Wednesday, July 20, 2022

KikshindhaKanda Part 1 ShriRamCharitManas Sholak 1 and 2 Doha 1 किष्किन्धाकाण्ड भाग १ श्रीरामचरितमानस श्र्लोक १ आणि २ दोहा १

 

KikshindhaKanda Part 1 
ShriRamCharitManas 
Sholak 1 and 2 Doha 1 
किष्किन्धाकाण्ड भाग १ 
श्रीरामचरितमानस 
श्र्लोक १ आणि २ दोहा १

कुन्देन्दीवरसुन्दरावतिबलौ विज्ञानधामावुभौ

शोभाढ्यौ वरधन्विनौ श्रुतिनुतौ गोविप्रवृन्दप्रियौ ।

मायामानुषरुपिणौ रघुवरौ सद्धर्मवर्मौ हितौ

सीतान्वेषणतत्परौ पथिगतौ भक्तिप्रदौ तौ हि नः ॥ १ ॥

कंदपुष्प व नील कमल यांच्यासमान सुंदर, गोरे व सावळे, अत्यंत बलवान, सर्वज्ञ, लावण्यसंपन्न, श्रेष्ठ धनुर्धर, वेदांनी स्तुती केलेले, गोब्राह्मणांच्या समुदायाला प्रिय, मायेने मनुष्यरुप धारण केलेले, श्रेष्ठ धर्माच्या संरक्षणासाठी कवचस्वरुप, सर्वांचे हितकारी, श्रीसीतेच्या शोधाला निघालेले पांथस्थ असे रघुकुलशिरोमणी श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघे बंधू आम्हांला भक्तीच प्रदान करोत. ॥ १ ॥

ब्रह्माम्भोधिसमुद्भवं कलिमलप्रध्वंसनं चाव्ययं

श्रीमच्छम्भुमुखेन्दुसुन्दरवरे संशोभितं सर्वदा ।

संसारामयभेषजं सुखकरं श्रीजानकीजीवनं

धन्यास्ते कृतिनः पिबन्ति सततं श्रीरामनामामृतम् ॥ २ ॥

जे वेदरुपी समुद्राचे मंथन केल्याने उत्पन्न झालेले व कलियुगाचे दोष पूर्णपणे नष्ट करणारे, अविनाशी, भगवान श्रीशंभूंच्या सुंदर व श्रेष्ठ मुखरुपी चंद्रामध्ये सदैव शोभणारे, जन्म-मरणरुपी रोगाचे औषध असलेले, सर्वांना सुख देणारे आणि श्रीजानकीजीवन अशा श्रीरामनामरुपी अमृताचे जे निरंतर पान करीत असतात, ते पुण्यात्मे धन्य होत. ॥ २ ॥

सो० मुक्ति जन्म महि जानि ग्यान खानि अघ हानि कर ।

जहँ बस संभु भवानि सो कासी सेइअ कस न ॥

जेथे श्रीशिवपार्वती राहातात, त्या काशीला मुक्तीचे माहेर, ज्ञानाची खाण आणि पापांचा नाश करणारी मानून तिचे सेवन का करु नये ?

जरत सकल सुर बृंद बिषम गरल जेहिं पान किया ।

तेहि न भजसि मन मंद को कृपाल संकर सरिस ॥

ज्या भीषण हलाहल विषाने सर्व देव होरपळू लागले होते, ते स्वतः प्राशन करणार्‍या श्रीशंकरांना, हे मना, तू का भजत नाहीस ? त्यांच्यासारखा दयाळू दुसरा कोण आहे ?

आगें चले बहुरि रघुराया । रिष्यमूक पर्बत निअराया ।

तहँ रह सचिव सहित सुग्रीवा । आवत देखि अतुल बल सींवा ॥

श्रीरघुनाथ मग पुढे निघाले. ऋषमूक पर्वत जवळ आला. तेथे ऋषमूक पर्वतावर सुग्रीव हा मंत्र्यांसह राहात होता. अतुलनीय बलाची परिसीमा असलेले श्रीराम आणि लक्ष्मण यांना येतांना पाहून ॥ १ ॥

अति सभत कह सुनु हनुमाना । पुरुष जुगल बल रुप निधाना ॥

धरि बटु रुप देखु तैं जाई । कहेसु जानि जियँ सयन बुझाई ॥

सुग्रीव अतिशय घाबरुन म्हणाला, ‘ हनुमाना, ऐक. हे दोघे पुरुष बल व रुपाची खाण आहेत. तू ब्रह्मचार्‍याचे रुप घेऊन जाऊन बघ. त्यांची खरी हकीकत जाणून घेऊन मला खूण कर. ॥ २ ॥

पठए बालि होहिं मन मैला । भागौं तुरत तजौं यह सैला ॥

बिप्र रुप धरि कपि तहँ गयऊ । माथ नाइ पूछत अस भयऊ ॥

जर ते मनाने दुष्ट असलेल्या वालीने पाठविले असतील, तर मी त्वरित हा पर्वत सोडून पळून जाईन. ‘ हे ऐकून हनुमानाने ब्राह्मणाचे रुप धारण केले व तो त्यांच्याजवळ जाऊन नतमस्तक होऊन विचारु लागला. ॥ ३ ॥

को तुम्ह स्यामल गौर सरीरा । छत्री रुप फिरहु बन बीरा ॥

कठिन भूमि कोमल पद गामी । कवन हेतु बिचरहु बन स्वामी ॥

‘ हे वीरांनो, सावळ्या व गोर्‍या वर्णाचे तुम्ही कोण आहात ? क्षत्रिय असूनही वनात का फिरत आहात ? हे स्वामी, या कठोर भूमीवर कोमल चरणांनी चालणारे तुम्ही कशासाठी वनात फिरत आहात ? ॥ ४ ॥

मृदुल मनोहर सुंदर गाता । सहत दुसह बन आतप बाता ॥

की तुम्ह तीनि देव महँ कोऊ । नर नारायन की तुम्ह दोऊ ॥

मनाला हरण करणारी तुमची सुंदर अंगे आहेत. मग तुम्ही वनामधील दुःसह ऊन-वारे का सहन करीत आहात ? तुम्ही ब्रह्मदेव, विष्णु, महेश या तीन देवांपैकी कुणी आहात की नर-नारायण आहात ? ॥ ५ ॥


दोहा--- जग कारन तारन भव भंजन धरनी भार ।

की तुम्ह अखिल भुवन पति लीन्ह मनुज अवतार ॥ १ ॥

अथवा तुम्ही जगाचे मूल कारण आणि संपूर्ण लोकांचे स्वामी प्रत्यक्ष भगवान आहात की, लोकांनी भवसागर पार करुन जावा म्हणून आणि पृथ्वीचा भार नष्ट व्हावा म्हणून मनुष्य-रुपाने अवतार घेतला आहे ? ‘ ॥ १ ॥

कोसलेस दसरथ के जाए । हम पितु बचन मानि बन आए ॥

नाम राम लछिमन दोउ भाई । संग नारि सुकुमारि सुहाई ॥

श्रीराम म्हणाले, ‘आम्ही कोसलराज दशरथांचे पुत्र आहोत आणि पित्याची आज्ञा पाळण्यासाठी वनात आलो आहोत. आम्ही दोघे भाऊ असून आमची नावे राम व लक्ष्मण आहेत. आपच्यासोबत सुंदर सुकुमार अशी माझी पत्नी जानकी होती. ॥ १ ॥

इहॉं हरी निसिचर बैदेही । बिप्र फिरहिं हम खोजत तेही ॥

आपन चरित कहा हम गाई । कहहु बिप्र निज कथा बुझाई ॥

येथे कोणी राक्षसाने तिचे हरण केले. हे ब्राम्हणा, आम्ही तिलाच शोधत फिरत आहोत. आम्ही आपली ओळख सांगितली. आता तुम्ही तुमचा परिचय सांगा.’ ॥ २ ॥

प्रभु पहिचानि परेउ गहि चरना । सो सुख उमा जाइ नहिं बरना ॥

पुलकित तन मुख आव न बचना । देखत रुचिर बेष कै रचना ॥

प्रभूंना ओळखताच हनुमानाने त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. शिव म्हणाले, ‘ हे पार्वती, त्याच्या आनंदाचे वर्णन काय करावे ? हनुमानाचे शरीर पुलकित झाले, मुखातून शब्द फुटत नव्हता, तो प्रभूंचा सुंदर वेष पाहात होता. ॥ ३ ॥

पुनि धीरजु धरि अस्तुति कीन्ही । हरष हृदयँ निज नाथहि चीन्ही ॥

मोर न्याउ मैं पूछा साईं । तुम्ह पूछहु कस नर की नाईं ॥

नंतर धीर धरुन त्याने स्तुती केली. आपल्या स्वामींची ओळख पटल्याने त्याच्या हृदयात आनंद मावत नव्हता. मग हनुमान म्हणाला, ‘ हे स्वामी, मी जे विचारले ते बरोबर होते. ( दीर्घ कालानंतर तुम्हांला तपस्वी वेषात पाहिले, शिवाय माझी वानर-बुद्धी असल्याने मी तुम्हांला ओळखू शकलो नाही. ) परंतु तुम्ही मला मनुष्याप्रमाणे कसे काय विचारत आहात ? ॥ ४ ॥

तव माया बस फिरउँ भुलाना । ता ते मैं नहिं प्रभु पहिचाना ॥

मी तुमच्या मायेमुळे तुम्हांला विसरुन भटकत आहे. त्यामुळे मी आपल्या स्वामींना ओळखले नाही. ॥ ५ ॥


Custom Search

No comments: