Friday, January 8, 2016

Shri NavnathBhaktisar Adhyay 12 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बारावा ( १२ ) भाग १/२

Shri NavnathBhaktisar Adhyay 12 
Shri NavnathBhaktisar Adhyay 12 Jalindar ran away from the palace as he was not ready to marry. He came in the forest where God Agni met him. God Agni told him that you are not son of king Bruhadrava but he was son of God Agni only. Then he asked Jalinder what was his wish. Jalinder told him that he wanted to do some good to the people. God Agni thought carefully and decided to take Jalindar to God Datatreya at BadriNath. God Dattatreya welcomed both of them. Knowing about Jalinder he asked God Agni to leave Jalinder with him for 12 years so that he can teach him all vidyas. After 12 years God Agni came back till that time Jalindar has acquired knowledge of all vidyas. God Dattatreya asked God Agni to get blessings from all gods of the vidyas for Jalinder and then Jalinder should complete 12 years of rigorous Tapas. As told by God Dattatreya Jalinder completed the tapas. Then God Shiva stood before him and God Agni. He blessed Jalinder and told him that prabhudha Narayan has taken birth from brahma vidya in the ear of a big elephant. Hence all three searched for the elephant then they saw the elephant in the forest. God Shiva told them that the elephant was very powerful and he won't allow anybody to come near to him. However Jalindar used Sprashastra Mantravidya and fixed elephant. Then he went near, praised the elephant and called Prabudha Narayan at the ear of elephant. Jalinder told him that as his birth is from the ear he was named as KarnaKanifa. Kanifa came out. Then Jalindar helped him to come down to the ground. Then he asked Kanifa to bow to God Shiva and God Agni. Then after God Agni went away and God Shiva took care of Kanifa for about six months after which God Datta and Jalindar imparted all the knowledge of the Astra-Mantra vidya to Kanifa. However Jalindar purposely held back knowledge of Sanjivani vidya and Vatakarshan vidya from Kanifa as his birth was from the ear of elephant. Elephants are very wise in taking revenge. If Kanifa has this bad virtue he may mutualise Sanjivani vidya and Vatakarshan vidya hence that knowledge was not passed on to him. God Shiva asked Jalindar to obtain blessings for Kanifa from Gods of all vidyas. Hence Jalindar called all the gods by using stavanastra. All gods of all vidyas came but refused to bless Kanifa since he has not completed 12 years tapas. Jalinder was very angry and there started a war between Gods and Jalindar. Jalindar defeated them and made them to bless Kanifa. He further asked all Gods to be helpful for his Shabari Kavitva. Now in the 13th adhyay Dhundi sut poet Malu from Narahari family will tell us what happened next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बारावा ( १२ )
भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी भगवंता । पाळक नरहरीच्या सुता ।
नरहरीरुपा कंदर्पताता । अवतार अनंत मिरविशी ॥ १ ॥
तरी आता पुढें ग्रंथ । बोलवीं बरवे रसभरित ।
मागिले अध्यायीं मच्छिंद्रनाथ । स्त्रीराज्यांत पै गेला ॥ २ ॥
उपरी जालिंदराचा जन्म । यज्ञकुंडीं उत्तमोत्तम ।
उपरी पश्र्चात्तापेकरुन । पर्वतदरींत निघाला ॥ ३ ॥
तेथें प्रगटूनि ज्वाळामाळी । तो परम स्नेहाचे नव्हाळीं ।
अंकी घेऊनि त्या काळीं । जन्मकथा सांगितली ॥ ४ ॥
आहे इतुकी कथा श्रोतीं । पूर्वाध्यायीं संपली होती ।
आतां पुढें अवधानाप्रती । श्रवणार्थी मिरवावें ॥ ५ ॥
असो महाराजा द्विमूर्धनी । सकळ जन्माची कथा सांगोनी ।
उपरी बोले कामना मनीं । कोणती बाळा ती सांग ॥ ६ ॥
येरु म्हणे जी महाराज । कामनाविरहित मन माझें ।
आहे परी हितार्थ गुज । सकळ जाणसी तूं ताता ॥ ७ ॥
या नरदेहाची झाली प्राप्ती । तरी सार्थक ओपीं माझें हातीं ।
नाही तरी आले तैसे जाती । ऐसें न करी महाराजा ॥ ८ ॥
जैसा उदककुंभ साचार येथें । तो मळ उसके जेथें तेथें ।
परी तयाचा विस्तार महीतें । कांहीं एक मिरवेना ॥ ९ ॥
तरी व्यर्थ जन्मूनि मरण । कीं लोहकाराचे भाते भरुन ।
कीं भाडाईत ग्रंथिक रचून । व्यर्थ शीण वृषभातें ॥ १० ॥
तरी आतां ऐक ताता । मिरवेल ऐशा पूर्ण वार्ता ।
तिहीं भुवनांमाजी सत्ता । चिरंजीवित्व संपादीं ॥ ११ ॥
लोक म्हणती जालिंदर झाला । परी मेला नाहीं ऐकिला ।
ऐसें न करुनियां देहाला । जगीं मिरवी हे ताता ॥ १२ ॥
ऐसें ऐकूनियां ज्वलन । मौळी तुकावोनि डोलवी मान ।
म्हणे बाळाचे धन्य ज्ञान । वयासमान नसे कीं ॥ १३ ॥
मग त्वरें तो द्विमूर्धनी । जालिंदरासी स्कंधीं वाहोनी ।
अनसूयानंदनस्थानी । त्वरें जाऊनि पोहोंचला ॥ १४ ॥
तव त्या महाराज अत्रिनंदनास । अग्नीसी पाहोनि झाला हर्ष ।
मग पुढें होऊनि हव्यवाहनास । आलिंगिलें सुप्रेमें ॥ १५ ॥
म्हणे महाराजा मम दैवता । तेजःपुंज जेवी सविता ।
कवण कामना वेधूनि चित्ता । येथें आलासी महाराजा ॥ १६ ॥
मज आळशियावरी  ओघ । ओघिला गंगोदकीं चांग ।
कीं क्षुधिता धेनु लागूनि माग । पयःपान करवीतसे ॥ १७ ॥
कीं तमाचें होता वेष्टण । अर्क दिवटा आला होऊन । 
कीं मृत्युसमयीं पीयूषपान । पीयूषचि करवी आग्रहें ॥ १८ ॥
तेवीं येथें झाली परी । गंगा ओविली आळशावरी ।
मग बैसूनि निकट शेजारीं । वर्तमान पुसतसे ॥ १९ ॥
परी महाराजा द्विमूर्धन । हा कोणाचा आहे नंदन ।
येरी म्हणे पंवबाण । शिवदेहीचा हा असे ॥ २० ॥
कीं शिवदेहीचा काम श्रेष्ठ । म्यां दाहिला हें बोलती स्पष्ट ।  
परी जठरीं रक्षिला होता वरिष्ठ । आजपर्यंत महाराजा ॥ २१ ॥
मग बृहद्रव्याच्या यज्ञकुंडांत । प्रगट केलें या देहातें ।
तस्मात् महाराजा तुमचा सुत । तूंचि आतां संगोपीं ॥ २२ ॥
तरी यातें अनुग्रह देऊनी । जगीं मिरवीं सनाथपणीं । 
हा चिरंजीव असो शिवकामनीं । मृत्यु कदा न पावो ॥ २३ ॥
प्रमथ दशकर रेत वहिला । मम जठरीं त्यावरी जन्मला ।
तस्मात् श्रेष्ठ उभयपक्षांला । चिरंजीव असो हा ॥ २४ ॥
जैसा लाभल्या रस पीयुष । उपरी संजीवनी साह्य त्यास ।
मग तो निर्भय यमसदनास । यमापाशीं मिरवेळ ॥२५ ॥
कीं घृतशर्करेची पडतां मिठी । नको कोण म्हणेल या कडवटीं ।
का चंद्रअर्काची झाली भेटी । उजेड कांहीं दिसेना ॥ २६ ॥
तेवीं शिवकाम माझें जठर । ऐक्य झालिया श्रेष्ठाकार ।
त्यांत नारायण नव साचार । अंतरिक्ष संचरला ॥ २७ ॥
याही उपरांतिक ऐका परी । मौंजी विराजल्या स्वामीकरीं ।
मग तें माहात्म्य कवणापरी । जगामाजी काय वर्णावें ॥ २८ ॥
आधीं सुवर्ण सोवळा दासी । त्यावरी सुगलें हेमकर्णी ।
जडित नवरत्न सुढाळ कोंदणीं । तें कोण लेऊं म्हणेना ॥ २९ ॥
कीं आधींच सुगंध मलयागर । मृदमद झाला असे त्यावर ।
त्यावरी शृंगारुनि सुंदर । कोण उटी घेईना ॥ ३० ॥
तस्मात् ऐशा झाल्या गोष्टी । वरदकरीं तव गा तपोजेठी ।
मग जालिंदर महीपाठीं । कीर्तिसूर्य मिरवेल ॥ ३१ ॥
परी ते पावकी रसाळ वचन । वर्षते अमृतवन ।
तेणें चातकमन । तुष्ट झालें शरीरीं ॥ ३२ ॥
मग म्हणे जी महाराजा । पुरवीन आतांचि काम तुझा ।
परी द्वादश वर्ष विजयध्वजा । मजपाशीं ठेवीं हा ॥ ३३ ॥
अवश्य म्हणूनि ज्वाळमौळी । म्हणे रक्षणें आपणांजवळी ।
परी मज देखतां हस्त मौळीं । वरदकरणी मिरवावा ॥ ३४ ॥
मग तो सुपात्र अत्रिनंदन । अंकीं घेत जालिंदर रत्न ।
सकळ कळांतें सांगून । विकल्पाते नुरवीतसे ॥ ३५ ॥   
पहा हो कृपेची सदट नव्हाळी । वरदहस्त स्पर्शितां मौळीं ।
कर्णी ओपितां मंत्रावळी । अज्ञान काजळी फिटतसे ॥ ३६ ॥
परी मंत्राक्षर अंबुदाकार । पूर्ण संचरता कर्ण पात्र ।
मग ती मही पिकें विचित्र । ब्रह्मपणें मिरवली ॥ ३७ ॥
मग तातचि तात अनुपम । चराचरादि स्थावर जंगम ।
एकरुपी सनातन । ब्रह्मप्राप्ती मिरवली ॥ ३८ ॥
ऐसा झालिया स्वतंत्र विचार । मग करुनि दत्तासी नमस्कार ।
महाराज तो वैश्र्वानर । अदृश्यपणें मिरवला ॥ ३९ ॥
मग दत्तात्रेय आणि जालिंदर । विराजले पर्वतगिरीदर ।
मग प्रेमें अभ्यासीं चमत्कार । दृश्यादृश्य कळतील ॥ ४० ॥
मग सवें घेऊनि जालिंदरासी । नित्य गमन करी महींसी ।
स्नान करुनि भागीरथीसी । विश्र्वेश्र्वरासी नमिताती ॥ ४१ ॥
तेथूनि भोजन पांचाळेश्र्वरी । भिक्षा मागावी कोल्हापुरीं ।
निद्रा जयाची मातापुरीं । माहूरगड म्हणविताती ॥ ४२ ॥
असो ऐसे द्वादश वरुषांत । नाना अस्त्रांसही घेत । 
प्रवीण करी बाळा समर्थ । विद्याभांडार भरुनिया ॥ ४३ ॥
जालिंदराचें दास्य पाहून । घडिघडि आल्हाद पावे मन ।
सकळ विद्येचें रत्न । तयालागीं भूषणातें ॥ ४४ ॥
वातास्त्रादि जलदास्त्र । अग्न्यस्त्र धूमास्त्र । 
वाताकर्षणे कामास्त्र । पर्वतास्त्र निवेदिलें ॥ ४५ ॥
वज्रास्त्र आणि वासवशक्ती । नागास्त्र प्राणाहुती ।
खगेंद्रास्त्र प्रतापशक्ती । मोहनास्त्र सांगितले ॥ ४६ ॥
निर्वाणास्त्रादि संजीवनी । रुद्रास्त्र आणि प्रळयाग्नीं ।
विरक्तास्त्र कामासनीं । मोहनास्त्र सांगितलें ॥ ४७ ॥
दानवास्त्र देवास्त्र पूर्णतम । काळास्त्र मिरवती यमादि दम ।
स्तवनास्त्रगती उत्तम । जिंकूं शके ब्रह्मांड ॥ ४८ ॥
कार्तिकास्त्र ब्रह्मास्त्र । विभक्तास्त्र जारणास्त्र । 
शापास्त्र आणि मरणास्त्र । शरास्त्रही शिकविलें पैं ॥ ४९ ॥
ऐसा द्वादश वर्षांत । सकळास्त्रीं प्रवीण केला नाथ ।
आयुष्य भविष्य गमनार्थ । सकळ विद्या निरुपिल्या ॥ ५० ॥
रसायनादि किमयागार । वेदव्याकरणादि निपुणशास्त्र ।
नाटकें संगीतसार जें स्वर । गंधर्वातें लाजवी ॥ ५१ ॥
ज्योतिष सायक शरसंधान । कोकशास्त्रीं झाला प्रवीण ।
कामुक दंडगुण ओढण । शास्त्राधारे पैं केला ॥ ५२ ॥
जलतरणादि चातुर्यकविता । वैदिकी रत्नलक्षणसहिता ।
ब्रह्मज्ञानादि निपुण अर्था । बोले तैसा चालतसे ॥ ५३ ॥
ऐसी सकळ कळाकुसरी । सद्विद्येचा पूर्ण भांडारी ।
करुनि निका परीक्षेपरी । जगामाजी मिरविला ॥ ५४ ॥
यावरी झालीया पूर्ण । पुढें दैवतें आराधून ।
वर ओपावयाकारणें । जालिंदरा उतरलीं ॥ ५५ ॥
मग तो स्तवूनि वैश्र्वानर । पुढें केला तयाचा कुमर ।
प्रत्यक्ष होतां जालिंदर । सद्विद्येसी दाविलें ॥ ५६ ॥
पाहूनि विद्या अपाररत्न । मान तुकावी द्विमूर्धन ।
धन्य धन्य हा अत्रिनंदन । वारंवार म्हणतसे ॥ ५७ ॥
यापरता अत्रिसुत म्हणे महाराजा ऐक मात ।
पूर्णपणीं जालिंदरनाथ । सद्विद्येश पैं झाला ॥ ५८ ॥
झाला परी ऐक वचन । एक उरलें आराधन ।
 दैवत करुनि द्यावें प्रसन्न । वरालागीं महाराजा ॥ ५९ ॥
तरी सकळ दैवतांसी । नेऊनि भेटवीं जालिंदरासी । 
बोल स्वीकारुनि पूर्ण तयासी । बैसवावें महाराजा ॥ ६० ॥
मग अवश्य म्हणूनि वैश्र्वानर । स्कंधीं वाहिला जालिंदर ।
भुवनत्रयीं समग्र । फिरोनि ओळखी दैवतें ॥ ६१ ॥
असो ती स्थानें दैवतें नामें । सांगतां वैखरी सुमध्यमे ।
तरी दुबार कथा ग्रंथमाहात्म्यें । पडत आहे महाराजा ॥ ६२ ॥
पूर्वीं मच्छिंद्राचे कारणीं । निरोपिली स्थानें दैवतें नामीं ।
नागपत्रें अश्र्वत्थधामीं । सूर्यकुंड उपदेशिले ॥ ६३ ॥     
जें जें मच्छिंद्रें केले संधान । सकळ दैवतें प्रसन्न ।
तें तें दाविलें द्विमूर्धनें । वरालागीं ओपिलें ॥ ६४ ॥
बावन्नवीरादि जळदेवता । पाताळभुवनीस्वनाथा ।
तितुक्यासी करुनि प्रणिपाता । वरालागीं ओपिलेंसें ॥ ६५ ॥
परी दैवतें वर देऊनि त्यासी । सांगातीं झाली पूर्ण तपासी ।
तेणें पावेल सकळ सिद्धींसी । ऐसें सकळ वदलेती ॥ ६६ ॥
तें ऐकूनि द्विमूर्धन । पाहता झाला बद्रिकावन । 
तेथें द्वादश वर्षेंनेम करुन । तपालागीं बैसला ॥ ६७ ॥
लोहकंटकी चरणांगुष्ठ । वातग्रहणीं आहार पुष्ट ।
मुखीं रामनामपाठ । ब्रह्मीं दृष्टीं निर्मिलीसे ॥ ६८ ॥
तंव ते आचाट तप पाहून । दैवतें तुकविती झाली मान ।
आपुलाले वाहनी आरोहण । करुनि आलीं तया ठाया ॥ ६९ ॥
ब्रह्मा विष्णु महेश्र्वर । आणिक दैवतें आली अपार ।
तपशांती करुनि साचार । स्थानीं गेली आपुलाल्या ॥ ७० ॥
बद्रिकाश्रमीं बद्रिनाथ । तेणें उभयतां सुतां ।
आपुल्याजवळीं त्रिरात्र । ठेवूनियां घेतलेसे ॥ ७१ ॥
ठेविलें परी भविष्य कथून । सांगता झाला पंचानन ।
सत्यलोकातें ब्रह्मभुवन । तेथें वर्तले विपरीत ॥ ७२ ॥          
म्हणाल तें कोणत्या रीतीं । ब्रह्मतनया सरस्वती ।
द्वादशवर्षें दिव्यमूर्ती । रेखिलीसे शृंगारीं ॥ ७३ ॥
जिचे मुख पाहतां भद्र । रेखला वाटे पूर्णचंद्र ।
केश कुरळ आकाश मंद । वेष्टित वाटे पाहतां कीं ॥ ७४ ॥
यापरी पूर्व आणिक युक्ती । शृंगार रेखिला हेममुक्ती ।
तें मुक्त न वाटे नक्षत्रपातीं । शृंगारातें मिरवलें ॥ ७५ ॥
अपार रत्नीं आगळा । स्कंद वेष्टित बहु रसाळा ।
तिहीं भुवनीं रत्नकीळा । नक्षत्रासम मिरवली ॥ ७६ ॥
कंचुकीवेष्टन दाट करुनी । त्यात कंदुकासमान इंदुतरणी ।
कुच विराजती हृदयस्थानीं । चीर पदरातें मिरवें पै ॥ ७७ ॥
हरिकटीते कटाकृती । जानु कर्दळीस्तंभनीतीं ।
सरळ पोटर्‍या चरणस्थिती । गजगामिनी मिरवते ॥ ७८ ॥
ऐसी तनया पाहतां दृष्टी । तों काम उदेला सहज पोटीं ।
मग विधि नोहे तो अवधी । परमेष्टी कुबुद्धितें संचरला ॥ ७९ ॥
तो कामबळें उन्मत्त । कुमारीमागे लागत । 
धावतां धावतां वीर्यपात । झाला विधीचा तेधवां ॥ ८० ॥
वातचक्र सबळ नेट । बुंद पावला महीपाट ।
परी हिमाद्रीचे वनीं अचाट । दिग्गज एक निजलासे ॥ ८१ ॥
निजला परी कर्णरंध्रांत । येऊनि पडिले बिंदुरेत ।
त्या रेतातें जीव व्यक्त । प्रबद्ध नारायण संचरला ॥ ८२ ॥
परी त्यातें लोटले बहुत दिन । झालें चतुरावृत्ती युगप्रमाण ।
द्विजालागी नाहीं मरण । चिरंजीव असती ते ॥ ८३ ॥
अष्टदिशीं अष्ट दिग्गज । महादीप्त ते महाराज ।
त्यांतील एक हो तेजःपुंज । निजला आहे महाराजा ॥ ८४ ॥
प्रबुद्ध नारायण विख्यात । अवतारदीक्षा देहस्थित ।
त्या दिग्गजाच्या कर्णविवरांत । सुशोभित आहे कीं ॥ ८५ ॥
बालतनु बालार्काकिरणीं । हरी ते पहावे निजनयनीं ।
तो जालिंदरें शिष्य करोनि । महीलागीं मिरवावा ॥ ८६ ॥  
कर्णोदय त्याचा झाला । म्हणोनि कानिफा नाम त्याला ।
ऐसें ऐकोनि शिववचनाला । वैश्र्वानर बोलतसे ॥ ८७ ॥
म्हणे महाराजा फार बरवें । आपण वदला तितकें अपूर्व ।
परी गज केवीं विदारावा । आम्हांलागीं दाखवा ॥ ८८ ॥
जैसी उदया आणिली गोष्टी । तैसी दाखवा प्रत्यक्ष दृष्टी ।
सूर्यजयद्रथ पाठपोटीं । मिरवावा महाराजा ॥ ८९ ॥
फार बरवें उत्तम झालें । एकटें महीं मम तान्हुलें ।
त्यातें पृष्ठीं रक्षक भलें । निर्माण केले महाराजा ॥ ९० ॥
तरी आतां कृपा करुन । दाखवावें गजस्थान ।
अवश्य म्हणूनि उमारमण । त्रिवर्गादि चालले ॥ ९१ ॥
त्रिवर्गाचें तेज अद्भुत । दिशा व्यापोनि शिरले गगनांत ।
जेवीं चंद्रसूर्याचे तेजांत । अग्नि संचरे तिसरा ॥ ९२ ॥
किं एक रुद्र एक विष्णु । तिजा उदेला कमळतनु ।
कीं चंद्राचळ द्रोणाचळ धनु । मंदराचळ तिसरा पैं ॥ ९३ ॥
कीं एक शुक्र बृहस्पती । त्यांत कचेश्र्वरमूर्ती ।
कीं अमृतसंजीवनी युक्ती । तिसरा अमर मिरवला ॥ ९४ ॥
कीं एक परिस एक चिंतामणी । तिसरा निघतो प्रतापखाणी ।
ऐसे त्रिवर्ग हिमाद्रीस्थानी । प्रवेश करिते पैं झाले ॥ ९५ ॥
तों पैल हिमाद्रीपर्वतीं । दिसे शेवटीं दिग्गजमूर्ती ।
महाविक्राळ स्थूळवटशक्ती । पर्वतासम देखिला ॥ ९६ ॥
देखतांचि उमावर । म्हणे हा गज प्रतापी तीव्र ।
कदा नोहे महीं स्थिर । माजविल समर आपणांसी ॥ ९७ ॥
तरी तयासी कैसी युक्ती । करावी न राहे स्थिरत्वगती ।
मग जालिंदर तीव्रयुक्ती । बोलता झाला शिवातें ॥ ९८ ॥
हे महाराज उमावर । माझिया मस्तकीं वरदकर । 
अत्रिसुतें ठेविला थोर । त्याचा चमत्कार पहा आतां ॥ ९९ ॥  
ब्रह्मांड मिरवल्या तीव्रपणीं । तेही हिसावेल शूलपाणी ।
मग या गजाची अपार करणी । कोठवर उरे महाराजा ॥ १०० ॥
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बारावा ( १२ ) 
Shri NavnathBhaktisar Adhyay 12


Custom Search

No comments: