Shri RamCharitManas Part 72
छं०—गाथे महामनि मौर मंजुल अंग सब चित चोरहीं ।
पुर नारि सुर सुंदरीं बरहि बिलोकि सब तिन तोरहीं
॥
मनि बसन भूषन वारि आरति करहिं मंगल गावहीं ।
सुर सुमन बरिसहिं सूत मागध बंदि सुजसु सुनावहीं ॥
१ ॥
त्या सुंदर मुकुटामध्ये बहुमूल्य रत्ने
गुंफली होती. त्यांचे सर्व अवयव मन हरण करीत होते. नगरातील सर्व स्त्रिया व
देवसुंदरी गवताची काडी मोडून दृष्ट काढत होत्या आणि रत्ने,वस्त्रे व दागिने
त्यांच्यावरुन ओवाळून टाकून आरत्या करीत होत्या आणि मंगलगान गात होत्या. देव फुले
उधळत होते आणि सूत, मागध, भाट कीर्ती गात होते. ॥ १ ॥
कोहबरहिं आने कुअँर कुअँरि सुआसिनिन्ह सुख पाइ कै
।
अति प्रीति लौकिक रीति लागीं करन मंगल गाइ कै ॥
लहकौरि गौरि सिखाव रामहि सीय सन सारद कहैं ।
रनिवासु हास बिलास रस बस जन्म को फलु सब लहैं ॥ २
॥
सुवासिनी स्त्रिया मोठ्या आनंदाने वधू-वरांना
कुलदेवतेपाशी घेऊन आल्या आणि अत्यंत प्रेमाने मंगलगीते गात गात लौकिक रीतीप्रमाणे
कुळाचार करु लागल्या. पार्वती श्रीरामांना व सरस्वती सीतेला परस्परांना घास खाऊ
घालण्यास शिकवू लागल्या. सर्वांना जन्माचे सारे फळ मिळत होते. ॥ २ ॥
निज पानि मनि महुँ देखिअति मूरति सुरूपनिधान की ।
चालति न भुजबल्ली बिलोकनि बिरह भय बस जानकी ॥
कौतुक बिनोद प्रमोदु प्रेमु न जाइ कहि जानहिं
अलीं ।
बर कुअँरि सुंदर सकल सखीं लवाइ जनवासेहि चलीं ॥ ३
॥
आपल्या हातातील रत्नांमध्ये सुंदर रुपाचे
भांडार असलेल्या श्रीरामांचे प्रतिबिंब दिसत होते. ते पाहून सीता दर्शनात विघ्न
येऊ नये म्हणून आपली बाहुरुपी लता आणि दृष्टी हलू देत नव्हती. त्या प्रसंगीचे
हास्य-विनोद, आणि प्रेम यांचे वर्णन करता येणे शक्य नाही. ते फक्त सख्याच जाणतात.
त्यानंतर सर्व सख्या वर-वधूंना घेऊन जानवश्याकडे निघाल्या. ॥ ३ ॥
तेहि समय सुनिअ असीस जहँ तहँ नगर नभ आनँदु महा ।
चिरु जिअहुँ जोरीं चारु चार्यो मुदित मन सबहीं म
कहा ॥
जोगींद्र सिद्ध मुनीस देव बिलोकि प्रभु दुंदुभि
हनी ।
चले हरषि बरषि प्रसून निज निज लोक जय जय जय भनी ॥
४ ॥
त्यावेळी नगरात आणि आकाशात जिकडे पाहावे
तिकडे आशीर्वादाचे शब्द ऐकू येत होते आणि मोठा आनंदी आनंद झालेला होता. सर्वजण
प्रसन्न मनाने म्हणत होते की, ही सुंदर चारी जोडपी चिरंजीव होवोत. ‘ योगिराज,
सिद्ध, मुनीश्र्वर आणि देव यांनी प्रभू रामचंद्रांना पाहून दुंदुभी वाजविली आणि
आनंदाने फुलांचा वर्षाव करीत ‘ जय हो, जय हो, जय हो ‘ असे म्हणत ते आपापल्या लोकी
निघून गेले. ॥ ४ ॥
दोहा—सहित बधूटिन्ह कुअँर सब तब आए पितु पास ।
सोभा मंगल मोद भरि उमगेउ जनु जनवास ॥ ३२७ ॥
मग चारी कुमार आपापल्या वधूंसह वडिलांकडे
आले. शोभा, मांगल्य आणि आनंद यांनीं जानवास ओसंडत आहे, असे वाटत होते. ॥ ३२७ ॥
पुनि जेवनार भई बहु भॉंती । पठाए जनक बोलाइ बराती
॥
परत पॉंवड़े बसन अनूपा । सुतन्ह समेत गवन कियो
भूपा ॥
त्यानंतर अनेक प्रकारचे पाक सिद्ध झाले.
जनकांनी वर्हाडी मंडळींना बोलाविले. राजा दशरथ हे पुत्रांसह गेले. बहुमोल
वस्त्रांच्या पायघड्या घातल्या जात होत्या. ॥ १ ॥
सादर सब के पाय पखारे । जथाजोगु पीढ़न्ह बैठारे ॥
धोए जनक अवधपति चरना । सीलु सनेहु जाइ नहिं बरना
॥
आदरपूर्वक सर्वांचे पाय धुऊन योग्य स्थानी
त्यांना पाटावर बसविले. मग जनकांनी दशरथांचे पाय धुतले. त्यांचे शील आणि स्नेह
यांचे वर्णन करणे कठीण आहे. ॥ २ ॥
बहुरि राम पद पंकज धोए । जे हर हृदय कमल महुँ गोए
॥
तीनिउ भाइ राम सम जानी । धोए चरन जनक निज पानी ॥
नंतर श्रीशिवांच्या हृदय-कमलांमध्ये गुप्तपणे
जी वास करतात ती श्रीरामचंद्रांची चरण-कमले धुतली. अन्य तीन भावांनाही
श्रीरामचंद्रांसमान मानून जनकांनी त्यांचे चरणही आपल्या हातांनी धुतले. ॥ ३ ॥
आसन उचित सबहि नृप दीन्हे । बोलि सूपकारी सब
लीन्हे ॥
सादर लगे परन पनवारे । कनक कील मनि पान सँवारे ॥
राजा जनकांनी सर्वांना योग्य आसने दिली आणि
वाढप्यांना बोलाविले. मोठ्या आदराने पत्रवळी घातल्या गेल्या. त्या रत्नांच्या
पानांना सोन्याच्या काड्यांनी टाचून बनविलेल्या होत्या. ॥ ४ ॥
दोहा—सूपोदन
सुरभी सरपि सुंदर स्वादु पुनीत ।
छन महुँ सब
कें परुसि गे चतुर सुआर बिनीत ॥ ३२८ ॥
चतुर व
विनम्र स्वयंपाक्यांनी सुंदर, स्वादिष्ट आणि पवित्र वरणभात आणि त्यावर गाईचे तूप
क्षणभरात सर्वांसमोर वाढले. ॥ ३२८ ॥
पंच कवल करि
जेवन लागे । गारि गान सुनि अति अनुरागे ॥
भॉंति अनेक
परे पकवाने । सुधा सरिस नहिं जाहिं बखाने ॥
सर्व लोक ‘ प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा,
व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा आणि समानाय स्वाहा ‘ या मंत्रांचा उच्चार करीत पाच
घास घेऊन भोजन करु लागले. जेवताना उणी-दुणी काढण्याचे गाणे ऐकून सर्व प्रेममग्न
झाले. अनेक प्रकारची अमृतासारखी स्वादिष्ट पक्वाने वाढली गेली.त्यांचे वर्णन करणे
कठीण. ॥ १ ॥
परुसन
लगे सुआर सुजाना । बिंजन बिबिध नाम को
जाना ॥
चारि भॉंति
भोजन बिधि गाई । एक एक बिधि बरनि न जाई ॥
चतुर
वाढपी नाना प्रकारची तोंडी लावणी वाढू लागले, त्यांची नावे कोणास ठाऊक ? चावून
खायचे, चोखून खायचे, चाटून खायचे व प्यायचे असे चार प्रकारचे भोजन-पदार्थ सांगिले
आहेत. त्यांतील प्रत्येकाचे इतके पदार्
बनविले होते की, सांगता सोय नाही.
छरस रुचिर
बिंजन बहु जाती । एक एक रस अगनित भॉंती ॥
जेवँत देहिं
मधुर धुनि गारी । लै लै नाम पुरुष अरु नारी ॥
सहा रसांची
अनेक प्रकारची स्वादिष्ट तोंडी लावणी होती. एक-एक रसाचे असंख्य प्रकार बनविले
होते, भोजन करताना पुरुष व स्त्रिया यांची घेत घेत मधुर स्वरांनी स्त्रिया टोमणे
मारीत होत्या.
समय सुहावनि
गारि बिराजा । हँसत राउ सुनि सहित समाजा ॥
एहि बिधि
सबहीं भोजनु कीन्हा । आदर सहित आचमनु दीन्हा ॥
प्रसंगानुसार
चाललेले विनोद शोभून दिसत होते. ते ऐकून राजा दशरथासह सर्व मंडळी हसत होती. अशा
प्रकारे सर्वांचे भोजन झाले, मग सर्वांना आदराने हात धुण्यासाठी पाणी दिले गेले. ॥
४ ॥
दोहा—देइ
पान पूजे जनक दसरथु सहित समाज ।
जनवासेहि
गवने मुदित सकल भूप सिरताज ॥ ३२९ ॥
मग पान
देऊन जनकांनी परिवारासह दशरथांचे पूजन केले. सर्व राजांचे चक्रवर्ती असलेले राजा
दशरथ प्रसन्न मनाने जानवश्यात गेले. ॥ ३२९ ॥
नित नूतन
मंगल पुर माहीं । निमिष सरिस दिन जामिनि जाहीं ॥
बड़े भोर
भूपतिमनि जागे । जाचक गुन गन गावन लागे ॥
जनकपुरामध्ये
नित्य नवे मंगल प्रसंग घडत होते. दिवस व रात्र पळभरात निघून जात. भल्या सकाळी
राजांचे मुकुटमणी दशरथांना जाग आली. याचक त्यांचे गुण-गान करु लागले. ॥ १ ॥
देखि कुअँर
बर बधुन्ह समेता । किमि कहि जात मोदु मन जेता ॥
प्रातक्रिया
करि गे गुरु पाहीं । महा प्रमोदु प्रेमु मन माहीं ॥
चारी
कुमारांना सुंदर वधूंच्यासह पाहून दशरथांच्या मनात इतका आनंद झाला की, तो कशाही
प्रकारे सांगता येत नाही. ते प्रातर्विधी आटोपून गुरु वसिष्ठांकडे गेले. त्यांच्या
मनात महान प्रेम व आनंद भरुन राहिला होता. ॥ २ ॥
करि प्रनामु
पूजा कर जोरी । बोले गिरा अमिअँ जनु बोरी ॥
तुम्हरी
कृपॉं सुनहु मुनिराजा । भयउँ आजु मैं पूरन काजा ॥
राजांनी
प्रणाम व पूजन करुन मग हात जोडून अमृतमय वाणीने म्हटले की, ‘ हे मुनिराज, ऐका.
आपल्या कृपेमुळे आज मी पूर्णकाम झालो. ॥ ३ ॥
अब सब बिप्र
बोलाइ गोसाईं । देहु धेनु सब भॉंति बनाईं ॥
सुनि गुर
करि महिपाल बड़ाई । पुनि पठए मुनिबृंद बोलाई ॥
हे स्वामी, आता सर्व ब्राह्मणांना बोलावून त्यांना सर्व तर्हेने
अलंकृत गाई द्या.’ हे ऐकून गुरुंनी राजाची थोरवी वर्णन
केली आणि मुनिगणांना
बोलावणे पाठविले. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment