Shri RamCharitManas Part 75
श्रीरामचरितमानस बालकाण्ड
दोहा—प्रेमबिबस परिवारु सबु जानि सुलगन नरेस ।
कुअँरि चढ़ाईं पालकिन्ह सुमिरे सिद्धि गनेस ॥ ३३८
॥
संपूर्ण परिवार प्रेमाने व्याकूळ झाला होता.
राजांनी सुंदर मुहूर्त पाहून सिद्धींसह श्रीगणेशाचे स्मरण करुन कन्यांना
पालख्यांमध्ये बसविले. ॥ ३३८ ॥
बहुबिधि भूप सुता समुझाईं । नारिधरमु कुलरीति
सिखाईं ॥
दासीं दास दिए बहुतेरे । सुचि सेवक जे प्रिय सिय
केरे ॥
राजांनी मुलींची अनेक प्रकारे समजूत घालून
त्यांना स्त्रीधर्म व कुळाचार शिकविले. तसेच सीतेच्या विश्र्वासातील तिला प्रिय
असणारे अनेक दासी-दास दिले. ॥ १ ॥
सीय चलत ब्याकुल पुरबासी । होहिं सगुन सुभ मंगल
रासी ॥
भूसुर सचिव समेत समाजा । संग चले पहुँचावन राजा ॥
सीता निघाली, तेव्हा मिथिलावासी व्याकूळ
झाले. मंगल-शकून होऊ लागले. ब्राह्मण व मंत्री यांच्या समूहासह राजा जनक त्यांना
पोहोचविण्यासाठी निघाले. ॥ २ ॥
समय बिलोकि बाजने बाजे । रथ गज बाजि बरातिन्ह
साजे ॥
दसरथ बिप्र बोलि सब लीन्हे । दान मान परिपूजन
कीन्हे ॥
वेळ पाहून वाद्ये वाजू लागली. वर्हाडी
मंडळींनी रथ, हत्ती आणि घोडे सज्ज केले. राजा दशरथांनी सर्व ब्राह्मण लोकांना
बोलावून घेतले आणि त्यांना दान देऊन सन्मानित केले. ॥ ३ ॥
चरन सरोज धूरि धरि सीसा । मुदित महीपति पाइ असीसा
॥
सुमिरि गजानन कीन्ह पयाना । मंगलमूल सगुन भए नाना
॥
त्यांच्या चरण-कमलांची धूळ माथी धरुन आणि
आशीर्वाद प्राप्त करुन राजांना आनंद वाटला आणि श्रीगणेशाचे स्मरण करुन त्यांनी
प्रस्थान केले. त्यावेळी अनेक मंगल शकून झाले. ॥ ४ ॥
दोहा—सुर
प्रसून बरषहिं हरषि करहिं अपछरा गान ।
चले अवधपति
अवधपुर मुदित बजाइ निसान ॥ ३३९ ॥
देव
आनंदित होऊन फुले उधळू लागले आणि अप्सरा गाऊ लागल्या. अयोध्यापती दशरथ नगारे
वाजवून आनंदाने अयोध्येला निघाले. ॥ ३३९ ॥
नृप करि
बिनय महाजन फेरे । सादर सकल मागने टेरे ॥
भूषन बसन
बाजि गज दीन्हे । प्रेम पोषि ठाढ़े सब कीन्हे ॥
राजा
दशरथांनी सर्व प्रतिष्ठित मंडळींना विनंती करुन परत पाठविले आणि सर्व याचकांना
आदराने बोलाविले. त्यांना दागिने-कपडे, हत्ती-घोडे दिले आणि प्रेमाने वागून
सर्वांना संपन्न व बलशाली केले. ॥ १ ॥
बार बार
बिरिदावलि भाषी । फिरे सकल रामहि उर राखी ॥
बहुरि बहुरि
कोसलपति कहहीं । जनकु प्रेमबस फिरै न चहहीं ॥
ते सर्व
वारंवार राजांच्या कुलकीर्तीची वाखाणणी करीत श्रीरामचंद्रांना हृदयी धरुन परतले.
कोशलाधीश राजा दशरथ परत जाण्यासाठी वारंवार सांगत होते, परंतु राजा जनक प्रेमवश
झाल्यामुळे परतू इच्छित नव्हते. ॥ २ ॥
पुनि कह
भूपति बचन सुहाए । फिरिअ महीस दूरि बड़ि आए ॥
राउ बहोरि उतरि
भए ठाढ़े । प्रेम प्रबाह बिलोचन बाढ़े ॥
मग दशरथ
म्हणाले, ‘ हे राजन, फार दूरवर आलात, आता परत जा.’ राजा दशरथ रथातून उतरुन उभे
राहिले. त्यांच्या नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले. ॥ ३ ॥
तब बिदेह
बोले कर जोरी । बचन सनेह सुधॉं जनु बोरी ॥
करौं कवन
बिधि बिनय बनाई । महाराज मोहि दीन्हि बड़ाई ॥
तेव्हा
राजा जनक हात जोडून प्रेमरुपी अमृतात ओथंबलेले शब्द बोलले, ‘ मी आपल्याला कसे
सांगू ? हे महाराज, तुम्ही मला मोठी थोरवी दिली आहे. ‘ ॥ ४ ॥
दोहा—कोसलपति
समधी सजन सनमाने सब भॉंति ।
मिलनि परसपर
बिनय अति प्रीति न हृदयँ समाति ॥ ३४० ॥
अयोध्यानाथ
दशरथांनी आपल्या व्याह्यांना सर्व प्रकारे सन्मानित केले. त्यांच्या परस्पर
भेटीमध्ये अत्यंत नम्रता होती आणि हृदयात न मावणारे प्रेम होते. ॥ ३४० ॥
मुनि
मंडलिहि जनक सिरु नावा । आसिरबादु सबहि सन पावा ॥
सादर पुनि
भेंटे जानाता । रुप सील गुन निधि सब भ्राता ॥
जनकांनी
मुनींच्या पुढे मस्तक नमविले आणि सर्वांचे आशीर्वाद प्राप्त केले. नंतर आदराने ते
रुप, शील व गुण संपन्न आपल्या जावयांना भेटले. ॥ १ ॥
जोरि पंकरुह
पानि सुहाए । बोले बचन प्रेम जनु जाए ॥
राम करौं
केहि भॉंति प्रसंसा । मुनि महेस मन मानस हंसा ॥
आणि
सुंदर कर-कमल जोडून प्रेमोत्पन्न शब्द बोलले, ‘ हे राम, मी कशा प्रकारे तुमची
स्तुती करु ? तुम्ही मुनींच्या आणि महादेवांच्या मनरुपी
मानस सरोवरातील हंस आहात. ॥ २ ॥
करहिं जोग
जोगी जेहि लागी । कोहु मोहु ममता मदु त्यागी ॥
ब्यापकु
ब्रह्मु अलखु अबिनासी । चिदानंदु निरगुन गुनरासी ॥
योगिजन
क्रोध, मोह, ममता आणि मद यांचा त्याग करुन ज्यांच्यासाठी योगसाधन करतात, जे
सर्वव्यापक, ब्रह्म, अव्यक्त, अविनाशी, चिदानंद, निर्गुण आणि गुणांचे निधान आहेत.
॥ ३ ॥
मन समेत
जेहि जान न बानी । तरकि न सकहिं सकल अनुमानी ॥
महिमा निगमु
नेति कहि कहई । जो तिहुँ काल एकरस रहई ॥
मनासह
वाणी ज्यांना जाणत नाही आणि सर्वजण ज्यांच्याविषयी फक्त अनुमानच करतात, कोणताही
तर्क करु शकत नाहीत, ज्यांचा महिमा वेद ‘ नेति नेति ‘ म्हणून वर्णन करतात आणि जे
सच्चिदानंद तिन्ही कालांमध्ये एकरस, सर्वदा आणि सर्वथा निर्विकार असतात; ॥ ४ ॥
दोहा—नयन बिषय मो कहुँ भयउ सो समस्त सुख मूल ।
सबइ लाभु जग जीव कहँ भएँ ईसु अनुकूल ॥ ३४१ ॥
तेच सर्व सुखांचे मूळ असलेले तुम्ही माझ्या
नेत्रांना दिसू शकला. ईश्र्वर अनुकूल असल्यावर जगात जिवाला लाभच लाभ मिळतो. ॥ ३४१
॥
सबहि भॉंति मोहि दीन्हि बड़ाई । निज जन जानि लीन्ह
अपनाई ॥
होहिं सहस दस सारद सेषा । करहिं कलप कोटिक भरि
लेखा ॥
तुम्ही मला सर्व प्रकारे मोठेपण दिले आणि
आपला समजून आपला बनविले. जरी दहा हजार सरस्वती व शेष असलेले आणि ते कोट्यावधी कल्पांपर्यंत गणना करीत राहिले, ॥ १
॥
मोर भाग्य राउर गुन गाथा । कहि न सिराहिं सुनहु
रघुनाथा ॥
मैं कछु कहउँ एक बल मोरें । तुम्ह रीझहु सनेह
सुठि थोरें ॥
तरीही हे रघुनाथा, माझे सद्भाग्य आणि तुमच्या
गुणांची कथा पूर्ण होऊ शकत नाही. मी जे काही सांगत आहे, ते फक्त एवढ्याच एका बळावर
की, तुम्ही अत्यंत थोड्याशा प्रेमाने प्रसन्न होता. ॥ २ ॥
बार बार मागउँ कर जोरें । मनु परिहरै चरन जनि
भोरे ॥
सुनि बर बचन प्रेम जनु पोषे । पूरनकाम रामु
परितोषे ॥
मी वारंवार हात जोडून हे मागतो की, माझ्या
मनाने चुकूनही तुमचे चरण सोडू नयेत.’ जनकांची ही श्रेष्ठ प्रेमपूर्ण वचने ऐकून
पूर्णकाम श्रीराम संतुष्ट झाले. ॥ ३ ॥
करि बर बिनय ससुर सनमाने । पितु कौसिक बसिष्ठ सम
जाने ॥
बिनती बहुरि भरत सन कीन्ही । मिलि सप्रेम पुनि
आसिष दीन्ही ॥
त्यांनी सुंदर शब्दांत विनंती करुन पिता दशरथ, गुरु
विश्र्वामित्र व कुलगुरु वसिष्ठांसमान मानून श्वशुर जनक
यांचा सन्मान केला. नंतर जनकांनी भरताला तसेच
सांगितले आणि प्रेमाने भेटून त्याला आशीर्वाद दिले. ॥ ४
॥
No comments:
Post a Comment