Wednesday, October 21, 2020

ShriRamcharitmans Part 54 श्रीरामचरितमानस भाग ५४

ShriRamcharitmans Part 54 
Doha 249 to 251 
श्रीरामचरितमानस भाग ५४ 
दोहा २४९ ते २५१ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—बोले बंदी बचन बर सुनहु सकल महिपाल ।

पन बिदेह कर कहहिं हम भुजा उठाइ बिसाल ॥ २४९ ॥

भाटांनी म्हटले, ‘ हे पृथ्वीचे पालन करणार्‍या सर्व राजांनो, ऐका. आम्ही बाहू उभारुन जनकांचा महान पण सांगतो. ॥ २४९ ॥

नृप भुजबलु बिधु सिवधनु राहू । गरुअ कठोर बिदित सब काहू ॥

रावनु बानु महाभट भारे । देखि सरासन गवँहिं सिधारे ॥

राजांच्या भुजांचे बल हे चंद्र आहे आणि शिवांचे धनुष्य राहू आहे. ते अवजड व कठोर आहे, ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. योद्धे रावण व बाणासुरसुद्धा हे धनुष्य पाहून गप्पपणे निघून गेले. त्याला स्पर्श करण्याची सुद्धा हिम्मत त्यांना झाली नाही. ॥ १ ॥

सोइ पुरारि कोदंडु कठोरा । राज समाज आजु जोइ तोरा ॥

त्रिभुवन जय समेत बैदेही । बिनहिं बिचार बरइ हठि तेही ॥

हे भगवान शिवांचे अवजड धनुष्य आज या राजसमाजामध्ये जो कोणी मोडेल, त्याला त्रैलोक्याच्या विजयाबरोबर जानकी कोणताही विचार न करता मनापासून वरील. ॥ २ ॥

सुनि पन सकल भूप अभिलाषे । भटमानी अतिसय मन माखे ॥

परिकर बॉंधि उठे अकुलाई । चले इष्टदेवन्ह सिर नाई ॥

हा पण ऐकून सर्व राजांना उत्कंठा लागली. ज्यांना आपल्या शौर्याचा अभिमान होता, ते मनातून अधीर झाले. कमर कसून उतावळेपणे उठले व आपल्या इष्टदेवांना नमस्कार करुन निघाले. ॥ ३ ॥

तमकि ताकि तकि सिवधनु धरहीं । उठइ न कोटि भॉंति बलु करहीं ॥

जिन्ह के कछु बिचारु मन माहीं । चाप समीप महीप न जाहीं ॥

त्यांनी मोठ्या तावातावाने शिवधनुष्याकडे बघितले आणि लक्षपूर्वक ते पकडले. असंख्य प्रकारे जोर लावला, परंतु ते उचलले गेले नाही. ज्या राजांना काही विवेक होता, ते धनुष्याकडे फिरकले नाहीत. ॥ ४ ॥

दोहा—तमकि धरहिं धनु मूढ़ नृप उठइ न चलहिं लजाइ ।

मनहुँ पाइ भट बाहुबलु अधिकु अधिकु गरुआइ ॥ २५० ॥

ज्या मूर्ख राजांनी तावातावाने धनुष्य धरले, परंतु ते जेव्हा उचलले गेले नाही, तेव्हा ते लाजून परत गेले. जणू वीरांच्या भुजांचे बळ लाभल्यामुळे ते धनुष्य जास्तच अवजड होत होते. ॥ २५० ॥

भूप सहस दस एकहि बारा । लगे उठावन टरइ न टारा ॥

डगइ न संभु सरासनु कैसें । कामी बचन सती मनु जैसें ॥

मग एक हजार राजे एकाच वेळी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करु लागले. तरीही ते हलले नाही. ज्याप्रमाणे कामी पुरुषांच्या बोलण्यामुळे सतीचे मन विचलित होत नाही, त्याप्रमाणे शिवांचे ते धनुष्य हलत नव्हते. ॥ १ ॥

सब नृप भए जोगु उपहासी । जैसें बिनु बिराग संन्यासी ॥

कीरति बिजय बीरता भारी । चले चाप कर बरबस हारी ॥

ज्याप्रमाणे वैराग्याविना संन्यासी हास्यास्पद ठरतो, त्याप्रमाणे सर्व राजे हास्यास्पद झाले.  आपली कीर्ती, विजय, अत्यंत शौर्य—हे त्या धनुष्याकडून जबरदस्तीने हिरावून घेतले गेल्यामुळे ते पराभूत होऊन निघून गेले. ॥ २ ॥

श्रीहत भए हारि हियँ राजा । बैठे निज निज जाइ समाजा ॥

नृपन्ह बिलोकि जनकु अकुलाने । बोले बचन रोष जनु साने ॥

राजेलोक मनातून पराजित झाल्याने निष्प्रभ झाले आणि आपापल्या गोटामध्ये जाऊन बसले. सर्व राजे अपयस्वी ठरल्याचे पाहून राजा जनक व्याकूळ झाले आणि क्रोधाने म्हणाले, ॥ ३ ॥

दीप दीप के भूपति नाना । आए सुनि हम जो पनु ठाना ॥

देव दनुज धरि मनुज सरीरा । बिपुल बीर आए रनधीरा ॥

‘ जो पण मी ठेवला होता, तो ऐकून द्वीपद्वपांतरातील अनेक राजे आले. देव व दैत्य हे सुद्धा मनुष्याचे शरीर धारण करुन आले. आणखीही पुष्कळसे रणधीर वीर आले. ॥ ४ ॥

दोहा—कुअँरि मनोहर बिजय बड़ि कीरति अति कमनीय ।

पावनिहार बिरंचि जनु रचेउ न धनु दमनीय ॥ २५१ ॥

परंतु धनुष्य मोडून मनोहर कन्या, मोठा विजय आणि उज्ज्वल कीर्ती प्राप्त करणारा जणू ब्रह्मदेवांनी कोणी निर्माणच केला नाही. ॥ २५१ ॥

कहहु काहि यहु लाभु न भावा । काहुँ न संकर चाप चढ़ावा ॥

रहउ चढ़ाउब तोरब भाई । तिलु भरि भूमि न सके छड़ाई ॥

हा लाभ कुणाला आवडला नसता ? सांगा. परंतु कोणीही शंकरांचे धनुष्य उचलू शकला नाही. उचलणे आणि मोडणे हे तर दूरच राहिले, कुणी ते तिळभरही जमिनीपासून हलवू शकला नाही. ॥ १ ॥

अब जनि कोउ माखै भट मानी । बीर बिहीन मही मैं जानी ॥

तजहु आस निज निज गृह जाहू । लिखा न बिधि बैदेहि बिबाहू ॥

आता कुणी वीरतेचा अभिमान बाळगणार्‍याने नाराज व्हायचे कारण नाही. मला तर कळून चुकले की, पृथ्वीवर वीरच नाहीत. आता आशा सोडून आपापल्या घरी जा. ब्रह्मदेवांनी सीतेचा विवाह तिच्या नशिबी लिहिलेलाच नाही. ॥ २ ॥

सुकृतु जाइ जौं पनु परिहरऊँ । कुअँरि कुआरि रहउ का करऊँ ॥

जौं जनतेउँ बिनु भट भुबि भाई । तौ पनु करि होतेउँ न हँसाई ॥

जर मी पण सोडला, तर पुण्य जाईल. तर आता काय करावे ? कन्या कुमारीच राहील. जर मला आधी ठाऊक असते की, पृथ्वी वीरांनी रहित आहे, तर हा पण करुन मी हास्यास्पद झालो नसतो. ‘ ॥ ३ ॥

जनक बचन सुनि सब नर नारी । देखि जानकिहि भए दुखारी ।

माखे लखनु कुटिल भइँ भौंहें । रदपट फरकत नयन रिसौंहें ॥

जनकांचे बोलणे ऐकून सर्व स्त्री-पुरुष जानकीकडे पाहून हळहळले. परंतु लक्ष्मण रागाने लालबुंद झाला, त्याच्या भुवया उंचावल्या, ओठ फडफडू लागले आणि डोळे रागामुळे लाल झाले. ॥ ४ ॥



Custom Search