Thursday, October 30, 2014

Gurucharitra Adhyay 35 Part 2/3 श्रीगुरचरित्र अध्याय ३५ भाग २/३


Gurucharitra Adhyay 35 
Gurucharitra Adhyay 35 is in Marathi. This Adhyay describes Somawar Vrata. Name of this Adhyay is Simantini Aakhyanam.
गुरुचरित्र अध्याय ३५ भाग २/३
सूर्यासारिखी होईल कांति । चंद्रासारिखी मनःशांति । 
दहा सहस्त्र वर्षें ख्याती । पतिसहित राज्य करील ॥ 
११४ ॥
ऐसें जातक वर्तविलें तिसी । राव करी अतिहर्ष । 
अखिल दानें ब्राह्मणांस । देता जाहला आनंदे ॥ ११५ ॥
असतां राजा सभेसी । द्विज एक परियेंसी ।
भय न धरितां वाक्यासी । बोलता जाहला अवधारा ॥ 
११६ ॥
ऐक राया माझें वचन । कन्यालक्षण सांगेन ।
चवदावें वर्षी विधवापण । होय तुझ्या कन्येसी ॥ ११७ 
ऐसें वचन ऐकोनि । राजा पडिला मूर्च्छनीं ।
चिंता करी बहु मनीं । ब्राह्मणवचन परिसतां ॥ ११८ ॥
ऐसें सांगोनि ब्राह्मण । निघोनि गेला तत्क्षण ।
राजयाचें खेचिं अंतःकरण । म्हणे ईश्र्वराधीन सर्व ॥ 
११९ ॥
ऐसें बाळपण क्रमितां । सीमंतिनी वर्षे साता ।
चिंतीत होती मातापिता । वर्‍हाड केवीं करुं म्हणती ॥ 
१२० ॥
चवदावें वर्षीं विधवत्व येणें । म्हणोनि सांगितलें 
ब्राह्मणें ।
तेणें व्याकुळ अंतःकरण । राजा-राजपत्नीचें ॥ १२१ ॥
कन्या खेळें राजांगणा । सवें असती सखी जन ।
बोलतां ऐकिलें वचना । चौदा वर्षी विधवत्व ॥ १२२ ॥ ऐसें ऐकोनियां वचन । कन्या करितसे चिंतन ।
वर्ततां आली एक दिन । तयां घरीं ब्राह्मणस्त्री ॥ १२३ 
याज्ञवल्क्याची पत्नी । नाम तिचें असे मैत्रायणी ।
घरांत आली पवित्रिणी । कन्या लागे चरणासी ॥ १२४ ॥
साष्टांगीं नमोनि । करसंपुट जोडोनि । 
विनवीतसे करुणावचनीं । मातें प्रतिपाळीं म्हणतसे ॥ १२५ ॥
सौभाग्य स्थिर अहेवपण । उपाय सांगे दया करुन ।
चंचळ असे अतःकरण । म्हणूनि चरणा लागली ॥ १२६ 
ऐकोनि कन्येचें वचन । बोले विप्रस्त्री जाण । 
शरण रिघावें उमारमणा । अहेवपण स्थिर होय ॥ १२७ 
कन्या विनवी तियेसी । कैसे सांगे आम्हांसी ।
जननी तूंचि होसी । कैसे व्रत सांगे म्हणे ॥ १२८ ॥
विप्रस्त्री सांगे तियेसी । सोमवार व्रत परियेंसी ।
पूजा करावी शिवासी । उपवासोनि अवधारीं ॥ १२९ ॥
बरवें सुस्नात होवोनि । दिव्य वस्त्र परिधानूनि ।
स्थिर मन करोनि । पूजा करी गौरीहरा ॥ १३० ॥
अभिषेकें पापक्षय । पीठ पूजितां साम्राज्य ।
गंधाक्षता-पुष्पमाल्यें । सौभाग्यसौख्य अखिल पावे ॥ १३१ ॥
सुगंधी होय धूपदानें । कांति पाविजे दीपदानें ।
भोग नैवेद्यअर्पणाने । तांबूलदानें लक्ष्मी स्थिर ॥ १३२ 
चतुर्विध पुरुषार्थ । नमस्कार करितां त्वरित ।
अष्टैश्र्वर्ये नांदत । ईश्र्वरजप केलिया ॥ १३३ ॥
होमें सर्व कोश पूर्ण । समृद्धि स्तविता होय जाण ।
भोजन करवितां ब्राह्मण । सर्वदेव तृप्त होती ॥ १३४ ॥
ऐसें सोमवार व्रत । करी वो तूं कन्ये निश्र्चित ।
भय आलिया, दुरित । परिहरती महा क्लेश ॥ १३५ ॥
गौरिहरपूजा करितां । समस्त दुरितें जाती परता ।
ऐकोनि सीमंतिनी त्वरिता । अंगीकारिलें व्रतदेखा ॥ १३६ 
सोमवाराचिया व्रता । आचरे सीमंतिनी त्वरिता । 
पिता देखोनि चिंतित । विवाहा योग्य म्हणोनि ॥ १३७ 
राजा विचारी मानसीं । वर्‍हाड करावें कन्येसी ।
जैसे प्राप्तव्य असे तिसी । तैसे घडेल म्हणतसे ॥ १३८ 
विचारावया मंत्रियासी । पाठविता जाहला राष्ट्रासी ।
दमयंतीनळवंशी । इंद्रसेन-कुमारक ॥ १३९ ॥
चंद्रागंद वर बरवा । जैसे चंद्र तेज प्रभा ।
बोलाविती विवाहशोभा । कन्या दिधली संतोषें ॥ १४० ॥
राजे भूमांडलिक देखा । समस्त आले वर्‍हाडिका ।
विवाह केला विवेका । महोत्साह नानापरी ॥ १४१ ॥
नाना द्रव्यालंकार । वर्‍हाडिकां दे नृपवर । 
अखिल दानें देकार । विप्रांसी देता झाला देखा ॥ १४२ ॥
पाठवणी केली सकळिकां । जांवई ठेविला कवतुका ।
कन्यास्नेह अनेका । म्हणोनि राहवी राजपुत्रा ॥ १४३ ॥
राजपुत्र श्र्शुरालयीं । स्त्रिया प्रेमें अतिस्नेहीं ।
काळ क्रमितां एके समयीं । जलक्रीडे निघाला ॥ १४४ ॥
कालिंदी म्हणिजे नदीसी । राजपुत्र परियेसीं ।
सर्व दळ समसगमेसीं गेला नदीसी विनोदें ॥ १४५ ॥
राजपुत्र नदींत । सवें निघाले लोक बहुत ।
विनोदें असे पोहत । अतिहर्षें जलक्रीडा ॥ १४६ ॥
पोहतां राजककुमार देखा । बुडाला मध्यें-गंगोदका ।
आकांत झाला सकळिकां । काढा काढा म्हणताति ॥ 
१४७ ॥
सवें सैन्य लोक सकळ । होते नावेकरी प्रबळ ।
उदकीं पाहती तये वेळ । न दिसे कुमर बुडाला ॥ १४८ 
उभय तटाकीं सैन्य । धांवत गेले राजधाना ।
व्यवस्था सांगती पूर्ण । जांवई तुमचा बुडाला ॥ १४९ ॥
कालिंदीये डोहांत । सवें-गड्या राव होता पोहत ।
अदृश्य झाला त्वरित । न दिसे गंगेंत बुडाला ॥ १५० ॥
ऐकोनि राजा पडे धरणीं । मूर्च्छा येऊनि तत्क्षणीं ।
कन्या ऐकतांच श्रवणीं । त्यजूं पाहे प्राण आपुला ॥ १५१ 
राजा कन्येसी संबोखीत । आपण गेला धांवत । 
राजस्त्री असे शोक करीत । कन्यादुःख अतिबहु ॥ १५२ 
सीमंतिनी करी शोका । म्हणे देवा त्रिपुरांतका । 
शरण रिघाल्यें तुज ऐका । मरण कैसें आलें मज ॥ १५३ 
मृत्यु चवदा वर्षी जाणे । म्हणोनि धरिले तुझे चरण ।
वृथा झालें गौरीपूजन । तुजसहित सोमवारीं ॥ १५४ ॥
तुझें देणें अढळ सकळां । उपेक्षिलें जाश्र्वनीळा ।
अपकीर्ति तुज केवळा । शरणागता रक्षीं रक्षीं ॥ १५५ ॥
स्मरण करी श्रीगुरुसी । याज्ञवल्क्यपत्नीसी ।
सांगितले व्रत आम्हांसी । अहेवपण म्हणोनि ॥ १५६ ॥
तुझें वाक्य ऐकोनि । पूजा केली शिवभवानी ।
वृथा होतसे माझे मनीं । शीघ्र विनवी शिवासी ॥ १५७ 
ऐसें दुःखें प्रलापीत । सीमंतिनी जाय त्वरित ।
गंगाप्रवेश करीन म्हणत । निघाली वेगें गंगेसी ॥ १५८ 
पिता देखोनि नयनीं । धरावया गेला धांवोनि । 
कन्येतें आलिंगोनि । दुःख करी अत्यंत ॥ १५९ ॥
समस्त मंत्री पुरोहित । सकल सैन्य दुःख करीत ।
बोलाविती नावेकरीयांते । पहा म्हणती गंगेंत ॥ १६० ॥
गंगा समस्त शोधिती । न दिसे कवण गतीं ।
शोक करी सीमंती । राजा संबोखी तियेसी ॥ १६१ ॥
रजकुमाराचे सेवक । करुं लागले बहु दुःख ।
सांगो गेले पुत्र शोक । इंद्रसेनरायासी ॥ १६२ ॥
ऐकोनि इंद्रसेन । दुःख करी अतिगहन ।
भार्येसहित निघोन । आला तया मृत्युस्थळा ॥ १६३ ॥
दोघे राजे मिळोन । प्रलाप करिती रोदनीं ।
हा हा कुमारा म्हणोन । ऊर-शिर पिटिताति ॥ १६४ ॥
' हो पुत्र हो तात ' म्हणत । राजा असे लोळत ।
मंत्री राजकुळ समस्त । नगरलोक दुःख करिती ॥ १६५ 
कोठे गेलासी राजपुत्रा । म्हणोनि सीमंतिनी रडत ।
खिन्न होती समस्त । माता पिता श्र्वशुरादि ॥ १६६ ॥
सीमंतिनी म्हणे पितयासी । प्राण त्यजीन पतिसरसी । 
वांचूनियां संसारासी । काय उपयोग वैधव्यत्वें ॥ १६७ ॥
पुसती सकळ द्विजांसी । करावें सहगमन कैसी ।
विप्र सांगती रायासी । प्रेतावेगळें करुं नये ॥ १६८ ॥
प्रेत विचारावें नदींत । दहन करावें कन्येसहित ।
न दिसे बुडाला गंगेंत । केवीं कराल म्हणताति ॥ १६९ 
आतां इसी ऐसें करणें । प्रेत सांपडे तव राखणें ।
ऐकोनियां द्विजवचन । राजा कन्येसी विनवीत ॥ १७० 
ऐसें व्याकुळ दुःख करिती । मंत्री पुरोहित म्हणती ।
जे जे असेल होणार गति । ब्रह्मादिकां न टळे देखा ॥ १७१ ॥
होणार जाहली देवकरणी । काय कराल दुःख करुनि ।
ऐसें मंत्री संबोखोनि । राजयांते चला म्हणती ॥ १७२ ॥
निघाले राजे उभयतां । मंदिरा पातले दुःख करीत ।
इंद्रसेन अति दुःखित । न विसरे कधीं पुत्रशोक ॥ १७३ 
राजव्यापार सोडूनि । दुःख करी पुत्रचिंतनीं । 
गोत्रजादीं व्यापोनि । राष्ट्र घेतलें सकळिक ॥ १७४ ॥
सहभार्या रायासी । ठेविलें कारागृहासी ।
पुत्रशोक बहु तयासी । राज्यभोगीं चाड नाहीं ॥ १७५ ॥
चित्रवर्मा राजा देखा । कन्या ठेविली ममत्विका । 
प्राण त्यजूं पाहे निका । लोकनिंदा म्हणोनि ॥ १७६ ॥
राजा म्हणे कन्येसी । पुत्र नाहींत आमुच्या वंशी ।
कन्या एक तूं आम्हांसी । पुत्र म्हणूनि प्रतिपाळूं ॥ १७७ 
लोक निंदती आम्हांसी । वैधव्यत्व नाहीं परियेसीं ।
वर्ष एक क्रमीं वो तूं ऐसी । पुढें आचार करीं बाळे ॥१७८ 
पिता-वचन ऐकोनि । करीतसे बहु चिंतन ।
म्हणे देवा शूळपाणि । केवीं मातें गांजिलें ॥ १७९ ॥
ऐसें विचारी मानसीं । व्रत आचरीतसे सुरसीं ।
सोमवार उपवासी । ईश्र्वरपूजा करीतसे ॥ १८० ॥
इतुकें होतां राजकुमर । बुडाला होता गंगापूर ।
गेला जेथें पाताळनगर । वासुकी जेथें राज्य करी ॥ १८१ 
नागलोकींचिया नारी । आल्या होत्या नदीतीरीं ।
राजकुमार आला पूरीं । नदीतटाकीं वहात ॥ १८२ ॥
देखोनियां नागकन्या । काढिती संतोषेंकरुनियां ।
अमृत शिंपिती आणूनियां । जागृत झाला राजकुमर ॥ १८३ ॥
नागकन्या मिळून त्यासी । घेउनि जाती तक्षकापाशीं ।
विचित्र नगर परियेसीं । आश्र्चर्य पाहे राजकुमर ॥ १८४ 
पाहे पाताळनगर-रचना । जैसी शोभा इंद्रभुवना ।
गोपुरें दिसतीं महारत्ना । जैसी विद्दुल्लता लखलखित ॥ १८५ ॥
वज्र-नीळ वैडूर्येसीं । माणिक्य-मुक्ताफळेसीं ।
महारम्य पुरी जैसी । सूर्यकांतीपरी शोभा ॥ १८६ ॥
चंद्रकांतीसरसी भूमि । महाद्वार कपाटहेमी ।
अनेक रत्नें नाहीं उपमी । ऐशा मंदिरीं प्रवेशला ॥ १८७ 
पुढें देखतां सभा थोर । समस्त बैसले सर्पाकार ।
आश्र्चर्य करी राजकुमर । असंख्य सर्प दिसताति ॥ १८८ 
सभेमाजीं अतिशोभित । मध्यें दिसे पन्नगनाथ । 
जैसी सूर्यकांति फांकत । अति उन्नत बैसलासे ॥ १८९ 
अनेक श्र्वेतफणी दिसती । जैशी वीजु असे लखलखती ।
पीतांबर वास ज्योती । रत्नकुंडलमंडित देखा ॥ १९० ॥
अनेकरत्नखचित देखा । मुकुट मिरवती सहस्त्र एका ।
सहस्त्रफणी मिरवे तक्षका । ऐसा सभे बैसलासे ॥ १९१ 
रुपयौवन नागकन्या । नाना आभरणें लेवोनियां ।
अनेक सहस्त्र येवोनियां । सेवा करिती तक्षकाची ॥ १९२ 
ऐसे सभास्थानीं देख । राजा बैसलासे तक्षक । 
देखोनि राजकुमारकें । नमन केलें तये वेळीं ॥ १९३ ॥
तक्षक पुसे नागकन्यांसी । कैचा कुमारक आणिलासी ।
सुलक्षण दिसतो कैसी । कोठें होता म्हणोनियां ॥ १९४ 
नागकन्या म्हणती त्यासी । नेणों नाम याचे वंशासी ।
वहात आला यमुनेसी । घेऊनि आलों तुम्हांजवळी ॥ 
१९५ ॥
तक्षक पुसे कुमारकासी । नाम कवण, राज्यकवण वंशी 
काय कारण आलासी । कवण देशीं वास तुझा ॥ १९६ ॥
सांगे राजकुमर देखा । आम्ही भूमंडळनायका । 
नैषधाराज्याधिपति ऐका । ' नळ ' नामा पुण्यवंत लोकीं ॥ १९७ ॥
त्याचा पुत्र इंद्रसेन । जन्म आमुचा तयापासून ।
चंद्रांगद ' नाम आपणा । गेलों होतों श्र्वशुरगृहा ॥ १९८ 
जलक्रीडा करावयासी । गेलों होतों यमुनेसीं ।
विधिवशें आम्हांसी । बुडालो नदींत वधारा ॥ १९९ ॥
वहात आलों नदींत । नागकन्या मज देखत । 
घेवोनि आल्या तुम्हांपर्यंत । दैव आपुलें साफल्य ॥ २०० 
पूर्वाजित पुण्येसीं । भेटी झाली चरणासी ।
धन्य माझे जीवनासी । कृतार्थ झालों म्हणतसे ॥ २०१ 
करुणावचन ऐकोनि । तक्षक बोले संतोषोनि ।
नको भिऊं म्हणोनि । धैर्य देत तये वेळीं ॥ २०२ ॥
शेष म्हणे कुमर बाळा । तूं दिसतोसी मन-निर्मळा । 
तुमचे घरीम सर्वकाळा । कवण देव पूजीतसां ॥ २०३ ॥
ऐसें ऐकोनि राजकुमर । हर्षें जाहला निर्भर । 
सांगतसे विस्तार । आपुला देव शंकर देखा ॥ २०४ 
समस्त देवांचा देव । नाम आहे सदाशिव ।
वामभागीं उमा अपूर्व । त्यातें पूजितों निरंतर ॥ २०५ ॥
ज्याचें रजीं जनित ब्रह्मा । सृष्टि सृजितो अनुपम्या ।
तैसा सदाशिव आम्हां । पूजीतसो सर्वकाळीं ॥ २०६ ॥
ज्याचे सत्वगुणेसीं । विष्णु उपजला परियेसीं ।
प्रतिपाळक लोकांसी । तैशा शिवासी पूजीतसों ॥ २०७ ॥
ज्याच्या तामसापासून । एकादश रुद्रगण । 
उपजले, याचि कारण । प्रलयकर्ता तया नाम ॥ २०८ ॥ 
धाता-विधाता जो आपण । उत्पत्तिस्थितिलय कारण ।
तेजासी तेज असे वायुराकाशीं । तैशा पूजितों शिवासी ॥ २०९ ॥
पृथ्वी-आप-तेजासी । जो पूर्ण असे वायुराकाशीं ।
तैशा पूजितों शिवासी । म्हणे राजकुमर देखा ॥ २१० ॥
सर्व भूतीं असे पूर्ण । चिन्मय आपण निरंजन । 
जो रुपें असे अचिंतन । तैसा ईश्र्वर पूजितों सदा ॥ २११ 
ज्याची कथा वेद जाहले । तक्षक-शेष ज्याचीं कुंडलें ।
त्रिनेत्र असे चंद्र मौळीं । तैसा शंकर पूजीतसों ॥ २१२ ॥
ऐसें ऐकोनि वचन । तक्षक संतोषला अतिगहन ।
राजकुमारा आलिंगोन । तुष्टलों तुष्टलों म्हणतसे ॥ २१३ 
तक्षक म्हणे तये वेळीं । तुज देईन राज्य सकळी ।
तुवां रहावें पाताळीं । अनंत भोग भोगीं आतां ॥ २१४ ॥
माझे लोकीं जें जें रत्न । जें मुख्य असे पवित्र ।
तें देईन समस्त । सुखें ऐस म्हणतसे ॥ २१५ ॥
पाताळ लोकींची रचना परम । पाहे पां अनुपम्य ।
कल्पवृक्षादि मनोरम । आहेत माझ्या नगरांत ॥ २१६ ॥
अमृत न देखती स्वप्नीं कोणी । भरलें असे जैसे पाणी 
तळें बावी पोखरणी । आहेत माझे द्वारीं ॥ २१७ ॥
नाहीं मरणभय येथें । रोगपीडादि समस्त । 
नेणती कोणी स्वप्नावस्थें । ऐसें नगर माझें असे ॥ २१८ 
सुखें ऐस कुमरा म्हणत । तक्षक असे सांगत ।
राजकुमर असे विनवीत । करुणावचनेंकरुनियां ॥ २१९ ॥
राजकुमर विनवी तक्षकासी । एक पुत्र आपण पितयासी 
भार्या वर्ष-चतुर्दशीं । शिवपूजा करीतसे ॥ २२० ॥
नूतन माझे पाणिग्रहण । तेथें असे अंतःकरण ।
पहावे मातापित्याचे चरण । दुःखी असतील मजलागीं ॥ २२१ ॥
आपण बुडालों नदींत । पिता माता दुःख करीत ।
पत्नी म्हणे पति मृत । समस्त जीव त्यजितील ॥ २२२ 
देखिले तुमचे चरण । संतुष्ट जाहले अंतःकरण ।
राखिला तुम्ही माझा प्राण । दर्शन करवावे मातापिता ॥ २२३ ॥
तक्षक झाला संतोषी । नाना रत्नाभरणें त्यासी । 
अमृत पाजवी बहुवसी । आणिक देती स्त्रियेसी ॥ २२४ 
कल्पवृक्षफळें देती । अपूर्व वस्त्राभरणें समस्ती ।
जें अपूर्व असे क्षितीं । ते अमोल्य वस्तु देता जाहला ॥ २२५ ॥
इतुके देवोनि कुमरासी । तक्षक म्हणे परियेसीं ।
जे जे काळी आम्हां स्मरसीं । तुझें कार्य सिद्धि पाववूं ॥ २२६ ॥
Gurucharitra Adhyay 35 
श्रीगुरचरित्र अध्याय ३५


Custom Search

No comments: