Monday, December 21, 2015

Shri NavanathBhaktiSar Adhyay 11 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अकरावा ( ११ ) भाग १/२


Shri NavanathBhaktiSar Adhyay 11 
 Machchhindra and Gorksha came to a holy temple of God Shiva at Badrikedar. They bowed to God Shiva and praised him with devotion. God Shiva asked Machchhindra what is his desire. Then Machchhidra told him that He had brought Goraksha with him and Goraksha has to perform a rigorous 12 years tapas at Badrikedar. God Shiva told him that he knows everything at assured him that he himself will take care of Goraksha. So Machchhindra proceeded on his ThirthYatra after guiding Goraksha about his tapas. Machchhindra visited many holy places and at Setubandha he met with God Hanuman who was waiting for Machchhindra. Then he took him to women kingdom where Mainakini was lady queen of that kingdom. Hanuman told her as agreed by him that he will bring Machchhindra to her who can fulfil her desire and live with her. After some years Machchindra and Mainakaini were pleased by the birth of there son who was named as Meenanath. The second story in this adhyay is of a king Bruhadrava who was from Janmejay Vansha and performed a Somayaga for about a year. God Agni gave him blessings in the form of a son. This son was named as Jalindar and taken care off by king Bruhadrava and his wife Sulochana. As Jalindar grown up the king and queen were thinking of his marriage. Jalindar was not ready for marriage. He ran away in a forest where he mate his father-mother AgniNarayan. Now in the next 12th adhyay Dhunadi sut Malu who is from Narahari family, will tell us what next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अकरावा ( ११ ) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥ 
जयजयाजी इंदुशलाका । मुगुटमणे सकळटिळका ।
इंदिरापते विबुधजनका । भक्तिमानसा विराजित ॥ १ ॥
ऐसा धैर्यऔदार्यवंत । पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ । 
मागिले अध्यायी गहनीनाथ । जन्मोदय पावला ॥ २ ॥
यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ । महींची तीर्थें करीत ।  
हिमाचल बद्रिकेदारात । भ्रमण करीत पैं गेले ॥ ३ ॥
इतुकी कथा सिंहावलोकनीं । पूर्वाध्यायांत कीजे श्रवणी ।
असो गुरुशिष्य बद्रिकाश्रमीं । शिवालया पातले ॥ ४ ॥
बद्धांजळी जोडोनि कर । करिते झाले नमस्कार ।
नमस्कार करुनि जयजयकार । स्तुतिसंवादें आराधिलें ॥ ५ ॥
हे त्रिपुरारी शूळपाणी । अपर्णावर पंचाननी ।
रंडमाळा चिताभस्मी । दिव्यतेजभूषित तूं ॥ ६ ॥
हे कामांतका दक्षतेजा । भोळवट वरां देसी दानवां ।
कैलासपते महादेवा । सदाशिवा आदिमूर्ते ॥ ७ ॥
हे दिगंबरा जगजेठीं । भाळीं गंगा मौळीं जटाजूटी ।
नरकपाळ करसंपुटीं । इंदुकळेतें मिरविशी ॥ ८ ॥
उरगवेष्टन ( सर्पांचे वेष्टन ) कुरंगसाली । व्याघ्रांबर वसनपाली ।
गजचर्मादि मिति झाली । परिधाना महाराजा ॥ ९ ॥
हे कैलासवासा उमापती । दक्षजामाता आदिमूर्ती ।
चक्रचालका मायाभगवती । आम्हां दासा अससी तूं ॥ १० ॥
हे नीलग्रीवा आदिपीठ । करुणकरा उत्तमा श्रेष्ठ ।
स्वीकारुनि सर्व अरिष्ट । सुख देसी देवांसी ॥ ११ ॥
हे भाळदृष्टीत्रयार्थनयनी । डमरु त्रिशूळ विराजे पाणीं ।
सदा प्रिय वृषभ वाहनीं । भस्मधारणी महाराजा ॥ १२ ॥
हे स्मशानवासी वैराग्यशीळा । नगजामात रक्षपाळा ।
श्वेतवर्णा तमोगुणा आगळा । वाहसी गळां राममंत्र ॥ १३ ॥
हे सर्वाधीश विश्र्वपती । भिक्षाटणीं बहुत प्रीती ।
जटा पिंगटा त्रिपुंड्र लल्लाटीं । शुद्ध वीरगुंठी शोभतसे ॥ १४ ॥
फरशांकुश डमरु हातीं । लोप पापा पातोपातीं ।
षडाननताता सुत गणपती । विद्यालक्षणीं मिरविसी ॥ १५ ॥
ऐसी स्तुति अपार वचनीं । करीर मच्छिंद्र बद्रिकाश्रमीं ।
स्तुति ऐकूनि प्रेमें उगमी । प्रगट झाला महाराज ॥ १६ ॥    
मग मच्छिंद्राचा धरुनि हस्त । सप्रेम त्यातें आलिंगित । 
निकट बैसवूनि पुसे त्यातें । योगक्षेम कैसा तो ॥ १७ ॥
गोरक्षातें घेऊनि जवळी । मुख स्वकरें कुरवाळी ।
म्हणे बा उदय येणें कालीं । हरिनारायण झालासी ॥ १८ ॥
ऐसें वदोनी आणिक वदत । हे महाराज मच्छिंद्रनाथ ।
हा तव शिवयोगें सुत । तारक होईल ब्रह्मांडा ॥ १९ ॥
म्यां पूर्वीच यातें पाहिलें होतें । म्हणशील तरी कनकगिरीतें ।
तुवां अभ्यासूनि सुतें । आणिल दैवत घरातें ॥ २० ॥
श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत । भैरव काळिका वीरांसहित ।
पाचारितां मीही तेथ । आलों होतों महाराजा ॥ २१ ॥
तस्मात् पूर्वीची होय ओळखी । म्हणवूनि गोरक्ष घेतला अंकीं ।  
परी आतां असो शेखी  । एक वचन ऐकिजे ॥ २२ ॥
यातें विद्येतें अभ्यासिलें । परी तपाविण विगलित ठेलें ।
जैसें शत्रु जगत्रयीं झाले । मग तें हिनत्व प्रतापा ॥ २३ ॥
कीं जीवनाविण वृक्ष जैसा । काळरुप भासे तैसा । 
कीं तरुविण ग्राम जैसा । बुभुक्षित लागतसे ॥ २४ ॥
कीं नाकेंविण सुंदर नारी । कीं विनातोय सरितापात्रीं ।
कीं नक्षत्राविण शोभा रात्रीं । कदाकाळी दिसेना ॥ २५ ॥
तरी तपाविण लखलखीत । विद्याभांडार न दिसत ।
जैसा मानव परम क्षुधित । विकळ शरीरीं मिरवतसे ॥ २६ ॥
तरी आतां माझिया आश्रमीं । तपा बैसवीं योगद्रुमी ।
मग तपबळानें बलाढ्यगामी । विद्याअस्त्रें मिरवेल हा ॥ २७ ॥
याउपरीं मच्छिंद्रनाथ बोलत । वय धाकुटें बाळ अत्यंत ।
परी तप तीव्रक्लेशांत । साहिलें जाईल कैसें जी ॥ २८ ॥
येरु म्हणे वरदपाणी । तुझ्या आहे मौळिस्थानीं ।
तरी तपक्लेशावर कडसणी । दुःख देणार नाहीं बा ॥ २९ ॥
यापरी येथें नित्यनित्य । मी समाचारीनें गोरक्षातें । 
तूं निःसंशय सकलातें । तपा गोरक्षा बैसवीं ॥ ३० ॥
ऐसें वदतां आदिनाथ । अवश्य मच्छिंद्रनंदन म्हणत । 
उत्तम आहे ऐसें बोलत । अंगिकारिता पैं झाला ॥ ३१ ॥
तेथें आमुचें काय हरलें । कीं जन्मांधा चक्षू आले ।
कीं सदैव हरिणीतें सांभाळिले । एकटपणीं पावसांत ॥ ३२ ॥
तेवीं तूं आणि तुझा दास । येथें आश्रमीं करितां वास ।
तेथे वाईट काय आम्हांस । चिंता माझी निरसेल ॥ ३३ ॥
ऐसी शिवातें बोलूनि वाणी । परी हर्ष न माये मच्छिंद्रमनीं ।
जें योजिलें होते अंतःकरणीं । तेचि घडूनि पैं आले ॥ ३४ ॥
फारचि उत्तमोत्तम झालें । गोरक्षासी शिवें अंगिकारिलें ।
आतां जाईल संगोपिलें । अर्थअर्थी बहुवसें ॥ ३५ ॥
मग उत्तम वेळा उत्तम दिवस । ग्रहबळ जाणूनि नक्षत्रास ।
उत्तम तिथी उत्तम मास । पाहूनि तपा बैसविला ॥ ३६ ॥
लोहाचा करुनि कंटक नीट । त्या अग्रीं योजूनि चरणांगुष्ठ ।
वामपादा देऊनि कष्ट । उभा राहिला गोरक्ष तो ॥ ३७ ॥
वायुआहारीं ठेवूनि मन । क्षणिक अन्न त्यजून ।
उपरी फळपत्रीं आहार करुन । क्षुधाहरण करीतसे ॥ ३८ ॥
सूर्यमंडळी ठेवूनि दृष्टी । तपो करितसे तपोजेठी ।
तें मच्छिंद्र पाहूनि निजदृष्टीं । परम चित्तीं तोषिला ॥ ३९ ॥
मग आदिनाथा विनवोनी । मच्छिंद्र निघाला तीर्थाटनीं ।
द्वादश वर्षांचा नेम करुनी । गोरक्षातें सांगितलें ॥ ४० ॥
असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी । येरीकडे बद्रिकाश्रमीं ।
रात्रंदिवस बद्रिकाशूळपाणी । जवळी जाऊनि बैसला ॥ ४१ ॥
वस्यें आपण आदिनाथ । गोरक्षाचें दास्य करीत ।
मागें पुढें राहुनि अत्यंत । आल्या विघ्ना निवटीतसे ॥ ४२ ॥
असो यावरी मच्छिंद्रनाथ । गया प्रयाग करुनि त्वरित ।
काशी अवंतिका मिथुळासहित । मथुरा काश्मिरी पाहिली ॥ ४३ ॥
अयोध्या द्वारका महाकाळेश्र्वर । सोमनाथ करुनि तत्पर ।
ब्रह्मगिरी त्रंबकेश्र्वर । घृणेश्र्वर पाहिला ॥ ४४ ॥
भीमा उगमीं भीमाशंकर । आंवढ्या नागनाथादि पंढरपूर ।
करुनि चौदा पीठें थोर । भगवतीची पाहिली ॥ ४५ ॥
कार्तिक शेषाद्रि मल्लिकार्जुन । सरितासरोवरी अपार 
स्नान ।
घडलें करितां महीतें गमन । लोटली वर्षे द्वादशादि ॥ ४६ ॥
सकळ तीर्थें महीचीं करुन । शेवटी सेतुबंधी जाऊन ।
रामेश्र्वराचे चरण वंदून । स्नाना गेला अब्धीसी ॥ ४७ ॥
तों श्र्वेतबंधी वायुसुत । जाऊनि नमी मच्छिंद्रनाथ ।
परी मच्छिंद्रा पाहतां मकरध्वजतात । आल्हादला चित्तीं बहुत तो ॥ ४८ ॥
परमप्रीतीं लवडसवडी । मच्छिंद्रहस्त धरुनि ओढी । 
हृदयीं आलिंगूनि परम आवडीं । निकट बैसवी महाराजा ॥ ४९ ॥
म्हणे बा तूं योगद्रुमानें । कोणीकडे केले येणें ।
चोवीस वर्षी तुझें दर्शन । आजि झाले महाराजा ॥ ५० ॥
कीं आळशावरी गंगा वळली । कीं द्वादश वर्षे पर्वणी आली ।
तैसी माते गोष्ट जाहली । आज दर्शनें तुझ्या बा ॥ ५१ ॥
ऐसें बोलूनि वायुसुत । परम मच्छिंद्राचें आतिथ्य करीत ।
मग समय पाहूनि संतोषयुक्त । मच्छिंद्रातें बोलतसे ॥ ५२ ॥
आज चोवीस संवत्सर झाले । परी तुजकडे माझे चक्षु लागले ।      
कैं भेटसील म्हणोनि भुकेले । पारणें फिटलें आजि तें ॥ ५३ ॥
हे महाराज योगद्रुमा । कामनीं वेधली जो आम्हां ।
त्या सरिताप्रवाहीं हस्तवर उगमा । बुडवितो मजलागीं ॥ ५४ ॥
तरी त्या कामनाजळांत । तूं तारक झाला आहेसी मातें ।
झालासी परी अद्यापपर्यंत । बाहेर न काढिसी महाराजा ॥ ५५ ॥
पूर्वी मजला देऊनि वचन । तुवां केलें आहे गमन । 
परी स्त्रीराज्याचें स्थान । पाहिलें तुवां नाहीं कीं ॥ ५६ ॥
आतां तरी धरुनि चित्तीं । प्रसन्न करी कृपाभगवती ।
मैनाकिनीची कामरती । पूर्ण आहुति घेई कां ॥ ५७ ॥
आपुले वचनेंकरुनि त्याचें । आणिक फल दे मम वचनाचें ।
मग पावूनि आर्त मनीचें । सुटका केव्हां होईल ॥ ५८ ॥   
मी गुंतलों तिचे वचनीं । कीं मच्छिंद्र पाठविन ये भुवनीं ।
तरी ते रतिसुखाच्या कामाश्रमीं । मच्छिंद्रनाथा मिरविजे ॥ ५९ ॥
ऐसें वचन तींतें व्यक्त । आहे तरी मज करा मुक्त ।
आणि तुवांही वचन दिधलें मातें । तेंही सत्य करीं आतां ॥ ६० ॥
ऐसी ऐकूनि हनुमंतवाणी । अवश्य म्हणे मच्छिंद्रमुनी ।
मग त्रिरात्र तेथें वस्ती करुनी । निघते झाले उभयतां ॥ ६१ ॥ 
मार्गी जातां अनेक तीर्थें । यथाविधि झाले सरिते ।
मग गौडबंगाला टाकूनि त्वरितें । स्त्रीराज्यांत संचरले ॥ ६२ ॥
तंव ती सकळ स्त्रियांची स्वामिनी । विराजलीसे राज्यासनीं ।
महापुण्यांशें तपोखाणी । मैनाकिनी ज्ञानकळा ॥ ६३ ॥
शृंगारमुरड उत्तमजन । तेथें भोगीतसे राज्यासन । 
गज वाजी उदधी रत्न । रथ उष्ट्रादि असती पैं ॥ ६४ ॥
छडीदार चोपदार । रत्नपारख हेमकार । 
राउतपूर्ण भांडार । पोतदार फरासी ॥ ६५ ॥
यंत्रधारी मंत्रधारी । नानामंत्री असती कुसरी । 
शास्त्रनिपुण कारभारी । लेखकही सेवा विराजले ॥ ६६ ॥
जासुद हलकारे वकीलात । करुं जाणती सकळ समंतात ।
पायदळ अश्र्वराउत । नसे गणित पृतनेतें ॥ ६७ ॥
कुत्तेवान चित्तेवान । साकरखाणी पहिलवान ।
दिवाणादि कपिलखान । गजमस्तकीं रुढती ॥ ६८ ॥
खिस्मतगारी करणार । सिकारकी बंडीदार । 
ताशा मरफी पनवाळ थोर । कुशळपणीं वाजविती ॥ ६९ ॥
गायक हेर बातमीदार । खेळक प्राज्ञी निपुणतर । 
वाद्यधारी शृंगारकर । शिंपी कुल्लाल विराजले ॥ ७० ॥
असो ऐसीं राजकारणें । बहुत असती कामें भिन्नें ।
परी सकळ समुदायकानें । स्त्रिया अवघ्या मिरवल्या ॥ ७१ ॥
असो अवघ्या कटकांत । संचरते झाले उभयतां नगरांत ।
राजद्वारीं जाऊनि त्वरित । झाले दृष्टीस रायासी ॥ ७२ ॥
दृष्टीं पाहतांच अंजनीसुत । स्त्रियांसी आनंद झाला बहुत ।
बोलावूनि त्वरितात्वरित । कनकासनीं बैसविलें ॥ ७३ ॥
एकासनीं मच्छिंद्रनाथ । एकासनी अंजनीसुत ।
षोडशोपचारीं पूजूनि त्वरित । बद्धांजली केली तैं ॥ ७४ ॥
म्हणे महाराजा दिव्यरथा । वातनंदना अंजनीसुता ।
द्वितीय कोण सांग आतां । आगमन झालें महाराजा ॥ ७५ ॥
येरु म्हणे वो शुभाननी । त्वां बैसूनि तपा प्राज्ञी ।
तरी त्या तपाच्या कामना मनीं । पूर्ण करीं आतां वो ॥ ७६ ॥
मम भक्तीचे वरदावळीं । कीं पुरुष लाधशील मच्छिंद्र बळी ।
तरी तोचि हा होय येणें काळीं । रतिसुखा निववावें ॥ ७७ ॥
कीं सेवेलागीं उडुगणनाथ ( नक्षत्राधिपती चंद्र ) । कीं अरुणासह पूर्ण आदित्य । 
तेवीं तूंतें मच्छिंद्रनाथ । काम व्यक्त पुरवावया ॥ ७८ ॥
कीं शचीलागीं सहस्त्रनयनी । कीं शोभला जैसा शिव अपर्णी ।
तेवीं तूतें मच्छिंद्रमुनी । रतिसुखा हेलावे ॥ ७९ ॥
ऐसें बोलोनि वज्रशरीरी । निवांत बैसला आसनावरी ।
मग राहूनि तेथें तीन रात्री । निघता झाला कपिराज ॥ ८० ॥
पुन्हां श्र्वेतपदा येऊनि । करीत बैसला श्रीरामचिंतन ।
येरीकडे मच्छिंद्रनंदन । सुखामाजी हेला वे ॥ ८१ ॥
बैसूनियां कनकासनीं । राज्याविलासा भोगी मुनी ।
मुक्तमाळा ग्रीवेलागुनी । हेलावती समोर ॥ ८२ ॥
हेममुद्रिका ओपूनि कर्णीं । हस्त विराजले कनककोंदणी ।
भरजरी भूषणें हेमकर्णी । ढाळ देती लखलखीत ॥ ८३ ॥
 पुढें सेवे परिचारिका । परी त्याही दारा लावण्यलतिका ।
उर्वशीच्या सारुनि आवांका । सेवेलागीं उतरल्या ॥ ८४ ॥ 
बडीजाई बडीदार । वारंवार करिती पुकार । 
छडीदार चोपदार । दवलतजादा म्हणताती ॥ ८५ ॥
मुक्तलवंगांचे तुरे माळी । कस्तुरी शोभे केशर भाळीं ।
राज्यासनीं स्त्रिायामंडळी । सुशोभित भंवतालीं ॥ ८६ ॥
जैसा नभांत तारांगणीं । वेष्टित शोभला उडुगणस्वामी ।
तेवीं स्त्रियांत मच्छिंद्रमुनी । निजभारीं शोभला ॥ ८७ ॥
कीं देवगणीं शचीनाथ । परम शोभिवंत घवघवीत ।
तेवीं स्त्रीमंडळींत । मच्छिंद्रनाथ मिरवला ॥ ८८ ॥
सदा बैसूनि एका आसनीं । खेळ खेळती द्यूतकर्मी ।
नाना विनोदून विनोदवाणी । हास्य करिती गदगदां ॥ ८९ ॥
राज्यवैभवादि कारभार । स्वयें करिती सारासार ।
नानाकुशलता  अपार । निजदृष्टीं पाहतसे ॥ ९० ॥
रसायनीं कविताकार । वेदज्ञ बोलती शास्त्र अपार ।
ज्योतिष भविष्य जाणणार । व्याकरणादिक मिरवले ॥ ९१ ॥
धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ । कीं भिन्न पाहती प्रळयकाळ ।
जळ तें निर्मील विशाळ । उभे असती सन्मुख ॥ ९२ ॥
संगीतकार गायनप्रकारी । गंधर्वसरी तानमानी कळाकुसरी ।
औषधीक वैद्य रोगापरी । परीक्षिकी मीनले ते ॥ ९३ ॥
अश्र्वारोहण उत्तमयुक्तीं । अश्र्व फिरवणें वाताकृती ।
कोकशास्त्र भाष्याकृती । स्वर्गाचाराचे सकळिक ॥ ९४ ॥
नाटककळा सकळी शृंगारीत । आणूनि टेंकती राजसंमत ।
प्रसंगानुसार वाचे वदत । बोलूं जाण ती चातुरी ॥ ९५ ॥
ऐसिया गुणांचे उत्तम भरत । हेलावती राजसभेत ।
तेणें चित्तसरितेंत । आनंदतोय हेलावे ॥ ९६ ॥
तेणेंकरुनि मच्छिंद्रनाथ । सुखाब्धीचा मीन तळपत ।
ऐसे लोटले दिवस बहुत । रतिसुखामाझारीं ॥ ९७ ॥
तों समयें चित्तसुखमेळीं । ऋतु पावली राजबाळी ।
ते कामरतीचे सुखवेळीं । गरोदर झाली ते दारा ॥ ९८ ॥
तो गणामाजी भद्रजाती । सर्वगुणी मुनी भद्रमूर्ती ।
अंशरुपें प्रगटूनि रती । देह धरिता पै झाला ॥ ९९ ॥
रेतरक्त जेणें काळीं । लोटत मासां नवांचे मेळी ।

तदनंतर प्रसूत झालिया बाळी । बाळ बालार्क देखिला ॥ १०० ॥
Shri NavanathBhaktiSar Adhyay 11
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अकरावा ( ११ )

Custom Search

No comments: