Saturday, February 27, 2021

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 8 अयोध्याकाण्ड द्वितीयसोपान भाग ८

 

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 8 
Doha 41 and 46 
अयोध्याकाण्ड द्वितीय सोपान भाग ८ 
दोहा ४१ आणि ४६ 
श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड

दोहा—मुनिगन मिलनु बिसेषि बन सबहि भॉति हित मोर ।

तेहि महँ पितु आयसु बहुरि संमत जननी तोर ॥ ४१ ॥

वनात गेल्यामुळे खास करुन मुनींच्या भेटी होतील. त्यात सर्वप्रकारे माझे कल्याणच आहे. त्यातही वडिलांची आज्ञा आणि माते, तुमची संमती आहे, ॥ ४१ ॥

भरतु प्रानप्रिय पावहिं राजू । बिधि सब बिधि मोहि सनमुख आजू ॥

जौं न जाउँ बन ऐसेहु काजा । प्रथम गनिअ मोहि मूढ़ समाजा ॥

आणि प्राणप्रिय भरताला राज्य मिळेल. हे पाहून मला वाटते की, आज दैव सर्व प्रकारे मला अनुकूल आहे. जर अशा कामासाठी मी वनात गेलो नाही, तर मूर्खांमध्ये माझा क्रम पहिला येईल. ॥ १ ॥

सेवहिं अरँडु कलपतरुत्यागी । परिहरि अमृत लेहिं बिषु मागी ॥

तेउ न पाइ अस समउचुकाहीं । देखु बिचारि मातु मन माहीं ॥

हे माते, विचार करुन बघ की, जे कल्पवृक्ष सोडून एरंडाची सेवा करतात आणि अमृत टाकून विष मागतात, ते महामूर्खसुद्धा अशी संधी मिळाल्यावर ती सोडणार नाहीत. ॥ २ ॥

अंब एक दुखु मोहि बिसेषी । निपट बिकल नरनायकु देखी ॥

थोरिहिं बात पितहि दुख भारी । होति प्रतीति न मोहि महतारी ॥

आई, मला फार दुःख वाटते ते महाराजांना अत्यंत व्याकूळ झाल्याचे पाहून. एवढ्या लकानशा गोष्टीसाठी बाबांना इतके मोठे दुःख वाटावे, यावर माझा विश्र्वास बसत नाही. ॥ ३ ॥

राउ धीर गुन उदधि अगाधू । भा मोहि तें कछु बड़ अपराधू ॥

जातें मोहि न कहत कछु राऊ । मोरि सपथ तोहि कहु सति भाऊ ॥

कारण महाराज हे तर मोठे धैर्यशील व गुणसागर आहेत. नक्कीच माझ्याकडून एखादा मोठा अपराध घडला आहे. त्यामुळे महाराज माझ्याशी काही बोलत नाहीत. माते, तुला माझी शपथ, तू खरे खरे सांग.’ ॥ ४ ॥

दोहा—सहज सरल रघुबर बचन कुमति कुटिल करि जान ।

चलइ जोंक जल बक्रगति जद्यपि सलिलु समान ॥ ४२ ॥

रघुकुलश्रेष्ठ श्रीरामचंद्रांच्या स्वाभाविक सरळ बोलण्याला दुर्बुद्धी कैकेयी उलटच समजत होती. जरी पाणी जे समानच असते, तरी जळू त्यात वाकड्या चालीनेच चालते. ॥ ४२ ॥

रहसी रानि राम रुख पाई । बोली कपट सनेहु जनाई ॥

सपथ तुम्हार भरत कै आना । हेतु न दूसर मैं कछु जाना ॥

श्रीरामचंद्रांची मनोभूमिका पाहून राणी कैकेयी आनंदित झाली आणि कपटी प्रेम दाखवीत म्हणाली, ‘ तुझी व भरताची शपथ. मला राजजांच्या दुःखाचे दुसरे कोणतेही कारण माहीत नाही. ॥ १ ॥

तुम्ह अपराध जोगु नहिं ताता । जननी जनक बंधु सुखदाता ॥

राम सत्य सबु जो कछु कहहू । तुम्ह पितु मातु बचन रत अहहू ॥

बाळ ! तू अपराध करणारा नाहीस. तू माता-पिता आणि भाऊ यांना सुख देणारा आहेस, ते सत्य आहे. तू माता-पित्यांच्या आज्ञेचे पालन करण्यात तत्पर आहेस. ॥ २ ॥

पितहि बुझाइ कहहु बलि सोई । चौथेंपन जेहिं अजसु न होई ॥

तुम्ह सम सुअन सुकृत जेहिं दीन्हे । उचित न तासु निरादरु कीन्हे ॥

मी तुझ्यावरुन जीव ओवाळून टाकते. हीच गोष्ट तू बाबांना समजावून सांग. त्यामुळे म्हातारपणी त्यांची अपकीर्ती न होवो. ज्या पुण्याईमुळे यांना तुयासारखा पुत्र लाभला, तिचा अवमान करणे योग्य नव्हे. ॥ ३ ॥

लागहिं कुमुख बचन सुभ कैसे । मगहँ गयादिक तीरथ जैसे ॥

रामहि मातु बचन सब भाए । जिमि सुरसरि गत सलिल सुहाए ॥

मगध देशात गया इत्यादी तीर्थे असल्याप्रमाणे कैकेयीच्या दुष्ट मुखात हे सुंदर वचन वाटत होते. श्रीरामचंद्रांना कैकेयीचे बोलणे असे चांगले वाटले की, गंगेमध्ये बरे-वाईट कोणतेही पाणी मिळाल्यावर ते पवित्र बनते. ॥ ४ ॥

दोहा—गइ मुरुछा रामहि सुमिरि नृप फिरि करवट लीन्ह ।

सचिव राम आगमन कहि बिनय समय सम कीन्ह ॥ ४३ ॥

इतक्यात राजांची मूर्च्छा दूर झाली. ‘ राम-राम ‘ म्हणून ते कुशीवर वळले. मंत्र्यांनी श्रीराम आल्याची वार्ता यांना सांगितली. ॥ ४३ ॥

अवनिप अकनि रामु पगु धारे । धरि धीरज तब नयन उघारे ॥

सचिव सँभारि राउ बैठारे । चरन परत नृप रामु निहारे ॥

श्रीराम आल्याचे ऐकताच राजांनी धीर धरुन डोळे उघडले. मंत्र्यांनी राजांना धरुन बसविले. श्रीराम आपल्या पाया पडत आहेत, हे राजांनी पाहिले. ॥ १ ॥

लिए सनेह बिकल उर लाई । गै मनि मनहुँ फनिक फिरि पाई ॥

रामहि चितइ रहेउ नरनाहू । चला बिलोचन बारि प्रबाहू ॥

प्रेम-विव्हल झालेल्या राजांनी श्रीरामांना हृदयाशी धरले. जणू आपले हरविलेले रत्न सापाला पुन्हा मिळाले. राजा दशरथ श्रीरामांना पाहातच राहिले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा प्रवाह वाहू लागला. ॥ २ ॥

सोक बिबस कछु कहै न पारा । हृदयँ लगावत बारहिं बारा ॥

बिधिहि मनाव राउ मन माहीं । जेहिं रघुनाथ न कानन जाहीं ॥

अत्यंत शोकाकुल झाल्यामुळे राजे काही बोलू शकत नव्हते. ते वारंवार श्रीरामचंद्रांना हृदयाशी धरत होते आणि रघानाथ वनात जाऊ नये, अशी मनात ब्रह्मदेवांची आळवणी करीत होते.॥ ३ ॥

सुमिरि महेसहि कहइ निहोरी । बिनती सुनहु सदासिव मोरी ॥

आसुतोष तुम्ह अवढर दानी । आरति हरहु दीन जनु जानी ॥

मग महादेवांचे स्मरण करुन त्यांची प्रार्थना करीत ते म्हणाले, ‘ हे सदाशिवा, माझी विनंती ऐका. तुम्ही पटकन प्रसन्न होणारे आशुतोष आहात आणि मागेल ते देणारे आहात. म्हणून मला आपला दीन सेवक मानून माझे दुःख दूर करा. ॥ ४ ॥         

दोहा—तुम्ह प्रेरक सब के हृदयँ सो मति रामहि देहु ।

बचनु मोर तजि रहहिं घर परिहरि सीलु सनेहु ॥ ४४ ॥

तुम्ही प्रेरकरुपाने सर्वांच्या हृदयांत वास करता. माझे वचन मोडून आणि शील सोडून घरातच राहाण्याची बुद्धी तुम्ही श्रीरामाला द्या. ॥ ४४ ॥

अजसु होउ जग सुजसु नसाऊ । नरक परौं बरु सुरपुरु जाऊ ॥

सब दुख दुसह सहावहु मोही । लोचन ओट रामु जनि होंही ॥

जगात अपकीर्ती होवो किंवा सुकीर्ती नष्ट होवो. पापामुळे मी नरकात पडो किंवा स्वर्गात जावो. वाटल्यास सर्व प्रकारची दुःसह दुःखे मला सहन करायला लावा, परंतु श्रीराम माझ्या डोळ्यांआड जाऊ नये. ‘ ॥ १ ॥

अस मन गुनइ राउ नहिं बोला । पीपर पात सरिस मनु डोला ॥

रघुपति पितहि प्रेमबस जानी । पुनि कछु कहिहि मातु अनुमानी ॥

राजे अशाप्रकारे मनात विचार करीत होते, बोलत नव्हते. त्यांचे मन पिंपळाच्या पानासारखे सळसळत होते. श्रीरघुनाथांनी पाहिले की वडील प्रेम-विव्हळ झाले आहेत आणि अंदाज केला की, कैकेयी आणखी काही बोलली, तर वडिलांना दुःख होईल. ॥ २ ॥

देस काल अवसर अनुसारी । बोले बचन बिनीत बिचारी ॥

तात कहउँ कछु करउँ ढिठाई । अनुचितु छमब जानि लरिकाई ॥

म्हणून देश, काल आणि प्रसंगानुरुप विचार करुन श्रीराम नम्रपणे म्हणाले, ‘ हे तात, मी बोलतोय, ते धारिष्ट्य आहे. या अनौचित्याला माझे लहानपण समजून क्षमा करा. ॥ ३ ॥

अति लघु बात लागि दुखु पावा । काहुँ न मोहि कहि प्रथम जनावा ॥

देखि गोसाइँहि पूँछिउँ माता । सुनि प्रसंगु भए सीतल गाता ॥

या अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्हांला इतके दुःख सहन करावे लागले. मला कोणी या गोष्टीचा पत्ताच लागू दिला नाही. महाराज, तुमची ही अवस्था पाहून मी मातेला विचारले. तिने सर्व प्रसंग सांगितलेला ऐकून माझे समाधान झाले. ॥ ४ ॥

दोहा—मंगल समय सनेह बस सोच परिहरिअ तात ।

आयसु देइअ हरषि हियँ कहि पुलके प्रभु गात ॥ ४५ ॥

बाबा ! या मंगल प्रसंगी प्रेमाने व्याकूळ होऊन काळजी करणे सोडून द्या आणि आनंदाने मला आज्ञा द्या.’ हे सांगत असताना प्रभू रामांचे सर्वांग पुलकित झाले. ॥ ४५ ॥

धन्य जनमु जगतीतल तासू । पितहि प्रमोदु चरित सुनि जासू ॥

चारि पदारथ करतल ताकें । प्रिय पितु मातु प्रान सम जाकें ॥

नंतर ते म्हणाले, ’ ज्याचे चरित्र ऐकून पित्याला आनंद होतो, त्याचा या पृथ्वीतलावरील जन्म धन्य होय. ज्याला माता-पिता प्राणांसारखे प्रिय आहेत, त्याच्या मुठीत चारी पुरुषार्थ असतात. ॥ १ ॥

आयसु पालि जनम फलु पाई । ऐहउँ बेगिहिं होउ रजाई ॥

बिदा मातु सन आवउँ मागी । चलिहउँ बनहि बहुरि पग लागी ॥

तुमच्या आज्ञेचे पालन करुन आणि जन्म सफळ करुन मी लवकरच परत येईन. म्हणून मला आज्ञा द्या. कौसल्या मातेचा निरोप घेऊन येतो. मग तुमच्या पाया पडून वनास जाईन. ‘ ॥ २ ॥

अस कहि राम गवनु तब कीन्हा । भूप सोक बस उतरु न दीन्हा ॥

नगर ब्यापि गइ बात सुतीछी । छुअत चढ़ी जनु सब तन बीछी ॥

असे म्हणून श्रीराम तेथून निघाले. शोकामुळे राजांनी काही उत्तर दिले नाही. ही अत्यंत अप्रिय गोष्ट नगरात एवढ्या झपाट्याने पसरलरी की, दंश होताच जसे विंचवाचे विष सर्व शरिरात चढते. ॥ ३ ॥

सुनि भए बिकल सकल नर नारी । बेलि बिटप जिमि देखि दवारी ॥

जो जहँ सुनइ धुनइ सिरु सोई । बड़ बिषाद नहिं धीरजु होई ॥

ही वार्ता ऐकताच दावानल पाहताच वेली आणि वृक्ष जसे कोमेजून जातात त्याप्रमाणे सर्व स्त्री-पुरुष व्याकुळ झाले. ज्या कुणाला ऐकायला मिळे, तो तिथेच डोके बडवून घेत होता. सगळीकडे विषाद पसरला. कुणाला धीर धरवेना. ॥ ४ ॥

दोहा—मुख सुखाहिं लोचन स्त्रवहिं सोकु न हृदयँ समाइ ॥

मनहुँ करुन रस कटकई उतरी अवध बजाइ ॥ ४६ ॥

सर्वांची तोंडे सुकून गेली, डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते आणि हृदयात दुःख मावत नव्हते. जणू करुणरसाच्या सेनेने अयोध्येवर डंका वाजवत आक्रमण केले होते. ॥ ४६ ॥

मिलेहि माझ बिधि बात बेगारी । जहँ तहँ देहिं कैकइहि गारी ॥

एहि पापिनिहि बूझि का परेऊ । छाइ भवन पर पावकु धरेऊ ॥

सर्व जुळून आले होते. इतक्यात विधात्याने सर्व बिघडून टाकले. जिकडे-तिकडे कैकेयीला लोक शिव्या देऊ लागले. ‘ या पापिणीला काय अवदसा आठवली की, हिने शाकरलेल्या चांगल्या घराला आग लावली. ॥ १ ॥

निज कर नयन काढ़ि चह दीखा । डारि सुधा बिषु चाहत चीखा ॥

कुटिल कठोर कुबुद्धि अभागी । भइ रघुबंस बेनु बन आगी ॥

ही स्वतःच्या हाताने आपले डोळे फोडून डोळ्यांविना पाहू इच्छिते आणि अमृत टाकून देऊन विषाचा आस्वाद घेऊ इच्छिते. ही कठोर, कुटिल, निर्बुद्ध आणि अभागी कैकेयी रघुवंशरुपी वेळूच्या वनासाठी आग बनली. ॥ २ ॥

पालव बैठि पेड़ एहिं काटा । सुख महुँ सोक ठाटु धरि ठाटा ॥

सदा रामु एहि प्रान समाना । कारन कवन कुटिलपनु ठाना ॥

फांदीवर बसून हिने झाड तोडून टाकले. सुखाच्या वेळी भयंकर शोक निर्माण केला. श्रीरामचंद्र हिला नेहमी प्राणांसारखे प्रिय होते, मग हिने दुष्टपणा का केला, कळत नाही. ॥ ३ ॥

सत्य कहहिं कबि नारि सुभाऊ । सब बिधि अगहु अगाध दुराऊ ॥

निज प्रतिबिंबु बरुकु गहि जाई । जानि न जाइ नारि गति भाई ॥

कवि सांगतात, ते खरेच आहे. स्त्रीचा स्वभाव हा

 कोनत्याही प्रकारे कळणारा नाही. तो अथांग व रहस्यमय

 असतो. एक वेळ स्वतःचे प्रतिबिंब पकडता येईल, परंतु

 स्त्रियांची चाल काही समजत नाही. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: