Shri Dnyaneshwari
मूळ श्र्लोक
अधिभूतं
क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र
देहे देहभूतां वर ॥ ४ ॥
४) हे
नरश्रेष्ठा, अधिभूत म्हणजे नश्वर पदार्थ; व जीव हाच अधिदैवत आणि या देहांत अधियज्ञ
( देह भावाचा उपशमन करणारा ) मीच आहे.
आतां अधिभूत
जे म्हणिपे । तेंहि सांगों संक्षेपें ।
तरी होय आणि
हारपे । अभ्र जैसें ॥ ३० ॥
३०)
आतां अधिभूत ज्याला म्हणतात, तेंहि थोडक्यांत सांगतों, तर ज्याप्रमाणें ढग उत्पन्न
होतात व लय पावतात;
तैसें
असतेपण आहाच । नाहीं होईजे हें साच ।
जयांतें रुप
आणिती पांचपांच । मिळोनियां ॥ ३१ ॥
३१) त्याप्रमाणें
ज्याचें अस्तित्व उगीच वरवर असतें, व न होणें ज्याचें खरे स्वरुप आहे, आणि ज्याला
पंचमहाभूतें एकत्र होऊन व्यक्त दशेंत आणतात;
भूतांते
अधिकरुनि असे । आणि भूतसंयोगें तरि दिसे ।
जें
वियोगवेळे भ्रंशे । नामरुपादिक ॥ ३२ ॥
३२) जें
पंचमहाभूतांचा आश्रय करुन असतें; आणि पंचमहाभूतांचा संयोग ( पंचीकरण ) झाला तरच
जें दिसतें; आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असतां जें नामरुपात्मक शरीर नाशाला
पावतें;
तयातें
अधिभूत म्हणिजे । मग अधिदैव पुरुष जाणिजे ।
जेणें
प्रकृतीचें भोगिजे । उपार्जिलें ॥ ३३ ॥
३३)
त्याला ( शरीराला ) अधिभूत म्हणावें. मग अधिदैव म्हणजे पुरुष समजावा. तो
प्रकृतीनें मिळविलेले भोग भोगतो.
जो चेतनेचा
चक्षु । जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु ।
जो
देहास्तमानीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा ॥ ३४ ॥
३४) जो
चेतनेचा प्रकाशक आहे, जो इंद्रियरुपी देशाचा स्वामी आहे, आणि जो देह पडण्याच्या
वेळी संकल्परुप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे;
जो
परमात्माचि परि दुसरा । जे अहंकारनिद्रा निदसुरा ।
म्हणोनि
स्वप्नींचिया वोरवारा । संतोषे शिणे ॥ ३५ ॥
३५) जो
वास्तविक परमात्माच आहे. पण जो दुसरा ( वेगळा ) झाला. कारण कीं, त्यास अहंकाररुपी
झोप येऊन ( द्वैतभावात्मक ) स्वप्नाच्या व्यवहारानें तो संतोष पावतो व कष्टी होतो;
जीव येणें
नांवें । जयातें आळविजे स्वभावें ।
तें अधिदैव
जाणावें । पंचायतनींचें ॥ ३६ ॥
३६)
ज्याला जीव या नांवानें स्वभावतः बोलतात, त्याला पंचभूतात्मक शरीररुपी घरांतील
अधिदैव समजावें.
आतां इयेचि
शरीरग्रामीं । जो शरीरभावातें उपशमी ।
तो अधियज्ञु
एथ गा मी । पंडुकुमरा ॥ ३७ ॥
३७)
आतां याच शरीररुपी गांवामध्यें जो शरीरभावाला ( देहाहंकारादिकांना ) नाहींसें
करतो, तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुना, मी आहे.
येर
अधिदैवाधिभूत । तेहि मीचि कीर समस्त ।
परि पंधरें
किडाळा मिळत । काय साकें नोहे ॥ ३८ ॥
३८) इतर
अधिदैव, अधिभूत तेंहि सर्व खरोखर मीच आहे, परंतु अस्सल सोनें डांकाला मिळालें तर
तें हिणकस होत नाहीं काय ?
तरि तें
पंधरेपण न मैळे । आणि किडाचियाही अंशा न मिळे ।
परि जंव असे
जयाचेनि मेळें । तंव साकेंचि म्हणिजे ॥ ३९ ॥
३९)
वास्तविक या सोन्याचा उत्तमपणा मळत नाहीं; आणि तें सोनें किडाच्या भागाबरोबर
तद्रूप होत नाहीं; पण जोपर्यंत तें उत्तम सोनें किडांच्या मिलाफाने असतें;
तोंपर्यंत तयाला हिणकसच म्हटलें जातें.
तैसें
अधिभूतादि आघवें । हें अविद्येचेनि पालवें ।
झाकलें तंव
मानावें । वेगळें ऐसें ॥ ४० ॥
४०) त्याप्रमाणें
अधिभूत वगैरे हे सर्व जोंपर्यंत अविद्येच्या पदरानें झांकलेले आहेत, तोपर्यंत,
वेगळें असे समजावेत.
तेचि
अविद्येची जवनिक फिटे । आणि भेदभावाची अवधि तुटे ।
मग म्हणों
एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती ॥ ४१ ॥
४१) तोच
अविद्येचा पडदा काढला, म्हणजे द्वैत भावाची हद्द संपते, मग हें एकमेकांना मिळून
तद्रूप झालें असें जर म्हणावें तर पहिल्याप्रथम ते का दोन होते ?
पैं केशांचा
गुंडाळा । ठेविली स्फटिकशिळा ।
ते वरी
पाहिली डोळां । तंव भेदली गमली ॥ ४२ ॥
४२)
केसांचा गुंडाळा आहे ( व त्यावर ) स्फटिकाची शिळा ठेवली, तर ती वरुन डोळ्यानें
पाहिली असतां ( फुटलेली ) दिसते.
पाठीं केश
परौते नेले । आणि भेदलेपण काय नेणों
जाहालें ।
तरि डांक
देऊनि सांदिले । शिळेतें काई ॥ ४३ ॥
४३)
नंतर केस त्या स्फटिक शिळेपासून दूर काढलें, मग त्या शिळेचा फुटकेपणा कोठें गेला
तें कळत नाही. तर डाग देऊन त्या शिळेला जोडले काय ?
ना ते
अखंडचि आयती । परि संगें भिन्न गमली होती ।
ते सारीलिया
मागौती । जैसी का तैसी ॥ ४४ ॥
४४) तर
नाहीं, ती मूळची अखंड होती तशीच आहे. परंतु केसांच्या संगतीनें भंगलेली दिसत होती.
ते केस दूर केल्यावर पुनः ती मूळची जशी अखंड होती तशीच आहे.
तेवी
अहंभावो जाय । तरी ऐक्य तें आधींचि आहे ।
हेंचि साचें
जेथ होये । तो अधियज्ञु मी ॥ ४५ ॥
४५)
त्याप्रमाणें अहंकार गेला तर ऐक्य मूळचेंच आहे. हा प्रकार खरोखर जेथें घडतो, तो
अधियज्ञ मी आहें.
पैं गा
आम्हीं तुज । सकळ यज्ञ कर्मज ।
सांगितलें
कां जे काज । मनीं धरुनि ॥ ४६ ॥
४६)
अरे, आम्ही जो हेतू मनांत धरुन सर्व यज्ञ कर्मांपासून झाले आहेत असें ( चौथ्या
अध्यायांत ) तुला सांगितलें,
तो हा सकळ
जीवांचा विसांवा । नैष्कर्म्यसुखाचा ठेवा ।
परि उघड
करुनि पांडवा । दाविजत असे ॥ ४७ ॥
४७) तो
हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसांवा आहे. व नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. मग तो तुला
मी उघड करुन दाखवित आहे.
पहिलें
वैराग्यइंधन परिपूर्ती । इंद्रियानळीं प्रदीप्तीं ।
विषयद्रव्याचिया
आहुती । देऊनियां ॥ ४८ ॥
४८)
प्रथम वैराग्यरुपी भरपूर काष्ठांनी चांगला पेट घेतलेल्या इमद्रियरुपी अग्नींत
शब्दादि विषयरुपी द्रव्यांच्या आहुती देऊन,
मग वज्रासन
तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी ।
वेदिका रचे
मांडवीं । शरीराचां ॥ ४९ ॥
४९)
नंतर वज्रासन हीच कोणी जमीन, ती शुद्ध करुन शरीररुपी मांडवांत आधारमुद्रारुपी
चांगला ओटा घालतात.
तेथ
सयंमाग्नीचीं कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें ।
पूजिती
उदंडें । युक्तिघोषें ॥ ५० ॥
५०)
तेथे ध्यानधारणासमाधिरुपी अग्नीच्या कुंडांत बंधत्रयांच्या ममत्रघोषानें
इंद्रियरुपी विपुल द्रव्याच्या साह्याने यजन करतात;
मग मनप्राण
आणि संयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु ।
येणें
संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु ॥ ५१ ॥
५१)
नंतर मन, प्राण आणि संयम अशा या यज्ञसंपत्तीच्या समारंभानें धूररहित ज्ञानरुप
अग्नीला संतुष्ट करतात.
ऐसेनि हें
सकळ ज्ञानीं समर्पे । मग ज्ञान तें ज्ञेयी हारपे ।
पाठीं
ज्ञेयचि स्वरुपें । निखिल उरे ॥ ५२ ॥
५२) अशा
रीतीनें हें वर सांगितलेलें साहित्य, ज्ञानरुपी अग्नीमध्यें समर्पण केल्यावर, मग
त्या ज्ञानाचाहि ज्ञेयामध्यें लय होतो. मागें केवळ ज्ञेयच स्वरुपानें राहातें.
तयां नांव
गा अधियज्ञु । ऐसें बोलला जंव सर्वज्ञु ।
तव अर्जुन
अतिप्राज्ञु । तया पातलें तें ॥ ५३ ॥
५३) त्यास
अधियज्ञ असें नांव आहे. असें सर्वज्ञ श्रीकृष्ण ज्या वेळेस म्हणाले, त्या वेळेस
अर्जुन अतिशयच बुद्धिमान् असल्यामुळें
त्याच्या तें लक्षांत आलें.
हें जाणोनि म्हणितलें
देवें । पार्था परिसतु आहासि बरवें ।
या
कृष्णाचिया संतोषासवें । येरु सुखाचा जाहला ॥ ५४ ॥
५४) हें
लक्षांत येऊन देव म्हणाले, अर्जुना तू चांगल्या तर्हेनें ऐकत आहेस. ह्या
कृष्णाच्या संतोषानें अर्जुन आनंदित झाला.
देखा
बालकाचिया धणी धाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होईजे ।
हें
सद्गुरुचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवतिया ॥ ५५ ॥
५५)
पाहा, लहान मुलांच्या तृप्तीनें आपण तृप्त व्हावें किंवा शिष्याच्या पूर्ण
होण्यानें आपण कृतार्थ व्हावें, हे एक जन्मदात्री आई किंवा सद्गुरच समजतात.
म्हणोनि
सात्त्विक भावांची मांदी । कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं ।
न समातसे
परी बुद्धी । सांवरुनि देवें ॥ ५६ ॥
५६)
म्हणून अष्टसात्त्विकभावांचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णांच्या अंगी
मावेनासा झाला; परंतु देवांनीं आपल्या बुद्धीनें तो सांवरुन,
मग पिकलिया
सुखाचा परिमळु । कां निवलिया अमृताचा कल्लोळु ।
तैसा कोंवळा
आणि सरळु । बोलु बोलिला ॥ ५७ ॥
५७)
नंतर सुख हेंच कोणी पिकलेलें फळ त्याचा सुवास अथवा थंड अशा अमृताची लाट,
त्याप्रमाणें मृदु आणि सरळ असें भाषण केले.
म्हणे
परिसिणेयांचया राया । आइकें बापा धनंजया ।
ऐसी जळों
सरलिया माया । तेथ जाळितें तेंही जळे ॥ ५८ ॥
५८) श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यांतील श्रेष्ठा अर्जुना, बाबा, ऐक
. याप्रमाणें माया जळण्याची संपली कीं तिला जाळणारें जें
ज्ञान तेंहि त्या प्रसंगीं जळून नाहीसें
होतें.
No comments:
Post a Comment