ShriRamCharitManas
दोहा—तेउ बिलोकि रघुबर भरत
प्रीति अनूप अपार ।
भए मगन मन तन बचन सहित
बिराग बिचार ॥ ३१७ ॥
तेसुद्धा राम व भरत
यांचे निरुपम अपार प्रेम पाहून वैराग्य व विवेक असतानाही कायावाचामनाने त्या
प्रेमात बुडून गेले. ॥ ३१७ ॥
जहॉं जनक गुर गति मति भोरी
। प्राकृत प्रीति कहत बड़ि खोरी ॥
बरनत रघुबर भरत बियोगू ।
सुनि कठोर कबि जानिहि लोगू ॥
जेथे जनक व गुरु वसिष्ठ
यांच्या बुद्धीची गती कुंठित झाली, त्या दिव्य प्रेमाला लौकिक प्रेम म्हणणे चूक
आहे. श्रीरामचंद्र व भरत यांच्या वियोगाचे वर्णन केलेले ऐकून लोक कवीला कठोर
हृदयाचा म्हणतील. ॥ १ ॥
सो सकोच रसु अकथ सुबानी ।
समउ सनेहु सुमिरि सकुचानी ॥
भेंटि भरतु रघुबर समुझाए ।
पुनि रिपुदवनु हरषि हियँ लाए ॥
तो त्यांच्या भेटीतील
प्रेम-रस अवर्णनीय आहे. म्हणून कवीची सुंदर वाणी त्या प्रसंगी त्या प्रेमाचे स्मरण
करुन संकोचली. भरताला भेटून झाल्यावर श्रीरघुनाथांनी त्याला समजावले. नंतर आनंदित
होऊन त्यांनी शत्रुघ्नाला आलिंगन दिले. ॥ २ ॥
सेवक सचिव भरत रुख पाई ।
निज निज काज लगे सब जाई ॥
सुनि दारुन दुखु दुहूँ
समाजा । लगे चलन के साजन साजा ॥
सेवक व मंत्री, भरताचा
इशारा मिळताच आपापल्या कामाला लागले. हे ऐकून दोन्ही समाजांमध्ये मोठे दुःख पसरले
व ते निघण्याच्या तयारीला लागले. ॥ ३ ॥
प्रभु पद पदुम बंदि दोउ भाई
। चले सीस धरि राम रजाई ॥
मुनि तापस बनदेव निहोरी ।
सब सनमानि बहोरि बहोरी ॥
प्रभूंच्या चरण-कमलांना
वंदन करुन व श्रीरामांची आज्ञा शिरसावन्द्य मानून भरत-शत्रुघ्न हे दोन्ही बंधू
निघाले. त्यांनी मुनी, तपस्वी आणि वनदेवता या सर्वांना वारंवार आदराने विनंती
केली. ॥ ४ ॥
दोहा—लखनहि भेंटि प्रनामु
करि सिर धरि सिय पद धूरि ।
चले सप्रेम असीस सुनि सकल
सुमंगल मूरि ॥ ३१८ ॥
नंतर लक्ष्मणाला भेटून
दोघांनी प्रणाम केला व सीतेच्या चरणांची धूळ मस्तकी धारण केली. सर्व मांगल्याचे
मूळ असलेले तिचे आशीर्वाद कानात साठवून ते प्रेमाने निघाले. ॥ ३१८ ॥
सानुज राम नृपहि सिर नाई ।
कीन्हि बहुत बिधि बिनय बड़ाई ॥
देव दया बस बड़ दुखु पायउ ।
सहित समाज काननहिं आयउ ॥
लक्ष्मणासह श्रीरामांनी
राजा जनकांना नतमस्तक होऊन पुष्कळ विनंती केली व त्यांना मोठेपणा देत म्हटले, ‘ हे
देव, दयेमुळे तुम्ही फार कष्ट घेतले. तुम्ही परिवारासह वनात आलात. ॥ १ ॥
पुर पगु धारिअ देइ असीसा ।
कीन्ह धीर धरि गवनु महीसा ॥
मुनि महिदेव साधु सनमाने ।
बिदा किए हरि हर सम जाने ॥
आता आशीर्वाद देऊन
नगराला प्रयाण करा. ‘ हे ऐकल्यावर राजा जनकांनी धीर धरुन प्रस्थान केले. नंतर
श्रीरामचंद्रांनी मुनी, ब्राह्मण आणि साधूंना विष्णू व शिवासमान मानून सन्मानाने
निरोप दिला. ॥ २ ॥
सासु समीप गए दोउ भाई ।
फिरे बंदि पग आसिष पाई ॥
कौसिक बामदेव जाबाली ।
पुरजन परिजन सचिव सुचाली ॥
नंतर श्रीराम-लक्ष्मण
हे दोघे सासू सुनयना हिच्याजवळ गेले आणि तिच्या चरणांना वंदन करुन आशीर्वाद घेऊन
परतले. त्यानंतर विश्वामित्र, वामदेव, जाबाली, शुभ आचरणाचे कुटुंबीय, नगर-निवासी
आणि मंत्री, ॥ ३ ॥
जथा जोगु करि बिनय प्रनामा
। बिदा किए सब सानुज रामा ॥
नारि पुरुष लघु मध्य बड़ेरे
। सब सनमानि कृपानिधि फेरे ॥
या सर्वांना लक्ष्मणासह
श्रीरामांनी यथायोग्य विनयाने प्रणाम करुन निरोप दिला. कृपानिधान श्रीरामचंद्रांनी
लहान, मध्यम व मोठे या सर्व श्रेणींच्या स्त्री-पुरुषांना सन्मानपूर्वक निरोप
दिला. ॥ ४ ॥
दोहा—भरत मातु पद बंदि प्रभु सुचि सनेहँ मिलि
भेंटि ।
बिदा कीन्ह सजि पालकी सकुच सोच सब मेटि ॥ ३१९ ॥
भरताची आई कैकेयी हिच्या चरणांना वंदन करुन
प्रभू श्रीरामांनी निष्कपट प्रेमाने तिला भेटून तिचा संकोच आणि काळजी दूर केली.
नंतर तिला सजवलेल्या पालखीत बसवून निरोप दिला. ॥ ३१९ ॥
परिजन मातु पिताहि मिलि सीता । फिरी प्रानप्रिय
प्रेम पुनीता ॥
करि प्रनामु भेंटीं सब सासू । प्रीति कहत कबि
हियँ न हुलासू ॥
प्राणप्रिय पती श्रीरामांच्याबरोबर पवित्र
प्रेम करणारी सीता माहेरच्या कुटुंबियांना तसेच माता-पित्यांना भेटून परत आली.
नंतर प्रणाम करुन सर्व सासूंना गळ्यात गळा घालून भेटली. त्यांच्या प्रेमाचे वर्णन
करणे कवीला जमणारे नाही. ॥ १ ॥
सुनि सिख अभिमत आसिष पाई । रही सीय दुहु प्रीति
समाई ॥
रघुपति पटु पालकीं मगाईं । करि प्रबोधु सब मातु
चढ़ाईं ॥
त्यांचा उपदेश ऐकून आणि मनाजोगा आशीर्वाद
मिळवून सीता सासूंच्या व माता-पित्यांच्या प्रेमामध्ये बराच वेळ मग्न होऊन राहिली.
श्रीरघुनाथांनी सुंदर पालख्या मागवून सर्व मातांचे सांत्वन करुन त्यांना त्यांत
बसविले. ॥ २ ॥
बार बार हिलि मिलि दुहु भाईं । सम सनेहँ जननीं
पहुँचाईं ॥
साजि बाजि गज बाहन नाना । भरत भूप दल कीन्ह पयाना
॥
दोन्ही भावांनी मातांना सारख्याच प्रेमाने
वारंवार भेटून पोहोचविले. भरत आणि राजा जनक यांच्या सैन्यांनी घोडे, हत्ती आणि इतर
वाहने सज्ज करुन प्रस्थान केले. ॥ ३ ॥
हृदयँ रामु सिय लखन समेत । चले जाहिं सब लोग अचेता
॥
बसह बाजि गज पसु हियँ हारें । चले जाहिं परबस मन
मारें ॥
सीता, राम व लक्ष्मण यांना हृदयात बसवून सर्व
लोक देहभान विसरुन निघाले होते. बैल, घोडे, हत्ती इत्यादी पशू मनातून खचून, परवश
होऊन व मन मारुन चालले होते. ॥ ४ ॥
दोहा—गुर गुरतिय पद बंदि प्रभु सीता लखन समेत ।
फिरे हरष बिसमय सहित आए परन निकेत ॥ ३२० ॥
गुरु वसिष्ठ आणि गुरुपत्नी अरुंधती यांच्या
चरणांना वंदन करुन सीता, लक्ष्मण व प्रभू श्रीराम आनंदाने व विषादाने परत
पर्णकुटीत आले. ॥ ३२० ॥
बिदा कीन्ह सनमानि निषादू । चलेउ हृदयँ बड़ बिरह
बिषादू ॥
कोल किरात भिल्ल बनचारी । फेरे फिरे जोहारि
जोहारी ॥
नंतर निषादराजाचा सन्मान करुन त्याला निरोप
दिला. तो निघाला खरा, परंतु याच्या मनात विरहाचा फार मोठा विषाद भरला होता. मग
श्रीरामांनी कोल, किरात, भिल्ल इत्यादी वनवासी लोकांना परत पाठविले. ते सर्व जोहार
करीत करीत परतले. ॥ १ ॥
प्रभु सिय लखन बैठि बट छाहीं । प्रिय परिजन बियोग
बिलखाहीं ॥
भरत सनेह सुभाउ सुबानी । प्रिया अनुज सन कहत
बखानी ॥
प्रभू श्रीराम, सीता व लक्ष्मण वटवृक्षाच्या
सावलीमध्ये बसले. ते प्रियजन व परिवाराच्या वियोगाने दुःखी झाले. भरताचा स्नेह,
स्वभाव व सुंदर वाणी यांची वाखाणणी करुन श्रीराम प्रिय पत्नी सीता व लक्ष्मण यांना
सांगू लागले. ॥ २ ॥
प्रीति प्रतीति बचन मन करनी । श्रीमुख राम प्रेम
बस बरनी ॥
तेहि अवसर खग मृग जल मीना । चित्रकूट चर अचर
मलीना ॥
श्रीरामचंद्रांनी प्रेमाधीन होऊन भरताच्या
कायावाचामनातील प्रेम आणि विश्वास यांचे आपल्या श्रीमुखाने वर्णन केले. त्यावेळी
पशुपक्षी, पाण्यातील मासे आणि चित्रकूटावरील सर्व चराचर जीव उदास झाले. ॥ ३ ॥
बिबुध बिलोकि दसा रघुबर की । बरषि सुमन कहि गति
घर घर की ॥
प्रभु प्रनामु करि दीन्ह भरोसो । चले मुदित मन डर
न खरो सो ॥
श्रीरघुनाथांची ही दशा पाहून देवांनी
त्यांच्यावर फुले उधळली आणि आपल्या घरेचे दुःख सांगितले. प्रभु श्रीरामचंद्रांनी
त्यांना प्रणाम करुन आश्वासन दिले. मग ते प्रसन्न होऊन निघाले. आता त्यांच्या मनात
जरासुद्धा भय उरले नाही. ॥ ४ ॥
दोहा—सानुज सीय समेत प्रभु
राजत परन कुटीर ।
भगति ग्यानु बैराग्य जनु
सोहत धरें सरीर ॥ ३२१ ॥
लक्ष्मण व सीतेसह प्रभू
रामचंद्र पर्णकुटीमध्ये असे शोभून दिसत होते की, जणु वैराग्य, भक्ती आणि ज्ञान हेच
शरीर धारण करुन तेथे राहात होते. ॥ ३२१ ॥
मुनि महिसुर गुर भरत भुआलू
। राम बिरहँ सबु साजु बिहालू ॥
प्रभु गुन ग्राम गनत मन
माहीं । सब चुपचाप चले मग जाहीं ॥
मुनी, ब्राह्मण, गुरु
वसिष्ठ, भरत आणि राजा जनक हा सारा समाज श्रीरामचंद्रांच्या विरहाने विव्हल झाला
होता. प्रभूंच्या गुणसमूहांचे मनात स्मरण करीत सर्व लोक वाटेने मौन होऊन चालले
होते. ॥ १ ॥
जमुना उतरि पार सबु भयऊ ।
सो बासरु बिनु भोजन गयऊ ॥
उतरि देवसरि दूसर बासू ।
रामसखॉं सब कीन्ह सुपासू ॥
पहिल्या दिवशी सर्व लोक
यमुना ओलांडून पलीकडे गेले. तो दिवस भोजनाविना गेला. दुसरा मुक्काम गंगा ओलांडून
पलीकडे शृंगवेरपुरास झाला. तेथे रामसखा निषादराजाने सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.
॥ २ ॥
सई उतरि गोमतीं नहाए ।
चौथें दिवस अवधपुर आए ॥
जनकु रहे पुर बासर चारी ।
राज काज सब साज सँभारी ॥
नंतर त्यांनी सई पार
करुन गोमती नदीत स्नान केले आणि चौथ्या दिवशी सर्वजण अयोध्येला पोहोचले. जनक राजे
चार दिवस अयोध्येत राहिले. तेथील राज्यकारभार, सामान-सुमान सांभाळून, ॥ ३ ॥
सौंपि सचिव गुर भरतहि राजू
। तेरहुति चले साजि सबु साजू ॥
नगर नारि नर गुर सिख मानी ।
बसे सुखेन राम रजधानी ॥
तसेच मंत्री, गुरुजी
आणि भरत यांच्यावर राज्य सोपवून, सर्व संपत्तीची व्यवस्था लावून मिथिलेला निघाले.
अयोध्या नगरीतील स्त्री-पुरुष गुरुजींचा उपदेश मानून श्रीरामांची राजधानी
अयोध्येमध्ये सुखाने राहू लागले. ॥ ४ ॥
दोहा—राम दरस लगि लोग सब
करत नेम उपबास ।
तजि तजि भूषन भोग सुख जिअत
अवधि कीं आस ॥ ३२२ ॥
सर्व लोक
श्रीरामचंद्रांच्या पुनर्दर्शनासाठी नियम व उपवास करु लागले. ते भूषणे व भोग-सुख
यांचा त्याग करुन अवधी पूर्ण होऊन श्रीराम येण्याच्या आशेवर जगत आहेत. ॥ ३२२ ॥
सचिव सुसेवक भरत प्रबोधे ।
निज निज काज पाइ सिख ओधे ॥
पुनि सिख दीन्हि बोलि लघु
भाई । सौंपी सकल मातु सेवकाई ॥
भरताने मंत्र्यांना व
विश्वासू सेवकांना समजावून कार्य-प्रवण केले. तेही आज्ञा मिळाल्यावर आपापल्या
कामाला लागले. भरताने शत्रुघ्नाला बोलावून उपदेश दिला आणि सर्व मातांची सेवा
त्याच्यावर सोपविली. ॥ १ ॥
भूसुर बोलि भरत कर जोरे ।
करि प्रनाम बय बिनय निहोरे ॥
ऊँच नीच कारजु भल पोचू ।
आयसु देब न करब सँकोचू ॥
भरताने ब्राह्मणांना
बोलावून हात जोडून प्रणाम केला. त्यांच्या मानाप्रमाणे विनयाने विनंती केली की, ‘
तुम्ही लहान-मोठे, चांगले-सामान्य जे काही काम असेल, त्यासाठी आज्ञा करा. संकोच
बाळगू नका. ‘ ॥ २ ॥
परिजन पुरजन प्रजा बोलाए ।
समाधानु करि सुबस बसाए ॥
सानुज गे गुर गेहँ बहोरी ।
करि दंडवत कहत कर जोरी ॥
भरताने नंतर परिवारातील
लोकांना, नागरिकांना आणि इतर प्रजेला बोलावून, त्यांचे समाधान करुन त्यांना सुखाने
राहण्यास सांगितले. नंतर तो शत्रुघ्नाबरोबर गुरुजींच्या घरी गेला आणि दंडवत घालून
हात जोडून म्हणाला. ॥ ३ ॥
आयसु होइ त रहौं सनेमा ।
बोले मुनि तन पुलकि सपेमा ॥
समुझब कहब करब तुम्ह जोई ।
धरम सारु जग होइहि सोई ॥
आपली आज्ञा घेऊन मी नियमपूर्वक राहावे असे म्हणतो.
मुनी वसिष्ठ पुलकित होऊन प्रेमाने म्हणाले, ‘ हे भरता, तू
जे काही समजतोस, करतोस व म्हणतोस, तेच या जगात
धर्माचे सार असेल. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment