Saturday, October 12, 2013

Ratri Sukta (Marathi) रात्रीसूक्त (मराठी)


Ratri Sukta (Marathi) 
Original Ratri Sukta is in Sanskrit. Here it is tried to do it’s lyrics in Marathi. It may not be a perfect but the attempt is good. It is uploaded for the benefit of many devotees who wanted it in Marathi. It is the praise of Goddess Ratri Devi (Durga). It is very important in performing Sapta Shati Path. 


रात्रीसूक्त (मराठी) 
नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला । 
करालवदनेला, कालीला नमितो दुष्टग्रहविनाशिनीला । 
नमितो रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ॥ १ ॥ 
हाती खङ्ग खेट धारिणीला नमितो त्या भयानक देवीला । 
संरक्षणास भक्तलोका हाती धरी ती वरदाभयमुद्रा । 
नमितो रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ॥ २ ॥ 
हाती शंख, चक्र, गदा चाप धारिणीला । 
चतुर्भुज अष्टभुज आणि द्विभुज देवीला । 
शत्रुमर्दिनीला देवीला रात्रीदेवीला । 
नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ॥ ३ ॥ 
अठराहस्त लक्ष्मीला दशहस्त सरस्वतीला । 
सर्व संपदा दात्रीला सर्व विद्या दात्रीला । 
नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ॥ ४ ॥ 
हजार हात हजार चरण हजार मुखलोचनेला । 
हजार मुकुटेधारिणीला हजार चरणाम्बुजेला । 
नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ॥ ५ ॥ 
कमलयोनिमुखारुढेला विष्णुवक्षः स्थित देवीला । 
शिवांकावरील गौरीला त्रयात्मिकेला देवीला । 
नमितो रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ॥ ५ ॥ 
उग्र वैष्णवी देवीला कुलाला शोभित करणार्‍या देवीला । 
रक्ताक्षी निर्दहतीला देवीला सिंहवाहन देवीला । 
नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ॥ ६ ॥ 
मधुकैटभ संहारिणीला देवीला महिषासुर मर्दिनीला देवीला । 
शुंभनिशुंभ वधयित्रीला देवीला । 
नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ॥ ७ ॥ 
इंद्रादिदेवतांच्या सर्व शक्तिस्वरुपेला देवीला । 
सूर्यादिग्रहमण्डलाच्या सर्व शक्तिस्वरुपेला देवीला । 
नमितो मी रात्रीदेवीला शरणागतभक्तवत्सलेला ॥ ८ ॥ 
रात्री तीनवेळा प्रत्येक दिवशी । 
या रात्रीसूक्ताचा पाठ करावा । 
भूत प्रेत पिशाच चोर सर्पयांचा विनाश होई । 
निःसंशय होई रात्रीदेवी कृपेने ॥ ९ ॥ 
॥ इति श्री मराठी अनुवादित रात्रीसूक्तम् समाप्त ॥

Ratri Sukta (Marathi) 
रात्रीसूक्त (मराठी)


Custom Search

No comments: