Saturday, January 16, 2021

Shri RamCharitManas Part 73 श्रीरामचरितमानस भाग ७३

 

Shri RamCharitManas Part 73 
Doha 330 to 333 
श्रीरामचरितमानस भाग ७३ 
दोहा ३३० ते ३३३ 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

दोहा—बामदेउ अरु देवरिषि बालमीकि जाबालि ।

आए मुनिबर निकर तब कौसिकादि तपासालि ॥ ३३० ॥

मग वामदेव, देवर्षीनारद, वाल्मीके, जाबाली, विश्र्वामित्र आदी तपस्वी श्रेष्ठ मुनींचे समूहच्या समूह आले. ॥ ३३० ॥

दंड प्रनाम सबहि नृप कीन्हे । पूजि सप्रेम बरासन दीन्हे ॥

चारि लच्छ बर धेनु मगाईं । काम सुरभि सम सील सुहाईं ॥

राजांनी सर्वांना दंडवत प्रणाम केला आणि त्यांना उत्तम आसने देऊन प्रेमाने त्यांचे पूजन केले. चार लाख उत्तम गाई मागविल्या, त्या सर्व कामधेनूसारख्या चांगल्या स्वभावाच्या होत्या आणि शोभिवंत होत्या. ॥ १ ॥

सब बिधि सकल अलंकृत कीन्हीं । मुदित महिप महिदेवन्ह दीन्हीं ॥

करत बिनय बहु बिधि नरनाहू । लहेउँ आजु जगजीवन लाहू ॥

त्या सर्व गाईंना सर्व प्रकारेअलंकार व वस्त्रांनी सजवून राजाने प्रसन्न मनाने ब्राह्मणांना दिल्या. यावेळी राजा मानत होता की, या जगामध्ये मी आजच्या जगण्याचा आनंद मिळविला. ॥ २ ॥

पाइ असीस महीसु अनंदा । लिए बोलि पुनि जाचक बृंदा ॥

कनक बसन मनि हय गय स्यंदन । दिए बूझि रुचि रबिकुलनंदन ॥

ब्राह्मणांकडून आशीर्वाद मिळाल्यावर महाराज आनंदित झाले.नंतर याचकांच्या टोळ्या बोलावल्या. त्या सर्वांना त्यांच्या आवडीप्रमाणे सोने, वस्त्रे, रत्ने, घोडे, हत्ती आणि रथ इत्यादी, जे ज्यांनी मागितले, ते त्यांना सूर्यकुलाला आनंदित करणार्‍या दशरथांनी दिले. ॥ ३ ॥

चले पढ़त गावत गुन गाथा । जय जय जय दिनकर कुल नाथा ॥

एहि बिधि राम बिआह उछाहू । सकइ न बरनि सहस मुख जाहू ॥

ते सर्वजण गुणानुवाद गात आणि ‘ सूर्यकुलाधिपतींचा जयजयकार असो, ‘ असे म्हणत परत गेले. अशा प्रकारे श्रीरामचंद्रांच्या विवाहाचा उत्सव झाला. त्याचे वर्णन सहस्त्रमुखी शेषसुद्धा करु शकत नाही. ॥ ४ ॥

दोहा—बार बार कौसिक चरन सीसु नाइ कह राउ ।

यह सबु सुखु मुनिराज तव कृपा कटाच्छ पसाउ ॥ ३३१ ॥

विश्र्वामिर्त्रांच्या चरणी मस्तक ठेवून महाराज जनक म्हणाले, ‘ हे मुनिराज, हे सर्व सुख तुमच्याच कृपाकटाक्षाचा प्रसाद आहे. ‘ ॥ ३३१ ॥

जनक सनेहु सीलु करतूती । नृपु सब भॉंति सराह बिभूती ॥

दिन उठि बिदा अवधपति मागा । राखहिं जनकु सहित अनुरागा ॥

राजा दशरथांनी राजा जनकांच्या स्नेह, शील, कर्तृत्व आणि ऐश्र्वर्य यांची सर्व प्रकारे प्रशंसा केली. रोज सकाळी उठून राजा दशरथ निरोप घेण्यासाठी जात, परंतु राजा जनक त्यांना प्रेमाने ठेवून घेत. ॥ १ ॥

नित नूतन आदरु अधिकाई । दिन प्रति सहस भॉंति पहुनाई ॥

नित नव नगर अनंद उछाहू । दसरथ गवनु सोहाइ न काहू ॥

परस्परांविषयी नित्य नवा आदर वाढत होता. प्रत्येक दिवशी हजारो प्रकारचा पाहुणचार चालला होता. नगरामध्ये नित्य नवीन आनंद आणि उत्साह असे दशरथांनी परत जावे, हे कुणाला आवडत नव्हते. ॥ २ ॥

बहुत दिवस बीते एहि भॉंति । जनु सनेह रजु बँधे बराती ॥

कौसिक सतानंद तब जाई । कहा बिदेह नृपहि समुझाई ॥

अशा रितीने पुष्कळ दिवस निघून गेले. जणू वर्‍हाडी प्रेमाच्या बंधनाने बांधलेले होते. तेव्हा विश्र्वामित्र व शतानंद यांनी जाऊन राजा जनकांना समजावून सांगितले की, ॥ ३ ॥

अब दसरथ कहँ आयसु देहू । जद्यपि छाड़ि न सकहु सनेहू ॥

भलेहिं नाथ कहि सचिव बोलाए । कहि जय जीव सीस तिन्ह नाए ॥

‘ जरी तुम्ही स्नेहापोटी सोडत नाही, तरीही आता राजा दसरथांना जाण्याची अनुमती द्या. ‘ ‘ हे मुनिवर्य ! ठीक आहे.’ , असे म्हणून जनकांनी मंत्र्यांना बोलावून घेतले. ते आले. ‘ जय जीव ‘ म्हणत त्यांनी मस्तक नमविले. ॥ ४ ॥

दोहा—अवधनाथु चाहत चलन भीतर करहु जनाउ ।

भए प्रेमबस सचिव सुनि बिप्र सभासद राउ ॥ ३३२ ॥

जनक म्हणाले, ‘ अयोध्यानाथ जाऊ इच्छितात, अंतःपुरात वार्ता द्या. ‘ हे ऐकून मंत्री, ब्राह्मण, सभासद आणि राजा जनक हे सर्व प्रेमवश झाले होते. ॥ ३३२ ॥

पुरबासी सुनि चलिहि बराता । बूझत बिकल परस्पर बाता ॥

सत्य गवनु सुनि सब बिलखाने । मनहुँ सॉंझ सरसिज सकुचाने ॥           

जनकपुरवासींना जेव्हा कळले की, वर्‍हाड जाणार आहे. तेव्हा ते व्याकूळ होऊन एक दुसर्‍याला विचारु लागले. जाणार हे खरे आहे, असे ऐकल्यावर ते सर्व उदास झाले, ज्याप्रमाणे संध्याकाळ होताच कमळे कोमेजून जातात. ॥ १ ॥

जहँ जहँ आवत बसे बराती । तहँ तहँ सिद्ध चला बहु भॉंती ॥

बिबिध भॉंति मेवा पकवाना । भोजन साजु न जाइ बखाना ॥

येते वेळी वर्‍हाडी मंडळी जेथे जेथे थांबली होती, तेथे तेथे सर्व प्रकारची शीधा-सामुग्री पाठविली गेली. अनेक प्रकारचे मेवे, पक्वाने आणि भोजनाची सामुग्री इतकी पाठविली की, सांगता येत नाही. ॥ २ ॥

भरि भरि बसहँ अपार कहारा । पठईं जनक अनेक सुसारा ॥

तुरग लाख रथ सहस पचीसा । सकल सँवारे नख अरु सीसा ॥

अगणित बैलांवर व भारवाहकांवर लादून ती सामुग्री पाठविली. त्याचबरोबर जनकांनी अनेक सुंदर पलंग पाठविले. एक लक्ष घोडे, पंचवीस हजार रथ नखशिखांत सजविले होते. ॥ ३ ॥

मत्त सहस दस सिंधुर साजे । जिन्हहि देखि दिसिकुंजर लाजे ॥

कनक बसन मनि भरि भरि जाना । महिषीं धेनु बस्तु बिधि नाना ॥

दहा हजार सजविलेले मस्त हत्ती होते. त्यांना पाहिल्यावर दिग्गजसुद्धा ओशाळत होते. गाड्यांमध्ये भरुन सोने, वस्त्रे आणि रत्ने तसेच म्हशी, गाई आणि नाना प्रकारच्या वस्तू दिल्या होत्या. ॥ ४ ॥

दोहा—दाइज अमित न सकिअ कहि दीन्ह बिदेहँ  बहोरि ।

जो अवलोकत लोकपति लोक संपदा थोरि ॥ ३३३ ॥

अशा प्रकारे जनकांनी पुन्हा आंदण दिले. ते सांगता येत नाही. ते पाहून लोकपालांची संपत्ती तोकडी वाटत होती. ॥ ३३३ ॥

सबु समाजु एहि भॉंति बनाई । जनक अवधपुर दीन्ह पठाई ॥

चलिहि बरात सुनत सब रानीं । बिकल मीनगन जनु लघु पानीं ॥

अशा प्रकारे सर्व सामान सज्ज करुन ते राजा जनकानी अयोध्यापुरीस पाठवून दिले. वर्‍हाड जाणार हे ऐकताच सर्व राण्या थोड्याशा पाण्याविना मासे तडफडतात त्याप्रमाणे व्याकूळ झाल्या. ॥ १ ॥

पुनि पुनि सीय गोद करि लेहीं । देइ असीस सिखावनु देहीं ॥

होएहु संतत पियहि पिआरी । चिरु अहिबात असीस हामारी ॥

त्या वारंवार सीतेला मांडीवर घेत आणि आशीर्वाद देऊन शिकवण देत की, ‘ तू सदैव आपल्या पतीची आवडती हो, तुझे सौभाग्य अखंड राहो, हाच आमचा आशीर्वाद आहे. ॥ २ ॥

सासु ससुर गुर सेवा करेहू । पति रुख लखि आयसु अनुसरेहू ॥

अति सनेह बस सखीं सयानी । नारि धरम सिखवहिं मृदु बानी ॥

सासू, सासरे आणि गुरुंची सेवा कर. पतीचा कल पाहून आज्ञा-पालन कर. ‘ शहाण्या सख्यांनी प्रेमामुळे सीतेला कोमल वाणीने स्त्रियांचा धर्म काय, ते सांगितले. ॥ ३ ॥

सादर सकल कुअँरि समुझाईं । रानिन्ह बार बार उर लाईं ॥

बहुरि बहुरि भेटहिं महतारीं । कहहिं बिरंचि रचीं कत नारीं ॥

राण्यांनी मोठ्या आदराने सर्व कन्यांना स्त्रियांचा धर्म 

वारंवार समजावून दिला आणि त्यांना वारंवार हृदयाशी 

कवटाळून धरले. माता वारंवार भेटून ब्रह्मदेवांनी स्त्री-

जातीला का उत्पन्न केले, ते सांगत. ॥ ४



Custom Search

No comments: