Shri Pandurangashtakam
This Stotra is a very beautiful creation of Shri Param Pooja Adi Shankaracharya. This stotra is in Sanskrit. It is a praise of God Panduranga who is standing on a brick for his devotees, to give them blessings, peace and happiness and every thing they deserve. God Panduranga is Lord Vishnu’s avatar. Adi Shankaracharya tells us why he worships God Panduranga.
महायोगपीठे तटे भीमरथ्या
वरं पुंडरीकाय दातुं मुनीद्रैः ।
समागत्य तिष्टंतमानंदकदं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ १ ॥
तडिद्वाससं नीलमेघावभासं
रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् ।
वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ २ ॥
प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां
नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ३ ॥
स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे
श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।
शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ४ ॥
शरचंद्रबिबाननं चारुहासं
लसत्कुंडलक्रान्तगंडस्थलांगम् ।
जपारागबिंबाधरं कंजनेत्रम्
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ५ ॥
किरीटोज्ज्वलत्सर्वदिक् प्रान्तभागं
सुरैरर्चितं दिव्यरत्नैरमर्घ्यैः ।
त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ६ ॥
विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं
स्वयं लीलया गोपवेषं दधानम् ।
गवां वृंदकानन्दनं चारुहासं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ७ ॥
अजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं
परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ८ ॥
स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदं ये
पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् ।
भवांबोनिधिं तेऽपि तीर्त्वाऽन्तकाले
हरेरालयं शाश्र्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥
॥ इति श्री परम पूज्य शंकराचार्यविरचितं श्रीपांडुरंगाष्टकं संपूर्णं ॥
मराठी संक्षिप्त अर्थः१) भीमानदीच्या तीरावर महायोगाचे अधिष्ठान असलेल्या पंढरपूर क्षेत्रांत पुंडरीकाला वर देण्याकरीता श्रेष्ठ मुनींनसह येऊन तिष्टत असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
२) ज्याची वस्त्रे विद्दुलतेप्रमाणे पिवळ्या रंगाची आहेत, ज्याची अंगकांती नीळ्यामेघाप्रमाणे शोभत आहे, जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे, जो चित्प्रकाश आहे, जो सर्वश्रेष्ठ व भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर उभा आहे अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
३) त्याला अनन्यभावाने शरण येणार्या भक्तांना भवसागर हा फक्त कमरेइतकाच खोल आहे. तो सहज पार करता येतो. हे सांगण्याकरता त्याने कमरेवर हात ठेवले आहेत. ब्रह्मदेवाचा सत्यलोक हा कमरेपासून नाभिस्थान जितके उंच आहे त्यापेक्षा अधिक दूर नाही हे दाखवण्यासाठी त्याने आपली बोटे नाभिस्थानाकडे वळवली आहेत अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
४) आपल्या गळ्यांत कौस्तुभमणी घातल्याने जो अतिशय शोभून दिसत आहे, ज्याच्या बाहूंवर केयूर म्हणजे बाजुबंद शोभत आहेत, ज्याच्याजवळ श्री म्हणजे लक्ष्मीचा निवास आहे. जो लोकांचा पालनकर्ता आहे, अशा त्या परम शांत मंगलमय सर्वश्रेष्ठ व स्तुति करण्यास योग्य असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
५) शरदऋतूंतील चंद्रबिम्बाप्रमाणे अत्यंत रमणीय मुख असलेल्या, मुखावर सुंदर हास्य विलसत असलेल्या, कानांत कुंडले घातल्याने त्यांची शोभा गालावर झळकत असलेल्या, आोठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त वर्ण असलेल्या व कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
६) ज्याच्या मस्तकावर असलेल्या मुकुटाच्या प्रभेने मुखाभोवतालच्या सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत, दिव्य आणि अमूल्य रत्ने अर्पण करुन देव ज्याची पूजा करतात, बाळकृष्णरुपाने जो तीन ठिकाणी वाकून उभा आहे, ज्याच्या गळ्यांत वनमाला व मस्तकावर मोरपिसांचा तुरा शोभत आहे त्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
७) सर्व विश्र्व व्यापून राहणार्या, वेणु वाजवीत वृन्दावनात फिरणार्या, ज्याचा कोणाला अतं लागत नाही, लीलेने गोपवेष धारण केलेल्या, गायींच्या कळपाला आनंद देणार्या मधुर हास्य करणार्या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
८) ज्याला जन्म नाही, जो रुक्मीणीचा प्राणाधार आहे, भक्तांसाठी परम विश्रामधाम व शुद्ध कैवल्य असलेल्या, जागृति, स्वप्न व सुषुप्ति किंवा बाल्य, तारुण्य व वार्धक्य ह्या तीनही अवस्थांच्या पलीकडे असलेल्या, नेहमी प्रसन्न, शरणागतांचे दुःख हरण करणारा व देवांचाही देव असलेल्या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
९) अत्यंत पुण्यदायक असलेले, पांडुरंगाचे हे स्तोत्र जे कोणी एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक नित्य पठण करतील ते सर्वजण अन्तकाळी भवसागर सहजपणे तरुन जातील आणि त्यांना परब्रह्मस्वरुप श्रीहरीच्या-पांडुरंगाच्या शाश्र्वत स्वरुपाची प्राप्ती होईल.
अशा रीतीने परम पूज्य शंकराचार्यांनी रचिलेले हे पांडुरंगाष्टकं पुरे झाले.
संदर्भ: सद्विचार दर्शन यांनी प्रकाशित केलेल्या प्रार्थना प्रीति या पुस्तकांमधून मराठी अर्थाचा स्वैर साभार अनुवाद.
1) Astrology
Kanya rashi
Budha is owner of this kanya rashi. Persons in whose horoscope moon is in Kanya rashi are found brilliant, capable, and imaginative, nimble and at times hot tempered. They are found selfish and very practical. Kanya rashi has control over our large and small intestine. These people may suffer from indigestion and other diseases relating to stomach and intestine.
2) Thought for the Day
Honest labour bears a sweet fruit.
3) Success
Successful people always consider themselves as students and they keep on learning from their failures.
Shri Pandurangashtakam
Custom Search