Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 9
तेथ
तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें ।
तेणें
तियेचेचि पीयूषें । प्राणु जिये ॥ २४१ ॥
२४१)
त्या वेळीं तृप्त होऊन समाधान झाल्यावर ती तोंडानें जें गरळ ओकतें, त्या गरळातील
अमृताच्या योगानें प्राणवायू जगतो.
तो
आगीआंतूनि निघे । परि सबाह्य निघवूंचि लागे ।
ते वेळीं
कसु बांधिती आंगें । सांडिला पुढती ॥ २४२ ॥
२४२) तो
गरळरुपी अमृताचा अग्नि तिच्या तोंडांतून निघतो खरा, परंतु तो अग्नि ज्या वेळेस आंत
व बाहेर शांतच करुं लागतो, त्या वेळेस सर्व गात्रांची गेलेली शक्ति पुन्हा येऊं
लागते.
मार्ग
मोडिती नाडीचे । नवविधपण वायूचें ।
जाय म्हणऊनि
शरीराचे । धर्मु नाहीं ॥ २४३ ॥
२४३)
नाड्यांचें वाहणें बंद पडतें व ( स्थानभेदानें असणारे ) वायूचे नऊ प्रकार नाहींसे
होतात म्हणून शरीराचे धर्म राहात नाहींत.
इडा पिंगळा
एकवटती । गांठी तिन्ही सुटती ।
साही पदर
फुटती । चक्रांचे हे ॥ २४४ ॥
२४४)
इडा व पिंगला ह्या दोन्ही नाड्या एक होतात आणि तिन्ही गांठी सुटून चक्रांचे पदर
फुटतात.
मग शशी आणि
भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु ।
तो वातीवरी
पवनु । गिंवसितां न दिसे ॥ २४५ ॥
२४५)
अनुमानिक कल्पनेनें ठरविलेले डाव्या व उजव्या नाकपुडींतून वाहणारे चंद्रसूर्यरुपी
वायू नाकापुढें कापूस धरुन पाहिलें तरी दिसत नाहींत.
बुद्धीची
पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे ।
तोही
शक्तीसवे संचरे । मध्यमेमाजी ॥ २४६ ॥
२४६) बुद्धीचा
आकार ( चैतन्यांत ) नाहींसा होतो. नाकामध्ये राहिलेली गंध घेण्याची जी शक्ति, ती
कुंडलिनीबरोबर सुषुम्ना नाडींत शिरते.
तंव
वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें ।
कानवडोनि
मिळे । शक्तिमुखीं ॥ २४७ ॥
२४७)
तेव्हां वरच्या बाजूस हळूहळू चंद्रामृताचें तळें कलतें होऊन तें चंद्रामृत
कुंडलिनीच्या मुखांत पडतें.
तेणें
नातकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे ।
जेथिंचा तेथ
मुरे । प्राणपवनु ॥ २४८ ॥
२४८)
त्या नळीनें ( कुंडलिनीनें ) रस भरतो, तो सर्वांगामध्यें संचार करतो व प्राणवायु
जेथल्या तेथें मुरतो.
तातलिये मुसे
। मेण निघोनि जाय जैसें ।
कोंदली राहे
रसें । वोतलेनि ॥ २४९ ॥
२४९)
तापलेल्या मुशीतील मेण निघून जाऊन ती मूस जशी नुसत्या ओतलेल्या रसानेंच भरुन
राहाते,
तैसें
पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे ।
वरी
त्वचेचेनि पदरें । पांगुरली असे ॥ २५० ॥
२५०)
त्याप्रमाणें शरीराच्या आकारानें जणूं काय त्वचेचा पदर पांघरलेलें मूर्तिमंत तेजच
प्रकट झालेलें असतें.
जैसी
आभाळाची बुंथी । करुन राहे गभस्ती ।
मग फिटलिया
दीप्ति । धरुं नये ॥ २५१ ॥
२५१)
सूर्यावर ढगांचे आवरण आलें असतां त्याचें तेज झांकलेले असतें. पण तें ढगांचे आवरण
निघून गेल्यावर मग त्याचें तेज जसें आवरुन धरता येत नाही;
तैसा
आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातवडा ।
तो झडोनि
जाय कोंडा । जैसा होय ॥ २५२ ॥
२५२)
त्याप्रमाणें वरवर असणारा कातड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो.
मग
काश्मीराचे स्वयंभ । कां रत्नबीजा निघाले कोंभ ।
अवयवकांतीची
भांव । तैसी दिसे ॥ २५३ ॥
२५३) मग
जणूं काय मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरुप बीजास निघालेले अंकुरच कीं काय, अशी
अवयवांच्या कांतीची शोभा दिसते.
नातरी
संध्यारागींचे रंग । काढूनि वळिलें तें आंग ।
कीं
अंतरर्ज्योतीचें लिंग । निर्वाळिलें ॥ २५४ ॥
२५४)
अथवा संध्याकाळच्या आकाशरंगाचे रंग काढून बनविलेली मूर्ति किंवा प्रत्यक्ष
आत्म्याचें शुद्ध लिंगच.
कुंकुमाचें
भरींव सिद्धरसाचें वोतींव ।
मज पाहतां
सावेव । शांतिचि ते ॥ २५५ ॥
२५५)
केशरानें पूर्ण भरलेलें किंवा अमृताचें ओतलेलें, अथवा तें पाहतांना मला असें
वाटतें कीं, ती मूर्तिमंत शांतीच आहे.
ते
आनंदचित्रींचे लेप । नातरी महासुखाचें रुप ।
कीं
संतोषतरुचें रोप । थांबलें जैसें ॥ २५६ ॥
२५६)
तें ( योग्याचें शरीर ) आनंदरुपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष
मूर्तीच, किंवा संतोषरुप झाडाचें असें कांहीं बळावलेलें रोप आहे.
तो
कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा ।
नाना
सासिंनला मळा । कोंवळिकेचा ॥ २५७ ॥
२५७) तो
( योगी ) सोनचाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजुकपणाचा भरास आलेला
मळाच;
हो कां जे
शारदियेचि बोले । चंद्रबिंब पाल्हेलें ।
कां तेजचि
मूर्त बैसलें । आसनावरी ॥ २५८ ॥
२५८)
किंवा शरद्ऋतुच्या ओलाव्यानें टवटवीत झालेलें चंद्रबिंब अथवा आसनावर बसलेलें
मूर्तिमंत तेजच कीं काय !
तैसें शरीर
होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये ।
मग देहाकृती
बिहे । कृतांतु गा ॥ २५९ ॥
२५९)
ज्या वेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्या वेळी शरीर असें होतें, मग त्या देहाच्या
आकाराला पाहून यम भितो.
वृद्धाप्य
तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे ।
लोपली उघडे
। बाळदशा ॥ २६० ॥
२६०)
म्हातारपण मागें फिरतें, तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था ( परत )
येते.
वयसा तरी
येतुलेवरी । एर्हवीं बळाचा बळार्थु करी ।
धैर्याची
थोरी । निरुपम ॥ २६१ ॥
२६१) वय
तर त्यांचे एवढेसें, तथापि जेवढीं कृत्यें बलवान पुरुष करुं शकतो, तेवढीं हा करतो,
आणि त्याच्या धैर्याच्या थोरवीला तर उपमा नाही.
कनकद्रुमाचां
पालवीं । रत्नकळिका नित्य नवी ।
नखें तैसीं
बरवीं । नवीं निघती ॥ २६२ ॥
२६२) सोन्याच्या
झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य नवी कळी यावी, तशी चांगलीं नवीं नखें येतात.
दांतही आन
होती । परि अपाडें सानेजती ।
जैसीं
दुबाहीं बैसे पांती । हिरेयांची ॥ २६३ ॥
२६३)
दांतहि नवे येतात. पण ते फार लहान असतात; व ते असे दिसतात कीं जणूं काय दुतर्फा
हिर्यांची रांगच बसली आहे.
माणिकुलियांचिया
कनिया । सावियाची अणुमानिया ।
तैसिया
सर्वांगीं उधवती अणिया । रोमांचिया ॥ २६४ ॥
२६४)
ज्याप्रमाणे माणिकाचें अणू एवढाले कण असावेत, त्याप्रमाणें सहजच सर्व अंगावर
रोमांचांचीं टोकें वर येतात.
करचरणतळें ।
जैसीं कां रातोत्पलें ।
पाखाळीं
होती डोळे । काय सांगों ॥ २६५ ॥
२६५)
तळहात व तळपाय हे तांबड्या कमळांप्रमाणें असतात; व डोळे किती स्वच्छ होतात हें काय
सांगूं !
निडाराचेनि
कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें ।
मग शिवणी
जैशी उलटे । शुक्तिपल्लवांची ॥ २६६ ॥
२६६) परिपूर्ण
दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोत्यें शिंपीच्या गर्भांत
तैशी
पातिचिये कवळिये न समाये । दिठी जाकळोनि निघों पाहे ।
आधिलिचि परी
होये । गगना कळिती ॥ २६७ ॥
२६७)
त्याप्रमाणें दृष्टि पापण्यांच्या पात्यांत न मावतां त्या पात्यांना व्यापून बाहेर
निघण्यास पाहते. दृष्टि पूर्वींचीच असते, परंतु ती आकाश व्यापणारी होते.
आइकें देह
होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें ।
जे आपा आणि
पृथ्वीचे । अंशु नाहीं ॥ २६८ ॥
२६८)
अर्जुना, ऐक. त्यांचा देह सोन्यासारख्या कांतीचा होतो; परंतु त्याला वायूसारखा
हलकेपणा येतो. कारण कीं त्यांच्यांत पृथ्वीचें व पाण्याचें अंश नसतात.
मग
समुद्रापैलाडी देखे । स्वर्गींचा आलोचु आइके ।
मनोगत
वोळखें । मुंगियेचें ॥ २६९ ॥
२६९) मग
तो समुद्राच्या पलीकडचे पाहातो, स्वर्गांतील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातील भाव
ओळखतो;
पवनाचा
वारिका वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे ।
येणें येणें
प्रसंगें । येती बहुता सिद्धि ॥ २७० ॥
२७०) वायुरुप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालला तरी
पाण्यांत पाऊल शिरत नाहीं. अशा अनेक सिद्धि त्यास
प्रसंगानुसार त्यास प्राप्त होतात.
No comments:
Post a Comment