Monday, January 4, 2021

Shri RamCharitManas Part 68 श्रीरामचरितमानस भाग ६८

 

Shri RamCharitManas Part 68 
Doha 305 to 310 
श्रीरामचरितमानस भाग ६८ 
दोहा ३०५ ते ३१० 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

दोहा—हरषि परसपर मिलन हित कछुक चले बगमेल ।

जनु आनंद समुद्र दुइ मिलत बिहाइ सुबेल ॥ ३०५ ॥

वर्‍हाडी आणि स्वागत करणारे काही लोक परस्परांना भेटण्यासाठी आनंदाने वेगाने धावले. जणू दोन समुद्र आपली मर्यादा सोडून भेटावे तसेच ते एकमेकांना भेटले. ॥ ३०५ ॥

बरषि सुमन सुर सुंदरि गावहिं । मुदित देव दुंदुभीं बजावहिं ॥

बस्तु सकल राखीं नृप आगें । बिनय कीन्हि तिन्ह अति अनुरागें ॥

देवसुंदरी फुलांचा वर्षाव करीत गीत गात होत्या आणि देव आनंदाने नगारे वाजवीत होते. स्वागत करण्यास आलेल्या लोकांनी सर्व वस्तू दशरथांच्या समोर ठेवल्या आणि स्वीकारण्याविषयी प्रेमाने विनंती केली. ॥ १ ॥     

प्रेम समेत रायँ सबु लीन्हा । भै बकसीस जाचकन्हि दीन्हा ॥

करि पूजा मान्यता बड़ाई । जनवासे कहुँ चले लवाई ॥

राजा दशरथांनी सर्व वस्तू प्रेमाने स्वीकारल्या. नंतर त्या बक्षीस म्हणून याचकांना दिल्या गेल्या. त्यानंतर पूजा, आदर-सत्कार आणि सन्मान करुन स्वागत करणार्‍यांनी सर्वांना जानचशाकडे आणले. ॥ २ ॥

बसन बिचित्र पॉंवड़े परहीं । देखि धनदु धन मदु परिहरहीं ॥

अति सुंदर दीन्हेउ जनवासा । जहँ सब कहुँ सब भॉंति सुपासा ॥

तेथपर्यंत सुंदर वस्त्रांच्या पायघड्या घातल्या होत्या. त्या पाहून कुबेराचा-सुद्धा आपल्या संपत्तीचा अभिमान ओसरला. फार सुंदर जानवस घर दिले गेले होते. तेथे सर्वांसाठी सर्व तर्‍हेच्या सोयी-सुविधा होत्या. ॥ ३ ॥

जानी सियँ बरात पुर आई । कछु निज महिमा प्रगटि जनाई ॥

हृदयँ सुमिरि सब सिद्धि बोलाईं । भूप पहुनई करन पठाईं ॥

वर्‍हाड जनकपुरीत आल्याचे समजल्यावर सीतेने थोडा आपला महिमा प्रकट केला. तिने मनात स्मरण करुन सर्व सिद्धींना बोलावून घेतले आणि त्यांना राजा दशरथांचे अतिथ्य करण्यास पाठविले. ॥ ४ ॥

दोहा—सिधि सब सिय आयसु अकनि गईं जहॉं जनवासा ।

लिएँ संपदा सकल सुख सुरपुर भोग बिलास ॥ ३०६ ॥

सीतेची आज्ञा होताच सर्व सिद्धी जानवास घरात सर्व संपदा, सुख व इंद्रपुरीचे भोग-विलास घेऊन गेल्या. ॥ ३०६ ॥

निज निज बास बिलोकि बराती । सुरसुख सकल सुलभ सब भॉंती ॥

बिभव भेद कछु कोउ न जाना । सकल जनक कर करहिं बखाना ॥

वर्‍हाडी मंडळींनी आपापल्या राहाण्याची ठिकाणें पाहिली, तेव्हा त्यांना देवांना मिळणारी सुखें तिथे आपल्लाला सुलभ असलेली दिसली. इतक्या ऐश्र्वर्याचे रहस्य कुणालाही समजले नाही. सर्वजण राजा जनकांचा मोठेपणा सांगत होते. ॥ १ ॥

सिय महिमा रघुनायक जानी । हरषे हृदयँ हेतु पहिचानी ॥

पितु आगमनु सुनत दोउ भाई । हृदयँ न अति आनंदु अमाई ॥

हा सर्व जानकीचा महिमा आणि तिचे प्रेम ओळखून श्रीरामचंद्रांना फार आनंद झाला. आपले वडील राजा दसगरथांचे आगमन झाल्याचे ऐकून दोन्ही भावांच्या मनांतील आनंद गगनात मावत नव्हता. ॥ २ ॥

सकुचन्ह कहि न सकत गुरु पाहीं । पितु दरसन लालचु मन माहीं ॥

बिस्वामित्र बिनय बड़ि देखी । उपजा उर संतोषु बिसेषी ॥

संकोचाने ते गुरु विश्र्वामित्रांना सांगू शकत नव्हते. परंतु मनात पित्याच्या दर्शनाची लालसा होती. विश्र्वामित्रांनी त्यांची मोठी नम्रता पाहिली, तेव्हा त्यांच्या हृदयाला समाधान वाटले. ॥ ३ ॥

हरषि बंधु दोउ हृदयँ लगाए । पुलक अंग अंबक जल छाए ॥

चले जहॉं दसरथु जनवासे । मनहुँ सरोबर तकेउ पिआसे ॥

प्रसन्न होऊन त्यांनी दोघा भावांना हृदयाशी धरले. त्यांचे शरीर पुलकीत झाले आणि नेत्रांतून प्रेमाश्रू वाहूं लागले. ते त्यांना घेऊन दशरथांच्याकडे गेले. जणू सरोवरच तहानलेल्याकडे निघाले होते. ॥ ४ ॥

दोहा—भूप बिलोके जबहिं मुनि आवत सुतन्ह समेत ।

उठे हरषि सुखसिंधु महुँ चले थाह सी लेत ॥ ३०७ ॥

जेव्हा राजा दशरथांनी पुत्रांसह मुनी येत असल्याचे पाहिले, तेव्हा ते मोठ्या आनंदाने उठले व सुख-सागराचा थांग घेत निघाले. ॥ ३०७ ॥

मुनिहि दंडवत कीन्ह महीसा । बार बार पद रज धरि सीसा ॥

कौसिक राउ लिए उर लाई । कहि असीस पूछी कुसलाई ॥

पृथ्वीपती दशरथांनी मुनींची चरण-रज वारंवार आपल्या मस्तकाला लावली आणि त्यांना दंडवत प्रणाम केला. विश्र्वामित्रांनी राजाला उठवून हृदयाशी धरले आणि आशीर्वाद देऊन खुशाली विचारली. ॥ १ ॥

पुनि दंडवत करत दोउ भाई । देखि नृपति उर सुखु न समाई ॥

सुत हियँ लाइ दुसह दुख मेटे । मृतक सरीर प्रान जनु भेंटे ॥

नंतर दोघा भावांनी राजाला साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा राजांना झालेला आनंद काही विचारु नका. त्यांनी दोन्ही मुलांना छातीशी कवटाळून आपले वियोगाचे दुःख दूर केले. जणू मेलेल्या शरीरात नवचैतन्य आले. ॥ २ ॥

पुनि बसिष्ठ पद सिर तिन्ह नाए । प्रेम मुदित मुनिबर उर लाए ॥

बिप्र बृंद बंदे दुहुँ भाईं । मनभावती असीसें पाईं ॥

नंतर त्यांनी वसिष्ठांच्या चरणी मस्तक ठेवले. मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी सप्रेम आनंदाने त्यांना आलिंगन दिले. दोघा बंधूंनी सर्व ब्राह्मणांना वंदन करुन मनपसंत आशीर्वाद मिळविले. ॥ ३ ॥

भरत सहानुज कीन्ह प्रनामा । लिए उठाइ उर रामा ॥

हरषे लखन देखि दोउ भ्राता । मिले प्रेम परिपूरित गाता ॥

भरताने लहान भाऊ शत्रुघ्न याचेसह श्रीरामांना प्रणाम केला. श्रीरामांनी त्याला उचलून धरुन हृदयाशी कवटाळले. लक्ष्मण दोघा भावांना पाहून आनंदित झाला आणि प्रेमाने त्यांना मिठी घातली. ॥ ४ ॥

दोहा—पुरजन परिजन जातिजन जाचक मंत्री मीत ।

मिले जथाबिधि सबहि प्रभु परम कृपाल बिनीत ॥ ३०८ ॥

त्यानंतर परम कृपाळू आणि विनयी श्रीरामचंद्र अयोध्यावासीयांना, कुटुंबीयांना, ज्ञाति बांधवांना, याचकांना, मंत्र्यांना, मित्रांना अशा सार्‍यांना यथायोग्य पद्धतीने भेटले. ॥ ३०८ ॥

रामहि देखि बरात जुड़ानी । प्रीति कि रीति न जाति बखानी ॥

नृप समीप सोहहिं सुत चारी । जनु धन धरमादिक तनुधारी ॥

श्रीरामचंद्रांना पाहून वर्‍हाडी मंडळींना समाधान झाले. प्रेमाच्या रुपाचे वर्णन करता येत नाही. राजाचे चार पुत्र जणू धर्म, अर्थ, काम, मोक्ष हेच साकार झाल्यासारखे शोभत होते. ॥ १ ॥

सुतन्ह समेत दसरथहि देखी । मुदित नगर नर नारि बिसेषी ॥

सुमन बरिसि सुर हनहिं निसाना । नाकनटीं नाचहिं करि गाना ॥

पुत्रांसह राजा दशरथांना पाहून नगरातील स्त्री-पुरुष फारच आनंदित झाले होते. आकाशातून देव फुलांची उधळण करीत नगारे वाजवीत होते आणि अप्सरा गात गात नाचत होत्या. ॥ २ ॥

सतानंद अरु बिप्र सचिव गन । मागध सूत बिदुष बंदीजन ॥

सहित बरात राउ सनमाना । आयसु मागि फिरे अगवाना ॥

स्वागताला आलेले शतानंद, इतर ब्राह्मण, मंत्रीगण, स्तुतिपाठक, सूत, विद्वान व भाट यांनी वर्‍हाडासह दशरथ राजांचा आदत-सत्कार केला आणि त्यांचा निरोप घेऊन परत गेले. ॥ ३ ॥

प्रथम बरात लगन तें आई । तातें पुर प्रमोदु अधिकाई ॥

ब्रह्मानंदु लोग सब लहहीं । बढ़हुँ दिवस निसि बिधि सन कहहीं ॥

वर्‍हाड लग्नापूर्वीच आले असल्यामुळे जनकपुरीमध्ये आनंद पसरला होता. सर्व लोकांना जणू ब्रह्मानंद वाटत होता. ते विधात्याला विनंती करीत होते की दिवस व रात्र मोठे होवोत. ॥ ४ ॥

दोहा—रामु सीय सोभा अवधि सुकृत अवधि दोउ राज ।

जहँ तहँ पुरजन कहहिं अस मिलि नर नारि समाज ॥ ३०९ ॥

श्रीराम व सीता हे लावण्याची परिसिमा आहेत, आणि दोन्ही राजे पुण्याची. जिथे तिथे जनकपुरवासी स्त्री-पुरुष जमून असेच म्हणत होते.

जनक सुकृत मूरति बैदेही । दसरथ सुकृत रामु धरें देही ॥

इन्ह सम काहुँ न सिव अवराधे । काहुँ न इन्ह समान फल लाधे ॥

‘ जानकी ही जनक राजांच्या सुकृताची मूर्ती होय आणि दशरथांचे सुकृत, देह धारण केलेले श्रीराम होत. या दोन्ही राजांसारखी शिवांची आराधना कुणीही केलेली नाही, आणि यांच्यासारखे फल कुणालाही लाभलेले नाही. ॥ १ ॥

इन्ह सम कोउ न भयउ जग माहीं । है नहिं कतहूँ होनेउ नाहीं ॥

हम सब सकल सुकृत कै रासी । भए जग जनमि जनकपुर बासी ॥

त्यांच्यासारखा या जगात कोणी झाला नाही, सध्या कुठेही नाही आणि होणारही नाही. आम्ही सर्वजण पुण्यांची खाण आहोत, म्हणूनच जगात जन्म घेऊन जनकपुरीचे निवासी झालो. ॥ २ ॥

जिन्ह जानकी राम छबि देखी । को सुकृती हम सरिस बिसेषी ॥

पुनि देखब रघुबीर बिआहू । लेब भली बिधि लोचन लाहू ॥

आणि आपण जानकी आणि श्रीराम यांचे लावण्य पाहिले. आमच्यासारख्या विशेष पुण्यात्मा कोण असणार ? आणि आता आपण श्रीरघुनाथांचा विवाह-सोहळा पाहाणार आणि नेत्रांचा पुरेपुर लाभ घेणार. ‘ ॥ ३ ॥

कहहिं परसपर कोकिलबयनीं । एहि बिआहँ बड़ लाभु सुनयनीं ।

बड़े भाग बिधि बात बनाई । नयन अतिथि होइहहिं दोउ भाईं ॥

कोकिळे प्रमाणे मधुर बोलणार्‍या स्त्रिया आपापसात बोलत होत्या की, ‘ हे सुंदरनयने, या विवाकामुळे आमचा मोठा लाभ होणार आहे.   आमचे भाग्य मोठे म्हणून विधात्याने सर्व जुळवून आणले आहे. हे दोघे भाऊ आता आपल्या नेत्रांचे पाहुणे होणार. ॥ ४ ॥

दोहा—बारहिं बार सनेह बस जनक बोलाउब सीय ।

लेन आइहहिं बंधु दोउ कोटि काम कमनीय ॥ ३१० ॥

राजा जनक हे प्रेमाने सीतेला वारंवार बोलावणार आणि कोट्यावधी कामदेवांसारखे दोघे भाऊ सीतेला घेऊन जाण्यासाठी येत राहणार. ॥ ३१० ॥

बिबिध भॉंति होइहि पहुनाई । प्रिय न काहि अस सासुर माई ॥

तब तब राम लखनहि निहारी । होइहहिं सब पुर लोग सुखारी ॥

मग त्यांचा अनेक प्रकारे पाहुणचार होणार. हे सखी, असली सासुरवाडी कुणाला आवडणार नाही ? त्यावेळी आम्ही सर्व नगरवासी श्रीराम-लक्ष्मणांना पाहून पाहून सुखावून जाऊ. ॥ १ ॥

सखि जस राम लखन कर जोटा । तैसेइ भूप संग दुइ ढोटा ॥

स्याम गौर सब अंग सुहाए । ते सब कहहिं देखि जे आए ॥

हे सखी, श्रीराम-लक्ष्मण यांची जशी जोडी आहे, तसेच राजांच्याबरोबर आणखी दोन कुमार आहेत. एक श्यामल आणि दुसरा गौरवर्णाचा आहे. त्यांचे सर्व अवयव फार सुंदर आहेत. जे लोक पाहून आलेत, ते सर्व असेच म्हणतात.’ ॥ २ ॥   

कहा एक मैं आजु निहारे । जनु बिरंचि निज हाथ सँवारे ॥

भरतु रामही की अनुहारी । सहसा लखि न सकहिं नरनारी ॥

एकजण म्हणाला, ‘ मी आजच त्यांना पाहिले. ते इतके सुंदर आहेत की जणू ब्रह्मदेवांनी त्यांना आपल्या हातांनी घडविले आहे. भरत हा श्रीरामांचेच रुप घेऊन आला आहे. स्त्री-पुरुष त्यांना सहजपणे ओळखू शकणार नाहीत. ॥ ३ ॥

लखनु सत्रुसूदनु एकरुपा । नख सिख ते सब अंग अनूपा ॥

मन भावहिं मुख बरनि न जाहीं । उपमा कहुँ त्रिभुवन कोउ नाहीं ॥

लक्ष्मण व शत्रुघ्न हे दोघे एकरुप आहेत. दोघांची 

नखशिखांत सर्व अंगे अनुपम आहेत. मनाला फार छान 

वाटतात. परंतु मुखाने त्यांचे वर्णन करता येत नाही. ॥ ४ 




Custom Search

No comments: