KikshindhaKanda Part 4 ShriRamCharitManas
दोहा—कह बाली सुनु भीरु
प्रिय समदरसी रघुनाथ ।
जौं कदाचि मोहि मारहिं तौ
पुनि होउँ सनाथ ॥ ७ ॥
वाली म्हणाला, ‘ हे
घाबरट प्रिये, ऐकून ठेव. श्रीरघुनाथ हे समदर्शी आहेत. जर कदाचित त्यांनी मला
मारले, तर मला परमपद मिळेल. ‘ ॥ ७ ॥
अस कहि चला महा अभिमानी ।
तृन समान सुग्रीवहि जानी ॥
भिरे उभौ बाली अति तर्जा ।
मुठिका मारि महाधुनि गर्जा ॥
असे म्हणून तो अहंकारी
वाली सुग्रीवाला गवताप्रमाणे तुच्छ मानून भिडला आणि त्याला ठोसा देऊन त्याने
मोठ्याने गर्जना केली. ॥ १ ॥
तब सुग्रीव बिकल होइ भागा ।
मुष्टि प्रहार बज्र सम लागा ॥
मैं जो कहा रघुबीर कृपाला ।
बंधु न होइ मोर यह काला ॥
तेव्हा सुग्रीव व्याकूळ
होऊन पळाला. त्याला ठोसा हा वज्रासारखा लागला. सुग्रीवाने येऊन सांगितले की, ‘ हे
कृपाळू रघुवीर, मी तुम्हांला पूर्वीच सांगितले होते की, वाली हा माझा भाऊ नव्हे,
काळ आहे. ‘ ॥ २ ॥
एकरुप तुम्ह भ्राता दोऊ ।
तेहि भ्रम तें नहिं मारेउँ सोऊ ॥
कर परसा सुग्रीव सरीरा ।
तनु भा कुलिस गई सब पीरा ॥
श्रीराम म्हणाले, ‘
तुम्हां भावांचे एकसारखे रुप आहे. त्यामुळे मी त्याला मारु शकलो नाही. ‘ मग
श्रीरामांनी सुग्रीवाच्या शरीराला आपल्या हाताचा स्पर्श केला, त्यामुळे त्याचे
शरीर वज्रासारखे झाले आणि शरीर-पीडा नाहीशी झाली. ॥ ३ ॥
मेली कंठ सुमन कै माला ।
पठवा पुनि बल देइ बिसाला ॥
पुनि नाना बिधि भई लराई ।
बिटप ओट देखहिं रघुराई ॥
मग श्रीरामांनी
सुग्रीवाच्या गळ्यात फुलांची माळ घातली आणि त्याला प्रोत्साहन देऊन पाठविले.
दोघांमध्ये अनेक प्रकारे युद्ध सुरु झाले. श्रीराम वृक्षाआडून ते पाहात होते. ॥ ४
॥
दोहा—बहु छल बल सुग्रीव कर हियँ हारा भय मानि ।
मारा बालि राम तब हृदय माझ सर तानि ॥ ८ ॥
सुग्रीवाने पुष्कळ आक्रमक पवित्रे घेऊन
पाहिले, परंतु शेवटी भयामुळे तो हतोत्साह झाला. तेव्हा श्रीरामांनी बाण खेचून
वालीच्या छातीवर मारला. ॥ ८ ॥
परा बिकल महि सर के लागें । पुनि उठि बैठ देखि
प्रभु आगें ॥
स्याम गात सिर जटा बनाएँ । अरुन नयन सर चाप चढ़ाएँ
॥
बाण लागताच वाली व्याकूळ होऊन खाली पडला. परंतु
प्रभु रामांना पाहून तो उठून बसला. भगवंतांचे श्यामल शरीर आहे, मस्तकावर जटा आहेत.
नेत्र लालसर आहेत. धनुष्य-बाण सज्ज केलेले आहेत. ॥ १ ॥
पुनि पुनि चितइ चरन चित दीन्हा । सुफल जन्म माना
प्रभु चीन्हा ॥
हृदयँ प्रीति मुख बचन कठोरा । बोला चितइ राम की
ओरा ॥
वालीने वारंवार भगवंतांच्याकडे पाहून चित्त
त्यांच्या चरणीं लावले. प्रभूंना ओळखल्यामुळे त्याला आपला जन्म सफळ झाल्याचे
वाटले. त्याच्या मनात प्रेम होते, परंतु मुखात कठोर शब्द होते. तो
श्रीरामांच्याकडे पाहात म्हणाला, ॥ २ ॥
धर्म हेतु अवतरेहु गोसाईं । मारेहु मोहि ब्याध की
नाईं ॥
मैं बैरी सुग्रीव पिआरा । अवगुन कवन नाथ मोहि
मारा ॥
‘ हे स्वामी, तुम्ही धर्मच्या रक्षणासाठी
अवतार घेतला आहे, तर मग व्याधाप्रमाणे मला लपून का मारले ? तुम्हांला मी वैरी आणि
सुग्रीव प्रिय का ? हे नाथ कोणत्या दोषाकरिता तुम्ही मला मारले ? ‘ ॥ ३ ॥
अनुज बधू भगिनी सुत नारी । सुनु सठ कन्या सम ए
चारी ॥
इन्हहि कुदृष्टि बिलोकइ जोई । ताहि बधें कछु पाप
न होई ॥
श्रीराम म्हणाले, ‘ हे मूर्खा, ऐकून घे. लहान
भावाची पत्नी, बहीण, मुलची स्त्री आणि कन्या या चारीही सारख्या आहेत. यांच्याकडे
जो वाईट नजरेने पाहातो, त्याला मारण्यात कोणतेही पाप नसते. ॥ ४ ॥
मूढ़ तोहि अतिसय अभिमाना । नारि सिखावन करसि न
काना ॥
मम भुज बल आश्रित तेहि जानी । मारा चहसि अधम
अभिमानी ॥
हे मूर्खा, तुला फार अभिमान आहे. तू आपल्या
पत्नीच्या बोलण्यावर लक्ष दिले नाहीस. सुग्रीव हा माझ्या बाहुबलाचा आश्रित आहे. हे
माहीत असूनही अरे अधमा, गर्विष्ठ, तू त्याला ठार मारणार होतास. ॥ ५ ॥
दोहा—सुनहु राम स्वामी सन
चल न चातुरी मोरि ।
प्रभु अजहूँ मैं पापी
अंतकाल गति तोरि ॥ ९ ॥
वाली म्हणाला, ‘ हे
श्रीराम, स्वामीपुढे माझे शहाणपण चालू शकणार नाही. पण हे प्रभो, ( मला सांगा, )
अंतकाळी तुमचा आश्रय मिळूनही मी पापी राहिलो का ?’ ॥ ९ ॥
सुनत राम अति कोमल बानी ।
बालि सीस परसेउ निज पानी ॥
अचल करौं तनु राखहु प्राना
। बालि कहा सुनु कृपानिधाना ॥
वालीची ती अत्यंत
मृदुवाणी ऐकून श्रीरामांनी त्याच्या मस्तकाला आपल्या हाताचा स्पर्श केला आणि
म्हटले, ‘ मी तुझे शरीर दृढ करतो, तुझे प्राण वाचतील.’ वाली म्हणाला, ‘ हे
कृपानिधान, ऐकून घ्या. ॥ १ ॥
जन्म जन्म मुनि जतनु कराहीं
। अंत राम कहि आवत नाहीं ॥
जासु नाम बल संकर कासी ।
देत सबहि सम गति अबिनासी ॥
मुनिगण जन्मोजन्मी अनेक
प्रकारचे साधन करीत असतात. तरीही अंतकाळी त्यांच्या तोंडून रामनाम येत नाही.
ज्यांच्या नावाच्या बळावर शंकर हे काशीतील सर्वांना समानपणे मुक्ती देतात, ॥ २ ॥
मम लोचन गोचर सोइ आवा ।
बहुरि कि प्रभु अस बनिहि बनावा ॥
ते श्रीराम प्रत्यक्ष
माझ्या डोळ्यांसमोर आले आहेत. हे प्रभो, अशी संधी पुन्हा येईल काय ? ॥ ३ ॥
छंद—सो नयन गोचर जासु गुन नित नेति कहि श्रुति
गावहीं ।
जिति पवन मन गो निरस करि मुनि ध्यान कबहुँक
पावहीं ॥
मोहि जानि अति अभिमान बस प्रभु कहेउ राखु सरीरही
।
अस कवन सठ हठि काटि सुरतरु बारि करिहि बबूरही ॥ १
॥
श्रुती ‘ नेति-नेति ‘ म्हणून ज्यांचे गुणगान
करतात, आणि प्राण व मन जिंकून इंद्रियांना विषयांपासून विरक्त बनवून मुनिगण
ध्यानामध्ये ज्यांची क्वचितच एक झलक मिळवू शकतात, तेच तुम्ही प्रभू प्रत्यक्ष
माझ्याम समोर प्रकट आहात. तुम्ही मला अत्यंत अभिमानी मानून म्हटले की, ‘ तू शरीर
सोडू नकोस. परंतु जाणूनबुजून कल्पवृक्ष तोडून बाभळीचे कुंपण कोण मूर्ख करील ? (
म्हणजेच मोक्ष देणार्या तुम्हाला सोडून या नश्र्वर शरीराचे रक्षण कोण करील ? ) ॥
१ ॥
अब नाथ करि करुना बिलोकहु देहु जो बर मागऊँ ।
जेहिं जोनि जन्मौं कर्म बस तहँ राम पद अनुरागऊँ ॥
यह तनय मम सम बिनय बल कल्यानप्रद प्रभु लीजिऐ ।
गहि बाँह सुर नर नाह आपन दास अंगद कीजिऐ ॥
हे नाथ, आता माझ्यावर दयादृष्टी करा आणि मी
जो वर मागतो तो द्या. मी कर्मामुळे ज्या योनीत जन्म घेईन, तेथे हे श्रीरामा,
तुमच्या चरणी प्रेम करीत राहावे. हे कल्याणप्रद प्रभो, हा माझा अंगद विनय व बल या
बाबतीत माझ्यासारखाच आहे. याचा स्वीकार करा आणि हे देव व मनुष्य यांचे नाथ, याचा
हात धरुन याला आपला दास बनवा.’ ॥ २ ॥
दोहा—राम चरन दृढ़ प्रीति
करि बालि कीन्ह तनु त्याग ।
सुमन माल जिमि कंठ ते गिरत
न जानइ नाग ॥ १० ॥
श्रीरामांच्या चरणी दृढ
प्रेम ठेवून वालीने, हत्ती जसा गळ्यातील पुष्पमाला खाली पडल्याचे जाणत नाही,
त्याप्रमाणे सहजपणे शरीराचा त्याग केला.॥ १० ॥
राम बालि निज धाम पठावा ।
नगर लोग सब ब्याकुल धावा ॥
नाना बिधि बिलाप कर तारा ।
छूटे केस न देह सँभारा ॥
श्रीरामांनी बालीला
आपल्या परमधामी पाठविले. नगरातील सर्व लोक व्याकूळ होऊन धावत आले. वालीची पत्नी
तारा ही अनेक प्रकारे विलाप करु लागली. तिचे केस विस्कटले होते आणि तिला देहाची
शुद्ध नव्हती. ॥ १ ॥
तारा बिकल देखि रघुराया ।
दीन्ह ग्यान हरि लीन्ही माया ॥
छिति जल पावक गगन समीरा ।
पंच रचित अति अधम सरीरा ॥
तारा व्याकूळ झाल्याचे
पाहून श्रीरघुनाथांनी तिला ज्ञान दिले व तिचे अज्ञान हरण केले. ते म्हणाले, ‘
पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू या पंचतत्त्वांनी हे अत्यंत तुच्छ शरीर बनलेले
आहे. ॥ २ ॥
प्रगट सो तनु तव आगें सोवा
। जीव नित्य केहि लगि तुम्ह रोवा ॥
उपजा ग्यान चरन तब लागी ।
लीन्हेसि परम भगति बर मागी ॥
ते वालीचे शरीर तर तुझ्यासमोर
प्रत्यक्ष झोपलेले आहे, आणि जीव हा नित्य आहे. मग तू कशासाठी रडतेस ? ‘ जेव्हा
ज्ञान उत्पन्न झाले, तेव्हा ती भगवंतांच्या चरणी लागली आणि तिने परम भक्तीचा वर
मागितला. ॥ ३ ॥
उमा दारु जोषित की नाईं ।
सबहि नचावत रामु गोसाईं ॥
तब सुग्रीवहि आयसु दीन्हा ।
मृतक कर्म बिधिवत सब कीन्हा ॥
शिव म्हणतात, ‘ हे उमे,
स्वामी राम सर्वांना कठपुतळीप्रमाणे नाचवीत असतात. ‘ त्यानंतर श्रीरामांनी आज्ञा
केली आणि सुग्रीवाने विधिपूर्वक वालीचे सर्व अंत्यकर्म केले. ॥ ४ ॥
राम कहा अनुजहि समुझाई ।
राज देहु सुग्रीवहि जाई ॥
रघुपति चरन नाइ करि माथा ।
चले सकल प्रेरित रघुनाथा ॥
तेव्हा
श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाला समजावून म्हटले, ‘ तू जाऊन सुग्रीवाला राज्य दे.’
श्रीरघुनाथांच्या आज्ञेने सर्व लोक श्रीरघुनाथांच्या चरणीं नतमस्तक होऊन निघून
गेले. ॥ ५ ॥
दोहा---लछिमन तुरत बोलाए पुरजन बिप्र समाज ।
राजु दीन्ह सुग्रीव कहँ अंगद कहँ जुबराज ॥ ११ ॥
लक्ष्मणाने लगेच सर्व नगरवासीयांना व
ब्राह्मण मंडळींना बोलावून घेतले आणि त्यांच्यासमोर सुग्रीवाला राज्य व अंगदाला
युवराजपद दिले. ॥ ११ ॥
उमा राम सम हित जग माहीं । गुरु पितु मातु बंधु
प्रभु नाहीं ॥
सुर नर मुनि सब कै यह रीती । स्वारथ लागि करहिं
सब प्रीती ॥
‘ हे पार्वती, जगामध्ये श्रीरामांच्यासारखा
अकारण हित करणारा गुरु, पिता, माता, बंधू आणि स्वामी असा दुसरा कोणी नाही. देव,
मनुष्य आणि मुनी या सर्वांची रीत अशीच आहे की, स्वार्थासाठीच सर्व प्रेम करतात. ॥
१ ॥
बालि त्रास ब्याकुल दिन राती । तन बहु ब्रन
चिंतॉं जर छाती ॥
सोइ सुग्रीव कीन्ह कपिराऊ । अति कृपाल रघुबीर
सुभाऊ ॥
जो सुग्रीव रात्रंदिवस वालीच्या भीतीने
व्याकूळ असे, ज्याच्या शरीरावर बर्याच जखमा झाल्या होत्या आणि ज्याची छाती
चिंतेने जळत होती, त्या सुग्रीवाला श्रीरामांनी वानरांचा राजा बनविले.
श्रीरामचंद्रांचा स्वभाव अत्यंत कृपाळू आहे. ॥ २ ॥
जानतहूँ अस प्रभु परिहरहीं । काहे न बिपति जाल नर
परहीं ॥
पुनि सुग्रीवहि लीन्ह बोलाई । बहु प्रकार नृपनीति
सिखाई ॥
हे जाणूनही जे लोक अशा प्रभूला सोडून देतात,
ते विपत्तींच्या जाळ्यात का अडकणार नाहीत ? मग श्रीरामांनी सुग्रीवाला बोलावून
घेतले आणि अनेक प्रकारे राजनीती शिकविली. ॥ ३ ॥
कह प्रभु सुनु सुग्रीव हरीसा । पुर न जाउँ दस चारि
बरीसा ॥
गत ग्रीषम बरषा रितु आई । रहिहउँ निकट सैल पर छाई
॥
मग प्रभु म्हणाले, ‘ हे वानरराज सुग्रीवा, मी
चौदा वर्षे कोणत्याही गावात जाणार नाही. ग्रीष्मऋतू जाऊन वर्षाऋतू आला. आता मी
येथे जवळच पर्वतावर राहीन. ॥ ४ ॥
अंगद सहित करहु तुम्ह राजू । संतत हृदयँ धरेहु मम
काजू ॥
जब सुग्रीव भवन फिरि आए । रामु प्रबरषन गिरि पर
छाए ॥
अंगदासह तू राज्य कर. माझे काम नेहमी लक्षात ठेव.’
त्यानंतर सुग्रीव घरी परतला, तेव्हा श्रीराम प्रवर्षण
पर्वतावर जाऊन राहिले.
॥ ५ ॥