ShivShadakshar Stotram
ShivShadakshar Stotram is in Sanskrit. It is from Rudrayamal. It has arisen from the discussion in between Goddess Uma and God Maheshwar. The pious and powerful Mantra “Om Namaha Shivay “is a six letter word and each letter has its’ piousness and power since it is attached to the name of God Shiva. Further each letter represents many virtues of God Shiva. When this stotra is recited in the presence of God Shiva (in Shiva Temple); at the end of such devotee’s life he receives Moksha.
शिवषडक्षरस्तोत्रम्
ॐकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः ।
कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नमः ॥ १ ॥
नमन्ति ऋषयो देवा नमन्त्यप्सरसां गणाः ।
नरा नमन्ति देवेशं नकाराय नमो नमः ॥ २ ॥
महादेवं महात्मानं महाध्यानपरायणम् ।
महापापहरं देवं मकाराय नमो नमः ॥ ३ ॥
शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकम् ।
शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः ॥ ४ ॥
वाहनं वृषभो यस्य वासुकिः कण्ठभूषणम् ।
वामे शक्तिधरं देवं वाकाराय नमो नमः ॥ ५ ॥
यत्र यत्र स्थितो देवः सर्वव्यापी महेश्र्वरः ।
यो गुरुः सर्वदेवानां यकाराय नमो नमः ॥ ६ ॥
षडक्षरमिदं स्तोत्रं यः पठेच्छिवसंनिधौ ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते ॥ ७ ॥
॥ इति श्रीरुद्रयामले उमामहेश्र्वरसंवादे
शिवषडक्षरस्तोत्रं संपूर्णम् ॥
शिवषडक्षर स्तोत्र मराठी अर्थः १) ज्या बिन्दुसंयुक्त ' ॐ 'काराचे योगिलोक निरंतर ध्यान करतात, त्या सर्व ईच्छा आणि मोक्षसुद्धा देणार्या ' ॐ ' कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो.
२) ' न ' कारस्वरुप भगवान शंकरांना् ऋषि, देव, अप्सरा आणि मनुष्य नमस्कार करतात. त्या ' न ' कारस्वरुप देव देवेश भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो.
३) ते देवतांमध्ये महान आहेत. सर्वश्रेष्ठ असे महात्मा आहेत. जे नेहमी महासमाधि मध्ये असतात, जे सर्व महापापांचा नाश करतात, ' म ' कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो.
४) जे या विश्र्वाचे परम कल्याणकर्ते आहेत, जे नेहमी शांत स्वरुपांत असतात, जे या विश्र्वाचे नाथ आहेत, त्या ' शि ' कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो.
५) वृषभ हे ज्यांचे वहान आहे, नागराज वासुकी ज्यांच्या कंठाचे भूषण आहे, ज्यांच्या डाव्या बाजूला शक्तिरुप पार्वती आहे, ' वा ' कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो.
६) सर्वत्र व्यापून असणारे जे देवांचे देव आणि गुरु आहेत अशा ' य ' कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो.
७) जो कोणी या षडक्षर स्तोत्राचा पाठ शिवाच्या सन्निध (मंदिरांत) बसून करतो, तो अंती शिवलोकास वास करतो.
अशा रितीने उमा-महेश्र्वर संवादांत श्रीरुद्रमलायांत असलले शिवषडक्षर स्तोत्र पूर्ण झाले.
ShivShadakshar Stotram
शिवषडक्षरस्तोत्रम्
Custom Search
No comments:
Post a Comment