाहात सर्व वानर आनंदित झाले. ॥ २ ॥
जामवंत बोले
दोउ भाई । नल नीलहि सब कथा सुनाई ॥
राम प्रताप
सुमिरि मन माहीं । करहु सेतु प्रयास कछु नाहीं ॥
जांबवानाने
नल-नील या दोघा भावांना बोलावून सर्व सांगितले आणि म्हटले, ‘ मनात श्रीरामांच्या
प्रतापाचे स्मरण करुन सेतू बनवा. रामांच्या प्रतापामुळे काहीही कष्ट होणार नाहीत.’
॥ ३ ॥
बोलि लिए
कपि निकर बहोरी । सकल सुनहु बिनती कछु मोरी ॥
राम चरन
पंकज उर धरहू । कौतुक एक भालु कपि करहु ॥
नंतर
वानरांच्या समूहांना बोलावून घेतले आणि सांगितले की, ‘ तुम्ही सर्वजण माझी विनंती
ऐका. आपल्या मनात श्रीरामांचे चरण-कमल धारण करा आणि सर्व अस्वले व वानर मिळून एक
कौतुक करा. ॥ ४ ॥
धावहु मर्कट
बिकट बरुथा । आनहु बिटप गिरिन्ह के जूथा ॥
सुनि कपि
भालु चले करि हूहा । जय रघुबीर प्रताप समूहा ॥
बलवान
वानरांच्या समूहांनी धावत जाऊन वृक्ष व पर्वतांचे समूह उपटून आणावेत.’ हे ऐकताच
वानर व अस्वले हुंकार करीत आणि श्रीरघुनाथांच्या प्रतापाचा जयजयकार करीत निघाले. ॥
५ ॥
दोहा १
अति उतंग गिरि पादप लीलहिं लेहिं उठाइ ।
आनि देहिं नल नीलहि रचहिं ते सेतु बनाइ ॥
ते उंच उंच पर्वत व वृक्ष लीलया सहजपणे उपटून घेत होते आणि
नल व नील यांना आणून देत होते. ते दोघे चांगल्याप्रकारे पर्वत, वृक्ष रचून सेतू
बनवू लागले. ॥ १ ॥
सैल बिसाल आनि कपि देहीं । कंदुक इव नल नील ते लेहीं ॥
देखि सेतु अति सुंदर रचना । बिहसि कृपानिधि बोले बचना ॥
वानर मोठमोठे पर्वत आणून देत होते आणि नल-नील ते
चेंडूप्रमाणे सहज घेत होते. सेतूची सुंदर रचना पाहून कृपासिंधू श्रीराम हसून
म्हणाले. ॥ १ ॥
परम रम्य उत्तम यह धरनी । महिमा अमित जाइ नहिं बरनी ॥
करिहउँ इहॉं संभु थापना । मोरे हृदयँ परम कलपना ॥
‘ येथील भूमी परम रमणीय व उत्तम आहे. तिचा महिमा अगाध आहे.
मी येथे श्रीशंकरांची स्थापना करतो. माझ्या मनात हा महान संकल्प आहे. ‘ ॥ २ ॥
सुनि कपीस बहु दूत पठाए । मुनिबर सकल बोलि लै आए ॥
लिंग थापि बिधिवत करि पूजा । सिव समान प्रिय मोहि न दूजा ॥
श्रीरामांचे बोलणे ऐकून वानरराज सुग्रीवाने पुष्कळ दूत
पाठविले. त्यांनी सर्व श्रेष्ठ मुनींना बोलावून आणले. शिवलिंगाची स्थापना करुन
विधिपूर्वक त्याची पूजा केली. मग भगवान म्हणाले, ‘ शिवांसारखा दुसरा कोणी मला
प्रिय नाही. ॥ ३ ॥
सिवा द्रोही मम भगत कहावा । सो नर सपनेहुँ मोहि न पावा ॥
संकर बिमुख भगति चह मोरी । सो नारकी मूढ़ मति थोरी ॥
जो शिवांचा द्रोह करतो आणि स्वतःला माझा भक्त म्हणवून घेतो, तो मनुष्य स्वप्नातही मला प्राप्त करु शकत नाही. शंकरांना विन्मुख होऊन जो माझी भक्ती प्राप्त करु इच्छितो , तो नरकगामी, मूर्ख आणि अल्पबुद्धीचा होय. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment