Saturday, January 23, 2021

Shri RamCharitManas Part 76 श्रीरामचरितमानस भाग ७६

 

Shri RamCharitManas Part 76 
Doha 342 to 345 
श्रीरामचरितमानस भाग ७६ 
दोहा ३४२ ते ३४५ 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

दोहा—मिले लखन रिपुसूदनहि दीन्हि असीस महीस ।

भए परसपर प्रेमबस फिरि फिरि नावहिं सीस ॥ ३४२ ॥

नंतर राजांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना भेटून आशीर्वाद दिला. ते परस्पर प्रेमात बुडून वारंवार एकमेकांना मस्तक नमवू लागले. ॥ ३४२ ॥

बार बार करि बिनय बड़ाई । रघुपति चले संग सब भाई

जनक गहे कौसिक पदजाई । चरन रेनु सिर नयनन्ह लाई ॥

राजा जनकांशी वारंवार गुजगोष्टी करीत व त्यांना मोठेपणा देत श्रीरघुनाथ सर्व भावांबरोबर निघाले. जनकांनी जाऊन विश्र्वामित्रांचे पाय धरले आणि त्यांचे चरण-रज आपल्या मस्तकावर घेऊन नेत्रंनाही लावले. ॥ १ ॥

सुनु मुनीस बर दरसन तोरें । अगमु न कछु प्रतीति मन मोरें ॥

जो सुखु सुजसु लोकपति चहहीं । करत मनोरथ सकुचत अहहीं ॥

ते म्हणाले, ‘ हे मुनीश्र्वर, आपले सुंदर दर्शन झाले असता, काहीही दुर्लभ नाही, अशी माझी खात्री आहे. जे सुख आणि सुकीर्ती लोकपालांना हवी असते, परंतु ती मिळणे अशक्य समजून तिचे मनोरथ त्याना संकोच वाटतो, ॥ २ ॥

सो सुखु सुजसु सुलभ मोहि स्वामी । सब सिधि तव दरसन अनुगामी ॥

कीन्हि बिनय पुनि पुनि सिरु नाई । फिरे महीसु आसिषा पाई ॥

हे स्वामी, तेच सुख आणि सुकीर्ती मला सुलभपणे मिळाली. सर्व सिद्धी तुमच्या दर्शनामागोमाग चालत येतात.’ अशा प्रकारे वारंवार स्तुती केली आणि मस्तक टेकवून व त्यांचा आशीर्वाद घेऊन जनक परत गेले. ॥ ३ ॥

चली बरात निसान बजाई । मुदित छोट बड़ सब समुदाई ॥

रामहि निरखि ग्राम नर नारी । पाइ नयन फलु होहिं सुखारी ॥

डंका वाजवित वर्‍हाड निघाले. लहान-मोठे समुदाय प्रसन्न होते. वाटेच्या गावांतील स्त्री-पुरुष श्रीरामचंद्रांना पाहून डोळ्यांचे पारणे फिटल्यामुळे आनंदित होत होते. ॥ ४ ॥

दोहा—बीच बीच बर बास करि मग लोगन्ह सुख देत ।

अवध समीप पुनीत दिन पहुँची आइ जनेत ॥ ३४३ ॥

मधून-मधून मुक्कम करीत आणि वाटेतील लोकांना सुखावत वर्‍हाड पवित्र दिवशी अयोध्यापुरीजवळ आले. ॥ ३४३ ॥

हने निसान पनव बर बाजे । भेरि संख धुनि हय गय गाजे ॥

झॉंझि बिरव डिंडिमीं सुहाई । सरस राग बाजहिं सहनाई ॥

नगारे वाजत होते. सुंदर ढोल गर्जत होते. भेरी आणि शंख जोराने वाजत होते., हत्ती-घोडे गर्जना करीत होते. झांजा तालावर वाजत होत्या. डफ सुंदर ताल धरत होते. गोड रागामध्ये सनया वाजत होत्या. ॥ १ ॥

पुर जन आवत अकनि बराता । मुदित सकल पुलकावलि गाता ॥

निज निज सुंदर सदन सँवारे । हाट बाट चौहट पुर द्वारे ॥

वर्‍हाड येत आहे, असे पाहून अयोध्येचे नगरवासी आनंदून गेले. सर्वांची शरीरे पुलकित झाली. सर्वांनी आपापल्या घरांना, बाजारांना, गल्ल्या-बोळांना, चौकांना आणि नगरद्वारांना सुंदर रितीने सजविले. ॥ २ ॥

गलीं सकल अरगजॉं सिंचाईं । जहँ तहँ चौकें चारु पुराईं ॥

बना बजारु न जाइ बखाना । तोरन केतु पताक बिताना ॥

सर्व गल्ल्यांमध्ये चंदनाचे सडे घातले गेले. सर्वत्र रांगोळ्या घातल्या गेल्या. तोरणें, ध्वज, पताका आणि मांडव यांनी बाजार असा सजून गेला की, त्याचे वर्णन करता येत नाही. ॥ ३ ॥

सफल पूगफल कदलि रसाला । रोपे बकुल कदंब तमाला ॥

लगे सुभग तरु परसत धरनी । मनिमय आलबाल कल करनी ॥

सुपार्‍या लागलेली सुपारीची झाडे, केळी, आम्रवृक्ष, बकुळ , कदंब आणि तमाल वृक्ष उभारले गेले. फळांच्या भाराने वाकलेले वृक्ष जमिनीला टेकत होते. त्यांची आळी रत्नांच्या कलाकुसरीने बनविली होती. ॥ ४ ॥

दोहा—बिबिध भॉंति मंगल कलस गृह गृह रचे सँवारि ॥

सुर ब्रह्मादि सिहाहिं सब रघुबर पुरी निहारि ॥ ३४४ ॥

अनेक प्रकारचे मंगल कलश घरोघरी सजवून ठेवले होते. श्रीरघुनाथांची अयोध्यानगरी पाहून ब्रह्मदेव इत्यादी सर्व देव मुग्ध होत होते.

भूप भवनु तेहि अवसर सोहा । रचना देखि मदन मनु मोहा ॥

मंगल सगुन मनोहरताई । रिधि सिधि सुख संपदा सुहाई ॥

त्यावेळी राजमहाल खूप शोभून दिसत होता. त्याची रचना पाहून कामदेवाचे मनसुद्धा मोहित होत होते. मंगल शकुन, मनोहारिता, ऋद्धि-सिद्धी, सुख, सुंदर संपत्ती. ॥ १ ॥

जनु उछाह सब सहज सुहाए । तनु धरि धरि दसरथ गृहँ छाए ॥

देखन हेतु राम बैदेही । कहहु लालसा होहि न केही ॥

आणि सर्व प्रकारचे आनंद जणू सहजपणे सुंदर शरीर धारण करुन दशरथांच्या घरी अवतरले होते. श्रीरामचंद्र आणि सीता यांच्या दर्शनाची लालसा कुणाला बरे असणार नाही ? ॥ २ ॥

जूथ जूथ मिलि चलीं सुआसिनि । निज छबि निदरहिं मदन बिलसिनि ॥

सकल सुमंगल सजें आरती । गावहिं जनु बहु बेष भारती ॥

सुहासिनि स्त्रीया जमावाने निघाल्या. त्या आपल्या लावण्याने कामदेवाची पत्नी रती हिलाही तुच्छ ठरवत होत्या. सर्व सुंदर मंगल द्रव्ये आणि आरती सजवून त्या गात होत्या. जणू सरस्वतीच अनेक रुपे धारण करुन गात चालली होती. ॥ ३ ॥

भूपति भवन कोलाहलु होई । जाइ न बरनि समउ सुखु सोई ॥

कौसल्यादि राम महतारीं । प्रेमबिबस तन दसा बिसारीं ॥

राजमहाला,ध्ये आनंदामुळे कलकलाट चालला होता. त्या प्रसंगाचे व सुखाचे वर्णन करता येणे अशक्य. कौसल्या इत्यादी श्रीरामांच्या सर्व माता प्रेमसागरात बुडून देहभान विसरल्या होत्या. ॥ ४ ॥     

 

दोहा—दिए दान बिप्रन्ह बिपुल पूजि गनेस पुरारि ।

प्रमुदित परम दरिद्र जनु पाइ पदारथ चारि ॥ ३४५ ॥

मातांनी गणेश व त्रिपुरारी शिवांचे पूजन करुन ब्राह्मणांना खूप दाने दिली. त्या इततक्या प्रसन्न झाल्या होत्या की, जणू अत्यंत दरिद्री माणसाला चारी प्रकारचे अन्नपदार्थ मिळावे. ॥ ३४५ ॥

मोद प्रमोद बिबस सब माता । चलहिं न चरन सिथिल भए गाता ॥

राम दरस हित अति अनुरागीं । परिछनि साजु सजन सब लागीं ॥

मोठे सुख व आनंद यांमुळे सर्व मातांची गात्रे शिथिल झाली होती. त्यांचे पाय उचलत नव्हते. श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी त्या अत्यंत प्रेमाने औक्षणाचे सामान तयार करु लागल्या. ॥ १ ॥

बिबिध बिधान बाजने बाजे । मंगल मुदित सुमित्राँ साजे ॥

हरद दूब दधि पल्लव फूला । पान पूगफल मंगल मूला ॥

अनेक प्रकारची वाद्ये वाजू लागली, सुमित्रेने आनंदाने समग्री सजविली. हळद, दूर्वा, दही, पाने, फुले, पान-सुपारी इत्यादी मंगलिक वस्तू, ॥ २ ॥

अच्छत अंकुर लोचन लाजा । मंजुल मंजरि तुलसि बिराजा ॥

छुहे पुरट घट सहज सुहाए । मदन सकुन जनु नीड़ बनाए ॥

अक्षता, नवांकुर, गोरोचन, लाह्या आणि तुलसी-मंजिरी शोभून दिसत होत्या. नाना रंगांनी चित्रित केलेले सहज सुंदर सुवर्ण कलश, असे वाटत होते की, जणू कामदेवाच्या पक्ष्यांनी आपली घरटी बनविली असावीत. ॥ ३ ॥

सगुन सुगंध न जाहिं बखानी । मंगल सकल सजहिं सब रानी ॥

रची आरतीं बहुत बिधाना । मुदित करहिं कल मंगल गाना ॥

शकुनाच्या सुगंधित वस्तूंचे वर्णन करणे कठीण होते. सर्व 

राण्या संपूर्ण मंगल साजांनी सजल्या होत्या. अनेक

 प्रकारच्या आरत्या बनवून आनंदाने त्या सुंदर मंगलगीते

 गात होत्या. ॥ ४ ॥  



Custom Search

No comments: