Shri RamCharitManas Part 77
दोहा—कनक थार भरि मंगलन्हि कमल करन्हि लिएँ मात ।
चलीं मुदित परिछनि करन पुलक पल्लवित गात ॥ ३४६ ॥
सोन्याच्या तबकांमध्ये मांगलिक वस्तू भरुन व
आपल्या कमलासारख्या कोमल हातांमध्ये धरुन माता आनंदाने औक्षण करण्यास निघाल्या.
त्यांच्या गात्रांवर रोमांच आले होते. ॥ ३४६ ॥
धूप धूम नभु मेचक भयऊ । सावन घन घमंडु जनु ठयऊ ॥
सुरतरु सुमन माल सुर बरषहिं । मनहुँ बलाक अवलि
मनु करषहिं ॥
धूपाच्या धुराने आकाश असे काळे झाले होते की,
जणू श्रावणातील मेघ दाटून आले होते. देवगण कल्पवृक्षाच्या फुलांच्या माळांचा
वर्षाव करीत होते. जणू बगळ्यांचे थवे मनाला आकर्षित करुन घेत आहेत, असे वाटत होते.
॥ १ ॥
मंजुल मनिमय बंदनिवारे । मनहुँ पाकरिपु चाप
सँवारे ॥
प्रगटहिं दुरहिं अटन्ह पर भमिनि । चारु चपल जनु
दमकहिं दामिनि ॥
सुंदर रत्नांनी बनविलेली तोरणे अशी वाटत होती
की जणू इंद्रधनुष्ये सजविली असावीत. गच्चांवर सुंदर आणि चपळ स्त्रिया येत-जात
होत्या. जणू त्या विजा चमकल्याप्रमणे वाटत होत्या. ॥ २ ॥
दुंदुभि धुनि घन गरजनि घोरा । जाचक चातक दादुर
मोरा ॥
सुर सुगंध सुचि बरषहिं बारी । सुखी सकल ससि पुर
नर नारी ॥
नगार्यांचा आवाज जणूं मेघांची घनघोर गर्जना
वाटत होता. याचकगण, चातक, मंडूक व मोराप्रमाणे वाटत होते. देव पवित्र सुगंधरुपी
जलाचा वर्षाव करीत होते. त्यामुळे शेतीप्रमाणे नगरातील स्त्री-पुरुष सुखावून गेले
होते. ॥ ३ ॥
समउ जानि गुर ,आयसु दीन्हा । पुर प्रबेसु
रघुकुलमनि कीन्हा ॥
सुमिरि संभु गिरिजा गनराजा । मुदित महीपति सहित
समाजा ॥
नगर प्रवेशाची वेळ जाणून गुरु वसिष्ठांनी
आज्ञा केली, तेव्हा रघुकुलशिरोमणी महाराज दशरथांनी शिव, पार्वती व गणेश यांचे
स्मरण करुन सर्व मंडळींसह आनंदाने नगरात प्रवेश केला. ॥ ४ ॥
दोहा—होहिं सगुन बरषहिं सुमन सुर दुंदुभीं बजाइ ।
बिबुध बधू नाचहिं मुदित मंजुल मंगल गाइ ॥ ३४७ ॥
शुभ शकुन होत होते, देव दुंदुभी वाजवीत फुले
उधळत होते. देवांगना आनंदाने सुंदर मंगलगीते गात नाचत होत्या. ॥ ३४७ ॥
मागध सूत बंदि नट नागर । गावहिं जसु तिहु लोक
उजागर ॥
जय धुनि बिमल बेद बर बानी । दस दिसि सुनिअ सुमंगल
सानी ॥
मागध, सूत, भाट व चतुर नट त्रैलोक्यासह प्रकाशित
करणार्या श्रीरामचंद्रांचे यशोगान करीत होते. जयध्वनी आणि वेदांची पवित्र,
श्रेष्ठ व सुंदर मांगल्याने ओसंडलेली वाणी दाही दिशांना ऐकू येत होती. ॥ १ ॥
बिपुल बाजने बाजन लागे । नभ सुर नगर लोग अनुरागे
॥
बने बराती बरनि न जाहीं । महा मुदित मन सुख न
समाहीं ॥
पुष्कळशी वाद्ये वाजू लागली. आकाशातील देव
आणि नगरातील लोक सर्वजण प्रेममग्न झाले होते. वर्हाडी मंडळी अशी नटलेली होती की,
काही सांगायची सोय नाही. ते परम आनंदात होते. सुख त्यांच्या मनात मावत नव्हते. ॥ २
॥
पुरबासिन्ह तब राय जोहारे । देखत रामहि भए सुखारे
॥
करहिं निछावरि मनिगन चीरा । बारि बिलोचन पुलक
सरीरा ॥
अयोध्यावासीजनांनी राजांना वंदन केले.
श्रीरामांना पाहताच ते सुखावून गेले. सर्वजण रत्ने व वस्त्रे त्यांच्यावरुन ओवाळून
टाकीत होते. त्यांच्या नेत्रांत प्रेमाश्रूंचा पूर दाटला होता आणि ते पुलकित झाले
होते. ॥ ३ ॥
आरति करहिं मुदित पुर नारी । हरषहिं निरखि कुअँर
बर चारी ॥
सिबिका सुभग ओहार उधारी । देखि दुलहिनिन्ह होहिं
सुखारी ॥
नगरातील स्त्रिया आनंदित होऊन आरती करीत
होत्या आणि सुंदर चारी कुमारांना पाहून हर्षित होत होत्या. पालखीचे पडदे बाजूला
सारुन वधूंना पाहून त्या सुखावून जात होत्या. ॥ ४ ॥
दोहा—एहि बिधि सबही देत सुखु आए राजदुआर ।
मुदित मातु परिछनि करहिं बधुन्ह समेत कुमार ॥ ३४८
॥
अशा प्रकारे सर्वांना सुखी करुन ते राजद्वारी
आले. माता आनंदाने वधूंच्यासह कुमारांना औश्रण करु लागल्या. ॥ ३४८ ॥
करहिं आरती बारहिं बारा । प्रेमु प्रमोदु कहै को
पारा ॥
भूषन मनि पट नाना जाती । करहिं निछावरि अगनित
भॉंती ॥
त्या वारंवार आरती करीत होत्या. त्या प्रेम व
आनंदाचे वर्णन कोण करु शकेल ? अनेक प्रकारची आभूषणें, रत्ने आणि वस्त्रे व अगणित
प्रकारच्या वस्तू उतरुन टाकल्या जात होत्या. ॥ १ ॥
बधुन्ह समेत देखि सुत चारी । परमानंद मगन महतारी
॥
पुनि पुनि सीय राम छबि देखी । मुदित सफल जग जीवन
लेखी ॥
वधूंच्यासह चारी पुत्रांना पाहून माता
आनंदमग्न झाल्या. सीता व श्रीराम यांचे रुप-लावण्य वारंवार पाहून आपला जन्म सफल
झाल्याचे त्यांना वाटत होते. त्या आनंदून गेल्या होत्या. ॥ २ ॥
सखीं सीय मुख पुनि पुनि चाही । गान करहिं निज
सुकृत सराही ॥
बरषहिं सुमन छनहिं छन देवा । नाचहिं गावहिं
लावहिं सेवा ॥
सख्या जानकीचे मुख वारंवार पाहून आपल्या
पुण्याची वाखाणणी करीत गीते गात होत्या. देव क्षणाक्षणाला फुले उधळत, नाचत, गात
आपापली सेवा-समर्पित करीत होते. ॥ ३ ॥
देखि मनोहर चारिउ जोरीं । सारद उपमा सकल ढँढोरीं
॥
देत न बनहिं निपट लघु लागीं । एकटक रहीं रुप
अनुरागीं ॥
ती चारीही मनोहर जोडपी पाहून सरस्वतीने सर्व
उपमा शोधल्या, पण कोणतीही उपमा देता येत नव्हती, कारण त्या सर्वच उपमा तुच्छ वाटत
होत्या. तेव्हा निराश होऊन सरस्वतीसुद्धा श्रीरामांच्या रुपावर अनुरुक्त होऊन एकटक
त्यांना पाहात राहिली. ॥ ४ ॥
दोहा—निगम नीति कुल रीति करि अरध पॉंवड़े देत ।
बधुन्ह सहित सुत परिछि सब चलीं लवाइ निकेत ॥ ३४९
॥
वेद-विधी आणि कुलाचार पूर्ण झाल्यावर अर्घ्य
व पायघड्या घालत माता वधूंच्यासह सर्व पुत्रांना औक्षण करुन त्यांना महालात घेऊन
आल्या. ॥ ३४९ ॥
चारि सिंघासन सहज सुहाए । जनु मनोज निज हाथ बनाए
॥
तिन्ह पर कुअँरि कुअँर बैठारे । सादर पाय पुनीत
पखारे ॥
जणू कामदेवाने स्वतःच्या हाताने बनविलेली
सुंदर चार सिंहासने होती. मातांनी त्यांवर राजकुमारींना बसविले आणि मोठ्या आदाराने
त्यांचे पवित्र चरण धुतले. ॥ १ ॥
धूप दीप नैबेद बेद बिधि । पूजे बर दुलहिनि
मंगलनिधि ॥
बारहिं बार आरती करहीं । ब्यजन चारु चामर सिर
ढरहीं ॥
मग वेद-विधीप्रमाणे मांगल्याचे माहेर असलेले
नवरदेव व वधू यांची धूप, दीप आणि नैवेद्य इत्यादींनी पूजा केली. माता वारंवार
ओवाळीत होत्या आणि वधू-वरांच्या मस्तकावर मोर पंख व चवर्या यांनी वारा घालीत
होत्या. ॥ २ ॥
बस्तु अनेक निछावरि होहीं । भरीं प्रमोद मातु सब
सोहीं ॥
पावा परम तत्त्व जनु जोगीं । अमृतु लहेउ जनु संतत
रोगीं ॥
अनेक वस्तू उतरुन टाकल्या जात होत्या. सर्व
माता आनंदाने परितृप्त झाल्यामुळे अशा शोभत होत्या की, जणू योग्याने परमतत्त्व
प्राप्त केले आहे. नित्य रोगी असलेल्या मनुष्याला जणू अमृत मिळाले. ॥ ३ ॥
जनम रंक जनु पारस पावा । अंधहि लोचन लाभु सुहावा
॥
मूक बदन जनु सारद छाई । मानहुँ समर सूर जय पाई ॥
जन्माचा दरिद्री असलेल्या माणसाला जणू परीस
लाभला. आंधळ्याला दृष्टी मिळाली. मुक्याच्या मुखामध्ये
जणू सरस्वती विराजमान झाली आणि वीराने जणू युद्धात
विजय मिळविला. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment