Shri Navaratri Aarati
Shri Navaratri Aarati is in Marathi. This is a very wonderful creation of shri Ramadas Swami. In the Navaratri festival this is a very special aarati which is sung with very much devotion by many families while celebrating Navaratri festival. Navaratri is a festival of Goddess Durga. This is a festival of mainly nine days from Ashwin Shuddha pratipaoa to Ashwin Shuddha Navami and the tenth Day is called as VijayaDashami or Dasara. Every day is of unique importance and that is described in this aarati. These nine days are pious and are filled with tremendous power, spiritual Energy and devotional power. Any spiritual activity done during these days with concentration, faith and devotion is rewarded by the Goddess. Dasara is considered as a very pious day and any auspicious work can be started on this day. I pray and request Goddess Durga to bless us and give us happiness, health, wealth, peace and all our good desires may come true.
नवरात्रीची आरती
आश्र्विनशुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो ।
प्रतीपदेपासूनी घटस्थापना ती करुनी हो ।
मूलमंत्रजप करुनी भोवते रक्षक ठेवूनी हो ।
ब्रह्मा विष्णु रुद्र आईचे पूजन करीती हो ॥ १ ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तूरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।
उदोकारे गर्जति सकळ चामुंडा मिळुनी हो ॥ २ ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ ॥
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो ।
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळां हो ।
कंठीची पदकें कांसे पितांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ ३ ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥
चतुर्थीचे दिवशी विश्र्वव्यापक जननी हो ।
उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो ।
पूर्ण कृपें तारिसी जगन्माते मनमोहिनी हो ।
भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणी हो ॥ ४ ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥
पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो ।
अर्घ्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो ।
रात्रीचे समयीं करिती जाग्रण हरिकथा हो ।
आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडता हो ॥ ५ ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥
षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो ।
घेऊनि दिवत्या हस्ती हर्षें गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफळां हो ।
जोगवा मागता प्रक्षन्न झाली भक्तकुळां हो ॥ ६ ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥
सप्तमीचे दिवशी सप्तश्रृंग गडावरी हो ।
तेथे तूं नांदसी भोवंती पुष्पें नानापरी हो।
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो ।
भक्त संकटी पडतां झेलुनी घेसी वरचेवरी हो ॥ ७ ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥
अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो ।
सह्याद्रीपर्वती राहिली उभी जगज्जननी हो ।
मन माझे मोहिले शरण आलो तुजलागुनी हो ।
स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो ॥ ८ ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥
नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो ।
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो ।
आचार्य-ब्राह्मणा तृप्त केले कृपे त्वा करुनी हो ॥ ९ ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥
दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो ।
सिंहारुढ करि दारुण शस्त्रें अंबे त्वा घेऊनी हो ।
शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणी हो ।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो ॥ १० ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥
Shri
Navaratri Aarati
नवरात्रीची आरती
Custom Search
2 comments:
बहुत ही सुंदर लेख-
मांं काली के 108 नाम और मंत्र
धन्यवाद
उत्कृष्ट आर्टिकल के लिए आपका बहुत-बहुत धन्यवाद।
https://aadiyogi.org.in/
Post a Comment