Wednesday, May 18, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 3, कर्मयोग अध्याय ३


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 3 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 3 is in Sanskrit. Name of this Adhyay is Karma yoga. God Shrikrishna is telling Karma Yoga to Arjuna.
कर्मयोग अध्याय ३
अर्जुन उवाच 
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ ॥
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्र्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २ ॥
श्रीभगवानुवाच 
लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥ ३ ॥
न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्र्नुते ।
न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ४ ॥
न हि कश्र्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ ५ ॥
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ६ ॥
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ७ ॥
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येतकर्मणः ॥ ८ ॥
यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ९ ॥
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ १० ॥
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ ११ ॥
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्ते स्तेन एव सः ॥ १२ ॥
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः ।
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥ १३ ॥
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ १४ ॥
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् ।
तस्मात्सर्वगतमं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥ १५ ॥
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्यतीह यः ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ १६ ॥
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्र्च मानवः ।
आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ १७ ॥
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेननेह कश्र्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्र्चिदर्थव्यपाश्रयः ॥ १८ ॥
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ १९ ॥
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।
लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥ २० ॥      
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१ ॥
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२ ॥
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३ ॥
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् ।
सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४ ॥
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत । 
कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्र्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् ॥ २५ ॥
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् ।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् ॥ २६ ॥
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ २७ ॥
तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥
प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत् ॥ २९ ॥
मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३० ॥
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३१ ॥
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तानन्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३२ ॥
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३३ ॥
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ३४ ॥
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५ ॥
अर्जुन उवाच
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३६ ॥
श्रीभगवानुवाच
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ ३७ ॥
धूमेनाव्रियते वन्हिर्यथादर्शो मलेन च ।
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥ ३८ ॥
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरुपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३९ ॥
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ४० ॥
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥ ४१ ॥
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२ ॥
एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरुपं दुरासदम् ॥ ४३ ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥ 
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मराठी अर्थ
अर्जुन म्हणाला
१) हे जनार्दना, जर तुला कर्मापेक्षां (साम्य) बुद्धि श्रेष्ठ वाटते, तर मग, हे केशवा, हें घोर कर्म करण्यासाठी माझी योजना का करतोस?
२) संदिग्ध अशा वाक्यानें तूं माझ्या बुद्धीला जणूं मोहच पाडीत आहेस, ह्यास्तव ज्यानें माझे कल्याण होईल असा एकच मार्ग निश्र्चित करुन सांग. 
श्रीभगवान म्हणाले,
३) हे निष्पाप अर्जुना, ह्या लोकीं ज्ञानमार्गानें सांख्यांची व (निष्काम) कर्मयोगानें योग्यांची अशी दोन प्रकारची निष्ठा आहे, असें मीं तुला पूर्वी सांगितलें आहे.
४) कर्माचा आरंभच न केल्यानें पुरुषाला नैष्कर्म्य प्राप्त होत नाही. किंवा कर्माचा त्याग केल्यानें त्याला सिद्धि मिळत नाही.
५) कारण कोणी झाला तरी (कांहींना कांहीं) कर्म न करतां क्षणभर देखील राहूं शकत नाहीं. प्रकृतीच्या गुणांनीं सर्व प्राणी परतंत्र असल्यामुळें ते गुण त्यांच्याकडून कर्म करवितात. 
६) जो मूर्ख कर्मेंद्रियें बळजबरीनें आवरुन मनानें विषयांचें चिंतन करीत राहतो, त्याला ढोंगी म्हणतात. 
७) पण हे अर्जुना, जो मनानें इंद्रियांचे नियमन करुन आसक्ति न ठेवितां केवळ कर्मेंद्रियांद्वारा कर्मयोगाचे आचरण करितो, त्याची योग्यता विशेष होय.  
८) हें अर्जुना, तुझें नेमलेले कर्म तूं कर, कारण कर्म न करण्यापेक्षां कर्म करणें श्रेष्ठ आहे आणि कर्माशिवाय तुझी जीवनयात्राही चालणार नाही.
९) यज्ञाच्या हेतुनें केलेल्या कर्माखेरीज इतर कर्म केलें असतां मानव कर्मबद्ध होतो. हे अर्जुना, यज्ञार्थ करावयाचे कर्म देखील तूं आसक्ति सोडून करीत राहा. 
१०) पूर्वी यज्ञासह प्रजा उत्पन्न करुन ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, ह्या यज्ञानें तुम्ही अभ्युदय करुन घ्या. हा यज्ञ तुमची कामधेनु म्हणजे तुमचे मनोरथ पूर्ण करणारा होतो. 
११) ह्या यज्ञसाधनाने तुम्ही देवांना संतुष्ट करा, व ते देवही तुम्हांला संतुष्ट करोत. ह्याप्रमाणे परस्परांना संतुष्ट करुन तुम्ही आपलें कल्याण करुन घ्या. 
१२) यज्ञानें संतुष्ट झालेले देव तुम्हांला इच्छित वस्तु देतील पण त्यांनी दिलेलें त्यांना परत न देतां जो केवळ स्वतःच भोगतो; तो चोरच होय.
१३) यज्ञ करुन शेष राहिलेल्या भागाचे सेवन करणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पातकांतुन मुक्त होतात. परंतु जे पापी लोक केवळ आपल्यासाठींच अन्न शिजवितात, ते पापच भक्षण करीत असतात.
१४) अन्नापासून प्राणी उत्पन्न होतात पर्जन्यापासून अन्न होतें, यज्ञापासून पर्जन्य होतो. कर्मापासून यज्ञाची उत्पत्ति होते.
१५) कर्माची उत्पत्ति ब्रह्मापासून म्हणजे प्रकृतीपासून (आहे असें) जाण आणि हे ब्रह्म अक्षरापासून म्हणजे परमात्म्यापासून उत्पन्न झालें आहे, म्हणून सर्वव्यापी ब्रह्मच नेहमी यज्ञांत अधिष्ठित असतें. 
१६) हे अर्जुना, ह्याप्रमाणें परमेश्र्वराने सुरु केलेले हें सृष्टिचक्र जो ह्या लोकीं पुढें चालवीत नाही, तो केवळ इंद्रियसुखलोलुप पापी मनुष्य व्यर्थ जन्माला आला असें समज. 
१७) परंतु जो मनुष्य केवळ आत्म्यांतच रममाण असतो, आत्मानंदांतच जो तृप्त आणि आत्म्याचे ठायींच जो संतुष्ट असतो त्याला मात्र (स्वतःचे म्हणून) कांहीं कर्तव्य उरत नाही.
१८) ह्या जगांत कर्म करण्यांत अगर न करण्यांत त्याचा कांहींच लाभ नसतो. त्याचप्रमाणें सर्व भूतांचे ठायीं त्याचा स्वतःचा म्हणून कांहीं अर्थ गुंतून राहिलेला नसतो.
१९) म्हणून तूं ( ज्ञानी पुरुषाप्रमाणें ) आसक्तिरहित होऊन आपलें कर्तव्यकर्म नेहमी करीत जा. आसक्ति सोडून कर्म करणार्‍या पुरुषाला मोक्ष प्राप्त होतो.
२०) कारण जनकादिकांनीही कर्मानेंच उत्तम सिद्धि मिळविली. ह्यासाठीं व लोकसंग्रहाकडे लक्ष देऊनही तुला कर्म करणेंच उचित आहे.
२१) श्रेष्ठ पुरुष जसें आचरण करितो तसेंच सामान्य जनही आचरण करितात. श्रेष्ठ जें प्रमाण ठरवितात तें लोक अनुसरतात.
२२) हे पार्था, ह्या त्रैलोक्यांत मला स्वतःकरितां कांहींच करावयाचे (उरलेले) नाही. कारण मला मिळालेलें नाही किंवा मिळावयाचें आहे असे कांहींच नाही. तरी पण मी कर्म करीतच असतो.
२३) कारण जर मी आळस सोडून असा कर्मांत न वागेन तर हे पार्था, सगळे लोक सर्वथा माझा मार्ग अनुसरतील.
२४) जर मी कर्म न करीन, तर हे सर्व लोक उत्पन्न म्हणजे नष्ट होतील; आणि मी वर्णसंकर करणारा व ह्या प्रजांचा घात करणारा होईन. 
२५) ह्याकरितां अर्जुना, कर्मासक्त असलेले अज्ञानी लोक ज्याप्रमाणें कर्में करीत असतात, त्याचप्रमाणे अनासक्त अशा ज्ञानी पुरुषानेंही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेनें कर्में करावीत. 
२६) ज्ञानी पुरुषांनी कर्मामध्ये आसक्त असलेल्या अडाणी लोकांचा बुद्धीभेद करुं नये, एवढेंच नव्हे तर त्यानें स्वतः सर्व कर्में योगयुक्तपणें करीत राहून इतरांकडूनही तशीच करवावींत. 
२७) वस्तुतः सर्व कर्म प्रकृतीच्या सत्त्व, रज व तमोगुणांकडून केलीं जातात. पण अहंपणाने ज्याच्या अंतःकरणाला मोह पडलेला असतो, तो मूढ मीच कर्ता आहें असें समजतो. 
२८) परंतु हे महाबाहो अर्जुना, गुण आणि कर्में ही दोन्ही आपल्याहून भिन्न आहेत हें तत्त्व जाणणारा ( ज्ञानी पुरुष ) गुणांचा हा आपापसांत खेळ चालला आहे असें समजून त्यांत आसक्त होत नाही.
२९) प्रकृतीच्या गुणांनीं वेडावलेले लोक गुण व कर्में यांत आसक्त होतात अशा असर्वज्ञ व मंद लोकांस पूर्णज्ञानी पुरुषाने आपल्या कर्मत्यागानें भलत्याच मार्गाला लावून बिघडवूं नये.
३०) तूं आत्मनिष्ठ चित्तानें सर्व कर्में करुन मला अर्पण कर आणि फलाची आशा व ममत्वबुद्धि सोडून बिनदिक्कत युद्ध कर. 
३१) जे लोक श्रद्धावान् व दोषदृष्टिरहित होऊन, माझ्या ह्या मताप्रमाणे निरंतर वागतात, तेही कर्मबंधनापासून मुक्त होतात.
३२) परंतु जे दोषैकदृष्टीचे लोक माझें मत अनुसरीत नाहीत, ते सर्व ज्ञानविमूढ म्हणजे पक्के मूर्ख अविवेकी बुडाले असें समज.
३३) ज्ञानी पुरुष देखील आपल्या प्रकृति-स्वभावानुरुप वागतो. सर्वच प्राणी आपापल्या प्रकृतीच्या वळणावर जातात; तेथे निग्रह (जबरी) काय करणार ?
३४) इंद्रिय आणि त्याचे ( शब्दस्पर्शादि ) विषय ह्यांच्यामधील प्रीति व द्वेष ( हीं दोन्ही ) व्यवस्थित म्हणजे मूळचींच ठरलेली आहेत, या प्रीति-द्वेषांच्या ताब्यांत आपण जाऊं नये, ( कारण ) ते मनुष्याचे ( वाटमारे ) शत्रु होत. 
३५) सुखानें आचरतां येणार्‍या परधर्मापेक्षां गुणानें उणा स्वधर्मच श्रेयस्कर होय. स्वधर्मामध्यें मरण आलेलें कल्याणकारक होईल. ( परंतु ) परधर्माचें आचरण घातक असतें.
अर्जुन म्हणाला,  
३६) हे श्रीकृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसताही जणूं काय बलात्कार केल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेनें पापाचरण करितो ? 
श्रीभगावान म्हणाले,
३७) ह्या बाबतींत रजोगुणापासून उत्पन्न झालेला जो महा खादाड, व अत्यंत पापकर्मी असा हा काम किंवा क्रोध, ह्यालाच तूं या जगांतला वैरी समज.
३८) ज्याप्रमाणें धुरानें अग्नि किंवा धुळीनें आरसा झांकला जातो, किंवा गर्भ जसा वारेनें वेष्टिलेला असतो, त्याचप्रमाणें त्याने हें ज्ञान गुरफटून टाकिलेलें आहे.
३९) हे अर्जुना, तो कधींही तृप्त न होणारा अग्निच असून ज्ञानी पुरुषाच्या ह्या कामरुपी नित्य वैर्‍यानें ज्ञान आच्छादून टाकिलें आहे.
४०) इंद्रियें, मन व बुद्धि हीं कामाचीं वसतिस्थानें आहेत असे सांगितले आहे. ह्या स्थानांच्या आश्रयानें ज्ञान झांकून टाकून हा काम जीवात्म्याला मोहांत पाडितो.
४१) म्हणून हे भरत श्रेष्ठ अर्जुना, तूं आधीं इंद्रियांचें संयमन करुन ज्ञान ( अध्यात्म ) आणि विज्ञान ( विशिष्ट ज्ञान ) ह्यांचा नाश करणारा हा पापी काम नाहींसा कर ( ठार मारुन टाक).
४२) असें म्हणतात, कीं ( स्थूल बाह्य पदार्थाच्या मानानें ते पदार्थ जाणणारीं )
इंद्रियें पर म्हणजे पलीकडची इंद्रियांच्या पलीकडचें मन, मनाच्या पलीकडे ( व्यवस्थापक ) बुद्धि आणि जो बुद्धिच्याही पलीकडे तो ( आत्मा ) आहे.
४३) हे पराक्रमी अर्जुना, ह्याप्रमाणें बुद्धीहून श्रेष्ठ व पलीकडे असलेल्या आत्म्याला जाणून, आपणच आपल्याला आवरुन धरुन दुःसाध्य अशा कामरुपी शत्रूला ठार कर. 
ह्याप्रमाणें श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील ' कर्म योग ' ह्या नांवाचा तिसरा अध्याय संपूर्ण झाला. 
Meaning in English
Arjuna said,
1) If in your opinion, O Janrdana, knowledge is superior to action, then why do you, O Keshava, engage me in this terrific action (war)?
2) By (these) apparently conflicting words You seem to confuse my understanding; tell (me) definitely that one thing by which I can attain final beatitude.
God ShriKrishna Said,
3) O sinless one (Arjuna), a twofold faith has been declared by Me earlier for this human race; the way of knowledge for the Sankhyas, and the way of action for the Yogies.
4) By not doing work a person does not reach inactivity, nor does he attain perfection by mere renunciation (of action).
5) Verily, no one ever remains inactive even for a moment; for all are forcibly made to act by the qualities born of Prakruti.
6) That fool, who (outwardly) controlling the organs, of action keeps dwelling on sense objects with the mind, is called a hypocrite.
7) But he, O Arjuna, who controlling the organs by the mind, performs Karma-Yoga with the organs of action being unattached--he excels.
8) Perform the prescribed duties; for action is superior to inaction; moreover, if you are inactive, even the maintenance of your body will be impossible.
9) This world is bound by action other than that done for sacrifice; (therefore) perform actions for the sake of that, O son of Kunti, free from attachment. 
10) Prajapati, creating of yore beings who co-exist with a sacrifice, said; “By this you multiply, let this yield you covetable objects of desire.
11) " By this entertain the gods and let the gods entertain you; entertaining each other you will both attain supreme good.
12) " Being entertained by sacrifices the gods will surely bestow on you the desired enjoyments. He who enjoys what is given by them without offering it to them, is indeed a thief.
13) " The good who partake of the remnants of a sacrifice are freed from all sins; but those sinful persons who cook for their own sake, partake of sin."
14) Beings are born from food, food is produced from rain, rain comes from a sacrifice results from action.
15) Know that action originates from Brahman (the Veda), and Brahman originates from the Imperishable. Therefore the all-pervading Brahman (Veda), eternally rests in the sacrifice.
16) He who does not follow here this cycle thus set revolving, who leads a sinful life and delights in the senses, in vain, O Partha,  does he live.
17) But that person who delights only in the Self, is satisfied with the Self, is contented in the Self alone, has no duties to perform.
18) He has nothing to gain by action or (lose) by inaction in this world; nor does he depend on any being for attaining his purpose.
19) Therefore always perform action which has to be done, unattached; verily, man attains the highest by performing action unattached.                               
20) By action alone Janaka and others realized perfection. Even considering the incentive to people you should perform action.
21) Whatever a great man does others also copy; that which he accepts as authority, people only follow.
22) I have no duty to perform, O Partha, nor is there anything in the three worlds unattained which is to be attained; still I am engaged in action.
23) If ever I cease to be vigilantly engaged in action, O Partha, (then) people (would) follow My footsteps in every way.
24) If I cease doing work, these worlds would be ruined, and I should be causing an admixture of castes and destroying these beings.
25) As the ignorant perform action being attached to it, even so, O descendant of Bharata, should the wise perform action unattached, desiring the welfare of the world.
26) The wise man should not unsettle the faith of the ignorant that are attached to work. He should make them devoted to all work, performing action himself intently.
27) Actions are done in all cases by the Gunas of Prakruti. He whose mind is deluded through egoism thinks, ' I am the doer'.
28) But he who knows, O mighty-armed one, the truth as to the differentiation of the senses (Gunas) and their functions (from the Self)-he, knowing that the Gunas or senses rest in the Gunas or sense-objects, is not attached.
29) Being deluded by the constituents of Prakruti (Nature), people get attached to the senses and their functions. He who knows everything should not unsettle these people who are dull-witted and imperfect in knowledge.
30) Renouncing all actions in Me, with your mind resting on the Self, and giving up hope and idea of ownership, fight, being free from fever.
31) Those men who ever practise this teaching of Mine with faith and without cavilling, are also freed from actions.
32) But those who carp at this teaching of Mine and do not practise it- know such fools, bereft of all knowledge, to be doomed.
33) Even a wise man acts according to his own disposition; beings follow (their) nature; what can restraint do?
34) In respect of each of the senses, attachments and aversions to objects are fixed. One should not come under their sway, for they are impediments in one's way.
35) Better is one's own duty, though defective, than another's duty well performed. Death in one's own duty is better; the duty of another is fraught with fear. 
Arjun said,
36) Prompted by what, does a man commit sin, even though unwilling, O Varshneya (Shree Krishna), being constrained, as it were, by force?
God Shree Krishna said,
37) This is desire, this is anger, born of the constituent (of Prakruti called) Rajas--of inordinate appetite and most sinful. Know it to be an enemy here.
38) As fire is enveloped by smoke, as a mirror is covered by dust, as a foetus is enveloped by the amnion, even so is this covered by it.
39) O son of Kunti, knowledge is covered by this eternal enemy of the wise in the form of desire, which is like an insatiable fire.
40) The senses, the mind, and the intellect are said to be its seat; covering knowledge by these, it deludes the embodied being.
41) Therefore, controlling the senses at the very outset, O best of the Bharatas, kill this sinful thing which destroys realisation and knowledge.
42) The senses are said to be superior (to their objects); superior to the senses is the mind; but superior to the mind is the intellect; while that which is superior the intellect is the Self.
43) Thus knowing that which is beyond the intellect, and controlling the self (mind) by the self (intellect), kill, O mighty-armed one, the enemy in the form of desire, which is difficult to conquer.
Shri Mat Bhagwat GeetaAdhyay3, 
कर्मयोग अध्याय ३


Custom Search

No comments: