Shri RamCharitManas Part 79
दोहा—सुतन्ह समेत नहाइ नृप बोलि बिप्र गुर ग्यानि
।
भोजन कीन्ह अनेक बिधि घरी पंच गइ राति ॥ ३५४ ॥
नंतर राजांनी व मुलांनी स्नान केले. राजांनी
ब्राह्मण, गुरु व कुटुंबीयांना बोलावून त्यांच्यासह अनेक प्रकारचे भोजन केले. इतके
होई तो पर्यंत पाच घटिका रात्र झाली. ॥ ३५४ ॥
मंगलगान करहिं बर भामिनि । भै सुखमूल मनोहर
जामिनि ॥
अँचइ पान सब कॉंहू पाए । स्त्रग सुगंध भूषित छबि
छाए ॥
सुंदर स्त्रिया मंगलगान करीत होत्या. ती
रात्र सुखाची आणि मनोहारक ठरली. सर्वांनी आचमन करुन पान-विडा घेतला. फुलांच्या
माळा, सुगंधी द्रव्ये इत्यादींनी विभूषित झालेले सर्वजण शोभून दिसत होते. ॥ १ ॥
रामहि देखि रजायसु पाई । निज निज भवन चले सिर नाई
॥
प्रेम प्रमोदु बिनोदु बड़ाई । समउ समाजु मनोहरताई
॥
श्रीरामचंद्रांना पाहून व त्यांची आज्ञा घेऊन
व त्यांना नमस्कार करुन सर्वजण आपापल्या घरी गेले. तेथील प्रेम, आनंद, विनोद,
महत्त्व, वेळ, समुदाय आणि मनोहरता ॥ २ ॥
कहि न सकहिं सत सारद सेसू । बेद बिरंचि महेस
गनेसू ॥
सो मैं कहौं कवन बिधि बरनी । भूमिनागु सिर धरइ कि
धरनी ॥
हे सर्व सरस्वती, शेष, वेद, ब्रह्मदेव,
महादेव आणि गजानन हे सुद्धा सांगू शकणार नाहीत. मग मी ते कसें वर्णन करुन सांगणार
बरे ? गांडूळ कधी पृथ्वीला शिरावर घेईल काय ? ॥ ३ ॥
नृप सब भांति सबहि सनमानी । कहि मृदु बचन बोलईं
रानी ॥
बधू लरिकनीं पर घर आईं । राखेहु नयन पलक की नाईं
॥
राजांनी सर्वांचा सर्व प्रकारे सन्मान करुन,
गोड बोलून राण्यांना बोलावले आणि सांगितले की, सुना अजुनी लहान आहेत, परक्या घरी आल्या आहेत. डोळ्यांची काळजी पापण्या घेतात,
त्याप्रमाणे त्यांची काळजी घ्या, ॥ ४ ॥
दोहा—लरिका श्रमित उनीद बस सयन करावहु जाइ ।
अस कहि गे बिश्रामगृहँ राम चरन चितु लाइ ॥ ३५५ ॥
मुले थकून गेली आहेत. त्यांना झोपेने घेरले
आहे. त्यांना नेऊन झोपवा. ‘ असे म्हणून राजा श्रीरामांच्या चरणी मन लावून आपल्या
विश्रामस्थानी गेले. ॥ ३५५ ॥
भूप बचन सुनि सहज सुहाए । जरित कनक मनि पलँग डसाए
।
सुभग सुरभि पय फेन समाना । कोमल कलित सुपेतीं
नाना ॥
राजांचे स्वभावतः सुंदर वचन ऐकून राण्यांनी
रत्नजडित सुवर्णाचे पलंग घातले. गाद्यांवर गाईच्या दुधाच्या फेसाप्रमाणे सुंदर,
कोमल व शुभ्र पलंगपोस घातले. ॥ १ ॥
उपबरहन बर बरनि न जाहीं । स्त्रग सुगंध मनिमंदिर
माहीं ॥
रतनदीप सुठि चारु चँदोवा । कहत न बनइ जान जेहिं
जोवा ॥
सुंदर उश्यांचे तर वर्णन करता येणार नाही.
रत्नजडित मंदिरांना फुलांच्या माळा व सुगंधित द्रव्यांनी सजविले होते. सुंदर
रत्न-दीप व चांदवे यांची शोभा सांगवत नव्हती. ज्याने पाहिले असेल, त्यालाच ती
कळेल. ॥ २ ॥
सेज रुचिर रचि रामु उठाए । प्रेम समेत पलँग पौढ़ाए
॥
अग्या पुनि पुनि भाइन्ह दीन्ही । निज निज सेज सयन
तिन्ह कीन्ही ॥
अशा प्रकारे सुंदर शय्या सजविल्यावर मातांनी
श्रीरामांना उचलून मोठ्या प्रेमाने पलमगावर झोपविले. श्रीरामांनी भावांना वारंवार
आज्ञा केली, तेव्हा तेही आपापल्या शय्येवर झोपले. ॥ ३ ॥
देखि स्याम मृदु मंजुल गाता । कहहिं सप्रेम बचन
सब माता ॥
मारग जात भयावनि भारी । केहि बिधि तात ताड़का मारी
॥
श्रीरामांचे सावळे-सुंदर व कोमल अवयव पाहून
सर्व माता प्रेमाने म्हणू लागल्या, ‘ हे लाडक्या, जाताना वाटेत तुम्ही भयंकर ताडका
राक्षसीला कसे मारले ? ॥ ४ ॥
दोहा—घोर निसाचर बिकट भट समर गनहिं नहिं काहु ॥
मारे सहित सहाय किमि खल मारीच सुबाहु ॥ ३५६ ॥
जे युद्धात कोणालाही जुमानत नसत, त्या महान
योद्धे असलेल्या मारीच व सुबाहू या भयंकर दुष्ट राक्षसांना व त्यांच्या अनुयायांना
तुम्ही कसे बरे मारले ? ॥ ३५६ ॥
मुनि प्रसाद बलि तात तुम्हारी । ईस अनेक करवरें
टारी ॥
मख रखवारी करि दुहुँ भाईं । गुरु प्रसाद सब
बिद्या पाईं ॥
हे बाळांनो ! इडा-पीडा टळो. मुनींच्या
कृपेमुळेच ईश्र्वराने तुमच्यावरील कित्येक संकटे दूर केली. दोघा भावांनी यज्ञाचे
रक्षण करुन गुरुंच्या कृपेने सर्व विद्या मिळविल्या. ॥ १ ॥
मुनितिय तरी लगत पग धूरी । कीरति रही भुवन भरि
पूरी ॥
कमठ पीठि पबि कूट कठोरा । नृप समाज महुँ सिव धनु
तोरा ॥
चरणांच्या धुळीचा स्पर्श होताच मुनि-पत्नी
अहल्या तरुन गेली. जगभरात ही कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. कासवाची पाठ, वज्र व
पर्वत यांच्याहून कठोर शिव-धनुष्य तुम्ही सर्व राजांच्या समोर मोडून टाकले. ॥ २ ॥
बिस्व बिजय जसु जानकि पाई । आए भवन ब्याहि सब भाई
॥
सकल अमानुष करम तुम्हारे । केवल कौसिक कृपॉं
सुधारे ॥
विश्र्व-विजयी कीर्ती आणि जानकी मिळविली आणि
सर्व भावांचा विवाह करुन त्यांना घेऊन घरी आलात. तुमची सर्व कृत्ये अलौकिक आहेत.
ती केवळ विश्र्वामित्रांच्या कृपेने पूर्ण झाली. ॥ ३ ॥
आजु सुफल जग जनमु हमारा । देखि तात बिधुबदन
तुम्हारा ॥
जे दिन गए तुम्हहि बिनु देखें । ते बिरंचि जनि
पारहिं लेखें ॥
हे लाडक्यांनो ! तुमचे चंद्रमुख पाहून आज आम्ही जगात
जन्म घेतल्याचे सार्थक झाले. तुम्हांला न पाहता जे
दिवस गेले, ते ब्रह्मदेवांनी आमच्या आयुष्यात धरु नयेत. ‘
॥ ४ ॥
No comments:
Post a Comment