ShukraStavaraj stotra
शुक्रस्तवराज स्तोत्र
शुक्रस्तवराज स्तोत्रम्
अस्य श्रीशुक्रस्तोत्रस्य
प्रजापतिऱ्ऋषिः I अनुष्टुप छन्दः I
शुक्रो देवता I
शुक्रप्रीत्यर्थम् जपे विनियोगः II
नमस्ते भार्गवश्रेष्ट दैत्यदानवपूजित I
वृष्टिरोधप्रकर्त्रे च वृष्टिकर्ते नमो नमः II १ II
देवयानिपितस्तुभ्यं वेदवेदांगपारग I
परेण तपसा शुद्धः शंकरो लोकसुंदर: II २ II
प्राप्तौ विद्यां जीवनाख्यां तस्मै शुक्रात्मने नमः I
नमस्तस्मै भगवते भृगुपुत्राय वेधसे II ३ II
तारामंडलमध्यस्थ स्वभासाभामितांबर I
यस्योदये जगत्सर्वं मंगलार्हम् भवेदिह II ४ II
अस्तं याते ह्यरिष्टम् स्वात्तस्मै मंगलरूपिणे I
त्रिपुरावासिनो दैत्यान् शिवबाणप्रपीडितान् II ५ II
विद्ययाSजीवयच्छुक्रो नमस्ते भृगुनंदन I
ययातिगुरवे तुभ्यं नमस्ते कविनंदन II ६ II
बलिराज्यप्रदो जीवस्तस्मै जीवात्मने नमः I
भार्गवाय नमस्तुभ्यं पूर्वगीर्वाणवंदित II ७ II
जीवपुत्राय यो विद्यां प्रादात्तस्मै नमो नमः I
नमः शुक्राय काव्याय भृगुपुत्राय धीमहि II ८ II
नमः कारणरुपाय नमस्ते कारणात्मने I
स्तवराजमिमं पुण्यं भार्गवस्य महात्मनः II ९ II
यः पठेत्श्रुणुयाद्वापि लभते वांछीतं फलं I
पुत्रकामो लभेत्पुत्रान् श्रीकामो लभते श्रियम् II १० II
राज्यकामो लभेद्राज्यं स्त्रीकामः स्त्रीयमुत्तमाम् I
भृगुवारे प्रयत्नेन पठितव्यं समाहितैः II ११ II
अन्यवारे तु होरायां पूजयेभ्दृगुनंदनम् I
रोगार्तो मुच्यते रोगाभ्दयार्तो मुच्यते भयात् II १२ II
यद्यत्प्रार्थयते जन्तुस्तत्तप्राप्नोति सर्वदा I
प्रातःकाले प्रकर्तव्या भृगुपूजा प्रयत्नतः I
सर्वपापविनिर्मुक्तः प्राप्नुयाच्छीवसंनिधिम् II १३ II
इति श्री ब्रह्मयामले शुक्रस्तोत्रम् संपूर्णं II
शुक्रस्तवराज स्तोत्रम् चा मराठी अर्थ:
या शुक्रस्तोत्राचा प्रजापति हा ऋषी आहे. अनुष्टुप हा छन्दःआहे. या स्तोत्राची शुक्रही देवता आहे. शुक्रासाठी या जपाचा विनियोग आहे.
१) भार्गव श्रेष्टाला माझा नमस्कार. त्याची दैत्य व दानव पूजा करितात. तो पाऊस पाडणारा आहे व पाऊसाचा अवरोध करणाराही आहे. त्याला माझा नमस्कार असो.
२) वेद व वेदांगात पारंगत असलेल्याला व देवयानीचा पिता असलेल्याला अशा शुक्राला माझा नमस्कार असो.
३) भृगुपुत्र असलेल्या, जो विद्या देणारा, ज्ञान देणारा आहे अशा शुक्राला; मी मला ज्ञान व विद्या प्राप्त व्हावी म्हणून नमस्कार
करतो.
४) स्वतःच्या भासाने तारामंडलांत मध्यभागी विराजमान
होऊन त्याच्या उदयाबरोबर या जगांतील वातावरण मंगलमय करणारा असा हा शुक्र आहे.
५) सर्व अरिष्टाचा अस्त करणारा असा हा मंगलरुपी (शुक्र) शिव बाणांनी पिडीत झालेल्या त्रिपुरावासी दैत्यांना साहाय्य करणारा आहे.
६) हे भृगुनंदना, हे कविनंदना, हे ययाति राजाच्या गुरु व जीवन विद्या देणाऱ्या शुक्रा तुला मी नमस्कार करतो.
७) बळीराजाला राज्य मिळवून देणाऱ्या व दिव्य, स्वर्गीय विभूतींनी वंदिलेल्या भार्गवाला (शुक्राला) माझा नमस्कार
असो.
८) गुरुपुत्राला (कचाला) विद्या देणाऱ्या शुक्राला माझा नमस्कार
असो. काव्य देणाऱ्या भृगुपुत्राला नमस्कार असो.
९) हे शुक्राचे स्तवराज स्तोत्र फार पवित्र व पुण्यप्रद आहे.
१०) जो हे स्तोत्र म्हणेल किंवा ऐकेल त्याच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. पुत्राची इच्छा असणाऱ्याला पुत्राची प्राप्ती होते. धनाची इच्छा करणाऱ्याला धनाची प्राप्ती होते.
११-१३) राज्याची इच्छा करणाऱ्यास राज्याची व स्त्रीची इच्छा करणाऱ्याला उत्तम स्त्रीची प्राप्ती होते. शुक्रवारी हे स्तोत्र म्हणावेच व अन्य वारी शुक्राच्या होर्यांत हे स्तोत्र म्हणावे व भृगुनंदनाचे पूजन करावे. रोग्याची रोगांतून व भयग्रस्ताची भयापासून सुटका होते. जे जे प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना केले असेल ते ते सर्व शुक्राकडून प्राप्त होते. प्रातःकाळी भृगुपुत्राची प्रयत्नपूर्वक पूजा करावी. असे करणारा सर्व पापांतून मुक्त होतो व अंती शिव सानिध्यांत राहतो.
अशा रीतीने हे ब्रह्मयामलांतील शुक्रस्तोत्र संपूर्ण झाले.
ShukraStavaraj Stotra
Custom Search
No comments:
Post a Comment