Friday, September 26, 2014

ShriShantaDurga Stotra श्रीशांतादुर्गा स्तोत्रShriShantaDurga Stotra 
ShriShantaDurga Stotra is in Marathi. It is a very beautiful creation of Param Poojya Vasudevanand Saraswati who was a great devotee of God Dattatreya. Goddess Shanta Durga Temple is at Keloshi in Goa. This Stotra is created by P.P Vasudevanand Saraswati while he was in Goa and went in the temple for darshan.
श्रीशांतादुर्गा स्तोत्र
नमोस्तु ते देवि जगन्निवासे ।
सच्चिद्विलासे सुमनोज्ञहासे ।।
ह्या सेवकाची परिसें विनंती ।
धरुनि कारुण्यलवा स्वचित्तीं ॥ १ ॥
ब्रह्मांड हे निर्मिसि तूं महेशी ।
चिच्छक्ति तूं हेतु न केवि होशी ।।
उत्पत्ति-रक्षा-प्रलयादि हेतू ।
ती तूं करी हा मम पूर्ण हेतू ॥ २ ॥
उपासना नित्य तुझी घडावी ।
त्वत्पादभक्ती हृदयी जडावी ॥ 
मुखी तुझे नाम वसो सदैव ।
जे शीघ्र वारी भजतां कुदैव ॥ ३ ॥
मी पापि आहे जरि का कुबुद्धि ।
तरी मला देऊनि तूं सुबुद्धि ॥
बुद्धिप्रकाशे मज तारि ईशे ।
धीशे शिरी हस्त धरी ञ्यधीशे ॥ ४ ॥
तापत्रया तूं निववी भवानी ।
पापत्रया तूं शमवी मृडानी ॥
शर्वाणि सर्वार्ति हरी सदैव ।
रुद्राणि माझे शमवी कुदैव ॥ ५ ॥
रुद्राणि हृद्रोग हरी अशेष ।
शर्वाणि आपत्ति हरी अशेष ॥
दारिद्र्य दुःखौघभवा निवारी ।
अरिष्ट वारोनि अमित्र वारी ॥ ६ ॥
तारी शांते दुर्व्यसनी सनातनी ।
वारी भवाब्धीतुनि तूं चिरंतनी ॥
कुसंग वारी मज देई सन्मती ।
सुसंगयोगे मज देई सद्गती ॥ ७ ॥
न लाभ मागे विजया न मागे ।
उत्कर्ष मागे न सुकीर्ति मागे ॥
मागें तुझे पाद हृदीं असावे ।
त्वत्पादिं मच्चित्त सदा वसावें ॥ ८ ॥
कृपाकटाक्षे पहातां न तोटा ।
तुझा मला होईल लाभ मोठा ॥
तेव्हा कृपादृष्टिलवें शिवे तूं ।
मला निरीक्षी हरि जन्महेतू ॥ ९ ॥
केळोशीत जी निवसे ।
शांतादुर्गाऽभिधा असे ॥
तिची स्तुती करी यती ।
वासुदेव सरस्वती ॥ १० ॥
॥ इति प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्रीशांतादुर्गा स्तोत्र संपूर्ण ॥
आभार शुभदा रेगे आणि वासुदेवाश्रम पुणे      
ShriShantaDurga Stotra 
श्रीशांतादुर्गा स्तोत्र


Custom Search
Post a Comment