Monday, May 16, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 14 गुणत्रयविभागयोग अध्याय १४


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 14 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 14 is in Sanskrit. It describes the three Gunas, Namely Sattva, Rajas and Tamas and their influence on the human life. How to overcome these Gunas and reach to ultimate goal of to be one with the God is told to Arjuna by God ShriKrishna.
गुणत्रयविभागयोग अध्याय १४
श्रीभगवानुवाच
परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् ।
यञ्जात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः ॥ १ ॥
इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः ।
सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥ २ ॥
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन्गर्भं दधाम्यहम् ।
सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ ३ ॥
सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः ।
तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥ ४ ॥
सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः ।
निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्  ॥ ५ ॥  
तत्र सत्त्वं निर्मलत्वात्प्रकाशकमनामयम् ।
सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ ॥ ६ ॥
रजो रागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम् ।
तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम् ॥ ७ ॥
तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् ।
प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥ ८ ॥
सत्त्वं सुखे सञ्जयति रजः कर्मणि भारत ।
ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे सञ्जयत्युत ॥ ९ ॥
रजस्तमश्र्चाभिभूय सत्त्वं भवति भारत ।
रजः सत्त्वं तमश्र्चैव तमः सत्त्वं रजस्तथा ॥ १० ॥
सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्प्रकाश उपजायते ।
ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ॥ ११ ॥
लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमः स्पृहा ।
रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ ॥ १२ ॥
अप्रकाशोऽप्रवृत्तिश्र्च प्रमादो मोह एव च ।
तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन ॥ १३ ॥
यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् ।
तदोत्तमविदां लोकानमलान्प्रतिपद्यते ॥ १४ ॥
रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते ।
तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते ॥ १५ ॥
कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम् ।
रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम् ॥ १६ ॥
सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं रजसो लोभ एव च ।
प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥ १७ ॥
ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः ।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥ १८ ॥
नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति ।
गुणेभ्यश्र्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ॥ १९ ॥
गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान् ।
जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्रुते ॥ २० ॥
अर्जुन उवाच 
कैर्लिङ्गैस्त्रीन्गुणानेतानतीतो भवति प्रभो ।
किमाचारः कथं चैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते ॥ २१ ॥
श्रीभगवानुवाच 
प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव ।
न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति ॥ २२ ॥
उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते ।
गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते ॥ २३ ॥
समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः ।
तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः ॥ २४ ॥
मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः ।
सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥ २५ ॥
मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते ।
स गुणान्समतीत्यैतान्ब्रह्मभूयाय कल्पते ॥ २६ ॥
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य  च ।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥ २७ ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥  
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मराठी अर्थ 
श्रीभगवान म्हणाले
१) अर्जुना, सर्व ज्ञानांतील उत्तम ज्ञान पुन्हां तुला मी सांगतो. हें ज्ञान जाणूनच सर्व मुनि या संसारांतून सुटुन परमश्रेष्ठ गतीला गेले आहेत.
२) या ज्ञानाचा आधार घेऊन माझ्या स्वरुपाला प्राप्त झालेले म्हणजे माझ्याशीं एकरुप झालेले पुरुष सृष्टीच्या उत्पत्तिकालीं जन्मत नाहींत व प्रलयकालींही नाश पावत नाहींत.
३) अर्जुना, माझी तत्त्वतः ब्रह्मरुप असलेली मूळ प्रकृति हेच सर्व भूतांचें उत्पत्तीस्थान आहे. त्या मूळप्रकृतिरुपी उत्पत्तिस्थानांत मी जेव्हां माझें उत्पत्तिकारक असे बीज पेरतों, तेव्हां त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ति सुरु होते.
४) हे अर्जुना, सर्व योनींमध्ये ज्या व्यक्ति उत्पन्न होतात, त्यांचे उत्पत्तिस्थान महद्ब्रह्म म्हणजे व्यापक प्रकृति हेंच आहे, व तेथें उत्पादकशक्तिरुप बीज स्थापना करणारा जनक मीच आहे.
५) हे अर्जुना, सत्त्व, रज व तम हे प्रकृतिपासून उत्पन्न होणारे तीन गुण निर्विकार आत्म्याला देहांत बद्ध करुन ठेवतात.
६) हे निष्पाप अर्जुना, त्या गुणांपैकी प्रकाशक व निर्दोष असा हा सत्त्वगुण निर्मळ असल्यामुळें सुख आणि ज्ञान यांच्या संगानें जीवात्म्याला बांधून टाकितो.
७) हे अर्जुना, रजोगुण हा रंजनरुप असून भोगेच्छेच्या आसक्तिपासून उद्भवतो असे जाण. तो रजोगुण जीवात्म्याला कर्माच्या आवडीनें बद्ध करतो. 
८) हे भारता, सर्व लोकांना मोहांत पाडणारा तमोगुण हा अज्ञानापासून उत्पन्न होणारा आहे असे जाण. तो जीवात्म्याला प्रमाद ( दुष्कृत्य ), आळस व निद्रा यांनी बद्ध करतो. 
९) हे भरतकुलोत्पन्ना अर्जुना, सत्त्वगुण सुखाची हौस उत्पन्न करतो, रजोगुण कर्माविषयी आसक्ति उत्पन्न करतो आणि तमोगुण हा ज्ञानावर आवरण घालून प्रमादाच्या म्हणजे कर्तव्यमूढतेच्या आडमार्गाकडे माणसाला नेतो. 
१०) हे अर्जुना, रजोगुण व तमोगुण यांना पराभूत करुन सत्त्वगुण प्रकट होतो. (तेव्हां त्याला सात्त्विक म्हणावयाचे ); सत्त्वगुण व तमोगुण यांचा मोड करुन रजोगुण प्रबल होतो; तसेंच सत्त्वगुण व रजोगुण यांना जिंकून तमोगुण वृद्धि पावतो.
११) ज्या वेळीं या देहांत सर्व इंद्रियांत प्रकाश म्हणजे निर्मल ज्ञान उत्पन्न होतें, तेजस्वीपणा प्रादुर्भूत होतो, त्या वेळीं ( त्या देहांत ) सत्त्वगुणाची वाढ झाली असे समजावे.
१२) हे भरतश्रेष्ठा, रजोगुण वाढला असतां लोभ, कर्माकडे प्रवृत्ति व त्यांचा आरंभ व इच्छा हे विकार उत्पन्न होतात.
१३) हे कुरुकुलोत्पन्ना अर्जुना, तमोगुणाची वृद्धि झाली असतां अज्ञान, कांहीं करुं नये असें वाटणें, प्रमाद म्हणजे कर्तव्याचा विसर आणि मोह हे दोष त्या माणसाला पछाडतात. 
१४) सत्त्वगुणांचेंच प्राबल्य झाल्यावेळीं देहधारी मनुष्य मृत्यु पावला असतां तो उत्तम ज्ञानी पुरुषांना प्राप्त होणार्‍या निर्मल लोकांत जातो. 
१५) रजोगुणाच्या उत्कर्षांत मरण आलें असतां कर्मासक्त अशा मनुष्यलोकांत त्याचा जन्म होतो आणि तमोगुणांत मृत्यु आला असतां पशु इत्यादि मूढ योनींत तो उत्पन्न होतो.
१६) पुण्यकर्मांचा परिणाम ज्ञानमय व सात्त्विक असतो; परंतु राजस कर्मांचा परिणाम दुःखकारक व तामस कर्मांचा परिणाम अज्ञानकारक असतो असें सांगितलें आहे. 
१७) सत्त्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होतें, रजोगुणापासून लोभ, व तमोगुणापासून प्रमाद, मोह व अज्ञान हीं उत्पन्न होतात. 
१८) सात्त्विक आचरणाचे लोक वर म्हणजे देवलोकांत जातात. राजस आचरणाचे लोक मध्यम ( मनुष्य ) लोकांतच राहातात, आणि निकृष्ठ अशा तामस गुणांचे लोक अधोगतीला जातात.
१९) प्रकृतीच्या गुणांखेरीज दुसरा कोणी कर्ता नाही, असे जेव्हां द्रष्टा म्हणजे उदासीनपणाने पाहणारा पुरुष समजतो आणि तीनही गुणांच्या अत्यंत पलीकडे असलेलें तत्त्व ओळखतो, तेव्हां तो माझ्या स्वरुपाला प्राप्त होतो. 
२०) देहाच्या उत्पत्तीला कारणीभूत अशा या तीन गुणांचें जो पुरुष अतिक्रमण करतो, तो जन्म, मरण, वार्धक्य इत्यादि दुःखांपासून मुक्त होऊन अमृताचा म्हणजे मोक्षाचा उपभोग घेतो.
अर्जुन म्हणाला,
२१) हे प्रभो श्रीकृष्णा, या त्रिगुणांना उल्लंघून गेलेला पुरुष कोणत्या लक्षणांनीं युक्त असतो ? त्याचे आचरण कसें असतें व तो या तीन गुणांच्या पलीकडे कसा जातो ?
श्रीभगवान म्हणाले, 
२२-२५) अर्जुना, प्रकाश ( सत्त्वगुण ), प्रवृत्ति ( रजोगुण ), व मोह ( तमोगुण ) हे उत्पन्न झाले तरी जो त्यांचा द्वेष करीत नाहीं आणि ते विकार नाहीसे झाले तरी त्यांची इच्छा करीत नाही, जो कर्मफलाविषयीं उदासीन असून त्रिगुणांनीं विचलित होत नाही, गुणच वर्तन करीत आहेत असे जाणून जो स्थिर असतो, चंचल होत नाहीं, ज्याला सुख व दुःख सारखेंच असतें, जो आपल्या ठिकाणीं स्थिर असतो, ज्याला माती, दगड व सोनें सारखेंच असतें, ज्याला प्रिय व अप्रिय, तसेंच निंदा व आपली स्तुति हीं समसमान, सदोदित धैर्याने युक्त, जो मान व अपमान यांविषयीं सारखाच उदासीन, मित्र व शत्रु यांच्याकडे समदृष्टीनें पाहाणारा आणि सर्व कर्मांमध्ये फलासक्ति सोडणारा असा पुरुष, त्याला गुणातीत असे म्हणतात.  
२६) आणि जो माझी एकनिष्ठ भक्तिमार्गाने उपासना करतो तो या तीनही गुणांच्या पैलपार जाऊन ब्रह्मरुप होण्याला पात्र होतो. 
२७) कारण, अविकार्य व अविनाशी अशा ब्रह्माचे, तसेच सनातन अशा धर्माचें व निरतिशय अशा सुखाचें अधिष्ठान ( केन्द्र ) मीच ( परमात्मा ) आहे. 
याप्रमाणें श्रीकृष्णांनीं गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील ' गुणत्रयविभाग योग ' या नांवाचा चौदावा अध्याय समाप्त झाला.
Meaning in English
Bhagwan said,
1) I shall tell you again the supreme knowledge-- the best of all knowledges, knowing which all the sages have attained supreme felicity from hence.
2) By resorting to this knowledge they, having attained to My nature, are not reborn even at the time of creation nor they distressed at the time of dissolution.
3) The great Nature is my womb; in that I place the germ, and from that, O descendant of Bharat, is the origin of all beings.
4) Whatever forms, O son of Kunti, are born in different wombs, of them the great Nature is the womb, and I am seed-giving father.
5) Sattva, Rajas and Tamas-these Gunas, O mighty-armed one, that are born of Nature ( Prakritj ), bind fast the immutable, embodied being in this body. 
6) Of these, Sattva on account of its stainlessness is luminous and free from evil; it binds ( the embodied self ) by attachment to happiness and by attachment to knowledge, O sinless one ( Arjuna ).
7) Know Rajas to be of the nature of passion, the source of desire and attachment; O son of Kunti, it binds fast the embodied self by attachment to action.
8) But know Tamas to be born of ignorance and deluding all embodied beings; it binds fast, O descendant of Bharata, through inadvertence, laziness and sleep.
9) Sattva binds ( 0ne ) to happiness, Rajas, O descendant of Bharata, ( binds one ) to work, while Tamas by covering knowledge binds ( one ) to inadvertence, etc.
10) Sattva manifests, Odescendant of Bharata, overpowering Rajas and Tamas; Rajas ( manifests ) overpowering Sattva and Tamas (manifests) and likewise Tamas (manifests) overpowering Sattva and Rajas.
11) When through all the sense-openings in this body the light of knowledge radiates, then indeed one should know that Sattva predominates.
12) Greed, Activity, undertaking of works, restlessness, desire--these prevail, O best of the Bharatas, when Rajas predominates.
13) Darkness, inactivity, inadvertence, as also delusion--these prevail, Odescendant of Kuru (Arjuna), when Tamas predominates.
14) If the embodied self meets with death when Sattva is predominant, then it attains the pure spheres of the worshippers of the highest deities.
15) If it meets with death when Rajas is predominant, then it is born amongst those who are attached to work; likewise if it meets death when Tamas is predominant, then it is born in the wombs of irrational species.
16) The result of virtuous action is said to be Sattvika and pure, the result of Rajas is pain, while ignorance is the result of Tamas.
17) From Sattva resulte knowledge, from Rajas only greed, and from Tamas nothing but inadvetence, delusion and ignorance. 
18) Those who abide in Sattva go upwards (to higher spheres),the Rajasika dwell in the middle (spheres), and the Tamasika, dwelling in the functions of the lowest Guna, go downwards (to lower spheres). 
19) When the seer beholds no (active) agent other thn Gunas, and knows that which is beyond the Gunas, he attains My being.
20) Having transcended these three Gunas, which are the cause of this body, the embodied self, bereft of birth, death, old age and misery, attains immortality. 
Arjuna said,
21) By what characteristics, O Lord, is one who has transcended these three Gunas known? What is his conduct, and how does he transcended these three Gunas?
Bhagwan said,
22) He who does not hate when the light (of knowledge), activity and delusion arise, O son of Pandu, nor desires them when they cease;
23) He who rests like one indifferent and is not disturbed by the Gunas, who, realizing that the Gunas alone function, is steady and does not waver;
24) Alike in pleasure and pain, Self-abiding, regarding a clod of earth, a stone and gold as of equal worth, the same towards agreeable and disagreeable objects, calm, and the same to praise and blame bestowed on him;
25) The same in honour and dishonour, the same towards friend and foe, habituated to renounce all actions--such a person is said to have transcended the Gunas.
26) He who serves Me alone through the unswerving Yoga of devotion, transcends these Gunas and becomes fit for the state of Brahma.

27) For I am the embodiment of Brahman, of immortality, of the eternal religion and of absolute bliss.
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 14 गुणत्रयविभागयोग अध्याय १४Custom Search
Post a Comment