Sunday, June 28, 2015

Shri Vithalache Namaskarashtak श्रीविठ्ठलाचे नमस्काराष्टक


Shri Vithalache Namaskarashtak 
Shri Vithalache Namaskarashtak is in Marathi. I thank the creator of this Stotra for his beautiful creation and presenting it for the devotees of God Pandurang
श्रीविठ्ठलाचे नमस्काराष्टक
मना विठ्ठलाचे पदीं लीन व्हावें ।
सदासर्वदा नाम तें तूं वदावें ।
असे एकला तोचि आधार आतां ।
नमो विठ्ठला पांडुरंगा अनंता ॥ १ ॥
जगीं धन्य तो नाम घेई हरीचें ।
जयाच्या कृपें बंध जाती भवाचे ।
असें वंद्य जो सर्वही साधुसंतां ।
नमो विठ्ठला पांडुरंगा अनंता ॥ २ ॥
जिथें चंद्रभागा नदी नित्य वाहे ।
विठाईसखी माउली तेथ राहे । 
भुले भक्तिभावा भली मायमाता ।
नमो विठ्ठला पांडुरंगा अनंता ॥ ३ ॥
भवाच्या भये त्रासलों रे दयाळा ।
विनंती किती मी करुं हे कृपाळा ।
झणीं धांव घालीं नको वेळ आतां ।
नमो विठ्ठला पांडुरंगा अनंता ॥ ४ ॥
तुझ्या दर्शनाची मना ओढ लागे ।
कृपेची तुझ्या भीक मी फक्त मागें ।
जगन्नायका तूं जगाचा नियंता ।
नमो विठ्ठला पांडुरंगा अनंता ॥ ५ ॥
नको अंत पाहूं नको दूर राहूं ।
जगीं दुःखराशी कशा काय साहूं ।
तुझी थोर लीला तुझी थोर सत्ता ।
नमो विठ्ठला पांडुरंगा अनंता ॥ ६ ॥
मना हौस मोठी तुला शुद्ध भावें ।
स्मरावें, भजावें, पदीं लीन व्हावें ।
घडो नित्य सेवा तुझी दिननाथा ।
नमो विठ्ठला पांडुरंगा अनंता ॥ ७ ॥
अगा रुक्मिणीच्या वरा देवराया ।
करावी दुरी सर्व ही मोहमाया ।
असावी कृपा सर्वदा भाग्यवंता ।
नमो विठ्ठला पांडुरंगा अनंता ॥ ८ ॥
॥ श्रीविठ्ठल नमस्काराष्टक संपूर्ण ॥.
Shri Vithalache Namaskarashtak 
श्रीविठ्ठलाचे नमस्काराष्टक


Custom Search
Post a Comment