Monday, May 12, 2014

RunaMochan NruSinha Stotra श्रीनृसिंह नवरात्र आणि ऋणमोचन स्तोत्रम्


RunaMochan NruSinha Stotra 
RunaMochan NruSinha Stotra is from Narsinha Purana. It is in Sanskrit. It is said in the stotra that any devotee recites it daily with devotion and faith, his all debts are removed and he becomes prosperous. This stotra is uploaded as at present we are celebrating Narsinha Navratra from Vaishakha shukla Shashti (5th May 2014) to Vaishakha Shukla Chaturdashi (13th May 2014).


श्रीनृसिंह नवरात्र आणि ऋणमोचन स्तोत्रम् 
नृसिंह हा भगवान विष्णुच्या दशावतारांमधिल चौथा अवतार आहे.
नृसिंहाचे नवरात्र वैशाख शुद्ध षष्ठी ते चतुर्दशी असे साजरे केले जाते. 
उपासना: प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमीस नृसिंहव्रत, गुरुवारी येणार्‍या त्रयोदशीस त्रयोदशी व्रत, फाल्गुन वद्य द्वादशीस द्वादशी व्रत अशी उपासना केली जाते. 
शनिवार हा नृसिंहाचा वार सांगितला आहे. 
पंचमुखी हनुमान स्तोत्रांत पूर्वेकडे वानरमुख व दक्षिणेकडे नृसिंहमुख असे म्हटले आहे. अत्युग्रतेजो ज्वलंतम् भीषणं भयनाशनम् असे या मुखाचे 
वर्णन आहे. पश्र्चिमे कडील मुख गरुडाचे असून उत्तरेकडील मुख भगवान वराहांचे आहे. पांचवे मुख हयानन म्हणजे घोड्याचे तुंबरु स्वरुपांतील आहे. या पंचमुखी हनुमान स्वरुपांत भगवंताचे दोन अवतार आहेत व तीन अवतार भक्त स्वरुपांत आहेत. म्हणून 
हनुमंताचे पूजा, उपासनेने नृसिंहांची पूजा, उपासना आपसूकच घडते.
या ठिकाणी भक्त व भगवान एके ठिकाणी आहेत. असा हा हनुमंताचा अवतार आहे. 
नृसिंहाची पूजा: मूर्तीस स्नान घालावे. नंतर पंचामृत, पंचगव्य आदीने स्नान घालावे. मग कुंकूम, चंदन, केशर यांचे लेपन करावे. मालती, केवडा, अशोक, चाफा, बकुळ, तुळस आदी फुलांनी पूजा करावी. मग तूप, साखर, तांदूळ, जव आदीच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. शेवटी आरती करावी असे नृसिंह पुराणांत सांगितले आहे. कलियुगांत जो भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीनृसिंहाचे पूजन करील त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन, त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो. श्रीनृसिंह मंदिरेः १) श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान नीरा नरसिंहपूर, २) श्रीनृसिंह मंदिर अहोबल (आंध्र प्रदेश) ३) नृसिंहक्षेत्र सांगवडे ४) श्रीलक्ष्मी नृसिंह मंदिर धोम वाई ५) श्रीनृसिंह देवस्थान पुसद ६) कोप्परनृसिंह कर्नाटक ७) झरणी नृसिंह कर्नाटक ८) नरसिंहपूर सातारा ९) जोशीमठ अथवा ज्योतिर्मठ गढवाल १०) श्रीनृसिंह मंदिर मेहेकर वैनगंगाकाठी. 11) पुण्यास सदाशिव पेठेंत श्रीलक्ष्मीनृसिंह मंदिर.
नरसिंह चतुर्दशीचे व्रत:
हे व्रत विष्णुभक्तांनी व संकटनाशाची इच्छा करणारांनी दरवर्षी  वैशाख शुक्ल चतुर्दशीला निष्ठेने करावे. व्रताचे पंचामृतस्नान, पूजा व उपवास असे हे तीन  मुख्य विधी आहेत. ह्या व्रतास चतुर्दशीच्या दिवशी माध्यान्ह कालापासून सुरुवात करुन दुसर्‍या दिवशी घरांतील सर्वानी एकत्र उपवास सोडावा व सांगता करावी. 
चतुर्दशीच्या दिवशी दुपारी अंगाला मृतिका, गोमय, आवळे व तीळ लावून स्वच्छ स्नान करावे. जवळ नदी, समुद्र असेल तर तेथे जाऊन स्नान करावे.  
पूजेस सुरुवात करण्याआधी श्रीनृसिंहाची खालील प्रमाणे प्रार्थना करावी.
नृसिंहं देवदेवेशं तव जन्मदिने शुभे ।
उपवासं करिष्यामि सर्वभोगविवर्जितम् ।
श्रीनृसिंहमहोग्रस्त्वं दयां कृत्वा ममोपरि ।
अद्याहं प्रविधास्यामि व्रतनिर्विघ्नतां नय ।
पूजा सायंकाळी करावयाची असते. ते स्थान स्वच्छ करावे, 
गाईच्या गोमयाने सारवून घ्यावे. फरशी असल्यास स्वच्छ धूवून काढावी. त्यावर भगवंताचे स्मरण करुन अष्टदल काढावे. त्यावर तांब्याचा तांब्या पाण्याने भरुन ठेवावा. तांब्यावर ताम्हण ठेवावे. त्यांत गहू भरुन श्रीन्रृसिंहाची मूर्ती विधिपूर्वक ठेवावी. अक्षता व पुष्पे वाहून ' भगवान नृसिंह आपण येथे यावे.' असे अावाहन करावे. विधिपूर्वक आसन पाय धुण्यासाठी पाणी अर्पण करावे. अर्घ्य व आचमन द्यावे. त्याची पूजा करावी. पूजा करतांना शक्य असल्यास शंख नाद, नगारा वाजवावा. नंतर प्रतिमेस पंचामृताने, गरम पाण्याने व उटणे लावून स्नान घालावे. मल्लिका, मालती, केतकी, अशोक, चाफा, पुन्नाग, नागकेसर, बकुल, उत्पल, तुळस, कण्हेर पलाश पुष्पे अर्पण करावी. या फुलांची देवास माला घालावी. अखंड बिल्वपत्रे व तुलसीदलेही अर्पण करावीत. पूजा करुन  महिष, गुग्गुल, तूप व साखर यांनी तयार केलेला धूप अर्पण करावा. दीप ओवाळून महानैवेद्य दाखवावा. हविष्य, तूप, साखर, तांदुळ जवाची लापशी, खीर यांचा नैवेद्य अर्पण करावा. 
नंतर आरती आळवणी करावी. प्रदक्षिणा घालावी. भगवंताचे स्तोत्र म्हणावे. मूर्ती नसल्यास फोटोची पूजा करावी. चतुर्दशीच्या रात्री जागरण करावे. नृसिंहपुराणांतील कथा श्रवण करावी. जप करावा. 
दुसरे दिवशी सकाळी स्नान करुन पूजा करावी. नरसिंहाचा शांतपणे जप करावा. सत्पात्र ब्राह्मणास भोजन द्यावे व यथा शक्ती दक्षिणा द्यावी. हे व्रत समाजांतील सर्व लोकांना करता येण्यासारखे आहे. 
फलप्राप्तीः मनोकामना पूर्ण होतात, पुत्र प्राप्तीची अपेक्षा असेल तर तसे होते मात्र पूर्ण भक्तीयुक्त अंतःकरणाने हे व्रत करावे. घरांतील कटकटी दूर होतात व संसार सुखाचा होतो. निर्धनी कुबेर होतो. शत्रुनाश होतो. भूतबाधा दूर होते.      
ऋणमोचन स्तोत्रम् 
ॐ देवानां कार्यसिध्यर्थं सभास्तंभसमुद्भवम् । 
श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ १ ॥ 
लक्ष्म्यालिंगितवामांगं भक्तानामभयप्रदम् । 
श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ २ ॥ 
प्रल्हादवरदं श्रीशं दैत्येश्र्वरविदारणम् । 
श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ३ ॥ 
स्मरणात्सर्वपापघ्नं कद्रुजं विषनाशनम् । 
श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ४ ॥ 
अंत्रमालाधरं शंखचक्राब्जायुधधारिणम् । 
श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ५ ॥ 
सिंहनादेन महता दिग्दंतिभयदायकम् । 
श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ६ ॥ 
कोटिसूर्यप्रतीकाशमभिचारिकनाशनम् । 
श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ७ ॥ 
वेदांतवेद्यं यज्ञेशं ब्रह्मारुद्रादिसंस्तुतम् । 
श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ८ ॥ 
ॐ इदं यो पठते नित्यं ऋणमोचनसंज्ञकं । 
अनृणीजायते सद्यो धनं शीघ्रमवाप्नुयात् ॥ ९ ॥ 
॥ इति श्रीनृसिंहपुराणे ऋणमोचनस्तोत्रं संपूर्णम् ॥
RunaMochan NruSinha Stotra
ऋणमोचन स्तोत्रम्


Custom Search
Post a Comment