Saturday, January 23, 2021

Shri RamCharitManas Part 78 श्रीरामचरितमानस भाग ७८

 

Shri RamCharitManas Part 78 
Doha 350 to 353 
श्रीरामचरितमानस भाग ७८ 
दोहा ३५० ते ३५३ 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

दोहा—एहि सुख ते सत कोटि गुन पावहिं मातु अनंदु ।

भाइन्ह सहित बिआहि घर आए रघुकुलचंदु ॥ ३५० ( क ) ॥

या सर्व सुखांहून शेकडो कोटी पट आनंद मातांना मिळाला होता. कारण रघुकुलाचे चंद्रमा श्रीरघुनाथ विवाह करुन भावांसह घरी परतले होते. ॥ ३५० ( क) ॥

लोक रीति जननीं करहिं बर दुलहिनि सकुचाहिं ।

मोदु बिनोदु बिलोकि बड़ रामु मनहिं मुसुकाहिं ॥ ३५० ( ख ) ॥

माता लौकिक रीती करीत होत्या आणि वर-वधू लाजत होते. हा महान आनंद व विनोद पाहून श्रीरामचंद्र मनातल्या मनात हसत होते. ॥ ३५० ( ख ) ॥

देव पितर पूजे बिधि नीकी । पूजीं सकल बासना जी की ॥

सबहि बंदि मागहिं बरदाना । भाइन्ह सहित राम कल्याना ॥

मातांच्या मनातील सर्व कामना पूर्ण झाल्यामुळे देव व पितर यांचे व्यवस्थित पूजन त्यांनी केले. सर्वांना वंदन करुन माता हेच वरदान मागत होत्या की, भावांसह श्रीरामांचे कल्याण होवो. ॥ १ ॥

अंतरहित सुर आसिष देहीं । मुदित मातु अंचल भरि लेहीं ॥

भूपति बोलि बराती लीन्हे । जान बसन मनि भूषन दीन्हे ॥

देव गुप्तपणे आकाशातून आशीर्वाद देत होते व माता आनंदाने ते पदर भरभरुन घेत होत्या. नंतर राजांनी वर्‍हाडी लोकांना बोलाविले व त्यांना वाहने, वस्त्रे, रत्ने व आभूषणे दिली. ॥ २ ॥

आयसु पाइ राखि उर रामहि । मुदित गए सब निज निज धामहि ॥

पुर नर नारि सकल पहिराए । घर घर बाजन लगे बधाए ॥

आज्ञा मिळाल्यावर श्रीरामांना हृदयी धारण करुन ते सर्व आपापल्या घरी परतले. नगरातील सर्व स्त्री-पुरुषांना राजांनी वस्त्रे-भूषणे दिली. घरोघरी अभिनंदनासाठी वाद्ये वाजू लागली. ॥ ३ ॥

जाचक जन जाचहिं जोई । प्रमुदित राउ देहिं सोइ सोई ॥

सेवक सकल बजनिआ नाना । पूरन किए दान सनमाना ॥

याचक जे जे मागत होते, ते ते राजा प्रसन्न मनाने देत होते. सर्व सेवकांना व वादकांना राजांनी नाना प्रकारची दाने दिली आणि त्यांचा सन्मान करुन त्यांना संतुष्ट केले. ॥ ४ ॥  

दोहा—देहिं असीस जोहारि सब गावहिं गुन गाथ ।

तब गुर भूसुर सहित गृहँ गवनु कीन्ह नरनाथ ॥ ३५१ ॥

सर्वांनी वंदन करुन आशीर्वाद दिले आणि ते गुणगान करु लागले. तेव्हा गुरु व ब्राह्मण यांच्या समवेत राजा दशरथांनी महालामध्ये प्रवेश केला. ॥ ३५१ ॥

जो बसिष्ट अनुसासन दीन्ही । लोक बेद बिधि सादर कीन्ही ॥

भूसुर भीर देखि सब रानी । सादर उठीं भाग्य बड़ जानी ॥

वसिष्ठांनी ज्या ज्या प्रकारे आज्ञा दिली, त्याप्रमाणे लौकिक व वैदिक विधीनुसार राजाने आदराने सर्व केले. ब्राह्मणांची झालेली गर्दी पाहून सर्व राण्या आपले भाग्य समजत आदराने उठून उभ्या राहिल्या. ॥ १ ॥

पाय पखारि सकल अन्हवाए । पूजि भली बिधि भूप जेवॉंए ॥

आदर दान प्रेम परिपोषे । देत असीस चले मन तोषे ॥

ब्राह्मणांचे चरण धुऊन व त्यांना स्नान घालून राजांनी व्यवस्थितपणे त्यांचे पूजन करुन त्यांना भोजन दिले. आदर, दान आणि प्रेमामुळे तृप्त झालेले ते ब्राह्मण मनापासून आशीर्वाद देत गेले. ॥ २ ॥

बहु बिधि कीन्हि गाधिसुत पूजा । नाथ मोहि सम धन्य न दूजा ॥

कीन्हि प्रसंसा भूपति भूरी । रानिन्ह सहित लीन्हि पग धूरी ॥

राजा दशारथांनी विश्र्वामित्रांची अनेक प्रकारे पूजा केली आणि म्हटले, ‘ हे नाथ, माझ्यासारखा भाग्यवान कोणी दुसरा नाही.’ राजांनी त्यांची खूप स्तुति केली आणि राण्यांच्यासह त्यांची चरणधूली घेतली. ॥ ३ ॥

भीतर भवन दीन्ह बर बासू । मन जोगवत रह नृपु रनिवासू ॥

पूजे गुर पद कमल बहोरी । कीन्हि बिनय उर प्रीति न थोरी ॥

त्यांना महालामध्ये राहण्यासाठी उत्तम स्थान दिले. तेथून राजा व सर्व अंतःपुर त्यांच्या मनाप्रमाणे सर्व होते की नाही हे पाहू शकत होते. नंतर राजांनी गुरु वसिष्ठांच्या चरण कमलांची पूजा करुन त्यांची स्तुति केली. तेव्हा त्यांच्या मनात खूप प्रेम होते. ॥ ४ ॥

दोहा—बधुन्ह समेत कुमार सब रानिन्ह सहित महीसु ।

पुनि पुनि बंदन गुर चरन देत असीस मुनीसु ॥ ३५२ ॥

वधूंच्यासह सर्व राजकुमार व राण्या यांच्यासह राजा दशरथ                                                         

 गुरुंच्या चरणांनी वारंवार वंदन करीत होते आणि मुनीश्र्वर त्यांना आशीर्वाद देत होते. ॥ ३५२ ॥

बिनय कीन्हि उर अति अनुरागें । सुत संपदा राखि सब आगें ॥

नेगु मागि मुनिनायक लीन्हा । आसिरबादु बहुत बिधि दीन्हा ॥

दशरथ राजांनी अत्यंत प्रेमपूर्ण मनाने आपले पुत्र व सर्व संपत्ती मुनी वसिष्ठांच्या समोर ठेवून त्यांचा स्वीकार करण्याची त्यांना विनंती केली, परंतु मुनिराजांनी कुलगुरु म्हणून आपली दक्षिणा तेवढी मागितली आणि अनेक आशीर्वाद दिले. ॥ १ ॥

उर धरि रामहि सीय समेत । हरषि कीन्ह गुर गवनु निकेता ॥

बिप्रबधू सब भूप बोलाईं । चैल चारु भूषन पहिराईं ॥

नंतर वसिष्ठ, सीता व राम यांना आपल्या हृदयात ठेवून आनंदाने आपल्या आश्रमात गेले. राजांनी सर्व ब्राह्मण-स्त्रियांना बोलाविले आणि त्यांना सुंदर वस्त्राभूषणे दिली. ॥ २ ॥

बहुरि बोलाइ सुआसिनि लीन्हीं । रुचि बिचारि पहिरावनि दीन्हीं ॥

नेगी नेग जोग सब लेहीं । रुचि अनुरुप भूपमनि देहीं ॥

मग नगरातील सर्व सुवासिनींना बोलावले आणि त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना वस्त्रे दिली. अहेर घेणारे आपला अहेर घेत होते आणि राजांचे शिरोमणी असलेले दशरथ त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना देत होते. ॥ ३ ॥

प्रिय पाहुने पूज्य जे जाने । भूपति भली भॉंति सनमाने ॥

देव देखि रघुबीर बिबाहु । बरषि प्रसून प्रसंसि उछाहू ॥

जे प्रिय व पूज्य आप्तजन होते, त्यांना राजांनी चांगल्या प्रकारे सन्मानित केले. देवगण श्रीरामांचा विवाह पाहून उत्सवाची प्रशंसा करीत फुले उधळत, ॥ ४ ॥

दोहा—चले निसान बजाइ सुर निज निज पुर सुख पाइ ।

कहत परसपर राम जसु प्रेम न हृदयँ समाइ ॥ ३५३ ॥

नगारे वाजवत मोठे सुखावून आपापल्या लोकी गेले. ते परस्परांना श्रीरामांची कीर्ती सांगत होते. त्यांच्या हृदयात प्रेम मावत नव्हते. ॥ ३५३ ॥

सब बिधि सबहि समदि नरनाहू । रहा हृदयँ भरि पूरि उछाहू ॥

जहँ रनिवासु तहॉं पगु धारे । सहित बहूटिन्ह कुअँर निहारे ॥

सर्वांचा सर्व प्रकारे प्रेमाने यथोचित आदर-सत्कार केल्यामुळे राजा दशरथांच्या मनात आनंद भरुन गेला. ते अंतःपुरात गेले आणि त्यांनी मुला-सुनांना पाहिले. ॥ १ ॥

लिए गोद करि मोद समेता । को कहि सकइ भयउ सुखु जेता ॥

बधू सप्रेम गोद बैठारीं । बार बार हियँ हरषि दुलारीं ॥

राजांनी आनंदाने मुलांना मांडीवर घेतले. त्यावेळी त्यांना जे सुख वाटले, त्याचे वर्णन कोण करु शकेल ? नंतर त्यांनी सुनांना प्रेमाने मांडीवर घेतले आणि वारंवार आनंदित होऊन त्यांचे कोडकौतुक केले. ॥ २ ॥

देखि समाजु मुदित रनिवासू । सब कें उर अनंद कियो बासू ॥

कहेउ भूप जिमि भयउ बिबाहू । सुनि सुनि हरषु होत सब काहू ॥

हा सोहळा पाहून अंतःपुर प्रसन्न झाले. सर्वांच्या मनात आनंद दाटला. तेव्हा राजाने विवाह कसा झाला, त्याचे वर्णन केले, ते ऐकताना सर्वांना आनंद झाला. ॥ ३ ॥

जनक राज गुन सीलु बड़ाई । प्रीति रीति संपदा सुहाई ॥

बहुबिधि भूप भाट जिमि बरनी । रानी सब प्रमुदित सुनि करनी ॥

दशरथांनी जनकांचे गुण, शील, महत्त्व, प्रेमाची रीत आणि

 ऐश्र्वर्य यांचे वर्णन एखाद्या भाटाप्रमाणे अनेक प्रकारे

 केले. जनकांचे कर्तृत्व ऐकून सर्व राण्या फार प्रसन्न

 झाल्या. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: