Wednesday, August 29, 2012

SudarshanChakra Stotra सुदर्शनचक्र स्तोत्र

SudarshanChakra Stotra 

This SudarshanChakra Stotra is in Sanskrit. It is from Garud Purana. God Vishnu holds SudarshanChakra in his right hand’s figure. It is a very powerful weapon of God Vishnu. Here in this stotra, it is said that SudarshanChakra has many qualities, such as power to kill demons, cruel people to protect its devotees. Suchakra and Vichakra are the other names of SudarshanChakra. It has power to protect and destroy the world. Whosoever recites this very pious SudarshanChakra stotra becomes free from all his difficulties, diseases and finally reaches to Vishnu Loka.
सुदर्शनचक्र स्तोत्र 

नमः सुदर्शनायैव सहस्रादित्यवर्चसे । 
ज्वालामालाप्रदीप्ताय सहस्राराय चक्षुषे ॥ 
सर्वदुष्टविनाशाय सर्वपातकमर्दिने । 
सुचक्राय विचक्राय सर्वमन्त्रविभेदिने ॥ 
प्रसवित्रे जगद्धात्रे जगद्विध्वंसिने नमः । 
पालनार्थाय लोकानां दुष्टासुरविनाशिने ॥ 
उग्राय चैव सौम्याय चण्डाय च नमो नमः । 
नमश्र्चक्षुःस्वरुपाय संसारभयभेदिने ॥ 
मायापञ्जरभेत्रे च शिवाय च नमोनमः । 
ग्रहातिग्रहरुपाय ग्रहाणां पतये नमः ॥ 
कालाय मृत्यवे चैव भीमाय च नमोनमः ॥ 
भक्तानुग्रहदात्रे च भक्तगोप्त्रे नमो नमः । 
विष्णुरुपाय शान्ताय चायुधानां धराय च ॥ 
विष्णुशस्त्राय चक्राय नमो भूयो नमो नमः । 
इति स्तोत्रं महत्पुण्यं चक्रस्य तव कीर्तितम् ॥ 
यः पठेत् परया भक्त्या विष्णुलोकं स गच्छति । 
चक्रपूजाविधिं यश्र्च पठेद्रुद्र जितेन्द्रियः । 
स पापं भस्मसात्कृत्वा विष्णुलोकाय कल्पते ॥ 
॥ इति श्रीगरुडपुराणे सुदर्शनचक्र स्तोत्रं संपूर्णम् ॥
सुदर्शनचक्रस्तोत्र मराठी अर्थ 
सहस्र सूर्यांच्यासारखे तेज असलेल्या सुदर्शनचक्राला माझा नमस्कार असो. तेजस्वी किरणांच्या मालानी प्रदीप्त असे हजारो अरे, नेत्रांप्रमाणे असलेल्या, सर्व दुष्टांचा नाश करणार्‍या आणि सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणार्‍या सुदर्शन चक्राला माझा नमस्कार असो. सुचक्र आणि विचक्र अशी नावे असलेल्या, संपूर्ण मंत्रांचा भेद करणार्‍या, जगत सृष्टिचे पालनपोषण आणि संहार करणार्‍या हे सुदर्शनचक्रा तुला माझा नमस्कार असो. संसाराचे रक्षण करण्यासाठी आणि देवतांचे कल्याण करणार्‍या, दुष्ट राक्षसांचा विनाश करणार्‍या, उग्र आणि प्रचंड स्वरुप दुष्टांच्या संहारासाठी आणि सौम्य स्वरुप सज्जनांसाठी हे सुदर्शनचक्रा तुला वारंवार नमस्कार असो. जगतासाठी नेत्रस्वरुप होऊन संसार भयाचा नाश आणि मायारुपी पिंजर्‍याचा भेद कल्याणकारी सुदर्शनचक्राला नमस्कार असो. ग्रह तसेच अतिग्रहस्वरुप, ग्रहपति, कालस्वरुप, मृत्युस्वरुप, पापी लोकांसाठी अतिभयंकर असलेल्या सुदर्शनचक्राला नमस्कार असो. भक्तांवर कृपा करणार्‍या, त्यांच्यासाठी रक्षक असलेल्या, विष्णुस्वरुप असलेल्या, शांतस्वभावी, सर्व आयुधांची शक्ती आपल्यांत धारण करणार्‍या, हे सुदर्शनचक्रा ! हे विष्णुच्या आयुधा तुला माझा वारंवार नमस्कार असो. हे शंकरा ! सुदर्शनचक्राच्या या महापुण्यशाली स्तोत्राचा जो माणूस भक्तीभावाने पाठ करतो; तो विष्णुलोक प्राप्त करतो. अशा प्रकारे श्रीगरुड पुराणांतील हे सुदर्शनचक्र स्तोत्र पुरे झाले.
SudarshanChakra Stotra 
सुदर्शनचक्र स्तोत्र 


Custom Search
Post a Comment