Shri Dnyaneshwari
मूळ श्लोक
अन्तकाले च
मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति
स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ ५ ॥
५) आणि
मरणाच्या वेळीं जो केवळ माझेंच स्मरण करीत शरीराचा त्याग करुन जातो, तो मत्स्वरुप
पावतो; याविषयीं संशय नाहीं.
जें आतांचि
सांगितलें होतें । अगा अधियज्ञ म्हणितला जयातें ।
जे आदींचि
तया मातें । जाणोनि अंती ॥ ५९ ॥
५९) अर्जुना,
ज्यास अधियज्ञ म्हणतात, म्हणून आतांच सांगितलें, त्या मला, जें पुरुष जिवंत
असतांनाच जाणून मरणकाळींहिजाणतात,
ते देह झोळ
ऐसे मानुनी ठेलें आपणपें आपणचि होउनि ।
जैसा मठ
गगना भरुनी । गगनींचि असे ॥ ६० ॥
६०)
ज्याप्रमाणें मठ हा पोकळीनें भरुन पोकळींत असतो त्याप्रमाणें ते पुरुष, देह खोटा
आहे असें विचारानें जाणून, आपणच ( आत्मरुप ) होऊन आपल्या ठिकाणी असतात.
ये
प्रतीतीचिया माजघरीं । तयां निश्र्चयाची वोवरी ।
आली म्हणोनि
बाहेरी । नव्हेचि से ॥ ६१ ॥
६१) अशा
या वरील अनुभवाच्या माजघरांत, निश्र्चयाच्या खोलींत, त्यांस ( झोंप ) आली. म्हणून
त्यांस बाह्य विषयांची आठवणच होत नाहीं.
ऐसें सबाह्य
ऐक्य संचलें । मीचि होऊनि असतां रचिलें ।
बाहेरी
भूतांचीं पांचही खवलें । नेणतांचि पडिलीं ॥ ६२ ॥
६२)
याप्रमाणें अंतर्बाह्य ऐक्य भरलेलें असून, ते पुरुष मद्रूप होऊन राहिले असतां,
बाहेर पांचहि भूतांच्या खपल्या पडल्या, तरी त्यांस खबरच नाहीं.
उभयां उभेपण
नाहीं जयाचें । मा पडिलिया गहन कवण तयाचें ।
म्हणोनि
प्रतीतीचिये पोटींचें । पाणी न हाले ॥ ६३ ॥
६३)
जिवंतपणीं सर्व व्यवहार करीत असतां ज्यांस त्या शरीराच्या उभेपणाची जाणीव नाही;
त्यांस मग शरीर पडण्याचें संकट कोणतें असणार ? म्हणून अशाहि प्रसंगीं त्याच्या
स्वरुप अनुभवाच्या पोटांतील ( निश्र्चयरुप ) पाणी हालत नाहीं.
ते ऐक्याची
आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली ।
जैसी समरससमुद्रीं
धुतली । रुळेचिना ॥ ६४ ॥
६४) ती
त्याची प्रतीती ऐक्यरसाचीच जणूं काय ओतलेली असते; अथवा त्रिकालाबाधित जें स्वरुप
त्या स्वरुपाच्या हृदयांत ती जणूं काय
घातलेली असते; त्याची प्रतीती ऐक्यतारुपी समुद्रांत जणूं काय धुतली
असल्यामुळें ती मळत नाहीं;
पैं अथावीं
घट बुडाला । तो आंतबाहेरी उदकें भरला ।
पाठीं
दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे ॥ ६५ ॥
६५) अथांग
पाण्यांत घट बुडाला असतां तो आंतबाहेर पाण्यानेंच भरलेला असतो; नंतर तो दैववशात्
पाण्यांत असतांना जर फुटला, तर त्या घटांत असलेलें पाणी फुटतें काय ?
नातरी
सर्पें कवच सांडिलें । कां उबारेना वस्त्र फेडिलें ।
तरी सांग
पां कांहीं मोडलें । अवेवामाजीं ॥ ६६ ॥
६६)
अथवा, सर्पानें कात टाकली अगर एखाद्यानें उकडतें म्हणून वस्त्र टाकलें, तर असें
करण्यांत अवयवांमध्यें कांहीं मोडतोड झाली का ? सांग बरें .
तैसा आकारु
हा आहाच भ्रंशे । वांचूनि वस्तु ते सांचलीचि असे ।
तेचि बुद्धि
जालिया विसुकुसे । कैसेनि आतां ॥ ६७ ॥
६७) त्याप्रमाणें
वरवर भासणारा जो शरीररुपी आकार, तोच नाश पावत असून, त्या शरीराशिवाय असणारी
आत्मवस्तु तर, जशी सर्वत्र भरलेली आहे तशीच आहे; तीच आत्मवस्तु आपण आनुभवानें
झाल्यावर आतां ( देहपाताच्या वेळीं ) बुद्धिचा निश्र्चय कसा डगमगेल ?
म्हणोनि
यापरी मातें । अतंकाळीं जाणतसाते ।
जे मोकलिती
देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥
६८)
म्हणून याप्रमाणें मला अंतःकाळीं जाणत असतां जे देहाचा त्याग करतात, ते मद्रूप
होतात.
एर्हवीं
तरी साधारण । उरीं आदळलिया मरण ।
जो आठवु धरी
अंतःकरण । तेंचि होईजे ॥ ६९ ॥
६९) एर्हवीं
साधारण विचार करुन पाहिलें तर, मरण येऊन ठेपलें असतां मनुष्याच्या मनाला ज्या
वस्तुची आठवण होते, तीच वस्तू तो होतो.
जैसा कवणु
एकु काकुळती । पळतां पवनगती ।
दुपाउलीं
अवचितीं । कुहामाजीं पडिला ॥ ७० ॥
७०)
ज्याप्रमाणें कोणी एखादा मनुष्य काकुळतीनें वार्यासारखा पलत असतां एकाएकी दोन्हीं
पावलें निसटून आडांत पडला.
आतां तया
पडणयाआरौतें । पडण चुकवावया परौतें ।
नाहीं
म्हणोनि तेथें । पडावेंचि पडे ॥ ७१ ॥
७१)
आतां त्याला पडण्यापूर्वी, तें पडणें चुकविण्याकरितां दुसरा कांहीं ( उपाय )
नाहीं; म्हणून जसें त्याला पडावेंच लागतें;
तेविं
मृत्यूचेनि अवसरें एकें । जें येऊनि जीवासमोर ठाके ।
तें होणें
मग न चुके । भलतयापरी ॥ ७२ ॥
७२)
त्याप्रमाणें मृत्युच्या त्याप्रसंगीं, जी कांहीं एक वस्तु जीवनाच्या समोर येऊन
उभी राहते ( ज्या वस्तुकडे त्याचें मन लागतें ) , ती वस्तु होणें मग कोणत्याही
प्रकारानें चुकत नाहीं.
आणि जागता
जंव असिजे । तंव जेणें ध्यानें भावना भाविजे ।
डोळां
लागतखेंवो देखिजे । तेंचि स्वप्नीं ॥ ७३ ॥
७३) आणि
जेव्हां ( मनुष्य ) जागा असतो, त्या वेळेला त्याच्या वृत्तीने ज्याचा ध्यास घेतलेला
असतो तेंच त्याला, डोळा लागल्याबरोबर , स्वप्नांत दिसतें.
मूळ श्लोक
यं यं वापि
स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति
कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ ६ ॥
६) अथवा
हे कुंतीपुत्रा, ज्या ज्या वस्तुचें स्मरण करीत मनुष्य अंतःकालीं देहाचा त्याग
करतो, त्या त्या वस्तूप्रत तो सर्वदा ( तिच्या स्मरणानें ) तिच्या ठिकाणीं चित्त
एकाग्र झालेला असल्यामुळे जातो.
तेविं
जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे ।
तेंचि
मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥
७४)
ज्याप्रमाणें जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीनें अंतःकरणांत राहाते, तीच
मरणाच्यावेळी वारंवार मनांत येते,
आणि मरणीं
जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे ।
आणि
मरणसमयीं ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो.
मूळ श्लोक
तस्मात्
सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्
॥ ७ ॥
७)
म्हणून सर्वकाळीं माझें स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धि माझ्या ठिकाणीं
अर्पण करुन राहिलास, म्हणजे तू निःसंशय मजप्रतच येशील.
म्हणोनि
सदां स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥
७५)
असें आहे म्हणून, तूं नेहमी माझें स्मरण कर.
डोळां जें
देखावें । कां कानीं हन ऐकावें ।
मनीं जें
भावावें । बोलावें वाचे ॥ ७६ ॥
७६)
डोळ्यांनी जें पाहावें किंवा कानांनी जें ऐंकावें अथवा मनानें ज्याची कल्पना करावी
किंवा वाणीनें जें बोलावें,
तें आंत
बाहेरी आघवें । मीचि करुनि घालावें ।
मग सर्वीं
काळीं स्वभावें । मीचि आहें ॥ ७७ ॥
७७)
वरील सांगितलेले सर्व व्यवहार आंतबाहेर मीच करुन घाल. मग सर्वकाल सहज मीच
आहें.
अगा ऐसिया
जरी जाहलिया । मग न मरिजे देह गेलया ।
मा संग्रामु
केलिया । भय काय तुज ॥ ७८ ॥
७८) अरे,
असे झालें म्हणजे मग देह नाहींसा झाला, तरी तो मरत नाहीं, मग लढाई केलीस तरी तुला
काय भय आहे ?
तूं मन
बुद्धि सांचेसीं । जरी माझिया स्वरुपीं अर्पिसी ।
तरी मायेंचि
गा पावसी । हे माझी भाक ॥ ७९ ॥
७९) तूं
मनबुद्धि हीं खरोखर माझ्या स्वरुपांत अर्पण करशील, तर मग माझ्याशी एकरुपच होशील,
हें माझें प्रतिज्ञापूर्वक सांगणें आहे.
हेंचि
कायिसया वरी होये । ऐसा जरी संदेहो वर्तत आहे ।
तरी
अभ्यासूनि आदीं पाहें । मग नव्हे तरी कोपें ॥ ८० ॥
८०) अशी
स्थिति कशानें होईल, असा जर संशय तुझ्या मनांत राहिला असेल, तर अगोदरच अभ्यास करुन
पाहा; मग ती स्थिति झाली नाहीं, तर रागाव.
मूळ श्लोक
अभ्यासयोगयुक्तेन
चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं
दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥ ८ ॥
८) हे
पार्था, अभ्यासयोगामुळें स्थिर झालेल्या व अन्यत्र न जाणार्या चित्तानें ( परम
पुरुषाचें ) सतत स्मरण करणारा मनुष्य त्या तेजस्वी परम पुरुषाप्रत जातो.
येणेंचि
अभ्यासेंसि योगु । चित्तासि करीं पां चांगु ।
अगा
उपायबळें पंगु । पहाड ठाकी ॥ ८१ ॥
८१) याच
अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्या प्रकारें घाल. अरे, प्रयत्नांच्या बळावर
पांगळादेखील पर्वत चढून जातो.
तेविं
सदभ्यासें निरंतर । चित्तासि परमपुरुषाची मोहर ।
लावीं मग
शरीर । असो अथवा जावो॥ ८२ ॥
८२)
त्याप्रमाणें सद्भ्यासानें तूं निरंतर आपल्या चित्ताला परम पुरुषाचे ध्यान लाव. मग
शरीर राहो अथवा जावो.
जें नानागती
पावतें । तें चित्त वरील आत्मयातें ।
मग कवण आठवी
देहातें । गेलें कीं आहे ॥ ८३ ॥
८३)
नाना गतींना पावणार्या चित्तानें एकदा आत्म्यास वरलें, मग देह आहे किंवा गेला,
याची कोणी आठवण ठेवायची ?
पैं
सरितेचेनि ओघें । सिंधुजळा मीनलें घोघें ।
तें काय
वर्तत आहे मागें । म्हणोनि पाहों येती ॥ ८४ ॥
८४)
नदीच्या ओघाबरोबर घो घो करीत समुद्राच्या पाण्यांत मिसळलेलें जें पाणी, तें मागें
काय चाललें आहे, म्हणून परत येतें काय ?
ना तें
समुद्रचि होऊन ठेलें । तेविं चित्ताचें चैतन्य जाहालें ।
जेथ यातायात
निमालें । घनानंद जें ॥ ८५ ॥
८५) नाहीं. तर तें समुद्रच होऊन राहिलें; त्याप्रमाणें तें चित्तच चिद्रूप
बनल्यावर मग त्या ठिकाणीं जन्ममरणाचा शीण सहजच संपला; कारण तें चैतन्य एकरस आनंद
आहे.
No comments:
Post a Comment